Skip to main content

मराठी अमेरिकन्स ..

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 18/02/2009 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल भारताबाहेर राहुन , इतर देशाचे नागरिकत्व घेउन त्यांची भाट गिरी करित आणि भारतात रहाणाऱ्या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे. त्यातल्या त्यात, अमेरिकेची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते. ह्या भारतिय नागरिक नसलेल्या , पण मराठी बोलणाऱ्या अमेरिकन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची भारताला गरज आहे कां? इथल्या ज्या राजनैतिक नेत्यांची जे खिल्ली उडवतात, त्याच नेत्यांना हार्वर्ड ला लेक्चर द्यायला बोलवतात. इथल्या डबे वाल्या कडुन सिक्स सिग्मा बद्दल शिकण्याचे प्रयत्न करतात... ... ही गोष्ट साधारणतः एखाद्या डिस्कशन ग्रुप मधे, नेट वर, किंवा एखाद्या लेखाच्या रिस्पॉन्स वर दिसुन येते.. हिच गोष्ट आज बघितली इ सकाळच्या साइटवर..आणि मला खुप इन्सल्टींग वाटलं.. त्यामुळेच ’त्यांना’ म्हणजे मराठी बोलणाऱ्या अमेरिकन्स ना सांगावंस वाटलं.. ते इथे आहे.... वाचा हे लेखन कोणाच्या विरुध्द व्यक्तिशः लिहिलेले नाही .. त्यांच्या जनरल टेंडन्सी बद्दल लिहिलंय..

वाचने 33037
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

In reply to by नीधप

पण काहीही म्हणा, परदेशात खुप वेळ असतो हं .. टंकायला हो .. डाण्या .... तु परदेशी वाटतोस लेका :) वदनी

साहजिकच आहे

ही कविता मला एका ढकलपत्रातून आली होती. मला वाटते ही कविताच पुरेशी बोलकी आहे. तात्या/संपादक मंडळ: जर आक्षेपार्ह वाटली तर काढून टाका. =========== चिऊच्या घराची गोष्ट =========== एक होती चिऊ, एक होता काऊ. चिऊ दिवसभर कामात मग्न, बिचारीला बोलायलाही नव्हता वेळ. तिची लगबग पाहून काऊ शेवटी म्हणालाच- चिऊताई, कसलं सारखं काम करत राहणं? बघ तरी, एवढा वसंत फुललेला.. सोनेरी ऊन पडलेलं, सारं कसं छान छान! चिऊ धापा टाकत म्हणाली, काऊदादा, खरंय बाबा तुझं. दिसतंय ख्ररं सगळं सुंदर, पण ते असंच नाही राहणार. पिल्लं अजून लहान माझी, अन लवकरच पावसाळा सुरू होणार; तेव्हा अन्न शोधुनही नाही सापडणार. तेव्हा करते आताच सारी बेगमी, अन माझं घरटंही करते जरा आणखी भक्कम! काऊला चिऊची दया आली, पण मग तिच्याकडे दुर्लक्ष करून तो छान उडू, नाचू, बागडू लागला! उन्हाळा संपला, अन एक दिवस सोसाट्याचा आला वारा. काऊचं तोडकंमोडकं घर पुर्णच तुटलं. मग आला मुसळधार पाऊस. भिजल्या, कुडकूडत्या अंगाने, भुकेल्या पोटाने, काऊ चिऊला- राहायला दे, खायला दे- म्हणाला. चिऊ म्हणाली, नाही रे बाबा कऊदादा.. खुप राबले मी या घरासाठी अन पिल्लांसाठी. एकतर जागा नाही इथे, अन खाणं तर माझ्या पिल्लांसाठीच. काऊ चिडला, अन बोलावली सरळ पत्रकार परिषदच! चॅनेलवाले, पेपरवाले हजर झाले लगेच. मग लाईव्ह टेलेकास्टमध्ये काऊ म्हणाला- मी इथं पाण्यानं भिजतोय, थंडीनं कुडकूडतोय, अन्नावाचून मरतोय.. अन बघा ही बया, खुशाल खातेय, मजेत राहतेय!! मग सर्वांना आला काऊचा कळवळा.. एका पेपरवाल्याने सरळ बातमीच छापली.. चिऊच्या दारात बिचार्‍या काऊचं उपोषण म्हणून!! एका 'तेज'तर्रार चॅनेलनं तंबूच दिला बांधून सरळ.. अन कॅमेर्‍यानं त्यांचं २४ तास रतीब घालण्याचं काम केलं. मग काय विचारता राव....?? मुलभूत हक्कांची पायमल्ली!! हीच आहे का लोकशाही?? लोकप्रतिनिधी झोपलेत काय? सरकारचे डोके फिरले काय? साम्यवादाचा विजय असो! काऊ-राव-जी-पंत-चंद्र-महाराज-साहेब- चिरायू होवो! गरीबी हटाव, चिऊला भगाव!! काऊ फक्त अंगार है, बाकी सब भंगार है! काऊरावजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है!! न्याय मिळालाच पाहिजे.. शोषण बंद झालेच पाहिजे! पर्यावरणाचा र्‍हास होतोय.. समानतेचा नाश होतोय! राजीनामा दिलाच पाहिजे.. कारभारी बदललाच पाहिजे! काय काय अन बरंच काय-काय... चॅनेल्सवर झळकून, पेपरांत मिरवून, काऊचा झाला झिरोतून हिरो; मग त्याने ठेवलाच सरळ एक पी.आर.ओ.! काऊचे कपडे मग ब्रँडेड झाले, अंग काळेच, पण केस मात्र डाय झाले!! रात्रीसुध्दा काऊ रे-बॅन लावूनच बोलू लागला, पाहिजे त्या गोष्टींसाठी स्पाँसर्सही मिळवू लागला!! काऊने मुद्दा लावून धरला, तसा विधानसभेतच गदारोळ माजला! आयूक्त, प्रशासक बदलले.. अन मंत्रीमंडळही विस्तारले! पण शेवटी परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याकारणाने मुख्यमंत्रीच बदलले!! केंद्रसरकार हादरले, दर तासाला परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, म्हणू लागले! प्रतिक्रिया तर पैशाला पासरीभर, आपण मागे पडू, म्हणून सर्वांची धडपड! अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, दारिद्र्यरेषा.. गरीब, सवर्ण, आरक्षण, स्पेशल कोटा.. पक्षांतर, घोडेबाजार, जातीयवाद.. सभा, मोर्चे, बंद, अटक अन मतदारराजाला साद!! समर्थक, भक्त, अनुयायी, उगवते नेतृत्व.. काही खरं नाही, कशाला येईल महत्व!! सरकार बदललं, तसा कायदाही बदलला, चिऊच्या घरावर सरळ सरकारी कब्जाच आला. लेखण्या सरसावल्या, कॅमेरे क्लिकाटले.. समारंभपुर्वक काऊरावजी घराचे मालक झाले!! चिऊ बिचारी रडली, ओरडली.. वैतागून तिने शेवटी पिल्लांसह अमेरिका गाठली! चिऊ तिथेही राब-राब राबली, कंस्ट्रक्शन व्यव्सायात बिझनेस-वुमन बनली!! काऊला आजही स्वतःचं घर बांधता येत नाही, पण भाषण करण्यात त्याचा कुणी हात धरत नाही! आता तो नेहमी वेगवेगळ्या निवडणूका लढवतो.. एन.आर.आय. लोकांनी देशाला मदत केली पाहिजे म्हणतो..!! =================================

In reply to by नाटक्या

किती वेगळी कविता आहे! आवडली म्हणून हा प्रतिसाद आपण दिलेल्या कवितेला! धाग्याला कोणतीही प्रतिक्रिया देण्याची इच्छा राहिलेली नाही. रेवती

In reply to by रेवती

आवडली म्हणून हा प्रतिसाद आपण दिलेल्या कवितेला! धाग्याला कोणतीही प्रतिक्रिया देण्याची इच्छा राहिलेली नाही.
+१, रेवतीकाकुंशी शब्दशः सहमत आहे कविता लै भारी आहे आणि एकदम समयोचीत ..! बाकी चालु द्यात. आम्ही "बाल्कनीतली शीट" पकडुन बसलो आहे, बरोबर चघळायला भडंग करुन आणली आहे. होऊन जाऊ द्या काय व्हायचे ते ... ------ ( एकदा गडबडीत दोन्ही बाजुने कडाकड भांडलेला व नंतर ह्यातल्या "फोलपणाचा" साक्षात्कार झालेला ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

वा! --अवलिया

In reply to by अवलिया

असेच म्हणतो. --घाटावरचे भट

भारतात शिक्षण घेऊन बाकीच्या देशांची भांडी घासायला जाणारयांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे. सरकारच्या शिष्यवृत्त्यांवर शिकतात आणि बाहेरच्या देशांच्या तुंबड्या भरतात. सरकारसुद्धा या शिष्यवृत्त्या जनतेने दिलेल्या करांतूनच देत असते.म्हणजे त्यांच्या उच्चशिक्षणात जनतेचा वाटा असतो. सावरकरांनासुद्धा बॅरिस्टरीनंतर भारतात बाहेरच्या इतक्या कुठे चांगल्या संधी होत्या?पण त्यानीं देशाची गरज लक्षात घेऊन आयुष्याचा पुढचा मार्ग निवडला.'माझ्या एकट्याच्या बॅरिस्टरीमुळे देशाला काय स्वातंत्र्य मिळणार आहे?' असा विचार त्यांनी मुळीच केला नाही. पुढे त्यांना प्रत्यक्ष वकीली कधीच करावी लागली नाही. जे शिक्षण घेतले त्यातच करिअर करावे असा काही नियम नाही तर त्या शिक्षणाचा देशाला किती फायदा आहे हे पहावे . अमेरिका आणि तत्सम देशांमध्ये जाणार्या लोकांनी त्यांच्या शिक्षणाचा देशाला किती फायदा आहे हे पहावे.

In reply to by सिद्धेश

काय पण प्रतिक्रिया आहे.. सावरकरांनासुद्धा बॅरिस्टरीनंतर भारतात बाहेरच्या इतक्या कुठे चांगल्या संधी होत्या? म्हणजे आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? संध्या नव्हत्या म्हणून सावरकर परत आलेत? =)) भारतात शिक्षण घेऊन बाकीच्या देशांची भांडी घासायला जाणारयांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे प्रत्येक जण भांडी घासतोच हो. आणि बाहेरच्या देशात फक्त भांडी घासायला जातात हा दृष्टांत तुम्हाला कधी झाला? आणि एन. आय. आर. लोकांकडुन $$$$ पर्यायाने परकीय चलन मिळते त्याचे काय? मला आठवतं १९९०-९२ साली चंद्रशेखर यांचे सरकार होते (चु.भु.द्या.घ्या.) तेव्हा सोने गहाण ठेवून परकीय चलन मिळवावे लागले होते. तेव्हा भिक्षांदेही करताना सरकारला लाज नाही वाटली का? ते जावू दे. २००४/२००५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच अमेरिकेत दौरा करून ईथल्या उद्योजकांना भारतात उद्योग काढा, आम्ही तुम्हाला अमक्या सवलती देवू, हे फुकट देवू, कर माफ करू सांगून गेलेते. तेव्हा काय हा स्वाभीमान पुलंच्या भाषेत 'प्लीज फाईल' केला होता काय? या आणि अशा अनेक राजकारणी लोकांची मुलं शिकायला अमेरिकेत्/युरोपातच जातात ना? मग त्यांना का नाही आधी मिरच्यांची धुरी देत? अर्थव्यवस्था खुली तर करायची.. ग्लोबलायझेशनमुळे होणारे फायदे पण खिशात घालायचे. पण त्या ग्लोबलायझेशन साठी जे झटतात/झटले त्यांच्या नावानी गळे काढायचे. तुम्हाला काय वाटले की अमेरिकन/युरोपियन लोकांना स्वप्न पडले होते भारतात खुप चांगले ईंजीनियर्स/तंत्रज्ञ आहेत म्हणून. हे त्यांना पटवून देण्यासाठी कोणीतरी तिकडे जावूनच आपल्या कष्टांनी/हुशारीनेच पटवून दिले ना? मगच आता भारतात इतक्या संध्या उपलब्ध झाल्यात. आणि उच्चशिक्षण घेवून परदेशात स्थायीक झालेले लोक देशासाठी काही करत नाहीत हे तुम्हाला कसे कळले. अमेरिकेत महाराष्ट्र फाउंडेशन (http://www.indiancharity.org/) अतिशय भरीव काम करते आहे, ते एकदा पहा. आय. आय. टी. मधल्या लोकांनी गेल्या वर्षी १० लाख डॉलर्स इतकी मदत पाठवली आय. आय. टी. मध्ये नवीन प्रयोगशाळा/यंत्रसामग्री घेण्यासाठी. स्वतः भारताचे राष्ट्राध्यक्ष डॉ. कलाम आले होते आय. आय. टी. च्या संमेलनाला आणि या लोकांनी केलेल्या देणगी आणि इतर कार्याबद्द्ल प्रशंसा करून गेलेते ते काय उगाच. या सगळ्या बाबींचा विचार करा आणि मग ठरवा मिरच्यांची धुरी कोणाला द्यायची ते. - नाटक्या

In reply to by सिद्धेश

राहु द्या. राहु द्या. देशसेवा करायला देशातच रहायला पाहीजे हे तुम्हाला कुणी सांगीतलं? मीही सरकारच्या शिष्यवृतीवर शिकलो. काम करीन तर अस्सल भारतीय कंपनीत म्हटलो अन एका 'अस्सल' भारतीय कंपनीत ५ वर्षे घालवली. महीना पगार ६०००/-. रहायला घर फुकट. हाजी हाजी करायचा कंटाळा आला अन इथे आलो. सरकारी करातुन येणारी शिष्यवृती तुम्हाला दिसते हो पण जनतेचा कर बर्‍याच ठिकाणी गटारीत जातो. ते का नाही थांबवत? सरकारी कर्मचारी काम करायचे पैसे मागतात त्यांना कधी सुनावलय का? 'तुमचा पगार जनतेच्या करातुन येतो ते?' देशाबाहेर राहुन देशसेवा करणारे लोक मी पाहीले आहेत. देशात राहुन देशाला विकणारेही पाहीलेत. त्यांना टांगा उलटं. फोडा हंटरने. त्यांना द्या मिरचीची धुरी. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

In reply to by सुक्या

मस्त प्रतिसाद. नाटक्या रावांचा पण मस्त प्रतिसाद.. धुरी द्यायची ना.. तर आधी सरकारी कर्मचार्‍यांना द्या. आणि मग त्यांच्या नाकातून जर प्रामाणिक पणा बाहेर आला तर बाकींच्यांना द्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by सिद्धेश

धुरी द्यायला तरी अमेरिकेला यालच ना? तेव्हा विमानतळावरुन आणण्याची व्यवस्था करीन! शेवटी आपल्या देशबांधवांना मदत नको का करायला?? ;) एच वन झाला की कळवा, भारतीयांनाच धुरी द्यायला जातोय हे सांगितलेत की लगेच मिळेलही, कारण बाहेरच्या लोकांना जाणार्‍या जॉब्जमुळे गोरे अमेरिकन सुद्धा वैतागलेलेच आहेत! ;) चतुरंग

नेमेचि येतो पावसाळा तशा या पोस्ट्स असतात! काही नवीन नाही राहीलंय.. उद्या उठून कोणी परदेशस्थ भारतियांबद्दल,( हो भारतीयच!) दोन वाक्यं नॉर्मल बोलले ना तरच मला आता ते आश्चर्य वाटेल.. संपादकांना एक विनंती.. सेम विषय असलेले धागे परत उघडले गेले तर पूर्वीचा धागा दाखवून नवीन विषय बंद करावा.. चर्चाकर्त्याला अजुनही त्यावर चर्चा/वाद करायचे असतील तर पूर्वीच्या धाग्यावर चालूदे.. सारखं हेच हेच पाहून वैताग येतो! शिवाय चर्चा करून फायदाही नसतो! नवीन माणूस येतो आणि जुना+नवीन तिरस्कार ऍड होतो, इतकाच अर्थ उरलाय. साचे बदलायला कोणी तयार नसतंच नाहीतरी.. (असल्या चर्चांना वैतागलेली!) भाग्यश्री. http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

दोन वाक्य? बाई तिथे आख्खी पोस्ट टाकलीये ती दिसत नाही की हा तुमचा एकांगी पणा समजायचा? :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

मला वाटतो की तुम्च्यात आणी त्यांच्यात फरकच काय ? कारण आजकाल काही स्वतःला अतीहुशार समजणार्या मराठी लोकांना अशी गैरसमजुत झाली आहे की कोणीही येवुन परदेशात, त्यातल्या त्यात अमेरीकेत राहणार्या मराठी लोकांबद्दल आपण काहीही गरळ ओकु शकतो, आणी आपण महाराष्ट्रात राहतो , तर जसे काही हा आपल्याला कायद्यानीच अधीकार मिळाला आहे बॉ. तेव्हा असे लेख टाकण्याच्या आघी पुर्ण तयारी पाहीजे की लोकांच्या तिखट प्रतिक्रिया येणारच. मी आत्ता त्या दुव्यावर "जॉन" चे उत्तर वाचले. माझे हे म्हणण आहे की ह्या ईटरनेटच्या काळात ईतके जास्त फ्री पॉर्न ऊपलब्ध आहे की कोणी त्या मटा या सकाळ सारख्या भुक्कड लेखांकडे लक्षही देत नसतील. आणी ज्याला पाहीचे आहे, ही त्याची मर्जी. आपण कोण हो ठरवणारे. आणी जेव्हा ईंटरनेट नव्हते तेव्हा काय लोक अष्लील मासीक या सिनेमे पाहीचे नाही काय ? लोक काय करतात, ह्याच्यापेक्शा आपण जर आपल्या मुलांकडे लक्ष देवुन, ते तर कमी वयात अशा गोष्टी पाहात नाही ना, ह्या कडे जास्त लक्ष द्या. आणी परदेशात राहुन जर आम्ही आमच्या मात्रुभुमीवर आजही जीवपारप्रेम करतो, गुण गातो, तर मात्रुभुमीत होणार्‍या वाईट गोष्टीबद्दल बोलण्याचा तेवढाच अधीकार आम्हालाही आहे. आणी ह्या मागची ही ईछ्या आहे की मात्रुभुमीचाही तेवढाच विकास व्हावा. जसे मांजराला डोळे मिटुन दुध पिताना वाटते की कोणालाच काही दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्हालाही वाटते की भारतात होणार्‍या वाईट गोष्टी कोणालाच दिसत नाही ,पण सर्व जग बघतोय. ह. घ्या. तुम्हालाही या तुमच्यासारख्या कोणालाही परदेशात राहणार्‍या मराठी या भारतीयंबद्दल गरळ ओकण्याचा अधीकार नाही. मला एक म्हण आठविली, की जेव्हा कोल्हा अंगुराच्या वेलीवर लटकलेल्या अंगुराच्या घडा पर्यंत पोहोचु शकत नाही तर तो लोकांना सांगत सुटतो की "अंगुर अंगुर खट्टे है " :''( :''( जय महाराष्ट्र...."

In reply to by खादाड_बोका

कोल्हा अंगुराच्या वेलीवर लटकलेल्या अंगुराच्या घडा पर्यंत पोहोचु शकत नाही तर तो लोकांना सांगत सुटतो की "अंगुर अंगुर खट्टे है कारण कीत्येका साठी ते 'खट्टे' च असतात , पण ते इकडच्या लोकांना असे सांगतात की ते इतके गोड आहेत की तुम्ही आज पर्यंत खाल्ले नसतील.

वर सगळ्यांनीच योग्य तो ऊहापोह केलाच असल्याने अधिक काही लिहीत नाही; फक्त असे आचरट काहीतरी लिहिण्यापेक्षा गप्प बसणे श्रेयस्कर असा आगाऊ सल्ला नक्की देतो. (आगाऊ)बेसनलाडू एरव्ही असा आगाऊपणा केलाही नसता; पण अनिवासी मराठीजनांना शिव्या द्यायची जी फ्याशन आली आहे. तिच्याविरोधात असे तिखट बोलण्याशिवाय काही पर्याय ठेवलेला नाही फ्याशन आणणेल्यांनी! (पर्यायी)बेसनलाडू

समोरचा माणुस जर आपला दोष दाखवत असेल तर तो सुधारण्याचा प्रयत्न करावा ना...तो अमेरिकेत राहतो का इंग्लंडात राहतो का युगांडात राहतो याने काय फरक पडतो ??? यात नाव ठेवणार्‍याची प्रगती न होता झाली तर आपलीच प्रगती होईल. (भारतात सार्वजनिक स्वच्छतेची बोंब असल्याचे कबुल करणारा आणि सार्वजनिक जागी स्वत: कचरा न फेकणारा) शाहरुख

अमेरिकेमध्ये राहून भारताला नावे ठेवणारे भारतीय पाहिले नाहीत असे नाही. पण त्याच वेळी कंपनीने ग्रीन कार्ड करण्याची ऑफर दिलेली असताना किंवा ग्रीन कार्ड हातात मिळून देखील ते ठुकरावून भारतात परत गेलेले मित्र ही पाहिले आहेत. अमेरिकेत राहूनही इथले काही सुखावह न वाटणारे आणि भारतात परतायचे आहे पण अजुन परतले नाहीत असेही लोक पाहिले आहेत आणि इथली सिटीझनशिप घेउन कायमचे (?) भारतात परत गेलेली कुटुंबेही पाहिली आहेत. परदेशी रहा, पैसा कमवा पण काही काळानंतर मायभूमीला परत जा (असं माझं व्यक्तिगत मत आहे ...कोणाला सल्ला देत नाहिये)...भारत इतकाही वाईट देश नाहीये की एकदा परदेशी गेलो की परत यावेसेच वाटू नये. अमेरिकेचे नागरीकत्व घेताना शेवटची पायरी म्हणजे शपथविधी. ह्याचे मला नेहमी कोडे पडलेले आहे की भारतीय लोक 'अमेरिकेशी एकनिष्ठ राहीन 'वगैरे अशी शपथ कशी घेतात? खरीखुरी शपथ घेतली तर तुम्हाला मायभुमीबद्द्ल प्रेम नाही आणि खोटी शपथ घेतली तर तुम्ही अमेरिकन सरकारला फसवत आहात असा अर्थ होत नाही का ? कि असं दुट्प्पी वागून फक्त आपला स्वार्थ साधायचा?

तुम्ही जे लिहिले आहे ते तुमचे अनुभव आहेत कि वाचून / ऐकून बनलेले विचार आहेत? देशप्रेम ही काही कोणाची मक्तेदारी नाही ... तुम्ही भरतात रहातात याचा अर्थ by default तुम्ही देशभक्त आणि निष्ठावान भारतीय नागरिक होत नाही . आणि भारतात रहाणे हा काही अस्सल भरतीय असण्याचा एकमेव निकष नाहीये .

In reply to by मनीषा

मनिषाताई, 'अतिशय एकांगी विचार..' हे आपण सदर लेखकाला (महेन्द्र) उद्देशून लिहिले आहे की माझ्या प्रतिसादाला उत्तर देण्याकरता लिहीले आहे? कोणाबद्द्ल बोलताय त्याचा उल्लेख करायला हवा होता. (माझ्या प्रतिसादाला असेल तर मी कुठलेच विचार मांडले नाहीयेत फक्त माझी निरिक्षणे नोंदवली आहेत आणि मला नेहमी पडणारा प्रश्न लिहीला आहे. आणि मी सध्या भारतात रहात नाहीये.)

महेंद्र साहेब, आपल्या लेखावरुन असं वाटतं की, आपलं एखाद्या परदेशस्थ भारतीयाशी भांडणं असावं. त्यावरुन तुम्ही सरसकट सगळ्यांना एकाच तराजूत तोलण्याची चूक करत आहात. तुम्ही ज्या नेत्याबद्दल (लालूंबद्दलच ना?) त्यांना "हार्वर्ड ला लेक्चर द्यायला बोलवतात" असं विधान केलं आहे, त्या नेत्याला आपण आदर्श मानायचं का? तुम्हाला जर लालू ग्रेट वाटत असतील तर त्यांनी बिहारची जी वाट लावली आहे त्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला उत्सुक आहे. मिपावर बरेच परदेशस्थ भारतीय आहेत, पण आजपर्यंत मी कुणालाही भारतात राहणार्‍यांना ज्ञान शिकवताना पाहिले नाही. आधीच जातीची/धर्माची कुंपणं आहेत. त्यात अजून तुम्ही परदेशस्थ्/भारतात राहणारे असा भेद करु नका ही नम्र विनंती. तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो, तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो, मग माझं म्हणून काय असतं? -श्याम मनोहर

माझी मागे एकदा मायबोलीवर लिहिलेली "चिऊच्या घराची गोष्ट" वरती आली आहे. ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल फारेंडाचे आभार मानतो. अशा वेळी लिंक दिली जावी अशी अपेक्षा असते. जेणे करून मुळ लेखकाला त्याचे क्रेडिट मिळावे. पण तरी हरकत नाही. माझ्या वरील कवितेला जे प्रतिसाद आले होते त्यातच कुणीतरी तेव्हा मला 'आमच्या मित्रांना मेल करू का?' असे विचारले होते; व मी त्याला 'नक्कीच करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कविता पोचावी असे मला वाटते' असे उत्तर दिले होते. मेल मधून फिरत फिरत ही कविता इथे आली असेल, तर तो उद्देश साध्य झाला असे म्हणावे!! असो. वरती कवितेवर प्रतिक्रिया दिलेल्यांचे आभार. बाकी तुमची चर्चा चालू द्या.

In reply to by साजिरा

ही कविता मला ढकलपत्रातून मिळाली. त्यावर कोणाची, कुठून, कशी हे काही लिहीलेले नव्हते आणि मलाही ठावूक नव्हते. तसेच जेव्हा ती कविता ईथे टाकली तेव्हा त्याचा बद्द्ल मी क्रेडिट माझ्या कडे घेतले नाही (कविता टाकतानाच याचा उल्लेख केला आहे. वर असेही संपादक मंडळाला लिहिले आहे कि जर जरूर वाटली तर काढून टाकावी). जर माहीत असते तर १००% सांगतो की त्या बरोबर तुमचे नाव आणि लिंक दिली असती. तरी देखील एक सुंदर कविता लिहिल्या बद्दल आणि त्या मार्गाने आमच्या भावनांना शब्दरूप दिल्याबद्दल धन्यवाद... - नाटक्या

आ रे फक्त अमेरिकाच का? तिकडे आफ्रिका ,वेस्ट इंडीज मधे पण झाडा रे २-४ दुगाण्या... आपला टार्‍यापण येयिल आखाड्यात.... कवटी http://www.misalpav.com/user/765

>>आ रे फक्त अमेरिकाच का? तिकडे आफ्रिका ,वेस्ट इंडीज मधे पण झाडा रे २-४ दुगाण्या... नाही हो. तिथे अमेरिकेच्या तुलनेत कायमस्वरुपी रहाणारे खूप कमी आहेत. आणि अमेरिकन डॉलर ला भाव आहे ना. ;)

'इथे वाचा' वर मला तरी स्वाती दांडेकर ह्यांचे विचार (ज्यावरून एवढा गदारोळ माजला आहे) वाचायला मिळाले नाहीत. श्री. महेंद्र ह्यांनी 'स्वाती दांडेकर' ह्यांच्या विचारांचा 'सकाळ' ह्या वर्तमानपत्राचा दुवा द्यायला हवा होता, असे वाटाते. असो. मी अमेरिकेत नाही पण भारताबाहेर २५ वर्षे राहिलो आहे. अजूनही त्या देशाशी संबंध राखून आहे. ह्या वास्तव्यात मला तरी भारताला शिव्या घालणारा कोणी महाराष्ट्रीयन (की महाराष्ट्रिय?) भेटला नाही. सर्वांना भारताबद्दल प्रेमच दिसून आले. भारतातील गैरप्रकारांवर बोट ठेवणे म्हणजे काहितरी मोठ्ठे पाप करणे असा विचार कोणाच्याही मनात येत नाही. भारतात बुद्धीवंतांची कमी नाही. पण भ्रष्टाचार, राजकारण्यांची समाजकारणातील उदासिनता, समाजातील वाढती ऐहिकता, पारंपारिक जिवनमुल्यांचा र्‍हास, नविन पिढीची ऐतिहासिक वारशाबद्दलची अनास्था आदी अनेक मुद्दे भारत भेटीत प्रकर्षाने जाणवतात त्यावर 'तिथे' मराठी माणसांमध्ये स्वाभाविक पणे चर्चा होते. नुसती चर्चा होते का? तर नाही पुढील पिढीला संस्कारक्षम बनविण्यचा प्रयत्नही होतो. पण त्यावरही,' 'मुंजी लावल्या, शुभंकरोती शिकविले' म्हणजे आपण खूप काही संस्कार केले, असे एन्. आर्. आय्. ना वाटते', असे हिणकस शेरे, स्वदेशी आणि स्वबांधवांकडून कानावर येतात. असो. त्यांचे विचार त्यांच्या जवळ असे म्हणून सोडून द्यायचे. भारताबद्दल प्रेम वाटते तर परदेशात का राहता? परत येऊन भारताची सेवा करा, त्याला प्रगतीपथावर न्या. असा पोकळ आरडाओरडा करण्यापेक्षा आपण इथे आहोत तर प्रथम आपण स्वतःला सुधारू, मग आपल्या गल्ली-मोहल्ल्याला सुधारू, पुढे आपल्या शहरला सुधारू म्हणजे देश आपोआप सुधारुन आज ना उद्या प्रगती पथावर नेता येईलच. १०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची? स्वाती दांडेकराचे विचार माझ्या वाचण्यात आले नाहीत त्यामुळे त्यावर मी काही भाष्य करू शकत नाही. पण त्या काहितरी 'गैर' बोलल्या आहेत असे एकूण श्री. महेंद्र ह्यांच्या लिखाणावरून वाटते. ठीक आहे ते त्यांचे विचार आहेत असे म्हणून तिकडे दुर्लक्ष करून आपण आपले लक्ष भारताच्या सद्य परिस्थितीवर केंद्रित करावे. वरील सर्व सल्ला/उपदेश मी खडकावर उभा राहून पाण्यात बुडणार्‍याला पोहण्याचे धडे देत नसून मी स्वतः ह्या व्यवस्थेत गटांगळ्या खात पोहण्याचा प्रयत्न करतो आहे. दर महिना काही हजार परकिय चलन भारताला मिळवून देतो आहे. भारतातल्या १५ जणांना परदेशात पोटापाण्याला लावले आहे, भारतात सर्व टॅक्स भरून व्यवसाय उभारतो आहे. भारतात ३० जणांना पोटापाण्याला लावले आहे. पुण्यासारख्या शहरात सुशिक्षित (?) म्हणवणारे वय वर्षे १५ ते ७५ पर्यंत सर्व, स्त्री काय किंवा पुरुष काय, जेंव्हा बेशिस्तपणे वागून रहदारीचे नियम तोडतात तेंव्हा त्यांचा रोष पत्करून मी त्यांना समजविण्याचे, लोकशिक्षणाचे कार्य तिथल्या तिथे रस्त्यातच करीत असतो. भारताची पुढची पिढी महत्त्वाची. माझ्या स्वतःच्या मुलाला तो परदेशात असल्यापासून सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे बद्दल वारंवार मार्गदर्शन केले आहे. आज तागायत विविध स्तरावर त्याला 'घडविण्याचा' प्रयत्न करतो आहे. तसेच गल्लीबोळात क्लासेसच्या बाहेत रस्त्यावर आपापल्या दुचाक्या उभ्या करून गप्पा मारत बसलेल्या विद्यार्थ्यांनाही 'रहदारीला अडथळा निर्माण होईल असे वागू नका' अशी हात जोडून विनंती करीत असतो. रस्त्यात पान खाऊन थुंकणार्‍यांनाही समजावत असतो. असो. शासनाचीही काही जबाबदारी असते. आपल्याकडे सार्वजनिक मुतार्‍या अगदी नगण्य असतात. असतात त्याही 'वापरण्यापलिकडच्या' अवस्थेला पोहोचल्या असतात. स्त्रियांसाठी तर अशी सार्वजनिक सोयच नसते. समानतेचा ढिंढोरा पिटण्याच्या आजच्या काळात ही असमानता का? त्या मुळे कोणी पुरूष मंडळी रस्त्याच्या कडेला उभी असतील तर ते गैर आहे हे जाणूनही तिकडे दुर्लक्ष करावे लागते. मी स्वतः, बँका, मॉल, उपहारगृहे अशा आस्थापनांमधील स्वच्छतागृहांचा वापर निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी करतो. पण अशी नागरी सुविधा उपलब्ध करून न देणे (जनतेकडून भला थोरला कर वसूल करूनही) हे सरकारचे अपयशच आहे. 'धंदा, स्वतःचा व्यवसाय करणार्‍यांसाठी सरकारने अनेक नियम केलेले असतात पण त्यांचे काटेकोरपणे पालन करून व्यवसाय करणे कधी शक्य होऊ नये अशाच पद्धतीने ते बनविले असतात.' हे माझे विधान नसून प्रसिद्ध उद्योगपती श्री. शंतनुराव किर्लोस्करांचे ७०च्या दशकातले वाक्य आहे. मी फक्त सध्या तसा अनुभव घेतो आहे. माझ्या उपहारगृहासाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मला काही 'खर्च ' आला. तो करण्यावाचून गत्यंतरच नसते. कारण अग्निशमन दलाचा अधिकारीच मला सांगतो की असे एकेक नियम आहेत की ते पाळून तुम्ही व्यवसाय करूच शकणार नाही. तिच कथा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची, तिच कथा पोलिस परवान्याची, तिच कथा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची आणि तिच कथा कोर्ट कचेर्‍यातली. एकतर ह्या भ्रष्टाचाराचा भाग बना नाहितर घरी बसा. मी कायद्याला धरूनच वागेन, व्यवसाय करेन असे म्हणाल तर तुमचा व्यवसाय ४ महिनेही चालू देणार नाही ही व्यवस्था. ह्या, वरील उदाहरणांना 'टिप ऑफ द आईस बर्ग' असेही म्हणता येणार नाही, इतका हा 'कर्करोग' भारतभर पसरला आहे. कुणा परदेशस्थ मराठी (किंवा कोणीही भारतियाने) काही कॉमेंट करावी आणि आपण तमाम परदेशस्थांवर उखडण्याला समर्थनिय मानावे तर त्याच मापदंडाने जे काही भारतात चालले आहे त्या ह्या पापाला वाचा फोडून, त्याविरुद्ध चळवळ उभारण्याची प्राथमिकता कितीतरी पटीने अधिक आहे. कुणा एका व्यक्तीच्या वक्तव्याने आपण विद्ध होऊन 'शितावरून भाताची परीक्षा' हा न्याय सर्व पारदेशस्थांना लावित आहात पण भारतभर पसरलेल्या 'भाता'कडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहात. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे कुणा संताने म्हणून ठेवले आहे. त्याचा अर्थ एवढाच कि, 'त्याच्या निंदेतून आपल्याला आपलेच दोष स्वच्छ दिसून येतात. ते दूर करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा आपल्याला वाव मिळतो.' खरे पाहता आपण अशी स्पष्ट टिका करणार्‍यांचे आभारच मानले पाहिजेत. असो. हे माझे विचार आहेत. तुम्हाला ते पटले तर उत्तमच आहे नाही पटले तरी मी माझ्या मार्गावरून मार्गक्रणा करीत राहणारच आहे. धन्यवाद. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by प्रभाकर पेठकर

मानले तुम्हाला. अतिशय संयमी आणि समर्पक प्रतिक्रिया दिलीत. १०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १ कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची? नेमके वर्मावर बोट ठेवलेत आपण. - नाटक्या

In reply to by नाटक्या

>>१०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १ कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची? पेठकर काकांची प्रतिक्रिया छानच त्याबद्द्ल वाद नाही. फक्त एकच सांगायचे की ९९% मध्ये देश सुधारण्याची जबाबदारी पेलवणारे किती असावेत? बेसुमार लोकसंख्या वाढलेल्या या देशात दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असलेले गरीब जन किती असावेत? सरसकट ९९% आकडा बरोबर नाही वाटत.

In reply to by पक्या

'तो ' प्रॉब्लेम तर १ टक्यातही असणारच. ह्या १ टक्के अनिवासी भारतियात सर्वजण थोडेच शिकले-सवरले असणार आहेत? जे काही शिकले-सवरलेले आहेत त्यांच्यातही ती 'धमक' असेलच असे कशावरून? स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी ज्यांनी उडी घेतली ते सर्व उच्चविद्याविभूषित नव्हते. परिपक्व बुद्धीचा कोणी अशिक्षितही समाजकारण करू शकतो. असो. तसेच, ९९% टक्के म्हंटले म्हणजे अगदी बारावीच्या रिझल्ट सारखे नाही म्हणायचे आहे मला. मुद्दा एवढाच आहे की अनिवासी भारतिय निवासी भारतियांच्या तुलनेत बरेच कमी आहेत. तुमच्या समाधानासाठी १ % आणि ४०% असे प्रमाण घेतले तरी तेही अनिवासींपेक्षा बरेच भारी आहे. सगळेच शिकले/सवरलेले/समर्थ अमेरिकेत गेले आणि अशिक्षित/बावरलेले/असमर्थ भारतात मागे राहिले अशी परिस्थिती नाहीए. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by प्रभाकर पेठकर

