मतदान आणी रेशन कार्ड म्हटलं की आपल्याला आठवतं ते मतदान ओळखपत्रासाठी लागणारी रेशन कार्डची प्रत.
आज पुण्यात मुख्य निवडणूक आयुक्त श्री. नवीन चावला (हो तेच ज्यांच्यावर कॉंग्रेसधार्जीणे असल्याचा आरोप त्यांच्या आधीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी केला होता तेच) हे आले होते.
त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मतदान करायचे अवाहन केले आहे.सोबत एक घोषणा पण केली आहे की, ओळखपत्र नसलेल्या मतदारांनी घरातल्या सगळ्या मतदारांसोबत एकत्र मतदानास यावे. येताना रेशन कार्ड घेऊन यावे. रेशनकार्ड ३१ ऑगस्ट २००९ पूवीर्चे असायला हवे. निवडणूक अधिकारी रेशन कार्ड तपासतील, कुटुंबास काही तोंडी प्रश्न विचारतील आणी त्यांना ते वैध वाट्ल्यास (वैध असणे आवश्यक नाही का ????) मतदारास मतदान करु देतील.
जर मतदार बोगस वाट्ला आथवा असेल तर लगेच पोलिस तक्रार केली जाईल.
ह्याने मतदानाचे प्रमाण वाढून बोगस मतदानास आळा बसेल असे त्यांचे म्हणणे आहे. (लिंक : म.टा.)
पध्दत जरी वेगळी असली तरी याचा किती फायदा होणार अहे ते समजत नाहीये. मला वाटतेय की याने बोगस मतदानाचे प्रमाण वाढेल. कारण मुंबई आणी महाराष्ट्रात बांग्लादेशी आणी युपी/बिहार वाले यांना मोठ्या प्रमाणावर नकली रेशन कार्डे वाटल्याचे पेपर आणी जगजाहीर आहे....
मिपाकरांचे या प्रस्तावावर काय म्हणणे आहे??
वाचने
2693
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाकरांच
अहो,