Skip to main content

खुल जा सिम सिम

लेखक कल्पना म्हापुसकर यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

टाइपलेला मुका संदेश
सर्वत्र होतोय वाटून
संवादाचा कोरा कागद
पार गेलाय फाटून

एकीकडून दुसरीकडे
नाही कोणी हलत 
सर्वच प्रश्नांची उत्तरे 
मेसेजवर येतात डुलत

कष्ट नाही, व्यस्त आहे 
जेवायला ना कुणी उठत
मागवलेला पास्ता, पिझ्झा 
खातात मोबाइल बघत

बोटाच्या एका दाबावर 
फवारलं जातं अत्तर 
गल्लीदिल्ली, परदेशात 
लगेच पैसा ट्रान्स्फर 

ऑनलाइन ऑफलाइन
सर्व आहे-नाहीचा खेळ
एका चौकोनी डब्ब्यात 
सारीच झालमूडी भेळ 

घड्याळ, मॅप, पैसा-पाणी 
ग्रंथ, कीर्तन, गोड कहाणी 
सण, तारीख, वार, गाणी 
शुभेच्छापत्राची चित्रवाणी 

गळाभेट झाली दुरापास्त 
एका सिमवर चाललंय मस्त 
२९९चा मंथली पॅक आहे
जीव रिझवायला फार स्वस्त

कल्पना दिलीप म्हापुसकर 
मीरारोड, ठाणे

दिवाळी अंक वर्ष

वाचने 33
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया