Skip to main content

उत्सव रानफुलांचा

योगेश२४ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
जास्वंद गेंद Eriocaulon Sedgewickii पिवळी अबई_Reinwardtia indica शंकासूर शंकासूर शंकासूर शंकासूर कारवी_Carvia callosa सोनकुसुम_Cosmos कुर्डु_Celosia argentea बोगनवेल बॉटलब्रश एक्झोरा/रुक्मीणी मदाम_Abutilon Ppresicum कुसुंबी विष्णुक्रांत डिंगळा_Crotalaria spectabilis सोनकी घाणेरी_Lantana Camara संक्रांत वेल पांढरा कुडा तामण तामण टिकोमा पांढरी लिली निलवंती_Cyanotis Faciculata दशमुळी_Eranthemum Roseum शिंदळवान/रानहळद_Curcuma pseudomontana निळी पुंगळी_Lpomoea Nil इंद्रनील मोतिया गंगी कवळा पेव पानशिंग कोरांटी
लेखनविषय:
योगेश२४

ज्या फुलांची नावे माहित होती/मिळाली ती टाकलेली आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. :)
08/10/2010 - 21:55 Permalink
जिप्सी

योगेश सगळे फोटो मस्त आहेत्,वेळ काढून एकदा रायरेश्वराच्या पठारावर जाउन या. (मी पण येतो!) अजून फुल मिळतील बघायला. अवांतर :- श्रीकांत इंगळहळ्ळीकरांच फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री वाचलयं का नाही? नक्की वाचा.
08/10/2010 - 23:24 Permalink
मुक्तसुनीत

सुंदर फोटो. हे सगळे कासच्या पठारावरचे आहेत काय ? :-)
08/10/2010 - 23:30 Permalink
बेसनलाडू

पाहून डोळे तृप्त झाले. (आस्वादक)बेसनलाडू
09/10/2010 - 01:31 Permalink
चित्रा

पेव फुटले असे का म्हणतात ते आता कळले. फार सुंदर फोटो.
09/10/2010 - 02:17 Permalink
नंदन

In reply to by चित्रा

पेव फुटले असे का म्हणतात ते आता कळले.
असेच म्हणतो. सुरेख फोटो!
09/10/2010 - 12:36 Permalink
मृत्युन्जय

अशक्य फोटो आहेत हे. निसर्गात ठायी ठायी किती सैंदर्य लपले आहे ते एरवी आपण न्याहाळत नाही हे या छायाचित्रांमुळे पटले. कुठला कॅमेरा वापरता तुम्ही?
09/10/2010 - 10:20 Permalink
अस्मी

वाह!! अप्रतिम...सुंदर!! पांढरी लिली आहे ना तसं माझ्या घरी एक फूल येतं, त्याला आम्ही नागदोणी म्हणतो...हे दोन्ही एकच का? - अस्मिता
09/10/2010 - 11:21 Permalink
श्रावण मोडक

कलादालन समृद्ध करणारा आणखी एक धागा.
09/10/2010 - 11:55 Permalink
योगेश२४

प्रतिक्रियेंबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!! जिप्सी अधिक माहितीबद्दल धन्यवाद. रायरेश्वराच्या पठावर जायचे अजुन. बघु केंव्हा मुहुर्त मिळतोय. :) श्रीकांत इंगळहळ्ळीकरांच फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री वाचलयं का नाही? नक्की वाचा.>>>>नक्कीच. धन्यवाद. हे सगळे कासच्या पठारावरचे आहेत काय ?>>>सगळेच फोटो कासच्या पठारावरील नाही. यातील बरेचसे शिवनेरी, रायगड, सिंहगड, पेठचा किल्ला, जव्हार इ. ठिकाणचे आहेत. निसर्गात ठायी ठायी किती सैंदर्य लपले आहे ते एरवी आपण न्याहाळत नाही हे या छायाचित्रांमुळे पटले. >>>अगदी खरंय मृत्युंजय :) कुठला कॅमेरा वापरता तुम्ही?>>>Canon EOS 1000D त्याला आम्ही नागदोणी म्हणतो...हे दोन्ही एकच का?>>>मधुमतीजी, जर फोटो असेल तर टाका ना, मी चेक करून सांगतो. भारतातलीच आहेत की ईतर कुठली?>>>मराठमोळा, हि सगळी फुले आपल्या महाराष्ट्रातीलच आहे :) कलादालन समृद्ध करणारा आणखी एक धागा.>>>मनापासुन धन्यवाद.
11/10/2010 - 11:36 Permalink
नगरीनिरंजन

अप्रतिम फोटो! डोळ्याचे पारणे फिटले. घाणेरी म्हणजेच टणटणीचे फूल का? टणटणीची फुलेही अशीच दिसतात आणि एकदम छोट्या छोट्या फुलांचा गुच्छ असतो.
11/10/2010 - 11:42 Permalink
जागु

तु काढलेल्या फोटोंना प्रतिसाद द्यायला शब्दच नसतात. तुला एवढ्या सगळ्या फुलांची नाव कशी माहीत ? योगेश इंद्रनिलच्या खालची कसई आहे. तु ज्याला ताम्हण म्हणतोस त्याला आम्ही खोबर्‍याची. फुल म्हणतो.
11/10/2010 - 13:27 Permalink
गणपा

योगेश एकदम जबरा कलेक्शन केल आहेस. बर्‍याच फुलांची फक्त नावंच माहित होती (पाहिली नव्हती.), तर काही पाहिलेल्या फुलांची नावं ठाउक नव्हती.
11/10/2010 - 14:20 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर फोटोज! अवांतरः यातली अर्ध्याधिक फुलं आमच्या कँपसवरही दिसतात. पण मी येवढे चांगले फोटो काढूच शकत नाही.
11/10/2010 - 19:00 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर फोटोज! अवांतरः यातली अर्ध्याधिक फुलं आमच्या कँपसवरही दिसतात. पण मी येवढे चांगले फोटो काढूच शकत नाही.
11/10/2010 - 19:00 Permalink
पिवळा डांबिस

फुलांचे फोटो खरंच खूप सुरेख आले आहेत.... पांढर्‍या लिलीला आपल्याकडे निशिगंध असंही नांव आहे का? चूभूद्याघ्या.... बाकी रुक्मणी आणि गंगी लई आवडल्या!!! -शंकासूर :)
25/10/2010 - 22:25 Permalink