Skip to main content

आपल्याला पटते का?

लेखक श्रेया यांनी मंगळवार, 27/01/2009 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज जग २१ व्या शतकात आहे आपण प्रगती केली जुने विचार बदलले पाहिजेत हे मान्य पण आज काही लग्न झालेल्या बायका मंगळसुञ घालत नाही हेच चिञ T.V मध्ये पुरस्कार वितरणाच्या वेळी दिसते काळाबरोबर बदल केला पाहिजे पण मंगळसुत्र न घालणे हे पटत नाही ती फॅशन नसुन त्याला काही महत्व आहे आजच्या तरुण पिढीने बदल घडवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण जतन केले पाहिजे आपण भारतीय आहोत अमेरिके सारखे वागुन जमणार नाही आपला भारत विविध समृध्दिनी , संस्कारांनी नटलेला देश आहे आणि आपण तो ठेवणार आहोत

वाचने 18521
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

अजून मंगळसूत्र न घालण्यावरून वादंग चाललाय... च्यामारी विचारतो कोण तुमच्या इच्छेला वा अनिच्छेला? जिला घालायचंय ती घालेल मंगळसूत्र आणि जिला घालायचं नाहीये ती नाहीच घालणार. काय वाट्टेल ते करा. संस्कृतीच्या नावाने गळे काढा नाहीतर स्वतःला सोयीस्कर तत्वज्ञान तयार करून बायांना दुटप्पी दुटप्पी म्हणत बसा. विचारतो कोण तुम्हाला! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home