Skip to main content

बिंब

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
सगुण साकार
पाश मी तोडिले 
तेव्हा आकळले
अमूर्तत्व
 
तोकडी त्रिमिती 
आलो ओलांडून
सोबत सोडून 
संचिताची
 
ज्ञाताचे कुंपण
भिडे अज्ञाताशी
तिथे अज्ञेयाशी
गळाभेट
 
व्याधविद्ध मृग
मावळतीपाशी
मिथक कथांशी 
नाळ तोडे 
 
चिद्‌घनवृष्टीत
चराचर चिंब
रोमरोमी बिंब
उगवले
 

 
दिवाळी अंक वर्ष

वाचने 29
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया