Skip to main content

महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा

लेखक मेथांबा यांनी रविवार, 25/01/2009 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व कॉम्रेड्सना (कॉम्रेड म्हणजे मित्र हा पण अर्थ होतो) माझा लाल सलाम, मी एक गिरणगावात वाढलेला सामान्य कम्युनिस्ट कार्यकर्ता. माझ्या लहानपणी मला एसेम जोशी, कॉ. श्रीपाद डांगे, कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. बी. टी. रणदिवे, कॉ. प्रमिला दंडवते, मृणालताई गोरे, कॉ. गंगाधर बुरांडे यांना जवळून पाहायची संधी लाभली. अतिशय निष्कलंक चारीत्र्याची माणसे ही, धुतल्या तांदळासारखी स्वच्छ. जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व. ही लोकं म्हणजे ५२ खणी हिरे होते हिरे. काय एकेकाचा आवाज, बोलण्याची हातोटी, माणसे जोडण्याची कला. वा वा. अतिशय सुंदर. परत एकावरही चुकुन पण कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करु शकणार नाही. अजातशत्रु म्हणतात की काय तसं. चला तर मंडळी, आपण एकत्र येऊन या थोर परंपरेचं पुनरुजीवन करुया. सर्वांना लाल सलाम, आपला, मेथांबा

वाचने 46115
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

In reply to by अविनाशकुलकर्णी

रामदास स्वामी हे औरंगजेब चे गुप्त हेर होते हे लाल भाईंचे आवडते मत आहे.. प्रसिध्ध इतिहासकार अविनाश कुलकर्णी यांनी शोधुन काढले का? का या मनगढंत बाता आहेत? माझ्या लेखाचा आणि या विधानाचा संबंध समजावुन सांगाल का?

काय बी बना ! ह्यांना पण सलाम केला पाहीजे राव ! सारखं सारखं तोंडावर पडतात पण पुन्हा तोंड वर करुन येता ही मंडळी ! सलाम तुमच्या कार्याला ! सलाम ! सलाम ! सलाम ! --->> एक फुटकळ टिव्ही चॅनल कडून ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by दशानन

>>सलाम तुमच्या कार्याला ! सलाम ! सलाम ! सलाम ! साधा सलाम की लाल सलाम ??/

बंदुकिच्या गोळितुन सत्तेचा उगम असे विध्वंसक तत्वज्ञान असलेला चिन पुरस्क्रुत माऒ चा लाल विषाणु आता भारतात वेगाने पसरत आहे.नेपाळवर कबजा करुन राजेशाहि संपवुन एकमेव हिंदु राष्ट्र संपवुन हा विषाणु भारतात पसरत चालला आहे..

In reply to by अविनाशकुलकर्णी

अहो राहू दे राहू दे ! तुम्ही आता हिंदु खतरे में ... असा जल्लोश नका करु ... राहु दे ! रिल्याक्स ! व्यक्तीगत नका होऊ ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by दशानन

>>तुम्ही आता हिंदु खतरे में ... असा जल्लोश नका करु ... राहु दे ! तुम्हाला आक्रोश म्हणायचे आहे काय?

In reply to by सखाराम_गटणे™

नाय ! जल्लोशच म्हणायचं होतं ! मुद्दा सापडाला की लोकं जल्लोशच करतात ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

लाल सलाम, कम्युनिस्ट पक्ष इतरांपेक्षा चांगले आहेत यात वाद नाही. महाराष्ट्रात संघवाले आणि शिवसेनेचि गुंडगीरी यात लोकांच्या विचारशक्ती अडकली आहे. हा आपलाच करंटेपणा आहे. हे लोक आत्ताच्या अमेरिकेबद्दल बोलणार नाहित--तो गोता काय कामगारांनी केला?; केरळ बाबत चिडीचूप. क्यूबा? वेनेझुएला?

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

जरा स्पष्ट बोला की राव, वाईच पुढे बोलता येईल. :) नीलकांत

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

खरे आहे . या पेक्षा ही विचारशक्ती कमुनिष्ठांशी निष्ठा दाखवण्यात खर्ची घालावी .. लाल सलाम ठोकावे. अमेरिकेच्या प्रश्नावर कमुनिष्ठपणा हाच कसा उपाय आहे हे सांगावे. महाराष्ट्राने इतके दिवस कमुनिष्ठ न होऊन स्वतःचे किती नुकसान केले यावर व्याख्याने द्यावीत. म्हणजे पानात टाकायला लागल्यावर आमचे नाना म्हणायचे 'मेल्या! पानात टाकून रे अन्न वाया घालवतोस. त्या पेक्षा खाऊन वाया घालव' पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

केरळ चे काय सांगता, तिकडे हमालांची लाल युनिअन आहे. माझ्या कडे एकच पेटी होती. मला हमालाची गरज नव्हति. तरीही हमाल माझा बरोबर चालत होते. ट्याक्सी जवळ गेल्यावर जबर्दस्तीने पैसे मागू लागले. शेवटी आरडा ओरडा करून मी त्यांना हाकलले. केरळ मधे जाउन पहा उद्योग धंधे किती डब घाई ला आले आहेत. शिवसेने ची गुंडगिरी दिसते, बंगाल मधली जाळपोळ, सक्तीचे बंद हे काय राष्ट्र्कार्य आहे. कम्युनिझम ही अफू ची गोळी आहे हेच खरे.

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

कालिंदीबाई, आताच्या अमेरिकेबद्दल मेथांबा ह्यांनी वर काही विख्यात लोकांची वचने दिली आहेत. 'पावासाठीही रांगा लावाव्या लागतील' असे ते म्हणतात. ह्यावर मी त्यांना चीनसंबंधी दोन प्रश्नांवर टिप्पणी करण्यास विनंति केली होती. (ह्यापैकी एक मुद्दा अमेरिकेच्या पडझडीचा चीनवरील परिणाम ह्याच्याशी संबंधित आहे). त्यावर त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. आजकालच्या जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे एकच काहीही वेगळे काढून त्याविषयी बोलता येणे अशक्य आहे. एका बलाढ्य देशाचे (भांडवलशाही) 'कोसळणे' (मेथांबांना अभिप्रेत आहे, मला तसे होईल असे व्यक्तिशः वाटत नाही) तर त्याचा परिणाम, भारतीय कम्युनिस्टांना आदर्शस्थानी असलेल्या चीनवर होणारच-- नव्हे तसा तो होतही आहे. त्याचे काय, असा माझा प्रश्न आहे. केरळाची नक्की किती प्रगति आहे, ह्याविषयी मी त्या सरकारच्या संस्थलावर गेलो, तेथे माहिती धड मि़ळेच ना (ह्याविषयी इथे पहा). नुसतेच केरळ खूप प्रगत आहे, असे म्हणण्यापेक्षा आकडेवारी द्यावी, ही काही फार अपेक्षा नाही? वेनेन्झुएलाचे काय? तेल आहे, आरडाओरडा करताहेत. ह्यापलिकडे त्याविषयी काय बोलणार? भारतीय कम्युनिस्टांची चीनविषयीही मते जाणून घेणे आवडेल. मुखत्वे ते चीनी नेतृत्व मानतात. तेव्हा राज्यशकट चालवण्याची जी कार्यपद्धति तेथील राज्यकर्ते अवलंबतात, ती भारतिय कम्युनिस्टांना कितपत मान्य आहे ह्याविषयी जरूर चर्चा व्हावी. येथे भारतिय कम्युनिस्टांचे स्वातंत्रयुद्धातील 'योगदान', त्यांच्या विचीध सामाजिक व राजकिय विषयावरील भूमिका, त्यांची बलस्थाने, त्यांच्या चुका (त्यांना मान्य असलेल्या व नसलेल्या) ह्या सर्वांवर आनंदाने चर्चा करूया. अर्थातच ह्या विषयावर लोकांच्या भावना तीव्र असल्याने मधे मधे नुसतीच आगपाखड होईल, तिच्ज्याकडे दुर्लक्ष करायचे. तर आता, मेथांबा अथवा इतर कुणीही माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मी वाट बघतो.

काय पण गंमत आहे बॉ इथे! चर्चेला एक विषय ठेवायचा, प्रतिसाद आले की त्यांना धुडकावून लावायचे. आरोप करु नको, महाराष्ट्राबद्दलच बोल असे सुनवायचे. स्वतः मात्र सतत केरळाचे उदाहरण द्यायचे. अशा चिमुकल्या राज्याचे जिथे परदेशातून येणारी मदत थांबली तर अर्ध्या घरांत चुली पेटणार नाहीत, जिथे छोट्या-छोट्या गावांतल्या चर्चेसला परदेशी इव्हँजिलिकल संस्थांकडून दरचर्षी करोडोंची रसद मिळते (ती कशी वापरली जाते तो एक वेगळा विषय होऊ शकतो), जिथे कम्युनिस्ट राज्यकर्त्यांच्या गुंडांची संघटीत गुन्हेगारी थक्क करणारी आहे, जिथे विरोधकांचे भर दिवसा गळे चिरले जातात व पोलिसात केसही दाखल करुन घ्यायची मारामार आहे व जिथे स्वतःचे (परदेशातून व पर्यटनातून येणारे वगळून) उत्पन्न आमच्या बीड जिल्ह्यायेवढे सुद्धा आहे का नाही याची खात्री नाही....!!! जियो कॉम्रेड बंधू जियो!! बरं तुम्ही आदर्श पूर्वाश्रमीचा रशिया-चीनमधून घेता मात्र तुलना त्यांच्या सोबत नको. मी शिवसैनिक नाही. पण शिवसैनिक वेळोवेळी जिवाची ढाल करुन जनतेची मदत करतात हे मी जवळून पाहिले आहे. मग ते पूर असोत वा दहशतवादी हल्ले. अशी आजच्या काळातली तुम्ही (कॉम्रेडांनी) जीवावर उदार होऊन जनतेसाठी काही केल्याची उदाहरणे तुम्ही देऊ शकाल काय? उलट नक्षलवाद म्हणजे कॉम्रेड अशी एक साखळीच आज तयार झालेली आहे. कॉ. डांगेंसारखे धुतल्या तांदळासातखे स्वच्छ नेते कधी काळी भारतीय डाव्या विचारसारणीत होते. त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण तो आता इतिहास आहे. ते नेते अशा वेळी उदयास आले जेव्हा भांडवलशाही-कम्यूनिझम यांच्यात कोण चूक कोण बरोबर या कसोटीचा निकाल लागला नव्हता. त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला पटले त्या विचारसारणीला वाहून देऊन त्यांनी समाजसेवा केली. पण त्या कसोटीचा निकाल लागल्यावर, रशियातून कम्यूनिस्टांचा निप्पात झाल्यावर व चीनने कम्यूनिस्टांच्या मूळ विचारसारणीला छेद दिल्यावरही जर तुम्ही स्वतःचीच लाल म्हणत असाल तर एका शिवसैनिकाने तुम्हाला वर दिला तसा प्रतिसाद न अल्यास आश्चर्य वाटेल. बरे तुम्ही स्वतःची लाल म्हणत असाल तर आम्हाला त्याचे सोयर सुतक नाही. पण म्हणून ज्यांच्या समाजकार्याच्या पासंगालाही तुमच्या संस्था पुरत नाहीत त्यांच्या नावाने बोटे मोडून तुम्ही स्वतःचे हसे का करुन घेता? महापूर, भुकंप, वादळे, सुनामी, वा आणखी काहीही आपत्ती असो संघावाले जीवाची पर्वा न करता व कसलाही बोलबाला न करता तात्काळ सेवाकार्यात लागलेले असतात. मी त्या त्या ठिकाणी कधीही लालभाईंना पाहिल्याचे स्मरत नाही. चक्रीवादळा नंतर रेल्वेस्थानकावर येऊन पडलेली मदत इच्छित स्थळी पोचवण्यासाठी ममता बॅनर्जी सारख्या संघद्वेष्ट्या मुख्यमंत्र्याला सरकारी यंत्रणा कमी पडू लागली तेव्हा तुमच्या कॉम्रेडांच्या गडात मदत घ्यायची वेळ आल्यावर आठवण झाली ती संघावाल्यांचीच. तेच पुढे त्सुनामी नंतर झाले... प्रचंड हाणी पोचलेल्या दुर्गम खेड्यांत जिथे न्यूज चॅनलवाले जाऊ शकले नाहीत तिथे परदेशी मिशनरी वा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते फिरकतही नव्हते... तिथे पोचून पिडितांचे आश्रू पुसले कोणी? संघावाल्यांनीच. असो. तूर्तास येवढेच... पण मुद्दा हा की आपण एक-दोन इतिहासजमा स्वच्छ कॉम्रेडांचे नावे घेऊन लाल सलाम ठोकल्याने काही होणार नाही. त्यासाठी त्यागी वृत्ती बाळगून व वर्तमानाचे भान ठेऊन समाजकार्याला वाहून घ्यावे लागते. केरळाच्या बाहेर डोके काढून स्वतःला सिद्धा करून दाखवा अन मग बोला. आपला, (लोकशाहीवर अगाध श्रद्धा असलेला भारतीय) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

शिवसैनिक वेळोवेळी जिवाची ढाल करुन जनतेची मदत करतात हे मी जवळून पाहिले आहे. मग ते पूर असोत वा दहशतवादी हल्ले. अशी आजच्या काळातली तुम्ही (कॉम्रेडांनी) जीवावर उदार होऊन जनतेसाठी काही केल्याची उदाहरणे तुम्ही देऊ शकाल काय? अफाट हिंसाचार करायचा आणि त्यावर पांघरुण घालण्यासाठी २-३ लोकोपयोगी कामे करुन दाखवायची. श्रीकृष्ण आयोगाने ठेवलेला ठपका इतक्यात विसरलात का राव? का मतलबी विसराळुपणा आहे तुमच्याकडे. शिवसेनेच्या नेत्यानी लोकांना करोडो रुपयांचा चुना लावला. आमच्या एका तरी नेत्याबद्दल कोणीतरी भ्रष्टाचाराचा आरोप करु शकतो का? आणि हे जे जिवावर उदार झालेत ते सेनेचे नेते नव्हेत तर सर्वसामान्य कार्यकरते. कुठे होते तेव्हा उध्दव ठाकरे? बिळातुन बाहेर आलेले त्याना तर कोणी पाहिले नाही.

माझी कम्युनिझम बद्दलची "आत्मियता" ;) येथील इतर प्रतिसाद वाचल्यास समजेल म्हणून आकाशवाणी परत करण्याचे टाळले आणि टाळत आहे. तरी देखील, "महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा " मधे आपण म्हणत असलेल्या सर्वांबद्दल मला खर्‍या अर्थी आदर आहे आणि राहील. अर्थात त्यातील, "कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. बी. टी. रणदिवे, कॉ. गंगाधर बुरांडे " बद्द्ल काही माहीती नाही. रणदिव्यांचे केवळ नाव ऐकले आहे. अधिक माहीती आवडेल. वेगळा लेख अवश्य लिहा. ना.ग. गोरे आणि जॉर्ज फर्नांडीसना विसरलात अथवा आवडत नसले तरी त्यांचे योगदान कमी करू नये असे वाटते. कोकण रेल्वे तयार करण्यासाठी स्वतंत्र कोकण रेल्वे कमिशन काढून जॉर्जसाहेबांनी ते काम पुढे करायला मोठी मदत केल्याचे आठवते. तेच मधु दंडवत्यांबद्दल (जरी त्यांनी "मुस्लीम मेल्यानंतरही मातीत जात असल्याने, देशाच्या मातीशी जास्त इमान राखतात" असले बाष्कळ विधान केले असले तरी...). यातील बर्‍याच नेतृत्वाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी लढा दिल्याचे विसरणे म्हणजे कृतघ्नताच ठरेल. (अर्थात त्यात इत्यरही होते हे विसरता येत नाही. मात्र त्या काळात जगातल्या कामगारांना एकत्र करण्याच्या भानगडीत न पडता, मराठी माणसासाठी सर्वप्रकारच्या मराठी माणसांबरोबर एक होण्याची सक्रीय इच्छाशक्ती त्यांनी दाखवली) मात्र या लेखासंदर्भात एक प्रश्न पडतो, की जर इतके सगळे आदर्श वगैरे नेते होते तर मार कुठं खाल्ला? त्यांना सत्ता का स्थापता आली नाही? लोक त्यांच्या पाठीमागे का राहीले नाहीत? माझ्या लेखी समाजवादी नेत्यांनी काँग्रेसला रामराम करून जेंव्हा प्रजासमाजवादी पक्ष काढला तेंव्हाच त्यांनी स्वत:ला कमकुवत केले आणि काँग्रेसमधील अनिष्ठ नेत्यांना सत्तेत ठेवायला अप्रत्यक्ष मदत केली. (अर्थात त्यांचा तसा उद्देश नव्हता हे नक्की!) कम्यनिस्टांबद्द्ल काय बोलायचे? शब्द अपुरे पडतात... फक्त इतकेच म्हणेन त्या तत्वज्ञानाचा काही उपयोग नाही. जेंव्हा चीन युद्धात देशापेक्षा परदेशी तत्व मोठे समजत देशाच्या शत्रूला जास्तव जवळचे मानले तेंव्हाच त्याच्या मर्यादा समजल्या.... असो,

लाल लोक ही सध्याच्या इस्लामी टेररिस्ट पेक्षा जास्त टेरर आहेत. त्यांनी किती लोकांना मारले हे इथे पाहा. http://www.satp.org/satporgtp/countries/india/database/fatalitiesnaxal… निष्कंलंक वैगरे कमी लोक होती. जी सर्वच पक्षात असतात त्यामुळे वरिल उदा चूकीची वाटतात. अहिंसे सारखच हे तत्वज्ञान ही फसवे आहे. असे नसते तर रशिया लोकशाहीकडे वळले नसते. १९६२ च्या चिनी युध्दात हे लोक सैन्य पाठवल्यावर गळा काढून रडत होते. ह्या लोकांचे मालक दुसर्‍या देशात आहेत. शिवसैनीक निदान मान्य करतात ही रिमोट कंट्रोल बाळासाहेंबाकडे आहे म्हणून पण हे लोक म्हणजे. छ्या. देशद्रोह्यासारखे वागले त्या काळात. आंदोलन काय अन मोर्चे काय. अरेरे. कदाचित म्हणूनच आम जनता ह्यांचा सोबत नसते. लाल सेनेला लाल नाव का पडले ह्याचा शोध घेता मी अश्या निष्कर्षाप्रत आलो आहे की ह्या लोकांना रक्ताचा अभिषेक फार आवडतो. रक्ताचा रंग आल म्हणून हे लाल. वर आकडेवारी पाहा.

भगतसिंग आणि सुभाषबाबूंसमोर एकमुखाने नतमस्तक होणारे मिपाकर, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांचा विषय निघाल्यावर असे होलसेल मध्ये का तुटून पडतात कळत नाही बॉ!

In reply to by कोलबेर

कारण त्यांच्या कम्युनिझम मध्ये लोकांच्या हत्या समाविष्ट नाहीत. ते आधी देशप्रेमी व नंतर कम्युनिस्ट होते. तूम्ही आपल्या देशातील सद्य कम्युनिस्टांचा इतिहास समजुन घ्या मग तूम्हाला हा प्रश्नच पडनार नाही.

In reply to by केदार

मग विरोध त्यांच्या हत्यांना असायला पाहिजे ना...कम्युनिझमला नाही..इथे वेगळेच दिसत आहे!

In reply to by कोलबेर

नाही विरोध बदलेल्या कम्युनिझमला आहे. मूळ कार्ल मार्क्स तुम्ही वाचा त्यात हत्येवर भर नाही. दास कॅपीटलने मी ही भारावून गेलो पण ती आयडीयल स्तिथी येत नाही असे नसते तर खुद्द रशियात लेनीन चा पुतळा पडला नसता वा आज रशिया लोकशाहीकडे वळले नसते. त्याचा हवा तसा अर्थ ह्या लोकांनी लावून घेतला आहे व ही लोक हूकूमशहा झाले आहेत ही वस्तुस्तिथी आहे. कम्युनिस्ट असनारे इतर देश बघा, सगळीकडे हुकमशाही आहे. भारतीय कम्युनिस्ट ( ह्यालाही एक पार्टी नाही, मार्क्स, लेनीन ब्ल्बा ब्ला अश्या स्वतःच्या इगोत ह्या लोकांनी कम्युनिझमच्या पण पार्ट्या काढल्या आहेत) वा चिनी कम्युनिझम वा इव्हन रशिया ह्यांचा बेस हा सशस्त्र क्रांतीवरच आहे. . ते होणारच दुसरा पर्याय नाही. मग लोकशाही योग्य की हुकूमशाही हा वाद परत सुरु करायला हरकत नाही. कम्युनिझम व्यवस्था ही लोकशाही व्यवस्थे विरुध्द आहे. केरळ वा बंगाल इथला कम्यूनिझम खरा नाही कारण तो भारतीय संविधानाशी सहमत (म्हणजे लोकशाही पध्दतीने निवडनुका घेणारा ) आहे. त्या कम्युनिझमच्या नावाखाली दक्षिन महाराष्ट्रात वाट्टेल ते अत्याचार होताना मी स्वतः पाहीलेत. (किनवट तालुका, नांदेड जिल्हा) ह्या तालूक्या शेजारीच अदिलाबाद हा आंध्राचा तालूकाही आहे. तेथे नक्षलवादी गरिब जनतेवर किती अत्याचार करतात हे देखील पाहीले आहे. झार ह्या मनोवृत्तीला नाहीसे करन्यासाठी कम्युनिझम़ (कदाचीत) योग्य होता वा एक पर्याय होता, पण नंतर कम्युनिस्टच झार होतात कारण माणासाचा मूळ स्वभाव हा पॉवर वेडा असने हा आहे. मग ही पॉवर एकदा का क्रांतीमुळे आली की मग संपले. ती लोक इतरांवर अत्याचार करणार. हा मूळ गाभा म्हणून माझा विरोध. अहो फार लांब कशाला जाता, इथे मिपा वर मी काही दिवस येतोय, त्यात तात्याने बरेचदा आणिबाणी लावून काही लेख काढून टाकले तर इथली लोक दुसरीकडे जाऊन मिपावर लोकशाही नाही असा गोंधळ घालताना वाचला आहे. मग मला सांगा साध्या लेखनावर बंदी घातली तर आपण लोकशाही नाही म्हणतो ( ते ही जालावरील एका छोट्या समुदाय असनार्‍या साइटीवर) मग आपल्या देशावर हुकमशाही कम्यूनिस्टांनी केलेले राज्य आवडेल का? म्हणून विरोध. (तात्या हलेक घ्या, उदा म्हणून वापर केला इतकेच, आनी ते चपखल बसत होते म्हणून.) असा एकतरी देश दाखवा जिथे कम्युनिझम मस्त नांदतोय. एकही नाही. चिन देखील आता प्युर कम्युनिस्ट राहीला नाही तर तो मिक्सड आहे. त्या चौकात जाहीर हत्याकांड करनारा चिन (प्युअर कम्युनिस्ट) आणी आज अमेरिकेच्या अध्यक्षांना त्यांचा कडे बोलावनारा चिन हे वेगळे आहेत. (लोकशाही जपनारा व वाढविनारा) केदार

In reply to by केदार

तुमची लोकशाहीची कळकळ समजते. पण नुकतेच सुभाषबाबूंवर लिहिलेल्या लेखात हा उल्लेख बघितला आणि इथे मोठमोठे प्रतिसाद देणार्‍यांनी तिकडे का बरे काहीच मत नोंदवले नाही ह्याचे आश्चर्य वाटले इतकेच.
त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.

In reply to by कोलबेर

भगतसिंग आणि सुभाषबाबूंसमोर एकमुखाने नतमस्तक होणारे मिपाकर, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांचा विषय निघाल्यावर असे होलसेल मध्ये का तुटून पडतात कळत नाही बॉ! भगतसिंग आणि सुभाषबाबूच कशाला वरचा माझा प्रतिसाद पाहीला तर त्यातील सर्वांचा आदर करायला कमीपणा वाटला नाही... तरी देखील याचा अर्थ म्हणून कम्युनिझम बरोबर आहे असे म्हणणे, म्हणजे जरा अतीच झाले. वर केदारने दिलेला दुवा पहा आणि नक्षलवाद्यांचे स्मारक बांधण्यात सार्थकता मानणारे अधुनिक कम्युनिस्ट पहा (जे अमेरिकेत राहतात/राहायचे!). उद्या गांधींना मानायचे याचा अर्थ मुळासकट गांधीवाद मानायचा असा अर्थ घेतला तर काय होईल? - भारताला सैन्यपण ठेवता येणार नाही आणि तुम्हाआम्हाला कोळंबीपण (मांसाहार) खाता येणार नाही :-) चालणार आहे का? मग असे म्हणायचे का, गांधींच्यापुढे नतमस्तक होतात आणि मग चिकनवर तुटून पडतात? असे कसे बॉ? ;) आणि कोणी सांगावे? जर भगतसिंग / सुभाषबाबू हयात असते आणि कम्युनिस्टांचा आचरटपणा करू लागले असते तर त्यांनापण विरोधच झाला असता. पण त्यांची महती बघता, ते कम्युनिस्टम्हणून नंतर राहून स्वत:चे आणि देशाचे इमान चीन आणि रशियाला विकायला गेले असते असे वाटत नाही...अर्थात या जर-तरच्या गोष्टी झाल्या.... दुर्गापूजा करणार्‍या कलकत्ताच्या कम्युनिस्टांना विचारून बघा, भगतसिंगसारखे नास्तिकतेसंदर्भात अतिशय स्पष्ट विचार स्वतःचे मरण दोन दिवसांवर ठेपलेले असताना तरी ते करू शकतील का ते...

