महाजालासाठी काही नवीन नियम तयार करण्यात आले आहेत व त्यानूसार आता कायद्यात बदल केला गेला आहे.
नकली आयडी तयार करणे, दुस-याच्या नावाने प्रोफाईल / इ मेल आयडी तयार करणे, दुस-याच्या नेटवर्कचा गैरवापर करणे, संगणकामध्ये जाणून बुजून विषाणू पाठवणे, माहीती चोरी करणे व इतर प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आता सूचना-प्रौद्योगिकी कानून (आईटी एक्ट) मध्ये संशोधन करुन तीन ते आजिवन कारावास पर्यंतची शिक्षा ठोठवण्याची तरतुद केली गेली आहे.
संशोधन केलेले कायदे खालील प्रमाणे :
ऍक्ट - 66 सी
अपराध - दुस-याचा पासर्वड चोरी करणे / त्याच्या परवानगी शिवाय वापर करणे, डीजिटल हस्ताक्षर व फिंगर प्रिंन्टचा गैर वापर करणे.
सजा - तीन वर्ष जेल / एक लाख रुपयापर्यंत दंड.
ऍक्ट - 66 डी
अपराध - दुस-याची डुप्लिकेट आयडी तयार करणे / मेल आयडी तयार करणे / प्रोफाईल तयार करणे / वेबपेज चोरी करणे / दुस-याच्या नावाने एसएमएस पाठवणे, फसवण्याच्या हेतुने मेल पाठवणे (फिशिंग)
सजा - तीन वर्ष जेल / एक लाख रुपयापर्यंत दंड.
ऍक्ट - 66 ई
अपराध - चोरुन कुणाचे अश्लील फोटे / व्हिडिओ तयार करणे व महाजालावर टाकणे.
सजा - तीन वर्ष जेल / एक लाख रुपयापर्यंत दंड.
ऍक्ट- 67 बी
अपराध - चाइल्ड पोर्नोग्राफी
सजा - पांच वर्ष जेल व 10 लाख रुपए दंड.
ऍक्ट- 67 सी
अपराध - महाजालाचा वापर करण्या-या / संगणक वापर करणा-या प्रत्येक युजर चे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक (सरकार / संबंधीत प्रणाली कसे करणार माहीत नाही.) जर रेकॉर्ड ठेवले नाही तर गुन्हा समजला जाईल.
सजा - तीन वर्ष जेल / एक लाख रुपयापर्यंत दंड.
ऍक्ट - 69
अपराध - ब्लेकबेरी अथवा तस्म सेट / मोबाईल / सेवा सुविधा प्रदान करणा-या कंपन्यांनी मास्टर की सरकार ला देणे बंधन कारक केले आहे. नाही दिला तर गुन्हा
सजा - सात वर्ष जेल.
**********
सीआयडीचा दुवा व पुर्ण सायबर लॉ चे पिडीफ माहीती येथे उपलब्ध आहे.
**********
माहीती - न्युज चॅनेल (डी डी न्युज)
वाचने
5659
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहीती करिता धन्यवाद..
लै
+१
In reply to लै by अवलिया
चांगली माहीती
हे घ्या
In reply to चांगली माहीती by सहज
ज्यांना
In reply to हे घ्या by दशानन
वा राजे वा!!!
चांगली
उपयुक्त माहिती.
बरीच नविन
सीआयडी च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहीती नूसार.
छान माहीती आहे
उपयुक्त माहिती
ज्यांना
अत्यंत उपयुक्त माहिती
:S :S :S :S :S :S :S
चांगलं आहे..
अतिउत्तम
अजून काही