जलधर जमले आकाशी
जमल्या जलकुंभांच्या राशी
मेघ काळे भरुनी आले
सूर्यराज झाकुनी गेले
काळे कापूस झाले रहिवासी
झाडेझुडपे डोलू लागली
वार्यासंगे गाऊ लागली
करी ती जवळीक सुखाशी
सुख हे आकाशी बिलगले
पाहुनी आकाश गलबलले
थेंब हर्षाचे आले नयनाशी
थेंब जणू मोती झाले
मोद घेऊनी ओघळले
भुवरी पसरल्या टपोर्या राशी
- रसिका दास्ताने-सांगवीकर
दिवाळी अंक वर्ष
वाचने
52
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया