Skip to main content

तुम्ही प्रेसिडेंट ओबामा झालात तर...

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी शुक्रवार, 16/10/2009 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या प्रेसिडेंट ओबामा (काहींच्या मते 'आमचे' प्रेसिडेंट) त्याना मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्कारामुळे गाजत आहेत. खुद्द स्वतः ओबामांनाही धक्का बसला असेल त्याना नोबेल मिळाल्याचे ऐकून. असो, मिळाला एखाद्याला पुरस्कार म्हणून आपण कशाला जळा उगाचच. तर, आमचा प्रश्न हा आहे की तुम्ही प्रेसिडेंट ओबामा झालात तर १. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काय कराल? (कशी फिल्डींग लावाल?) किंवा २. मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी तुम्ही काय कराल? (कुठे कुठे शांतता प्रस्थापित कराल) वरील प्रश्नांच्या मधे 'किंवा' हा शब्द असल्याने २न्ही किंवा २ पैकी कोणत्याही १ प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. उत्तर गंभीर असायला हरकत नाही पण मग त्यातील मुद्दे सिद्ध करता यायला पाहीजेत. टवाळ उत्तरांचे नेहमीप्रमाणे स्वागतच असेल. उत्तरे कमीत कमी एका वाक्यात असावी ३०० शब्दांची प्रतिसाद खेटरे आनंदाने वाचण्यात येतील. (कमीत कमी मी तरी वाचेन) आता आमचे उत्तर. मी फक्त प्रश्न २ चे उत्तर देणार आहे. उत्तर असे: मी मराठी संकेतस्थळांवर शांतता प्रस्थापित करेन. त्यासाठी अमेरिकेत जाण्यास अयशस्वी ठरलेल्याना व्हिसा मदत केंद्र काढून मद्त करेन. माझ्या सहीमध्ये त्या मदत केंद्राची जाहीरात करेन. तर मंडळी उडुद्या फटाके. शुभ दिपावली.

वाचने 3530
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

की आता "मी मिपाचा मालक झालो तर"चं विडंबनही आलं की काय लगे हाथ! असो. मला असली स्वप्ने पडत नाहीत. असो. शांत असे मानस जयाचे । नोबेल तया मिळो न मिळो रे ।। इथे विरंगुळा होई जयाचा । मिपामालक तो बनो न बनो रे ।। आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

मराठी साईट चालू करून पुण्याला स्थाईक होईल.

In reply to by पाषाणभेद

अणि सुदलेकनाचा अभ्यास करीन हे पण लिहा. ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.

मी जर अमेरिकेचा प्रेसिडेंट ओबामा झालो तर-- मी स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याची उंची मायावतींच्या सर्वात उंच पुतळ्याच्या उंचीपेक्षा कमी करेन जेणेकरून त्या बाई अमेरिकेचा तिरस्कार करणार नाहीत आणि स्वतःचे पुतळे उभे करण्याचा उद्योग कदाचित थांबवतील... अर्थात यामुळे उत्तर प्रदेशात शांतता प्रस्थापित होईल.. :) त्यामुळे भारत सरकार माझी नोबेल पारितोषिकासाठी नक्कीच शिफारस करेल आणि मदत ही करेल! :) (केली नाही तरी अमर-लालू गेला बाजार अमिताभच्या हस्ते सत्कार करवतील...!) दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर सुचेल तसे..! --सुहास

In reply to by सुहास

=)) =)) =)) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by अमोल केळकर

=)) =)) =)) =)) आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

१. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काय कराल? (कशी फिल्डींग लावाल?) विठोबासारखा वीटेवर उभा राहीन. २. मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी तुम्ही काय कराल? (कुठे कुठे शांतता प्रस्थापित कराल) मी (पक्षी अमेरिकेच कोणताही अध्यक्ष) शांत राह्यला की जगात शांतताच असते. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

१. इंग्रजी रेषेवर लिहिले जाते (आठवा इयत्ता पाचवीत खरेदी केलेल्या त्या तीन ओळ्यांच्या वह्या). त्यामुळे इतर सगळ्या भाषांतील रेषांखालच्या अक्षरांना फाट्यावर मारण्यात यावे असा अधिनियम पास करवून घेणे. (अधिक माहिती येथे) २. वेलचीच्या उत्पादनावर बंदी आणणे. ३. १२ फेब्रुवारी या अब्राहम लिंकनच्या जन्मदिवशी दारू फुकट वाटणे. ४. सॅन होजेतल्या विटांवर अधूनमधून जाऊन उभे राहणे (क्षमस्व, 'वीट येणे'चा विनोद रेषांवरच्या इंग्रजीत लागू होत नाही.) तूर्तास इतकेच. सविस्तर आणि सखोल प्रतिसादाचे काम एका अभ्यासू सदस्याकडे बँगलोअर्ड करण्यात आले आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

आयला नंद्या फुल फॉर्मात! :)
त्यामुळे इतर सगळ्या भाषांतील रेषांखालच्या अक्षरांना फाट्यावर मारण्यात यावे असा अधिनियम पास करवून घेणे.
हा हा हा!
वेलचीच्या उत्पादनावर बंदी आणणे.
मी 'वेलची'ऐवजी चुकून 'वेलच्या' असे वाचले! :) आपला, (नंद्यावर लोभ असलेला) तात्या.

