Skip to main content

करून झाले

लेखक अन्वय यांनी मंगळवार, 08/09/2009 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने जे जे सांगितले ते करून झाले वा-याशी लावून शर्यती फिरून झाले ज्यांनी माझी साथ दिली ते परके होते, झाले तितके विरोध सारे घरून झाले माघारीचे पाउल पहिले कुणि उचलावे ? त्याचे माझे वाद एवढ्यावरून झाले काटयांतहि फुलण्याचा त्याने वसा दिलेला, झाले बहरुन पुन्हा, पुन्हा मोहरून झाले काहीही दिसले नाही, जे नकोच होते, आठवणींचे कपाटही आवरून झाले आता सावर केवळ थकल्या श्रांत जिवाला, कोसळणारे डोलारे सावरून झाले क्रांती यांची ही गझल अफलातून आहे. भटसाहेबांची याद आली. व्वा!

वाचने 1494
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया