रचना १ - आभाळात चंद्राची कोवळीशी कोर गं
आभाळात चंद्राची कोवळीशी कोर गं
अंगणात सख्यांचा हादग्याला फेर गं ||
पाटावर बसलाय डौलदार हत्ती गं
हादग्याचा अंगणात रंगलाय खेळ गं ||
पाटावरच्या हत्तीला झेंडूचा हार गं
अंगणात दरवळतोय फुलांचा सुवास गं ||
हातात हात घालून धरलाय फेर गं
हादग्याच्या खेळाला चढलाय रंग गं ||
मातीच्या अंगणी चांदण्याचा सडा गं
खिरापतीच्या वाटीत कसला दडलाय सुग्रास गं?
रचना २ - माहेरचा हादगा
बाहेर नजर लाविली,
कोण गं (पाहुणा) येतो दुरुनी?
आला गं आला सखा बंधू,
डोळ्यांत आले आनंदाचे अश्रू!
"चल गं बहिणी, माहेराला जाऊ,
अंगणात बसून खिरापत खाऊ!"
सासूबाई म्हणतात, "कशाची घाई?
घरातलं काम संपलंच नाही!"
"नका ना अडवू आता वाट,
माहेरी मांडलाय हादग्याचा थाट!"
सासू म्हणती, "हट्टी ही बाई,
माहेरी नेण्याला आलीय गाडी!
जा गं सुने, माहेरा जा,
हादग्याची खिरापत भरपूर खा...."
दिवाळी अंक वर्ष
वाचने
28
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया