Skip to main content

अंनिस व धर्मश्रद्धा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 09/08/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
अंनिस ही विवेकजागराची चळवळ आहे. विवेक ही काही अंनिसची मक्तेदारी नाही. समाजात विवेकाचा विचार सांगणारे संतजन होतेच की. बर्‍याच लोकांना अंनिस ही डामरट वाटते. दाभोलकर म्हणजे अंनिस हे समीकरण रुजण्याच कारण त्यांनी चळवळ प्रसारमाध्यमातुन रुजवण्याचे प्रयत्न केले. खरतर अंनिसचा विचार हा नवीन नाही. बुवाबाजीचा भंडाफोड झाल्यावर लोक बुवा बदलतात पण मानसिकता बदलत नाहीत. विवेकाधिष्ठीत समाज निर्माण करण्यासाठी नरेंद्र दाभोलकरांनी केलेले हे आवाहन- या पुर्वी याची चर्चा इथे झाली आहे
गरज विवेकी धर्मजागराची
[दैनिक सकाळ ३० आक्टोंबर २००७] (नरेंद्र दाभोलकर) धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न जेथे झाला, त्या महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे... कथित धर्मरूढी, प्रथा, परंपरा, पूजा, व्रतवैकल्ये, सणवार, कर्मकांडे यांना समाजजीवनात जणू उधाण आल्याचे दिसते आहे. याचा एक अर्थ यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना यश लाभते आहे. दुसरा अर्थ आपले कल्याण होईल, असे मानून भ्रमचित्त समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या वातावरणाला प्रशासकीय कठोरपणाचे उत्तर पुरे होईल, असे मानले जाते आहे. परिस्थितीच्या गांभीर्याची जाण येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे. जीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली. आपण लहानपणी भाषा शिकतो. धर्म जन्मतःच मिळतो. मायबोलीप्रमाणे व मायधर्म संस्काराने आपण स्वीकारतो. धर्मविचाराचा प्रश्‍नच उपस्थित केला जात नाही. व्यक्ती प्रौढ, विवेकी झाल्यावर तिने धर्मविचार करावा, अशी अपेक्षा असते. बहुतेकांच्या जीवनात हे घडत नाही. लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, गाडगेबाबा, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म या विषयावर मनन, चिंतन व कृती केली. धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न केला. त्याच महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मविचार व धर्माभिमान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने आपले कर्तव्यकर्म करावे; पण ते ईश्‍वराची आज्ञा म्हणून ईश्‍वरार्पण बुद्धीने करावे, अंतःकरणाच्या शुद्धीला व ईश्‍वरविषयक तळमळीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने व करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही, परंतु हा मार्ग मराठी मनाला व्यापून टाकू शकलेला दिसत नाही. कर्मकांडाचे आणि उत्सवी धर्माचे साम्राज्य अबाधित राहिलेच, पण ते वर्धिष्णूही बनते आहे. आपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्‍न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल. आत्मभाननिर्मितीचा दावा करणाऱ्या धर्माच्या नावाने हे घडावे हे भयचकित करणारे आहे. ही धार्मिकता विवेकही जागृत करत नाही आणि माणुसकीही जागवत नाही. ही प्रक्रिया याच तेजीने चालू राहिली तर धार्मिक राष्ट्रवादाचे रूप ती धारण करेल. राष्ट्राचे संविधान धर्मनिरपेक्ष व समाज धार्मिक राष्ट्रवादी अशा पेचात देश सापडेल. गुजरातमध्ये याची झलक आपण पाहिलीच आहे. याबरोबरच समाजातील अगतिकता, अस्थिरता, चंगळवाद, काळ्या पैशाचा प्रभाव, राजकीय सामाजिक मान्यतेसाठी धर्म सवंगपणे वापरणे हे सर्वही खरे आहे. या सर्वांतून अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्मभावना प्रभावित केली जात आहे. न्यायालयाचे निर्णय व त्याची प्रशासकीय खंबीर अंमलबजावणी, यामुळे या परिस्थितीला फक्त मर्यादितच आळा बसू शकतो. धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे हा त्यावरचा अधिक मूलगामी उपाय आहे. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे. विचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला. विधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे. - नरेंद्र दाभोलकर (लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत.)

वाचने 42080
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by विकास

बापु उवाचः मला स्वप्नदृष्टांत झाला कि माझ्या देहात विष्णू भगवान प्रवेश करते झाले. आता मी हि गोष्ट जाहिर करणार. मी कायद्यानुसार काहि गुन्हा केला का? माझ्या मनाच्या विक्षीप्त अवस्थेत मी बुवाबाजी केली आहे. मी स्वतःच अंधश्रद्धेचा बळी आहे. मला अगदी मनापासुन खात्री आहे कि कुणीतरी माझ्या कानात समोरच्या व्यक्तीचं भविष्य, रोगावर इलाज, धनप्राप्ती बद्दल सांगुन जातं. मी फक्त मॅसेज कन्व्हे करतो. मी स्वतःच व्हीक्टीम आहे अंधश्रद्धेचा. आता या बापुला कायदा कसा पकडणार? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

जर बापू या निमित्ताने खिसेकापूचा धंदा करत असेल तर व्हिक्टीम नाही कॉन्स्पिरेटर आहे. तुम्ही म्हणता त्या संदर्भात नवरात्रात (आणि इतर काही वेळेस विशिष्ठ पुजाअर्चांना) अंगात येणार्‍या, घागर फुंकणार्‍या स्त्रीया येऊ शकतील (ज्यांच्या त्या दिवशीच्या, नवरात्रात अष्टमीच्या रात्रीच्या प्रचंड उर्जेचे मला आजही आश्चर्य वाटते). कारण त्यात त्या काही पैसे घेत नाहीत अथवा इतर वेळेस कायम स्वरूपी त्या देवत्व येण्याचा धंदा करत नाहीत.

In reply to by विकास

"भक्त" स्वखुशीने पैसे देतो. त्यामुळे कुठलाच कायदा बापुंचा खिसेकापुपणा सिद्ध करु शकत नाहि. फार फार तर बापुंच्या इन्कमवर टॅक्स लावल्या जाऊ शकतो. भक्ताच्या या स्वखुषीशिवाय जर खिसेकापुपणा सिद्ध होत असेल तर त्याला अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचं काय प्रयोजन? खिसे कापणे, कुठल्याही प्रकारे, तसंही गुन्हा आहे. आणि तो तसाच शिक्षेस पात्र असायला हवा. एक लक्षात घ्या... या कायद्याचा सर्व भार दोन बाबींवर अवलंबुन आहे: १) बापुंना व्यवस्थीत माहित आहे कि तो खोटं बोलतोय २) ते माहित असुनही बापु आपला खोटेपणा भक्तांना विकतोय, भक्त स्वतः ते विकत घेत नाहिए. दोनपैकी एक जरी पॉईण्ट सिद्ध झाला नाहि तर कायदा लंगडा पडेल. तसं आपल्याकडे एखादा कायदा लंगडा पडणं नविन नाहि... पण एकदाका कायद्याने बापुला गुन्हेगार सिद्ध करता आलं नाहि तर त्याची "आमचे काम कायदामान्य आहे" अशी जाहिरात होईल, व त्याचा सरळ फटका अंधश्रद्धा निर्मुलन आंदोलनाला बसेल. छडीने मारुन शिस्त बाणवायची असेल तर छडी मोडता कामा नये. अन्यथा बेशिस्तीला मान्यतेचं अधिष्ठान मिळतं. आज गुन्हेगारी राजकारणात ठाण मांडुन बसली आहे त्याचं हेच कारण आहे. कायदामान्य अंधश्रद्धा तर समाजाची काय वाट लावेल. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

पण एकदाका कायद्याने बापुला गुन्हेगार सिद्ध करता आलं नाहि तर त्याची "आमचे काम कायदामान्य आहे" अशी जाहिरात होईल, व त्याचा सरळ फटका अंधश्रद्धा निर्मुलन आंदोलनाला बसेल. मुद्दा आवडला. तसे देखील कायद्यातून पळवाटा काढणारे असतातच. त्यामुळे अंनिस चळवळीस जरा फटका बसून त्यांना पण विचार करायला लागला तरी काही फरक पडत नाही.
"भक्त" स्वखुशीने पैसे देतो. त्यामुळे कुठलाच कायदा बापुंचा खिसेकापुपणा सिद्ध करु शकत नाहि. फार फार तर बापुंच्या इन्कमवर टॅक्स लावल्या जाऊ शकतो.
तुमच्या आधीच्या प्रतिसादाच्या संदर्भात जेंव्हा एखादा बापू एखादी सिस्टीम तयार करून अंगात देव, हातात ताईत घेऊन भक्ताच्या मागे जाईल तेंव्हा तांत्रिक दृष्ट्या त्याला वेडं ठरवणे अवघड जाईल. आणि तसे ठरवले गेले त॑र त्याला कायमचे अवघड जाईल. कारण खरेच वेड्यांच्या बाजारात त्याला बुवाबाजी करत बसावी लागेल आणि तिथले वेडे त्यासाठी खुळे नसावेत. ;)

In reply to by संजय क्षीरसागर

त्यातले बरेचस्र मुद्दे फ्रॉड, खोट्या मेडीकल प्रॅक्टीस वगैरे कायद्यात अगोदरच कव्हर झालेत. पशुबळी वगैर गोष्टी 'त्यांच्या बकरा ईद ला हात लाऊन दाखवा' अशा टाईपच्या धार्मीक टेन्शन वाढवणार्‍या आहेत, गंडे-ताईत प्रकार पण त्याच पद्धतीचा आहे. नरबळी त्यात दिलेलं नाहि, पण नरबळीला अंधश्रद्धेचा कायदा लावणे म्हणजे कसाबला अनस्टेबल मेण्टल स्टेटचा अधार देणे झाले... नरबळी सरळ सरळ सदोष मनुष्यवध आहे व त्याकरता ३०२ लावणे हेच उत्तम. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

>>> त्यातले बरेचस्र मुद्दे फ्रॉड, खोट्या मेडीकल प्रॅक्टीस वगैरे कायद्यात अगोदरच कव्हर झालेत. याविरूद्ध आधीच कायदे आहेत का या नवीन जादूटोणा कायद्यात या गोष्टींविरूद्ध कलमे आहेत? जर आधीचेच कायदे असतील तर त्या कायद्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. >>> पशुबळी वगैर गोष्टी 'त्यांच्या बकरा ईद ला हात लाऊन दाखवा' अशा टाईपच्या धार्मीक टेन्शन वाढवणार्‍या आहेत, गंडे-ताईत प्रकार पण त्याच पद्धतीचा आहे. पशुबळी म्हटल्यावर जत्रेत देवीला दिलेले बळी किंवा मशिदीत मारलेले बळी याच्यात भेद करता कामा नये कारण दोन्हीमध्ये धार्मिक कारणावरून प्राणीहत्या केली जाते. पण तरी शेवटी प्रश्न राहतोच की धर्माच्या नावाखाली केलेली पशुहत्या आणि आहाराच्या नावाखाली केलेली पशुहत्या यात फरक काय? एकावर बंदी व दुसर्‍या प्रकाराला मान्यता हा विरोधाभास आहे. >>> नरबळी त्यात दिलेलं नाहि, पण नरबळीला अंधश्रद्धेचा कायदा लावणे म्हणजे कसाबला अनस्टेबल मेण्टल स्टेटचा अधार देणे झाले... नरबळी सरळ सरळ सदोष मनुष्यवध आहे व त्याकरता ३०२ लावणे हेच उत्तम. सहमत. नरबळी हा सहेतुक खुनाचाच गुन्हा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

नरबळी हा सहेतुक खुनाचाच गुन्हा आहे. नरबळीस सहेतुक गुन्हा मानण्यास कोर्टाचे आधीचे निकाल ("case law") आहेत. "मानवत हत्याकांड" हा महाराष्ट्रास काळीमा लावणारा नरबळीचा प्रकार ४० एक वर्षांपूर्वी झाला होता. त्यातील एका पोलीस प्रमुखाचे भाषण नंतर अनेक वर्षांनी गणेशोत्सव अथवा नवरात्रोत्सवात ऐकल्याचे आठवते. लहान असल्याने त्यावेळेस ही पण आत्ता देखील अंगावर काटा येईल असले घॄणास्पद कृत्य त्यातील आरोपींनी केले होते. आत्ता जालावर शोधले तेंव्हा त्यावरील हा लेख मिळाला. त्यातील प्रमुख आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि सहआरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली.

In reply to by श्रीगुरुजी

धर्माच्या नावाखाली केलेली पशुहत्या आणि आहाराच्या नावाखाली केलेली पशुहत्या यात फरक काय?
पशुहत्या ही खाण्यासाठीच केली जाते ;) म्हणून तर (धर्माच्या/प्रथेच्या नावाखालीदेखिल) कोंबडी, बकरे अशा पशूंचाच बळी दिला जातो. मनुष्य सहसा खात नसलेल्या पशूचा बळी दिलेला पाहिला आहे कधी? ;) जोवर प्रत्यक्ष कायद्यात काय भाषा वापरली आहे ते समजल्याविना निष्फळ चर्चा करण्यात अर्थ नाही. असो.

कायदा नीट समजून अंमल बजावणी होत असेल तरच कायद्याचा उपयोग असतो. शेषन यांच्या अगोदरच्या आयुक्तानी हा अर्थ कधी समजूनच घेतला नाही. शेषन यानी कोणताही नवीन कायदा आणला नाही.फक्त उपलब्ध कायद्याचा पाठपुरावा केला. म्हणूनच व तरीही शेषन आज जिवंत असूनही भारतीय मनांत अजरामर झालेले आहेत. त्याच प्रमाणे आजच्या भारतीय दंडविधानातील अनेक कलमांचा उपयोग करून अघोरी प्रथांवर मात करता येईल. पण पोलीस खात्याचा बेसच मुळी तक्रार येणे असा असल्याने आपण होऊन पोलीस समाजसुधारणेसाठी कायद्याचा उपयोग करण्यासाठी आणखी शंभर वर्षे जावी लागतील.

In reply to by चौकटराजा

नाही पटले. शेषन यांचे उदाहरण गैर लागू आहे. त्यांनी जे केले ते "निवडणूक आयुक्त" या 'घटनात्मक पदावरून' केले (अर्थात ते तेव्हा सरकारी 'नोकर' नव्हते). ते स्वतः इतर पदांवर तितकेसे प्रभावी नव्हते. दुसरे असे की शेषन काय किंव इतर तत्सम कुणी काय नवे काय्दे आणू शकत नाही - आणूही नये. ते काम केवळ जनतेच्या प्रतिनिधींनीच केले पाहिजे आणि तेच योग्य आहे.
त्याच प्रमाणे आजच्या भारतीय दंडविधानातील अनेक कलमांचा उपयोग करून अघोरी प्रथांवर मात करता येईल.
कोणत्या?
पण पोलीस खात्याचा बेसच मुळी तक्रार येणे असा असल्याने आपण होऊन पोलीस समाजसुधारणेसाठी कायद्याचा उपयोग करण्यासाठी आणखी शंभर वर्षे जावी लागतील.
गैरसमज आहेत. काही गुन्हे असे आहेत जे घडल्याचे कळताच्ग तक्रारीची वाट न बघता पोलिसांना FIR देणे आवश्यक असते. प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यासाठी असे होणे शक्य नाही आणि योग्यही नाही!

या जुन्या धाग्याच्या निमित्ताने दोन गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे मिपावर त्यावेळी आणि आता प्रकट होणारी मते यात संख्यात्मक आणि विचारात्मक झालेला बदल. अमुक एका विचारांच्या सभासदांची संख्या वाढल्यामुळे हे झाले असावे. दुसरे म्हणजे त्या वेळी दाभोलकरांच्या सर्व कार्याविषयी नसलेली माहिती. अंधश्रद्धाविरोध या कार्यामुळे जरी त्यांना माध्यमप्रसिद्धी लाभली असली तरी त्यांची देवदासी आणि वाघ्यामुरळी प्रथानिर्मूलन तसेच एक गाव एक पाणवठा ही कामे अधिक व्यापक आणि अधिक यशस्वी होती. देवदासी प्रथा तर आज महाराष्ट्रात नष्टप्राय आहे. पुणे जिल्हा किंवा जवळपास एका दर्ग्याजवळ एक भली मोठी शिळा आहे. ती काही माणसांना केवळ एक अंगळी लावून उचलता येते या अंधश्रद्धेला आव्हान देऊन अंनिस.ने मोठाच विरोध ओढवून घेतला होता. 'साधना' चे संपादकत्व बरीच वर्षे समन्वयाने त्यांनी चालवले. (समाजवादी आणि समन्वय-- विचार करा किती कठिण!). ते आणि त्यांचे विस्तारित कुटुंब हे सर्व 'सोशल रीफॉर्मर्स होते/आहेत. १९२५ ते १९७५ या दरम्यान कर्वे-परांजपे परिवाराने महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेत जशी मोलाची भर घातली, (आणि आजही घालीत आहेत,) जवळपास तसेच कार्य हा दाभोलकर परिवार १९६०पासून आजतागायत करीत आलेला आहे. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळ्या क्षेत्रात असले तरी महत्त्वाच्या कामात सर्वांची मदत असते.स्वातंत्रानंतरच्या पहिल्या दशकात हिरीरीने समाजकार्यात उतरलेला हा गट आहे. हे भरीव कार्य सगळ्यांना माहीत असतेच असे नाही.

In reply to by राही

आम्ही काही मित्र एकदा बोटाने दगड उचलला जाणार्‍या ठिकाणी गेलो होतो. पहिल्या प्रयत्नात मी व अपरिचित चार जण अशा पाचांनी दगड उचलला. मग मी माझ्या बरोबरच्या पाच मित्राना बाजूल घेतले व नुसतेच बोट लावा काही करू नका असे सांगितले. दगड जागचा जाम हलेना. यातून माझ्या वेळेस अपरिचित असलेले ते कोण असावेत? एखादी सिद्धी प्राप्त झालेले भाग्यवान की रस्त्यावर ताईत विकणार्‍याचे ताईत विकत घेणारे त्याचे साथीदार ?

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या. -------------------------------------------------------------- सुरवातिपासुनच त्यांनी जर नि:पक्षपातीपणाचे धोरण अवलंबले असते , श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात गफलत न करता काम केले असते, सरसकट संपुर्ण धर्माला टार्गेट केले नसते,... अंधश्रद्धा निर्मुलनाच्या क्षेत्रामध्ये सर्वच धर्मांसाना समाविष्ठ केले असते, अनेक प्रकरणांमध्ये खोटेपणा केला नसता . . . तर कदाचीत आजची वेळ त्यांच्यावर आली नसती !! तरिही, दाभोळकर हे एक सच्चे देशभक्त होते, अंधश्रद्धा समाजातुन नष्ट व्हावी अशी त्यांची मनापासुन तळमळ होती, त्यांनी हिंदु धर्मातील अनेक ढोंगी आणि धर्माच्या नावावर पोटे भरणार्‍या दललांना त्यांची जागा दाखवुन दिली होती. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो , ही परमेश्वराचरनी प्रार्थना ! दाभोळकरांसारखा वैचारीक विरोधक लाभणे ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे !

In reply to by बॅटमॅन

ज्या मित्राने हे लिहीलय तो थोडा डोक्यावर पडलेला आहे.. त्याने हे चोप्य पस्ते केलं आहे असं वाटतय.. मी त्याला थोड्या शिव्या घालुन आलेय.. पण नक्की काय खोटेपणा केलाय ते मी विचारलं नाहि.. :(

In reply to by पिलीयन रायडर

पण नक्की काय खोटेपणा केलाय ते मी विचारलं नाहि..
आणि विचारलं असतं तरी घंटा काही उत्तर मिळालं नसतं हा भाग अलाहिदा.

In reply to by बॅटमॅन

विचारलं.. चांगलं खडसावुन विचारलं.. तर उत्तराच्या ऐवजी "गीता वाचा.. शुद्ध सात्विक देव म्हणजे काय तुम्हाला कळलंच नाहिये" असं काही तरी बरळणे चालु आहे. मी मुद्द्यवरुन भरकटु न देता "दाभोळकर खोटारडे आणि पक्षपाती कसे ते सांग आधी" हा एकच प्रश्न रेटत आहे.. बघु काय उत्तर देतो ते.. आणि कायद्या विषयी तर फार घोळ चालु आहे.. म्हणे की "जर हा कायदा आला तर देव मनल्या बद्दल पण तुरुंगवास होऊ शकतो"... काय बोलणार ह्यावर?

In reply to by प्रभाकर पेठकर

मला वाटतं शंकर महादेव हे तामसी वृत्तीचे देव असावेत. हॅहॅहॅ मग त्यांना भोलेनाथ का बरं म्हणत असावेत ? ;)

In reply to by पिलीयन रायडर

ही डोक्यावर पडलेली लोकं अशीच असतात. त्यांना कोंडीत पकडताय ते चांगलंच आहे. तरी हे वायझेड लोक काही सुधारणार नाहीत हेही तितकंच खरं. :(

नरेन्द्र दभोलकर की हत्या कहीं खान्ग्रेस और एनसीपी के द्वारा पूर्व नियोजित षडयंत्र द्वारा की गयी है इसाई मिशनरीयो के इशारे पे। ???????????? निष्कर्ष तक पहुचने क...े कारण :- 1) हत्या के तुरंत बाद से ही सारे मराठी चैनल्स पे सिर्फ नरेन्द्र दभोलकर के प्रोग्राम ही दिखाए जा रहे हैं और हत्या के लिए सीधे सीधे बिना किसी सबूत या साक्ष्य के सनातन संस्था, हिन्दू जनजाग्रति व् अन्य सनातनी संस्थाओ को दोषी बताया जा रहा है जबकि पुलिस ने अभी तक इस मामले पे कोई आधिकारिक बयान नही दिया है। 2) हत्या के तुरंत बाद ही आनन् फानन में अंध्श्रधा उन्मूलन कानून बिना किसी चर्चा के पास करके गवर्नर के पास भेज दिया गया है। ये महाराष्ट्र चुनाव से पहले हिन्दुओ को बाटने और मुस्लिम-इसाई तुष्टिकरण का षडयंत्र है। 3) हत्या के तुरंत बाद ही दभोलकर समर्थको के भेष में खान्ग्रेस और एनसीपी के कार्यकर्ताओ ने महाराष्ट्र में उत्पात मचाना शुरू कर दिया और पुणे बंद का एलान कर दिया गया। इस कानून का पास हो जाना भारत में सनातन धर्म पे सबसे बड़ी चोट होगी क्यूंकि महाराष्ट्र में पास होते ही अन्य राज्यों में बिल पास होने के दरवाजे खुल जायेंगे। ये कानून केवल हिन्दू रीती रिवाजों को कवर करता है, इस कानून में हाथ पे कलावा बांधना, टीका लगाना, हवन करना, सत्यनारण का पाठ करना जैसी हिन्दू रीतियो को ढोंग बताया गया है और इन सब के लिए 7 साल तक की सजा है। इस्लाम और ईसाइयत को इस कानून में पूरी छुट है। अंध्श्रधा उन्मूलन कानून बनाने वाले नरेन्द्र दभोलकर को भाई राजीव दिक्षित ने काफी समय पहले expose किया और बताया है की किस तरह दभोलकर को विदेशो से पैसा लेकर केवल सनातन धर्म के खिलाफ कार्य करता था और इस दभोलकर के बेटे का नाम हमीद है और वो इस्लाम कबूल कर चूका है। हम सब को मिलकर एक स्वर में इस कानून का विरोध करना होगा अन्यथा वो दिन दूर नही जब हाथ जोड़कर प्रार्थना करना भी ढोंग बता के आपको जेल में ठूस दिया जायेगा। आपके मन मे सवाल आएगा कि आखिर ऐसा क्या है इस अंधश्र्धा निर्मूलन कानून मे जो सब हिन्दू इसका विरोध कर रहें है ???? एक बार यहाँ जरूर जरूर click कर देखें ! http://www.youtube.com/watch?v=Lw7ZNxnllGM हर हर महादेव --------------------------------------------------------------------------- प्लिझ कुणीतरी त्या विडिओ मध्ये काय आहे हे सांगाल काय? तुनळी बॅन आहे इथे..

अजून एक कायदेशीर शंका >>> 9) to perform "Gopal Santan Vidhi" to beget a male offspring. हा "गोपाळ संतान विधी" नक्की काय आहे हे मला माहिती नाही. हा विधी नक्की कोण करतात व कोण हा विधी करून घेतात हे देखील मला माहिती नाही. बहुतेक आपल्याला "मुलगाच" व्हावा यासाठी विवाहीत जोडपी हा विधी करून घेत असावीत असे वाटते. कायदेशीरदृष्ट्या पाहिले तर "मुलगाच" व्हावा ही इच्छा बेकायदेशीर किंवा घटनेविरूद्ध कशी ठरते? गर्भ मुलीचा असल्यास मुलगी नको या एकमेव कारणास्तव मुद्दाम कोणतेही वैद्यकीय कारण नसताना गर्भपात करणे मुलीचा गर्भ नष्ट करणे हे नक्कीच बेकायदेशीर व अत्यंत नीच कृत्य आहे. पण एखाद्या जोडप्याने आम्हाला मुलगाच हवा अशी इच्छा व्यक्त करणे व त्यासाठी गोपाल संतान विधी करणे हे कसे बेकायदेशीर ठरू शकेल? मुळात "मुलगाच हवा" ही इच्छाच घटनेनुसार बेकायदेशीर ठरते का? सूचना - कृपया मी "मुलगाच" हवा याचे समर्थन करत आहे असा अजिबात गैरसमज करून घेऊ नये. मला दोन मुली आहेत व त्या दोघी माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत. "मुलगाच" हवा असा विचार माझ्या मनात कधीही निर्माण झाला नव्हता. फक्त या जादूटोणा कायद्यातून ज्या पळवाटा निघू शकतील असे मला वाटते ते मी लिहीत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

"गोपाळ संतान विधी" नक्की काय आहे हे मलादेखिल माहिती नाही. पण तुमच्या अंदाजाप्रमाणे असल्यास.. असा विधी करुन मुलगा होईल असा क्लेम करणारा जो यातून जोडप्यांची आर्थिक फसवणूक करतो त्याला शिक्षा करणे हा हेतु आहे.. जोडप्यांना आत टाकणे हा हेतु नाही.. यातुन जोडप्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे ही अपेक्षा आहे.. आणि असा विधी करुन असे होते असा विचार पसरवणार्‍यांवर चाप बसवणे हा हेतु आहे.

In reply to by बाळ सप्रे

येथे हा विधी दिलेला दिसतोय. बहुदा हा उत्तरेकडील प्रकार असावा. मिपा काही १००% प्रातिनिधिक आहे असे म्हणायचे नाही. पण येथे देखील जर कोणालाच हा विधी ऐकून देखील माहीत नसला तर त्याचा अर्थ हे प्रकरण महाराष्ट्रात एकदम कमीत कमी होत असावे असे वाटते... फक्त मुलगाच होउंदेत असे वाटणे योग्य नसले तरी, हा गुन्हा ठरू शकत नाही. बर बाकी वर दुवा दिलेल्या संस्थळावरील विधी म्हणजे कुठल्यातरी प्रकारातली पुजा आणि जपजाप्य आहे. त्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर सर्वच पुजा-अर्चांवर घ्यावा लागेल. त्यामुळे काहीतरी खरेच कारण असावे अथवा उगाच काहीतरी घुसडले असावे अशी दोनच टोके दिसतात.

In reply to by विकास

दुवा वाचला तसेच विधी हा सर्वसामान्य शान्ती विधी सारखा वाटला यात अघोरि असे काही आढळले नाही याचा एव्हडा बागुलबुवा का करण्यात यावा हे अनाकलनीय आहे, की अनिस ला दुसरा कुठला विधी अपेक्षीत असावा हे कळत नाही.

विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते कि माणस अंधश्रद्ध असतात कारण त्यांची ती गरज असते. संदर्भ- तिमिरातून तेजाकडे ले. डॉ नरेंद्र दाभोलकर माझ्या माहिती प्रमाणे हे त्यांनी होनी अनहोनी या तेंडुलकरांच्या दूरदर्शनवरील मालिके च्या संदर्भात अंनिस ने आंदोलन केले होते त्यावेळी कुठ तरी म्हटले होते. अधिक माहिती कुणाला इथे आहे का?