हे सा॑गतोय..जे परदेशात बसुन कविता पाठवितात त्या॑च्यासाठी,, काय असत माहीत आहे का ? कचरा असेल ना तर दुरवरून " वास "येतो,त्याचप्रमाणे वाईट बाब लगेच लक्षात येते, अत्तर मात्र बोटाला लावुन नाकाजवळ न्याव लागत्,त्याच प्रमाणे चाग॑ली बाब लक्षात येण्यासाठी त्याच्याजवळ जाव॑ लागत, दुर असणार्‍या॑ना का समजणार. समस्या १)अस्वछता : ही एक सार्वजनीक जबाबदारी आहे,आपण जे काही करताय ते व॑दनीय आहे. मी काय केल आहे : अशीच "नागपुरचाळ" ह्या झोपडट्टीची सुधारणा केली आहे,आता तिथे जाल तर ती झोपडपट्टीची वाटणार नाही,"सुविधा"आणी आमदाराचे हात पाय जोडुन सार्वजनीक स॑डास (एकुण १०) बाधुन घेतेले आहेत.एक जिम (टार्‍या पुण्याला आला की खास निमत्र॑ण आहेच्,सोबत त॑दूरी.ह.घ्या.)गेल्या आठ वर्षापासुन आम्ही(साधारण १५० मे॑बर)तिथे एक फ॑ड चालवितो.२% व्याजाने केवळ शिक्षणासाठी कर्ज देतो,मागील वर्षा॑पासुन१% केला आहे.बरेच जण उच्चपद्स्थ आहेत,भाउ,मित्र,झोपडपट्टीच्या मुली ,मी स्वतः आतापर्यत पर्यत यु.एस्.ला जाउन आलो,दोन जण I.I.T. engineers आहेत,बायका॑बरोबर यु.एसला रहातात.पण मुळ घर अजुन नागपुरचाळीत, अपेक्षा:जिथे असाल तिथे स्वछता असा आग्रह धरा...जालावर खडे फोडण्यापेक्षा..आम्हा परदेशी वास्तव्यात असलेल्या भारतीय बाध॑वाकडुन हिच अपेक्षा करतो.. सुहास..

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

In reply to by संदीप चित्रे

तू आणी तुझ्या स्टॅन्ड अप कॉमेडीच्या ग्रुप ने काय केलं ते नाही सांगितलंस तू. हा संदीपचा ग्रुप... एक कवडीही न घेता महाराष्ट्र फाऊंडेशन साठी पैसे जमाकरण्या करता त्यांच्या ३ तासाच्या शो चे खेळ करतात. आणि जमलेला सगळा निधी महाराष्ट्र फाऊंडेशन ला पाठवून देतात. नेहमीच्या कामकाजातून.. विकांताला सगळे कार्यक्रम असतात यांचे. आता पर्यंत कित्येक हजार डॉलर्स यांनी पाठवले आहेत महाराष्ट्र फाऊंडेशन साठी. आता काय म्हणाल याला? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

>>स्टॅन्ड अप कॉमेडीच्या ग्रुप .....महाराष्ट्र फाऊंडेशन साठी. आता काय म्हणाल याला? देशसेवा, भरीव योगदान. चित्रे साहेब सलाम आपल्या कार्याला.

काका सहमत आहे....अगदी छान लिहिल आहे. आम्हि हि आमच्या परिने खारिचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोच ...पण उगाच आम्ही परदेशात राहतो म्हणून कोणी काहीही बोलला कि त्रास होतो. आमचा देशप्रेम खोट त्यांच ते खर अस नसत ना.

In reply to by सायली पानसे

'उडदा माजी काळे गोरे' हे सर्वत्र असणारच. जास्त मनावर नाही घ्यायचे. समाजकारण करीत राहावे. कोणी काहीही म्हणू देत. 'ऍकला चॉलो रे!' दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

१०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १ कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची? आज भारतातील साक्षरता फक्त६०%आहे. आणि ४०%लोकांना पोटभर खायला पण मिळत नाही. मग त्यांच्याकडून काय डोंबलाची अपेक्षा करणार देश सुधारण्याची? परदेशात असणार्या भारतीयांना उत्तम ज्ञान आहे. जागतिक घडामोडी काय चालू आहेत भारताला प्रगतीसाठी काय करायला पाहिजे याची त्यांना चांगली माहिती आहे. आणि एवढी सगळी साधनं असतानाही ते पूर्ण योगदान देत नाहीत यामुळे च जीव तुटतो. उत्तम ज्ञान असणारे भारतात पण आहेत पण त्यांच्यामध्ये हे १लाख मिसळले तर संख्या नक्कीच वाढेल. आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका | पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

In reply to by सिद्धेश

भारतातील साक्षरता फक्त६०%आहे. आणि ४०%लोकांना पोटभर खायला पण मिळत नाही. मग त्यांच्याकडून काय डोंबलाची अपेक्षा करणार देश सुधारण्याची? मुळात देश सुधारणे म्हणजे काय? ह्यावर सखोल अभ्यास झाला पाहिजे. मला वाटते जे अशिक्षित, निरक्षर आहेत त्यांना 'ग्राम स्वच्छता अभियाना'चे महत्त्व पटले आणि त्यांनी ते अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी देशसेवा केली असेच म्हणावे लागेल. दूसरे, ते शिकले नाहित निरक्षर राहिले पण त्यांनी त्यांच्या मुलांना प्राथमिक का होईना शिक्षण देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्या हातून देशसेवा घडली असेच म्हणावे लागेल. त्यांनी व्यसनमुक्तीचा प्रयत्न केला तरी देशसेवा घडेल. त्यांनी 'तंटामुक्त गाव' अभियान चालविले तरी देशसेवा घडेल. देशसेवा अनेक मार्गांनी करता येते. शिक्षणाचा, साक्षरतेचा इथे संबंध नाही. जितके सुशिक्षित अनिवासी आहेत त्यांच्या पेक्षा कितीतरी सुशिक्षित निवासी भारतिय आहेत. त्या १ टक्यावाचूनच भारताची सर्व प्रगती अडली आहे अशा आडमुठ्या गैरसमजात राहणे मला तरी रुचत नाही.

भारतात ३० जणांना पोटापाण्याला लावले आहे. पुण्यासारख्या शहरात सुशिक्षित (?) म्हणवणारे वय वर्षे १५ ते ७५ पर्यंत सर्व, स्त्री काय किंवा पुरुष काय, जेंव्हा बेशिस्तपणे वागून रहदारीचे नियम तोडतात तेंव्हा त्यांचा रोष पत्करून मी त्यांना समजविण्याचे, लोकशिक्षणाचे कार्य तिथल्या तिथे रस्त्यातच करीत असतो. भारताची पुढची पिढी महत्त्वाची. माझ्या स्वतःच्या मुलाला तो परदेशात असल्यापासून सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे बद्दल वारंवार मार्गदर्शन केले आहे. आज तागायत विविध स्तरावर त्याला 'घडविण्याचा' प्रयत्न करतो आहे. तसेच गल्लीबोळात क्लासेसच्या बाहेत रस्त्यावर आपापल्या दुचाक्या उभ्या करून गप्पा मारत बसलेल्या विद्यार्थ्यांनाही 'रहदारीला अडथळा निर्माण होईल असे वागू नका' अशी हात जोडून विनंती करीत असतो. रस्त्यात पान खाऊन थुंकणार्‍यांनाही समजावत असतो. आप्ण केलेल्या या देशसेवेबद्द्ल मी एक भारतीय म्हणून आपला शतशः ऋणी आहे. आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका | पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

In reply to by सिद्धेश

मी माझे कर्तव्य करतो. 'ऋणाची' भाषा मी करत नाहिए.

अमेरिकेत गेला कुणी तर चांगलेच आहे की. स्वताच्या हिमतीवर परदेशात कुणी करियर केले तर बाकिच्याना का त्रास? तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तर पण जा ना परदेशात.

In reply to by वजीर

>>अमेरिकेत गेला कुणी तर चांगलेच आहे की. स्वताच्या हिमतीवर परदेशात कुणी करियर केले तर बाकिच्याना का त्रास? ..तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तर पण जा ना परदेशात. मुद्दे भरकटवू नका हो. परदेशात शिक्षण, करियर - नोकरी , पेसा कमावणे चूक की बरोबर असा वाद नाहिये. आणि तो नसावाही. परदेशी राहून भारतातल्या सिस्टिम ला नावे ठेवणे ह्या विरोधात लेखकाने लिहिले आहे. परदेशी जायला धमक च लागते असे नाही...हुशारी , चांगले शिक्षण असून , नोकरीतला भरभक्कम अनुभव असूनही काही जणांना जायची संधी मिळत नाही. त्यात घरच्या महत्वाच्या जबाबदार्‍या , पैशाची कमतरता, नशीब हे भाग ही असू शकतात. इथे अनिवासिंच्या विरोधात लिहीणारे सर्वच भारतात रहात आहेत, ते कधीही परदेशी गेले नाहीत आणि त्यांच्यात धमक नाहिये हा तुमचा गैरसमज आहे.

In reply to by पक्या

माझ्या म्हणण्याचा विपर्यास करु नका. मी कधीच असे म्हणालि नाही कि जे परदेशी जात नाहीत त्यांच्यात धमक नाही. माझे म्हणणे इतकेच आहे की जे जातात ते स्वबळावर जातात दुरदेशी खेळ मांडणे हा काही वाटतो तितका सोपा प्रकार नाही. तरीही उगीचच त्याना हिणवणे, हंटरने मारने वगैरे शब्दप्रयोग योग्य नाहीत. हे लोक काही चोर दरोडेखोर आहेत का? कि तुमच्या वाट्याचं हिसकावुन खात आहेत?

In reply to by पक्या

>>परदेशी जायला धमक च लागते असे नाही...हुशारी , चांगले शिक्षण असून , नोकरीतला भरभक्कम अनुभव असूनही काही जणांना जायची संधी मिळत नाही. त्यात घरच्या महत्वाच्या जबाबदार्‍या , पैशाची कमतरता, नशीब हे भाग ही असू शकतात. सहमत. कारणांमधे ठरवून घेतलेले निर्णय हे पण समाविष्ट करा. >>इथे अनिवासिंच्या विरोधात लिहीणारे सर्वच भारतात रहात आहेत, ते कधीही परदेशी गेले नाहीत आणि त्यांच्यात धमक नाहिये हा तुमचा गैरसमज आहे. इथेही सहमत. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

वजीरजी, मी स्वतः सध्या परदेशी च रहात आहे. त्यामुळे आपण म्हणताय त्या परिस्थितीबद्द्ल जाणून आहे. विपर्यास नाही केलाय . 'तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तर पण जा ना परदेशात' असे तुम्हीच आधीच्या प्रतिसादात लिहीले आहे ना. त्याला उत्तर दिलंय मी , ते नीट वाचल्यास आपल्याला समजेल. उगाच प्रतिसाद खोडून काढायचा म्हणून लिहू नका. हंटरने मारने असा शब्दप्रयोग मला दिसला नाही कुणी वापरलेला. वाचताना नजरचुकीने सूटला असेल तर माहीत नाही. ज्याने तो वापरला असेल त्याला तिथल्या तिथेच समज द्यायची होती ना मग.

बाझवला तिच्यायला..! अनिवासी आहेत असे आहेत. कुणी प्रेम करा किंवा जळा! प्रेम करण्यार्‍यांबद्दल अर्थातच आपुलकी आहे. आणि जळणार्‍यांना अनिवासी साले फाट्यावर मारतात. या सर्व जळूंना हे अनिवासी पुरून उरतील हे नक्की! आणि उरलेही आहेत! कवटी अभ्यंकर अवांतर : सिरीयस लेखाच्या विडंबनात आलेल्या सिरीयस प्रतिक्रीयांचे मुळ लेखात विडंबन करायची नविन प्रथा सुरु करत आहोत.

ज्यांना जायला मिळत नाही त्यांच्या मनात एक सुप्त असुया असते, ती अशा चर्चेत बाहेर येते. आधी बाहेर का जावे लागते त्याचा विचार करा. इथले सगळे मार्ग तुम्हीच बंद करुन टाकलेत तर ती पोरं काय स्वस्थ बसणार का उपाशी मरणार? ती जाणारच. आधी या देशातले घाणेरडे राजकारण बंद करा, सर्वांना समान संधी उपलब्ध करा आणि तरी कोणी गेले तर बोला.