Skip to main content

भैरवीचा डोह

लेखक श्वेता२४ यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

वागणे माझे मला बदलून जावे वाटते
हरवले कोठे मला, मी शोध घ्यावे वाटते

पोळलो ढोंगी व लोभी माणसांच्या संगती
गर्दीमधल्या दर्दीचा मी दोस्त व्हावे वाटते

सारखी माफी मिळुनी जाहले उन्मत्त जे
न्यायदारी आज त्यांना दंड द्यावे वाटते

मोगरा चाफा गुलाबाने करा शृंगार रे
पारिजाताच्या फुलांनी मी सजावे वाटते

भूप, पूरिया अन् यमनने तारले आयुष्य जे
भैरवीच्या शांत डोही बुडुनी जावे वाटते...

दिवाळी अंक वर्ष

वाचने 35
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया