Skip to main content

वाडा वोss माय

लेखक वैशाली पंडित यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

वाडा वोss माय

माय, मला येळ वाडा वो

दादा, दे की जरा तुज्जोळचा येळ

ए मैतरनी, अगं एss भयनी,

अगं घाल की उलुसा येळ माझ्या वाडग्यात

काय म्हंता दादा,

काय म्हंता ताई,

माज्जोळ तं म्वाप वाडगा भरून सांडुस्तो

हाय की वेळ

हा हा हा

बरूबर हाय बगा तुमचं

सकाळी उठल्यापासून रात्री कवातरी

झोपूस्तो हा ss इथून तिथ्थोर

हातपाय पसारल्याला येळच येळ हाय वो,

पन एकलाच हाय

पाठचं पोटचं कुनीच न्हाई 

पांगळा हाय त्यो

आंधळा बी

कोनतरी संगट आस्लं म्हंजी कसं

दुखलं खुपलं सांगता येतंय,

मनातलं इस्कटून बोलाय येतंय

आपुनच बोलावं नि आपुनच आयकावं

कट्टाळला त्यो,

तुमच्यातला वाढा की वो माय,

माझ्या येळंला चव ईल बगा

न्हायच म्हंता व्हय?

जीवा,

..ग्येले समदे

समदेच कशे येवडे भिकारी 

एका आण्याचा की नाण्याचा बी येळ न्हाई 

माज्या वंजळीत टाकाया

आसुदे तिकडं

उद्याच्याला पुन्ना पटकूर पसरू

आन म्हनू की घसा तानून

येळ वाडा वोss माय...!

दिवाळी अंक वर्ष

वाचने 45
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by गवि

मुशो करून ठेवलंय.  

 

एका व्यक्तीचं एकापेक्षा जास्त लेखन घ्यायला हरकत नाही असं ठरवल्यास ही कविता तयार आहे. तोपर्यंत 'राखीव' असं शीर्षकात लिहून ठेवलंय.