In reply to by कोलबेर

भगतसिंग आणि सुभाषबाबूंसमोर एकमुखाने नतमस्तक होणारे मिपाकर, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांचा विषय निघाल्यावर असे होलसेल मध्ये का तुटून पडतात कळत नाही बॉ! राजे,, एकमुखाने तुटून पडतात

कम्युनिझम आणि मुस्काट्दाबी (न जमल्यास हत्या ) एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महाराष्ट्रात कम्युनिझम असता तर ईथे मुक्त चर्चा होउ शकली असती काय? क्युबा, च्यायना मधील आंतर जाला वर ची बंधने पहा ना...

यांचे नाव यादीतून निसटले आहे. फार मोठा (जायंट या अर्थाने) माणूस! कम्युनिस्ट विचारसरणी चांगली किंवा वाईट यावर स्वतंत्र वाद करता येइल. ( मेथांबास्टाईल ;) किंवा नीलकांतस्टाईल :) ) पण यांतील काही (सर्वांविषयी माहिती नाही म्हणून) मंडळी दिग्गज होती आणि चारित्र्य सांभाळून होती हे खरेच. आपल्या पिढीला तितकीशी माहिती नाही पण स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात तसेच आणीबाणीच्या काळापर्यंत महाराष्ट्रातील ह्या मंडळींचा थोडाफार चांगला प्रभाव असलेला दिसतो.

In reply to by एकलव्य

या सगळ्याच लोकांच्या कर्तुत्वाबद्दल नव्याने ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल. पण हे चांगले होते म्हणून समाजवाद ग्रेट असं तुणतुणं वाजवणं हा मूर्खपणा.. (एकलव्य वाजवतोय असं म्हणायचं नाही. इथे इतर आहेत वाजवणारे त्यांच्याबद्दल आहे हे.) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

वाजविणारा मेथांबा असला की समाजवादाची कशी वाट लागते ते ही चर्चा पाहिली की कळेलच! चीअर्स!! I think the best way to discredit your opponent is to find out the craziest person on your enemy's side of the spectrum and give him credence. That crazy person and his theories will bury your opponent much more easily. - एकलव्य

In reply to by एकलव्य

या सगळ्याच लोकांच्या कर्तुत्वाबद्दल नव्याने ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल. पण हे चांगले होते म्हणून समाजवाद ग्रेट असं तुणतुणं वाजवणं हा मूर्खपणा.. (एकलव्य वाजवतोय असं म्हणायचं नाही. इथे इतर आहेत वाजवणारे त्यांच्याबद्दल आहे हे.) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by एकलव्य

स्मरण करुन दिल्याबदद्ल धन्यवाद. खरोखरच हि यादी इतकी मोठि आहे की ५-१० नावे राहुन गेली असतीलच. http://www.vandemataram.com/biographies/patriots/patwardhan.htm

गेल्या १५-२० वर्षांत रशिया कम्युनिझम कडून लोकशाहीकडे (भांडवलशाहीकडे) वळला आहे. त्या काळात रशियाची प्रगती झाली आहे की अधोगती झाली आहे? याबाबत मिपाकरांपैकी कोणाकडे काही माहिती असेल तर ती सांगावी. किंवा दुवे द्यावेत. प्रगती म्हणजे जीवनमान, दारिद्र्यरेषा व त्याखालील जनतेची संख्या, जीडीपी, महागाई दर, धान्योत्पादन, औद्योगिक उत्पादन, आरोग्य सेवा वगैरे. कम्युनिझम संपतानाची खरी परिस्थिती काय होती हे पोलादी पडद्यामागे लपलेले होते हे गृहीत धरून त्यानंतर ३ वर्षे ते आतापर्यंत अशी प्रगती मोजायला हरकत नाही. खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

In reply to by नितिन थत्ते

साठी ही लिंक बघा. https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/rs.htm… त्यातले इकॉनॉमी सेक्शन बघा. गेले ५ वर्षे ब्रिक बी आर आय सी ही टर्म तूम्ही ऐकली असेल. त्यातला आर म्हणजे रशिया.

In reply to by केदार

तुलनात्मक माहिती गेल्या १०- १२ वर्षांतील मिळाली तर हवी आहे. खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

In reply to by नितिन थत्ते

हा हा ! हे तुमचं बरं हाय.. त्यामायला आम्ही काय विचारलं तर तुम्ही उत्तर देत नाही.... कोणी उत्तर दिलेले तर तुम्ही संतुष्ट होत नाही... ! अजब तुझे सरकार ! * प्लिज हे खराटा... नाव बदला हो... तुम्ही वयाने मोठे दिसता उगाच तुमचा अपमान केल्या सारखं वाटतं तुमचं नाव घेतल्यावर ;) ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by दशानन

जे उत्तर दिले होते त्यात फक्त २००८ चीच माहिती होती. म्हणून पुन्हा विचारले. खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

In reply to by नितिन थत्ते

रशीया हा कम्युनिस्ट देश होता, तिथे पारदर्शकता न्हवती. गेल्या काही वर्षात स्तिथी बदलली तरी तूम्ही जे कम्पॅरिझन मागत आहात ते नेटवर उपलब्ध नाही बहुदा. तरिही शोधकार्य चालू आहे. त्या लिंक मध्ये असे लिहीले आहे की गेल्या १० वर्षाच्या ग्रोथ रेट ७ टक्के आहे. एक इकॉनॉमी अभ्यासक म्हणून सांगतो हा रेट खरच खूप जास्त आहे, ते ही सलग १० वर्षे. लक्षात आलेली गोष्ट -त्यांचा डेटाही ते जनतेला सांगत नाहीत ते कसले कम्युनिस्ट? पेक्षा आपली जातीत- आरक्षणात व सर्व गोष्टीत होरपळलेली लोकशाही बरी, निदान नेटावर आकडे तरी लगेच मिळतात. आकडे लिहील्यावर कोणाचा खुन होत नाही.

मेथांब्याने चर्चा सुरू केली होती समाजवादी व कम्युनिस्ट नेत्यांचे चारित्र्य आणि त्यांनी केलेले राजकारण. आपण काथ्या कुटतोय कम्युनिझम चांगला की वाईट याचा. खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

In reply to by नितिन थत्ते

कम्युनिस्टपणा कळाल्या शिवाय त्याच्या नेताचे चारित्र्य व त्यांनी केलेले राजकारण ह्यावर चर्चा होऊ शकत नाही असा माझा समज आहे... व तो समज बरोबर होता हे तुम्हाला दोन पानं भरुन आलेल्या प्रतिसादातून दिसलेच असेल.. अरे कोणी आहे का.... ह्याचा भाग दोन चालू करा राव.. टाका कोणी तरी क्रमशः ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by नितिन थत्ते

जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व. ही लोकं म्हणजे ५२ खणी हिरे होते हिरे. काय एकेकाचा आवाज, बोलण्याची हातोटी, माणसे जोडण्याची कला. वा वा. अतिशय सुंदर. परत एकावरही चुकुन पण कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करु शकणार नाही. अजातशत्रु म्हणतात की काय तसं. चला तर मंडळी, आपण एकत्र येऊन या थोर परंपरेचं पुनरुजीवन करुया.
ही सर्व माणसे शुद्ध राजकिय व सामजिक चारित्र्याची होती, हे अगदी खरे. त्याबद्दल कुणालाही प्रतिवाद करता येण्यासारखा नाही. पण असेच रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांविषयीही म्हणता येईल. तेथेही अशीच निस्पृह सेवाभाव असणारी माणसे. हेच काही गांधीवाद्यांबद्दलही म्हणता येईल. स्वच्छ चारित्र्य हे जरी लाख मोलाचे असले, तरी ही माणसे ज्या पक्षांसाठी कार्यरत आहेत, त्यांची सामाजिक व राजकिय ध्येयधोरणे काय आहेत, हेही तितकेच महत्वाचे आहे.

In reply to by प्रदीप

माणूस स्वच्छ चारित्र्याचा असला म्हणून त्याची धोरणे मान्य करावीत असे नाही. लोकशाहीत धोरण महत्त्वाचे म्हणून पक्ष महत्वाचा. म्हणून आमचे मेथांब्याला उत्तर माणूस चांगला आहे हो पण तो ज्या धोरणाचे प्रतिनिधित्व करतो ते धोरण आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही त्यांना मत देणार नाही. दुसरे म्हणजे कोणी कितिही चांगला असला तरी त्याला निवडून यायलाच हवे. तो चांगला आहे म्हणून त्याला तसाच आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही नाही मान्य करणार. कारण कोण आमचा प्रतिनिधी व्हावा हे आम्ही निवडणुकीने न ठरवता मीडियाने किंवा इतर कोणी (गिव्हन म्हणून) ठरवणे म्हणजेच हुकूमशाही. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

In reply to by प्रदीप

नुकत्याच गेटवे इथे झालेल्या प्रदर्शनात लोकांनी भ्रष्ट राजकारण्यांवर सडकुन टीका केली व माणुस पाहुन मत द्या असे म्हटलं ते कशासाठी असेल?

In reply to by मेथांबा

कॉ. मेथांबा साहेब, समजा आपल्या भागातून रा. स्व. संघाचे एक कार्यकर्ते निवडणूकीस उभे राहिले. आपली राजकिय मते त्यांच्या अगदी विरूद्ध आहेत, (तरी हे मान्य व्हावे की तिथेही अनेक निस्पृह, तळमळीने जनकार्य करणारे कार्यकर्ते आहेत)*. तेव्हा मग आपण त्यांना निव्वळ ह्याच कारणांसाठी मत द्याल का? 'माणूस पाहून मते द्या' असे जे म्हणतात ते उद्वेगाने म्हणतात. पण मते देतांना नुसत्याच सामाजिक चारित्र्याचा निकष लावणे हे काही राजकिय परिपक्वतेचे लक्षण नाही, हे आपल्याला मान्य व्हावे. [*स्वच्छ सामाजिक चारित्र्याचे कार्यकर्ते कम्युनिस्ट, (पूर्वीच्या) समाजवादी व रास्वसंघात बहुतांश आहेत, हा काही योगायोग नाही. ह्या सर्वच संघटनात माणसे तावून सुलाखून घेतली जातात, व तशीच ती कार्य करत रहातात. बाजारबुणग्यांना तिथे थारा नाही].

In reply to by नितिन थत्ते

समाजवादी आणि कम्युनिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या राजकारणाची चर्चा करायची मात्र त्यात कम्युनिझम कुठे येता कामा नये? हे कसब नाही बुवा आपल्यात. :)
जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व.
याचा अर्थ काय? हेच ना की मेथांबांना महाराष्ट्रात प. बंगाल किंवा त्यांच्या दृष्टीने (महाराष्ट्रापेक्षाही ) प्रगत केरळ सारखी कम्युनिष्ट राजवट अपेक्षीत आहे. अश्या वेळी कम्युनिझम वर चर्चा अपेक्षीतच आहे ना भौ ! एवढ्यावरही जर कम्युनिझम सोडुन ही चर्चा होत असेल तर मग मला माझ्या मेसची आठवण दाटून येते. तुरीच्या वरणात डाळीचे कण येऊ नये यासाठी आमच्या मेसवर कसोशिने प्रयत्न चालतात. ;) ह्या चर्चेत सुध्दा एकंदरीत ओघ असाच दिसतो आहे की आम्ही हवं ते बोलू , जाहिर चर्चा करू मात्र आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. विचारायचे असतील तर विचारा आम्ही उत्तरे देणार नाही. आम्ही आधी ठरलेलं तेवढंच बोलू. खरं तर आमचं कसं सगळं शिस्तीत ठरलेलं आहे. आधी लाल सलाम म्हणायचा, नंतर आमच्या गेलेल्या नेत्यांची नावे घ्यायची. सगळ्या महाराष्ट्राला त्यांच्या आदरभाव आहे. असं करतांना हळूच यशवंतरावांपासून ते पवारांपर्यंतच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या कर्तुत्वाला आव्हाण द्यायचे , यावर कुणी उसळला की त्याला संघाचा किंवा महाराष्ट्रात शिवसेनेचा म्हणून शिव्या द्यायच्या. आमचं कसं सगळं प्रखर आहेना ! कॉम्रेड..... लाल सलाम ! माझ्या सुरूवातीच्या काही बाळबोध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी वेळ आहे कुणाला? नीलकांत

