Skip to main content

खेकडे खेकडे आणि खेकडे

लेखक किल्लेदार यांनी बुधवार, 09/06/2010 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हा सर्वान्चे खेकडा - प्रेम बघून मला राहवले नाही. म्हणूनच काही अजून खेकडे पेश करतो आहे. खेकडा असा धरावा :)..... खावा कसा ते नन्तर. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10865
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

हे खेकडे नाहीत, यांना कोकणांत भरतावळे म्हणतात. भरतीच्या लाटां बरोबर हे किनार्याच्या वाळुवर येतात, आणी लगेचच ओल्या वाळुखाली लपतात. यांचा खाण्यासाठी काही उपयोग नाही - आतुन पोकळ असतात. चवही काही खास नसते.

In reply to by नेत्रेश

खेकडा जातो जीवानीशी आणि खाणारा म्हणतो पोकळ! :P (ह.घ्या) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

फोटो छानच.. फक्त आडवे खूप पसरलेत.. ते तेवढे लहान करा. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

आमच्या घरात एकजात सगळ्यांच्या (नवरा, मुलगी, सासू, मी, माझी आई) सौर किंवा चंद्र राशी खेकडा आहेत. त्यामुळे खेकडा माझा आवडता जलचर प्राणी. डेलावेअर ला लुईस ला हॉर्स शू क्रॅब्स सापडतात. डेलावेअर बे ला दक्षीण अमेरीकेतून खूप मोठ्या प्रमाणावर पक्षी स्थलांतर करून येतात. हे पक्षी आता उन्हाळ्यात कॅनडाला स्थलांतरीत होत असतात. इतकं अंतर कापल्यावर त्यांच्यात त्राण उरलेलं नसतं की "कवचवाले (शेलड) मासे" दगडावर आपटून , फोडून खायचं. मग ते हॉर्स शू क्रॅब्स ची मऊ पिल्लं खाऊन ताकद मिळवतात. http://www.abcbirds.org/abcprograms/policy/crabs/index.html मी नेहेमी नवर्‍याच्या युनिव्हर्सिटीच्या शोअर -डे ला जाते. खूप माहीती तर मिळतेच पण एक अनोखा अनुभव असतो. हॉर्स शू क्रॅबला हात लावून देतात वगैरे मजा मजा असते. पाण्यातले खेळ असतात. कुठे शिंपले खायला नमुने म्हणून स्टॉलमधे ठेवलेले असतात. बाजूलाच समुद्र. :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मुंबईच्या धुवांधार पावसात आय आय टी च्या निसर्गरम्य वातावरणाची मजा काही ओरच. : ) इतके खेकडे सापडतात पाण्यात ..... खूप सुंदर दिसतो कँपस पावसाळ्यात. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||