भारतातील काही राज्यं एका आठवड्यात पाहून होतात, तर काही राज्यं पाहायला अनेक महिनेही लागू शकतात. राजस्थान हे असंच एक राज्य. हे राज्य आकारानं मोठं आहेच, त्यामुळे इथे पाहायलाही खूप काही आहे. राजस्थानमधली जयपूर, जोधपूर, उदयपूर, बिकानेर, जैसलमेर, बुंदी, तसंच जवाई बांध आणि बेरा ही ठिकाणं पाहून झाली असल्यामुळे ‘राजस्थान आता आपला सगळा पाहून झाला’ असं मनाशी म्हणत मी खूश होत असतानाच अचानक एक नाव समोर आलं - शेखावटी. शेखावटी म्हणजे राजस्थानचा ईशान्येकडचा भाग. झुंझुनू, सिकर आणि चुरू या तीन जिल्ह्यांना मिळून शेखावटी असं म्हटलं जातं. म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला बागलाण प्रांत आहे किंवा पश्चिमेला कोकण आहे, तसं काहीसं.
नाव समोर आलं आणि मी माहिती काढायला लागलो. शेखावटी भागात महनसर, रामगढ, चुरू, झुंझुनू, मंडावा, सिकर, फतेहपूर, नवलगढ, लक्ष्मणगढ अशी अनेक गावं आहेत. हा भाग म्हणजे पोद्दार, बिर्ला, बजाज, पिरामल, गोयंका अशा उद्योगी घराण्यांचा प्रदेश. दिल्ली-गुजरात या महत्त्वाच्या व्यापारमार्गावर ही गावं वसलेली होती. साधारण शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे या गावांच्या भरभराटीचा काळ. अफू, महागडी वस्त्रं, कापूस आणि मसाल्याचे पदार्थ अशा वस्तूंची खरेदी-विक्री येथे होई. या वस्तूंचा व्यापार करणारे इथले व्यापारी काही काळाने अतिशय श्रीमंत झाले आणि आपली राहायची सोय म्हणून त्यांनी या हवेल्या बांधल्या. ‘त्याने बांधली त्यापेक्षा मी चांगली बांधतो’ असं म्हणत इथे हवेल्या बांधायची स्पर्धाच सुरू झाली. शंभर-दीडशे वर्षांच्या काळात इथे जवळपास हजारो हवेल्या बांधल्या गेल्या. नंतर मात्र काळाची चक्रं फिरली आणि या सगळ्या गावांना उतरती कळा लागली. इंग्रज आले, रस्त्यांमार्गे होणारा व्यापार मंदावला आणि मुंबई, कोलकाता अशा बंदरांना महत्त्व प्राप्त झालं. व्यापार थांबला तसा या गावांमध्ये खेळणारा पैसा नाहीसा झाला, या गावांचं महत्त्व कमी झालं आणि ही गावं सोडून आणि या हवेल्या अशाच मागे टाकून हे व्यापारी कलकत्ता, दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये विसावले.
त्या काळी एका माणसाच्या मालकीच्या असलेल्या या हवेल्यांचे आज शंभर वर्षांनंतर शेकडो वारसदार झाले आहेत. त्यामुळे या हवेल्यांचे मालक नेमके कोण, त्या सांभाळणार कोण, त्यांची देखरेख ठेवणार कोण असे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत. नियमित वास्तव्य नसल्यामुळे आणि डागडुजी होत नसल्यामुळे त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आपल्या मरणाची वाट बघत बसलेल्या या देखण्या हवेल्या पाहून वाईट वाटतं आणि मन भरून येतं.
२०२५ सालच्या ऑक्टोबर महिन्यात आम्ही शेखावटी भागाची सहल केली. नेहमी लिहितो तसं प्रवासवर्णन मी इथे लिहिणार नाही. काही मोजकी छायाचित्रं टाकून या हवेल्या नेमक्या कशा आहेत याचं चित्र आपल्यासमोर उभं करण्याचा, त्यांची सौंदर्यस्थळं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हवेल्यांविषयी, या सहलीविषयी, या प्रांताविषयी आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, मी त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन.
महनसर - आम्ही राहिलो ती गढी

महनसर - स्थानिक राजांच्या छत्र्या
महनसर - सोने चांदी की दुकान

महनसर - सोने चांदी की दुकान

महनसर - सोने चांदी की दुकान
महनसर - सोने चांदी की दुकान
महनसर - सोने चांदी की दुकान
महनसर - तोलाराम जी का कमरा

रामगढ - सेठ रामगोपाल पोद्दार छत्री समूह

रामगढ - सेठ रामगोपाल पोद्दार छत्री समूह

रामगढ - सेठ रामगोपाल पोद्दार छत्री समूह

रामगढ - गंगामाई मंदिर

रामगढ - गंगामाई मंदिर

रामगढ - गंगामाई मंदिर

रामगढ - शनिदेव मंदिर

रामगढ - शनिदेव मंदिर

रामगढ - शनिदेव मंदिर

चुरू - मालजी कोठारी हवेली

चुरू - मालजी कोठारी हवेली

चुरू - एक अपरिचित हवेली
फतेहपूर - नदिन ल प्रिन्स हवेली
फतेहपूर - नदिन ल प्रिन्स हवेली

फतेहपूर - नदिन ल प्रिन्स हवेली

झुनझुनू - मोदी हवेली

झुनझुनू - मोदी हवेली

झुनझुनू - मोदी हवेली

झुनझुनू - मोदी हवेली

झुनझुनू - मोदी हवेली

झुनझुनू - मोदी हवेली

झुनझुनू - मोदी हवेली

झुनझुनू - मोदी हवेली

झुनझुनू - मोदी हवेली

मंडावा - गोयंका हवेली

मंडावा - गोयंका हवेली

मंडावा - गोयंका हवेली

मंडावा - गोयंका हवेली

मंडावा - गोयंका हवेली

मंडावा - गोयंका हवेली

मंडावा - गोयंका हवेली

मंडावा - गोयंका हवेली

नवलगढ - मोरारका हवेली

नवलगढ - मोरारका हवेली

नवलगढ - भगतोंकी हवेली

नवलगढ - भगतोंकी हवेली

नवलगढ - भगतोंकी हवेली

नवलगढ - भगतोंकी हवेली

नवलगढ - भगतोंकी हवेली

नवलगढ - भगतोंकी हवेली

मिसळपाव



प्रतिक्रिया