१. हॅप्पी दिवाळी
सोपी झालेली
बोनस घेऊन
२. फालतूच त्रास
दुष्काळ दिवाळीत
फराळाचा वास
३. आकाश कंदील
उंच जातो
अंधार पसरतो..
४. पतंग उडवत राहा
आश्वासनांच्या शेपट्या
लोंबकळत
५. प्रत्येक दिव्याचा
स्वतःभोवती उजेड
जातीयवादी
६. फटाके
आरोपांचे
ढुम्मऽ धडाम्
७. नवे कपडे
दिवाळीत
जुन्या बाजारातून
८. शुभेच्छा
सारख्याच सगळ्यांच्या
आभासी दिवाळी..
९. नरकासुर
पुढच्या दिवाळीत
पुन्हा जिवंत
१०. दिवाळीचे पोस्त
हातात पडल्यावर
वॉचमन झोपतो निवांत
दिवाळी अंक वर्ष
वाचने
61
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया