Skip to main content

लुटा मौज कराड - बौध्दकालीन लेण्यांच्या सफरीची ...

लेखक दशानन यांनी गुरुवार, 17/12/2009 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुरहून पुण्यासाठी निघालो होतो सकाळ सकाळी. कुठेतरी चहा घ्यावा म्हणून बाईक जरा हळूच चालवत होतो तोच डाव्याहाताला एक बोर्ड दिसला छोटासाच. बौध्दकालीन लेणी व मार्गदर्शन बाण. थोडासा विचार केला व बघू म्हणून गाडी आत वळवली. काही मिटर आत गेल्यावर रस्ता संपला. आता काहीच कळेना मार्गदर्शक बोर्ड तर इकडेच रस्ता दाखवत होता मग रस्ता गेला कुठे, एक दोन जणांना विचारले तर त्यांनी एक कच्चा रस्ता दाखवला, तो रस्ता आहे हेच मला पटत नव्हते हा विषय वेगळा. पण काही किलोमीटर आत गेल्यावर एक नितांत सुंदर अशी जागा दिसते एक पाण्याचे तळे, तळ्याच्या बाजूला एक शेडवजा बांधकाम असलेले आश्रम. बाईक तेथेच उभी केली व सरळ समोर दिसणारा डोंगरावर नजर टाकली तर येथे कुठे लेणी असावीत अशी अंधूकशी पण शक्यता दिसत नव्हती पण तरी आलोच आहोत तर चढू वरती व पाहू असा विचार केला व डोंगर चढायला सुरवात केली. अर्धा-एक तासामध्येच वर माथ्यावर आलो व नजर फिरवली तर समोरच्या डोंगरामध्ये लपलेल्या लेणी दिसू लागल्या. कप्पाळाला हात मारुन परड डोंगर उतरलो व समोरचा डोंगर चढावयास सुरवात केली. जसे जसे लेणी जवळ येत गेल्या तस तसे त्यांचे सौंदर्य खुलून दिसू लागले आता ते शब्दात व्यक्त करणे अवघडच आहे त्यांचे फोटो देत आहे तुम्हीच पहा. एकून २६ लेणी आहेत. काहीपुर्ण आहे तर काही अपुर्ण. थोडे फार अतिक्रमण येथे पण झाले आहे पण ते विठल-रुक्माई ने केले आहे म्हणून आपण माफ करु त्यांना. हे बौध्दांचे पुजास्थळ + विश्रामगृह असावे असा माझा कयास आहे. ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाही नेट वर ही थोडी शोधाशोध केली तरी हातात काहीच गवसले नाही त्यामुळे फोटो सोडून जास्त काही माहीती देउ शकत नाही. हा लेण्यांकडे जाणारा रस्त्ता. ह्यांच डोंगरामध्ये लेणी आहेत. ही लेणी संरक्षित आहेत एवढेच सांगणारा हा सरकारी फलक. देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले/) शान की सवारी ;) परतीचा प्रवास चलो पुणे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17479
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

श्री रा रा राजेजीसाहेब, आपण स्वतःच्या दुचाकीवर स्वखर्चाने प्रवास करुन एवढा खटाटोप केलात. आपल्या एकूणच कष्टाबद्दल आम्ही आपले आभार मानतो. भारतीय संस्कृतीतील मैलाचा दगड (मैला : योग्य अर्थ घ्यावा) ठरलेल्या अश्या पुरातन वास्तुंना भेट देऊन त्यांची सामान्य जनांना ओळख करुन द्यावी, ही तुमची कळकळ सरकार दरबारी पोचली असेलच. नसेल तर मारा फाट्यावर... पुरातव्त खाते हे शेवटी एक खातेच असल्याने त्यांची नाराजी मनावर घेऊ नये. शुध्दलेखन..भाषा..सर्वस्वी बाझवताना आपण आपल्या भावना (!) कमीत कमी शब्दात मांडुन आम्हाला कृतार्थ केले आहे, तसेच त्या प्रेमवीराचे नाव तुम्ही पुसुन टाकले असते, तर आम्हास आपला अधीक अभिमान वाटला असता, पण असो. छायाचित्रण आवडले हे वेगळे सांगणे न लागे. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.. तुम्ही मलेशियात नसुन महाराष्ट्रात आहात याचे भान ठेवुन दुचाकी चालवावी. ईथे माणसे फार स्वस्त आहेत. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

२-३ दिवसच झालेत मिपा'वर येऊन. मी कदाचित नवीन असेन इथे. किंवा हीच इथली रीत असेल. पण इथे काही सुंदर आणि उपयोगी माहिती दिली आहे, काहीतरी अनुभव शेअर केला आहे. फोटोचाही प्रयत्न स्तुत्य आहे. पण ती माहिती आत्मसात करणे आणि माहिती स्त्रोताचे आभार मानणे किंवा काही constructive feedback देणे यापेक्षा इतर गोष्टींवरच चर्चा अधिक झालेली/केलेली आढळते. थोडेफार गमतीदार प्रतिसाद समजू शकतो आपण. पण इथे काही सन्माननीय अपवाद वगळता बरेचसे प्रतिसाद लेखकाची (या लेखाच्या किंवा अन्य कुठल्याही) टर उडवणे या हेतूने टाकलेले दिसतात. त्याबद्दल काही सदस्यांना मी बोललोही होतो. दोन दिवसापासून कुठे लिहावे असा प्रश्न होता, पण ही पोस्ट अधिक 'हिट' आहे म्हणूनच इथे लिहिण्याचे प्रयोजन. वाचकांची भूमिका राजहंसाची असावे असे माझे प्रामाणिक मत आहे. नीर-क्षीर विवेक जागृत ठेवून हवे ते घ्यावे, नको ते सोडून द्यावे. देणारानेही माहिती पुरवत राहावी, म्हणजे ज्या अपेक्षा घेऊन आम्ही या संकेतस्थळावर प्रवेश घेतला आहे त्या पूर्ण होतील याची खात्री वाटते. (ज्याअर्थी अगदी शुद्धलेखनापर्यंत वाचन झाले आहे त्याअर्थी) माहिती देणे आणि मिळवणे हे दोन्ही उद्देश इथे सफल झालेले आहेत. त्यामुळे या चर्चेबद्दल अजिबात खिन्नता न बाळगता पुढील पोस्ट देत राहणे. आम्ही (किमानपक्षी मी तरी) वाट पाहत आहोत. आपलाच, -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com ता.क.: बिनकामाच्या किंवा अवांतर प्रतिसादांना (या प्रतिसादालासुद्धा) कचऱ्याचा डबा दाखवावा.

भटकंती, माहिती आणि फोटो सगळेच उत्तम... वरुन ३ रा फोटो एकदम बेस्ट...

दुनिया घेऊन येते आपला धागा वर.... ह्या ना त्या कारणाने. आम्हीच स्वतःच धागा वर रहावा ह्या इच्छेने हा प्रतिसाद टाकतो. उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा ;) असो, प्रतिसाद द्या. =)) बदलीन. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©