भैसट भाजवला !! आधी प्लेबॉय विकत घेणार !!! आणि "जागतीक बोळा-मुक्ती संघटना" काढणार !!! ऐटोमैटिकली शांतता प्रस्थापित होईल .. आणि आपल्याला नोबेप पासून कोण रोखु शकणार नाही :) - विलास ओबामा

कंटाळा आला त्या ओबामाचे नाव वाचून वाचून.. (|: मिपावर हैदोस घातलाय ओबामाने नुसता! "Great Power Comes With Great Responsibilities"

१)नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काय कराल? (कशी फिल्डींग लावाल?) ज्यांना पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे अशा लोकांविषयी वाईट बातम्या पसरवेन्.वेळ पडल्यास CIA तर्फे काटा काढेन. २. मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी तुम्ही काय कराल? (कुठे कुठे शांतता प्रस्थापित कराल) प्रथम पंढरपूरला भेट देईन.नंतर दिल्लीला राजघाट.ईराकमध्ये सद्दाम हुसेन ह्यांच्या थडग्यासमोर उभा राहून ढसाढसा रडेन.फिडेल कॅस्ट्रो ह्यांच्या पायावर डोके ठेवेन. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

१. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काय कराल? (कशी फिल्डींग लावाल?) मी फक्त माझ्या देशात शांतता आणेन व बाकीच्या जगांत जी अशांतता आहे त्याला गुप्तपणे खतपाणी घालीन , वरकरणी मात्र सार्‍या जगाला शांततेचे डोस पाजीन. (पाजी पाजी कितीतरी पाजी ज्ञानामृत सर्वांना) २. मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी तुम्ही काय कराल? (कुठे कुठे शांतता प्रस्थापित कराल) उत्तर वरीलप्रमाणेच!!! ---- ओ. ति. मा. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

>> १. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काय कराल? (कशी फिल्डींग लावाल?) निवासी भारतीयांच्या मतांच्या जोरावर मिळेलच नोबेल शांतता पुरस्कार! गरज पडली तर अनिभांना बाहेरुन फिल्डींग लावायला सांगु / समर्थन घेउ. >> २. मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी तुम्ही काय कराल? (कुठे कुठे शांतता प्रस्थापित कराल) मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी : वारंवार उद्भवनार्‍या नि भा - अ नि भा वाद करणार्‍यांमध्ये समेट घडवुन आणीन.

In reply to by कुंदन

हा कुंदन कधी कधी तरी लिहतो... ;) १००% कुंदनशी सहमत ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

तुम्ही प्रेसिडेंट ओबामा झालात तर? वास्तवीक हा प्रश्न, "तुम्ही प्रेसिडेंट झालात तर?" असा हवा. उद्या मी झालो तर प्रेसिडेंट विकास होईन, कोणी "प्रेसिडेंट पुण्याचे पेशवे" तर कोणी "प्रेसिडेंट विसोबा खेचर" तर कोणी अगदी प्रेसिडेंट अवलीया होऊ शकतील... प्रेसिडेंट ओबामा कसे होऊ? ;) १. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काय कराल? (कशी फिल्डींग लावाल?) त्यासाठी माझ्या आधीच्या प्रेसिडेंटने वेड्यासारखे वागणे आणि वाट्टेलतशी युद्धे करणे जरूरीचे आहे... ;) २. मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी तुम्ही काय कराल? (कुठे कुठे शांतता प्रस्थापित कराल) जागण्यासाठी मी झोपणे अथवा डुलक्या घेणे बंद करीन... बाकी हा पुरस्कार शांतता प्रस्थापीत करणार्‍यास अथवा करण्यासाठी मिळत नाही. तेंव्हा त्याचा संबंध येत नाही... :-)

१. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काय कराल? (कशी फिल्डींग लावाल?) किंवा माझं उत्तरः त्या नोबेल कमिटीला सांगीन की जर मला नोबेल दिलं नाही तर इराक नंतर तुम्ही :D ..सो तुम्हाला नो' बेल...ही हा हा हा... >:) २. मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी तुम्ही काय कराल? (कुठे कुठे शांतता प्रस्थापित कराल) माझं उत्तरः पुरस्काराला जागण्यासाठी तो पुरस्कार कधी देतात ते पाहुन चौकशी करुन त्याच्या विरुद्ध वेळेला झोपीन...काय घ्या नेमकी त्याच वेळेला जांभयी याची.. ;) चालेल का आमचं ऊत्तर..?? ऑं - वा..