In reply to by नीलकांत

नीलकांत, तुझ्या कुठल्याच प्रश्नांना मेथांबा ह्यांजकडून तरी उत्तरे मिळणार नाहीत व मिळालीच ती कशी संतापजनक असतील त्याचा नमुना वर तू बघितला असशीलच. नुसतीच पोकळ घोषणाबाजी, आक्रस्ताळेपणा, हे काय दर्शवते? आपण जे (बहुधा) स्वेछेने अंगिकारले आहे, त्याविषयी कन्विक्शन (मराठी प्रतिशब्द?) नाही. निव्वळ पी. डी*. काहीतरी सांगते म्हणून ते खरे मानायचे व इतरांना सांगत सुटायचे. आणी ह्याची करोलरी (मराठी प्रतिशब्द?) अशी की पी. डी. ज्याबाबतीत मूग गिळून बसते, त्याबद्दल प्रश्न जर आलेच तर स्वतःचीच बनवाबनवी करून घ्यायची (नुसते फालतू घोषणात स्वतः ला मग्न करून घ्यायचे!) *पी. डी.: पीपल्स डेमॉक्रसी: मा. क. प. चे मुखपत्र

अगदी सुरुवातीच्या सुमारास, १९२५ साली भा,क,प, ची स्थापना ही रशियातील कम्युनिस्ट पक्षाची शाखा म्हणुनच झाली होती. १९२० च्या सुमारास गांधी विरुध्द लेनीन हे पुस्तक लिहुन डांगे ह्याने गांधींना कःपदार्थ लेखण्याचा बौद्धीक दिवाळखोरपणा दाखवला होता. गांधींचे नेत्रुत्व बलशाली होऊ नये म्हणुन झालेला हा पहिलाच प्रयत्न!जे ह्या प्रयत्नाला बळि पडले ते कम्युनिस्ट पक्षात गेले होते.ईंग्रजांच्या गुलामगिरीतुन भारत मोकळा झाला की त्याला रशीयातील कम्युनिस्ट पक्षाचा वेठबिगार म्हणुन ह्या पक्षाला कार्य करावे लागले. १९२८ सालच्या सहाव्या अंतर राष्ट्रीय साम्यवादी अधीवेशनात , भारतातल्या स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध करण्यात यावा असा आदेश देण्यात आला होता.रणदिवेला ही रशीयाची भुमिका पुर्ण पणे मान्य होती. त्या आदेशानुसार साम्यवाद्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या पाठीत खंजीर खुपसला. १९३५ सालच्या आंतरराष्ट्रिय परिषदेत रशियाचे धोरण बदलले., त्या परिशदेने भारतिय स्वातंत्र्य लढ्यास पाठींबा द्यावा असे सुचवले.त्या आदेशानुसार डांगेनी कॉंग्रेस मधे प्रवेश केला.त्यांनीच १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनीकांना पकडुन ब्रीटीशांच्या हवाली करुन त्या लढ्याला नेस्तनाबुत करण्याचा प्रयत्न केला होता. १९६२ साली झालेल्या चीन हल्ल्याला पाठींबा द्यायचा की नेषेध करायचा ह्या मुद्यावरुन कम्युनिस्ट पक्षत डांगे आणि रणदिवे गटात प्रचंड मतभेद झाले. आणि १९६४ साली एकसंघ असलेला कम्युनिस्ट पक्ष फुटला. डांगेच्या अधिपत्या खाली मूळ ”सीपीआय कार्यरत राहिला तर रणदिवे गटाने स्वतःला सीपीआय (माक्सीस्ट ) म्हणवणे सुरु केले. या नव्या पक्षाने चीनी सैन्याचे मुक्तीदाता म्हणुन स्वागत केले ..तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बरेच दिवस तुरुंगात देखिल ठेवले होते. हर्किशनसींग सुरजीत , नंबुद्रीपाद , ज्योती बसु हे सर्व प्रकाश कामत ज्या पक्षाचे समर्थन करीत आहेत त्याचे संस्थापक मेंबर्स होते. डांगे ह्यांच्या पक्षातच नंतर फाटाफुट झाली आणि त्यांना पक्षातुन निकासित करण्यात आले.. त्यानंतर प्रकाश करंत ह्यांच्याकडे नेत्रुत्व आले .. पुढे काय झाले सगळे जाणताच!!!! केवळ दोन कोपर्यात शिल्लक असलेल्या ह्या पक्षाशी हात मिळवणि करुन त्याला सामर्थ्य संपन्न करण्याचे महत्कार्य कॉंग्रेस ने केले आहे आणि आता त्याचिच फळे भोगताहेत... डॉ. सन येत्सेन आणि चँग के शेक यांच्या नेत्त्रुत्वाखालील चीन मधिल राष्ट्रिय राष्ट्रीय स्वातंत्रयाचा लढा रशियाच्या आदेशा नुसार माओ त्से तुंग्ने संपुर्णपणे आपल्या नियंत्रणात आणुन त्या देशातिल साम्य्वादी हुकुमशाही १९४९ साली स्थापन केली. त्याचप्रमाणे व्हिएतनाम मधे हो ची मिन्ह याने रशियाच्या आदेशाखाली तेथिल राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा साम्यवादी पक्षाच्या नियंत्रणाखाली आणून प्रथम फ्रांस आणि नंतर जापान व अमेरिकेचा पराभव करित साम्यवादी हुकुमशाही १९७६ साली स्थापन केली. ईंडोनेशियात मात्र रशियाचे प्रयत्न सफल झाले नाहित. भारतात डांगे ह्याने माओ त्से तुंग आणि हो चि मिन्ह प्रमाणे राष्ट्रिय स्वातंत्र लढयाचे नेत्रुत्व करुन तो रशियाच्या साम्राज्यशाही च्या नियंत्रणाखाली आणावा अशी योजना ह्होती . परंतु भारतिय साम्यवादि पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे आणि दुसर्या महायुद्धा मुळे चेंज झालेल्या आंतरराष्ट्रिय परिस्थिती ही योजना पुर्ण हौउ शकली नाही.hyach sobat , महात्मा गांधी ( ह्यांनी केलेल हेच एक मोठ्ठं कामं) आणि सरदार पटेल ह्यांच्या सतर्कते मुळे रशियाचा डाव पुर्ण मांडण्या पुर्वीच मोडला गेला. तरिही निराश न होता, भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा त्याला आपल्या प्रभावाखाली आणण्याचे प्रयत्न डांगे ह्याच्या थ्रु सुरुच ठेवले होते. आपली बुद्धि गहाण ठेवलेल्या आणि भारत स्वतंत्र झाला आहे हे लक्षात न घेता १९५०साली ह्या डांगे ने रशियाला जाउन स्टॅलिन कडुन भारतात राजनिती कशि करावी ह्याचे मार्गदर्शन घेतले... मला फक्त ह्याचंच वाईट वाटतं की ईतक्या देशद्रोही कारवाया केलेला पक्ष आज कॉंग्रेसला जवळचा वाटतो पण भा ज प केवळ हिंदुंना सपोर्ट करतो म्हणुन जवळ नको आहे......... व्हॉट अ शेम... आजही बर्याच लोकांना कम्युनिस्ट पक्ष हा केवळ द्वेशावर राजकारण करतो हेच कळत नाही ह्याचं वाईट वाटतं.

