Skip to main content

नोव्हेंबर २०२६ । कार्तिक १९४८ । घडामोडींची चर्चा

लेखक कांदा लिंबू यांनी रविवार, 01/11/2026 17:06 या दिवशी प्रकाशित केले.

नोव्हेंबर २०२६ । कार्तिक १९४८ । घडामोडींची चर्चा

नोव्हेंबर २०२६ । कार्तिक १९४८ । घडामोडींची चर्चा 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो 🙏

या महिन्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे.

हिंदूंचा लोकप्रिय उत्सव सण दिवाळीचा याच महिन्यात येत आहे. दिवाळीआधीच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणांस सुख, समृद्धी व भरभराटीची जावो ही श्रीचरणी प्रार्थना! ज्यांच्या घरात दिवाळी साजरी होते शक्यतो त्यांच्याकडूनच दिवाळीची खरेदी करावी ही अपेक्षा.  

आज काँग्रेस प्रणित आघाडीतर्फे, व भाजपतर्फे दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारणांनी मोर्चे आयोजित करण्यात आले होते. त्यांचा केंद्रीय राजकारणावर काय प्रभाव पडतो हे पाहणे रोचक ठरेल. पुढच्या वर्षी पहिला तिमाहीत उत्तर प्रदेश व पंजाबसहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची रणनीती आणि योगी आदित्यनाथ यांची राजकीय वाटचाल कशी राहते, याची पूर्वचिन्हे या महिन्यात दिसतील का?'

यावर्षीचा पावसाळा बराचसा निराशाजनक ठरला आहे. अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. नुकत्याच आलेल्या अर्णव वादळाने मध्य पूर्व भारतात एक-दोन दिवस जोरदार पाऊस पडला असला तरी त्याचा प्रभाव sustainable नाही. परतीचा मान्सून कदाचित चार सरी पाडून जाईल पण एकूणच यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने जाणवेल हे नक्की. बंगालच्या उपसागरातील पुढच्या वादळाचे नाव उपाना ठरविण्यात आले आहे व हे नाव भारताने दिले आहे. हे वादळ लगेच, पुढच्या एक-दोन आठवड्यात येऊ शकेल का?    

२०२६ दिवाळीआधी सोने दोन लाखांवर जाईल असा वर्षभरापुर्वी माझा अंदाज होता. या वर्षाच्या सुरुवातीला सोने पावणेदोन लाखांच्या पुढे जाऊनही आले. पण नंतर उद्भवलेल्या पश्चिम आशियातील युद्धपरिस्थितीमुळे मात्र सोने अजूनही दीड लाखाच्या आसपासच घुटमळत आहे. सोन्याला पुन्हा सोन्याचे दिवस यायला अजून किती दिवस लागतील?  

यावर्षी लक्ष्मीपूजन ८ नोव्हेंबर २०२६ रोजी आहे. साधारणतः सायंकाळी आठ वाजताचा मुहूर्त आहे. लक्ष्मी ही धन-धान्य-संपत्ती-पैसा यांची देवता. दहा वर्षांपूर्वी याच दिवशी सायंकाळी आठ वाजता रोख पैशांसंबंधी देशाच्या इतिहासातील एक मोठी घटना घडली होती. तिचे बरेवाईट परिणाम काय झाले याचा आढावा, आता दशकभरानंतर घेता येईल का?

याच दिवशी शेअर बाजार व्यापाऱ्यांसाठी, लक्ष्मीपूजनाव्यतिरिक्त दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग हा तासाभराचा एक विशेष भाग असतो. या दिवशी खरेदी-विक्री करणे शुभकारक असते अशी श्रद्धा आहे. मीही नियमितपणे मुहूर्त ट्रेडिंग करतो. यावर्षी दुपारी अडीच ते साडेतीन असा मुहूर्त NSE कडून घोषित झाला आहे. त्यादिवशी काय घ्यायचे, काय विकायचे याचे नियोजन या आठवड्यात करता येईल. शेअर बाजारात प्रवेश करू इच्छिणारे कुणी मिपाकर्स व्यापारी या दिवशी ट्रेडिंग सुरु करतील का?

- कांदा लिंबू 
 

लेख वर्गीकरण

वाचने 53
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

लोकहो,

 

राखीवपेढीने  कौलहाटधनावर ( = रिझर्व्ह बँकेने कॉल मनी मार्केट वर ) जोरदार निर्बंध टाकले आहेत.

हिंदी चलचित्र : https://www.youtube.com/watch?v=2dWy1ZSd40Q

 

कौलधनबाजारात पेढ्या कायदेपूर्तीसाठी एका रात्रीपुरते पैसे उसने घेतात. सदर बाजाराचा दर अफाट असतो. पण रक्कम किरकोळ असते व मुदत तर अत्यंत किरकोळ म्हणजे काही तासांपुरतीच असते. अर्थव्यवस्था जोमात असतांना बऱ्याचदा या व्यवहारात पेढ्यांकडे बरीच रक्कम जमते. ही रक्कम रोकडीच्या स्वरूपांत असते. सध्या भारताची अर्थव्यवस्था घोडदौड करीत असल्याने पेढ्यांकडे बरीच रोकड रक्कम जमली आहे. या अतिरिक्त रकमेस गळती लागून जर ती बाजारात आली तर महागाई वाढण्याची लक्षणे आहेत. म्हणून राखीवपेढीने पेढ्यांना दम भरून ही रक्कम त्यांच्याच तिजोरीत बंदिस्त करायला लावली आहे. 

 

वरील चलचित्रानुसार नेहमी ९०% रक्कम तिजोरीत बंद हवी असते, पण ऑक्टोबरांत राखीवपेढीने फर्मान काढून ही पातळी वाढवून ९९% गच्च केली आहे. त्यामुळे अतिरिक्त रोकड खुल्या बाजारांत कमी प्रमाणावर झिरपेल.

 

मला वेगळाच संशय येतोय. जानेवारी २०२७ मध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार यांकी डॉलर सोडून भारतीय रुपयांत गुंतवणूक करणार की काय ! तसं झाल्यास रोकडेची तरलता प्रचंड वाढेल. म्हणजे पैसे अधिक उपलब्ध होतील. पण त्या प्रमाणावर वस्तू व सेवा उपलब्ध व्हायला थोडा कालावधी जावा लागेल. मध्यंतरीच्या काळांत अर्थात महागाई गगनाला भिडेल. हे टाळण्यासाठी आधीपासून रक्कमबाजार 'कोरडा' ठेवलेला बरा. 

 

तुम्हांस काय वाटतं?

 

आ.न.,

-गा.पै.


पाऊसाने महाराष्ट्राला आणि कर्नाटकालाही दणका दिला आहे. अन्न महाग होणार.

नोकऱ्यांचा प्रश्न चिघळणार आहे. आंदोलनांतून राग व्यक्त होईल.

परदेश नीती भोवऱ्यांत सापडली आहे.

जो काही विकास होत आहे तो शहरांकडे - वीज, पाणी, वाहतूक. घरे मात्र महाग. गावांत शेती बुडीत ही परिस्थिती.

परदेशी कंपन्या आमच्या खरेदीदारांवर अवलंबून आणि म्हणून मार्केट वर जाईल.