तसं काम काहीच नव्हतं
पण सहज भेटला असतास नं,
तर कदाचित थंडगार पाषाणी
अस्ताव्यस्त वादळातून
सहीसलामत सुटून
निर्जीव पिवळी पानं
सटकून टाकता आली असती
आणि कदाचित
वठलेल्या आकांक्षांना
कोवळे अंकुर फुटले असते.
कदाचित बोथट जाणिवांना
लखलखीत धार आली असती.
मरगळलेले यांत्रिक श्वास उत्स्फूर्त झाले असते
आणि कदाचित
तुझ्या अस्तित्वाच्या
ऊबदार कवडशात
क्षण दोन क्षण जगणं
हा एक
महोत्सव ठरला असता.
Email- neelambari.s.k@gmail.com
दिवाळी अंक वर्ष
वाचने
27
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया