Skip to main content

रसूल अल्लाह बंदीश

लेखक अन्वय यांनी शनिवार, 12/09/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
दीनानाथ मंगेशकर यांची रसूल अल्लाह बंदीश जालावर कुठे आहे का कुणाला याविषयी माहिती आहे का विनंती : असल्यास धागा टाकावा

वाचने 5598
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

दीनानाथ मंगेशकर यांची रसूल अल्लाह बंदीश जालावर कुठे आहे का
दिनानाथराव थोरच आहेत, त्यांच्या नखाचीही सर आम्हाला नाही हे सर्वप्रथम मान्य करून एक लहान तोंडी मोठा घास घेऊ का? :) कभी पिने बैठेंगे तो हमभी आपको ये बंदिश जरूर सुनाएंगे! आम्ही जाणतो की ही गुस्ताखी होईल परंतु जोपर्यंत दिनानाथरावांची मिळत नाही तोवर एकदा आमच्याकडून ऐका आणि स्वत:चं १/१०००th समाधान करून घ्या! :) अर्थात, दिनानाथरावांची मिळाली की आम्हालाही कळवा. आम्हालाही ती हवीच आहे. बोला, कधी करायची बैठक? :) आपला, (अण्णांचा मानस-शागीर्द) तात्या. जोक्स अपार्ट, परंतु पूर्वी रागाची थोडीफार ग्वाल्हेरी तालीम मिळाली असल्यामुळे या बंदिशीतलं येणं-जाणं आम्ही जाणतो इतकंच! आपला, (विद्यार्थी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम तात्या छे तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते ' ' ' ' ' ' जा़ऊ देत तुम्ही विचारलच आहे तर आमची बाटलेली जीभ पुन्हा बाटवतो बोला कधी बसायचे आणि कुठे खंबा तुमचा पाणी आमचे

ही बंदिश मी पण जालावर शोधायचा खूप पण अयशस्वी प्रयत्न केला आहे. कुठेच नाहीये. :( @तात्या, तुम्हीच टाका जालावर. आम्ही वर्जिनल मिळेपर्यंत, १/१०००th समाधान करून घेऊ. :) बिपिन कार्यकर्ते

>>दीनानाथ मंगेशकर यांची रसूल अल्लाह बंदीश जालावर कुठे आहे का रसूल अल्लाह बंदीश, डोक्यावरुन गेले यार. सर्वांना समजेल असे काही सांगत जा. [म्हणजे बंदीश याला म्हणतात. बंदीशातील दादा माणसं , बंदिशाची वैशिष्टे असे काही. ] -दिलीप बिरुटे (अडाणी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"दयाघना , का तुटले चिमणे घरटे " च्या चालीत "रसूल अल्ला , क्यूं टूटा चिमणा घरटा" असं म्हणा .. जमेल बहुतेक... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

In reply to by भडकमकर मास्तर

चिमणा घराण्यातले आपलं घरट्यातले आहे होय? :) काळू दिवाळीअंकातील कथा टाईप करुन घेण्यासाठी माणूस हवा आहे, कृपया इच्छुकांनी व्य.नि करा.

In reply to by हुप्प्या

क्या बात है.. सुंदरच गायलं आहे... (श्रोता) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

फारच सुरेख आवाज आहे! खूप दिवसांनी एक ताजातवाना आवाज ऐकायला मिळाला! जियो!! :) (आनंदी)चतुरंग

In reply to by चतुरंग

झकास ब्लॉग आहे.. ओळख करून दिल्याबद्दल हुप्प्याला धन्यवाद... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

In reply to by श्रावण मोडक

हुप्प्या!!! जबरदस्त लिंक दिली आहे. जबरदस्त!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by सुबक ठेंगणी

शोधाशोध करताना अजून एक मिळालं... चांगलं वाईट कळत नाही. पण एका मल्याळी माणसाने गायलं आहे म्हणून जरा विशेष वाटले. आणि ही मूळ बंदिश नाही तर मराठी 'दयाघना...' आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by सुबक ठेंगणी

लिंकबद्दल खूप आभार :) स्वाती ताईनी गायलेली ईतर गाणी पण उत्तम आहेत. सुजय

In reply to by विसोबा खेचर

अहो तात्या कधी बसायचे ते सांगितले नाही बरं आमचा खंबा चालेल का

In reply to by हुप्प्या

स्वातीचा आवाज अतिशय नितळ आहे आणि तिने मूळ बंदीश आणि त्यावर आधारलेलं 'दयाघना' अतिशय समरसून गायलंय. स्वातीचे मनःपूर्वक अभिनंदन! स्वाती भविष्यात गायन क्षेत्रात खूप मोठी होईल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाहीये. हा दुवा दिल्याबद्दल हुप्प्याला मी दुआ देतो. :) विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

In reply to by हुप्प्या

हुप्प्या लिंक दिल्याबद्दल लइ धन्यवाद बाबा खंबा घे़वून कधी बसायचं ते सांग एक खंबा आपल्याकडे लागू बाँस

In reply to by हुप्प्या

हुप्प्यासाहेब, किती सुरेल लिंक दिलीत! आपले आभार! स्वाते कानिटकर यांचा आवाज फार आवडला. 'दयाघना' तर ग्रेटच! रेवती

मुसुने पण मस्त गायलेय बंदीश आणि दयाघना. =D> विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

सर्व दुव्यांबद्दल धन्यवाद.

आम्हाला गाण्यातल ओ का ठो कळत नाही. तरी देखील हुप्प्याने दिलेली लिंक ऐकली. एक दैवी आवाज ऐकतोय असेच वाटून गेले. फारच सुरेख. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.