PNB Greater Noida case: Rs 35 crore missing, 25 customers complain | Delhi News - The Indian Express
या बातमीनुसार पंजाब नॅशनल बॅंक ग्रेटर नॉईडा शाखेत २५ ग्राहकांच्या खात्यातली रक्कम अचानक शून्यावर आली. काहींच्या एफ डी देखील शून्यावर आल्या.
हा फ्रॉड असेल किंवा तांत्रीक चूक असेल पण आपण ज्या विश्वासाने बॅंकेत पैसे ठेवतो त्यालाच जर असा धक्का लागला तर ग्राहकाने काय करायचे?
एखाद्याला अचानक रक्कम लागली आणि ती उपलब्ध नसेल तर होणाऱ्या नुकसानास बॅंकेला जबाबदार धरावे लागेल. पैशाअभावी उपचार मिळू शकले नाहीत म्हणून कोणी दगावले किंवा कोणाचे शैक्षणीक / करीयरचे / आयुषभराचे नुकसान झाले त र्कोणास जबाबदार धरायचे.
या अशा घटनांविरुद्ध दाद कोठे मागायची. आणि निकल मिळन्यास विलंब झाला तर ग्राहकाने जायचे कोठे?
कोणी याबाबत मार्गदर्शन करू शकेल का?
वाचने
64
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप रे ..... अवघड आहे ! …
बाप रे ..... अवघड आहे !
व्यवस्थापक आणि ५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे असे माध्यमात वाचले.
भ्रष्टाचार विरोधी पथक ही चौकशी करणार आहे !
या वरुन माझा एक जुना धागा आठवला :
बॅंकीग संगणक प्रणाली: काही प्रश्न, अनुत्तरीत....
https://www.maayboli.com/node/48181
नुकताच भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर लीक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
भारतीय बॅंका म्हटलं एकंदरीत वैयक्तिक डाटा असो वा धन ... काहीच सु-रक्षित नाही !