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

१९६४ साली एकसंघ असलेला कम्युनिस्ट पक्ष फुटला. डांगेच्या अधिपत्या खाली मूळ ”सीपीआय कार्यरत राहिला तर रणदिवे गटाने स्वतःला सीपीआय (माक्सीस्ट ) म्हणवणे सुरु केले. या नव्या पक्षाने चीनी सैन्याचे मुक्तीदाता म्हणुन स्वागत केले ..तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बरेच दिवस तुरुंगात देखिल ठेवले होते. L) काय तरी चुकते आहे असे तुम्हाला वाटत नाही :? नेहरु ~X( १९६२ जय जवान जय किसान ! शास्त्रीजी हवे होते ना त्या काळी ! X( काय तरी टंकायचे म्हणून टाका लागला आहे काय तुम्ही ? इतिहासामध्ये काल कालावधीला किती महत्व असते ते आमच्या सारख्या इतिहासात नापास झालेल्यांना विचारा ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

माहिती रोचक आहे. जैनांनी दर्शविल्याप्रमाणे मा. क. प. पूर्वीच्या एकसंध कम्युनिस्ट पक्षातून १९६२ ते १९६३ ह्या दरम्यान फुटला असावा असे वाटते. पण ह्या तपशिलाने तसा काही फार फरक पडत नाही. डांगे हे एक (तत्कालिन कम्युनिस्ट नेत्यांप्रमाणेच) समर्थ नेते होते, त्या सर्वांनीच आपापल्या निष्ठेपायी बर्‍याच खस्ता खालेल्ल्या आहेत, तेव्हा त्यांचा, तसेच रणदिवे ह्यांचा उल्लेख एकेरी व्हावा हे खटकले. विएटनाममध्ये जपानी नव्हते, ते तर चीनमध्ये होते. तेव्हा १९३० पासून १९४९ पर्यंत माओ , चिआंग कै ह्सेक व जपानी आक्रमक ह्या दोन्ही आघाड्यांवर लढले. चीन व व्हिएटनाम येथील जनताही अनुक्रमे माओ चेदाँग व हो चि मिन्ह ह्यांच्या पाठीशी होती. जनतेचा ह्या दोन्ही लढ्यास भरघोस पाठिंबा नसता तर ह्या दोन्ही राजवटी सत्तेवर आल्या नसत्या. ह्या दोन्ही लढ्यांच्या मागे त्या त्या नेत्यांचा अतुलनीय पराक्रम व असीम नेतृत्व होते, त्यांना अनुल्लेखून चालणार नाही. तेव्हा ते जे काही तेथे झाले ते निव्वळ रशियन षडयंत्राचा भाग म्हणून झाले असे म्हणणे चुकिचे आहे. भारतीय कम्युनिस्ट नेतृत्वाची घोडचूक (जी ते आजतागायत करत आले आहेत) ही की देशभावनेला त्यांनी अजिबात किंमत दिली नाही. माओने ही चूक केली नाही. आणि आजही चिनी जनता राष्ट्रकर्तव्य सर्वोच्च मानते.

In reply to by प्रदीप

>>>भारतीय कम्युनिस्ट नेतृत्वाची घोडचूक (जी ते आजतागायत करत आले आहेत) ही की देशभावनेला त्यांनी अजिबात किंमत दिली नाही. माओने ही चूक केली नाही. आणि आजही चिनी जनता राष्ट्रकर्तव्य सर्वोच्च मानते. एकदम बरोब्बर! बाकी महेंद्र यांनी दिलेल्या रोचक इतिहासातील (एकेरी संबोधने आणी सनावळीची चूक सोडल्यास) अजून एक व्यक्ती राहीली असे वाटते ज्याचे नाते समाजवाद्यांशी आहे - मानवेंद्रनाथ रॉय. ज्येष्ठ समाजवादी (आणि यशवंतरावांसारखे कॉग्रेसी) नेते, ज्येष्ठ पत्रकार हे स्वतःला रॉयीस्ट म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. या रॉय यांचा इतिहास वाचल्यावर ह्यांचे का कौतूक केले जाते हा एक मोठा प्रश्न पडला होता...असो.

वर्ष चुकलं.. १९६२ वाचणे.. teMvha neheru hote..

श्री जोर्ज फर्नाण्डिस यान्चे कडुन आजकालच्या राजकारणी लोकानि खुपच शिकण्यासारखे आहेत. स्वच्छ चारित्र म्हणजे काय ते याना बघुनच कळते. श्री प्रमोद महाजन सन्रक्षण मन्त्रि असताना एका कार्यक्रमात साथी जोर्ज हि तेथे आले, प्रमोदजी ना पेप्सी दिलि गेलि पण श्री जोर्ज फर्नाण्डिस यानी विनम्र पणे चहाचि मागणी केली व तोच घेतलाहि. जोर्ज फर्नाण्डिस यान्चे राजकिय गुरु श्री राम मनोहर लोहिया हे हि तितकेच थोर सद ग्रुहस्थ. त्यानि आयुष्यभर लग्न न करिता देशाचिच सेवा केलि. त्यन्चे सोबत एक खानसामा सदैव असायचा. सकाळि त्याने चहा त्याना दिला कि त्यान्चा पहिला प्रश्न असायचा : "तुमने पि चाय?" उत्तर होकारार्थी आल्यासच ते चहा पित असत.

In reply to by स्वामीयोगेश

बकरी (*त्ता म्हणने नको म्हणून) चले शेर कि चाल.. कम्युनिष्टांनी चहाची मगणी करावी म्हणजे फार उच्च असे काय केले हो ? "तुमने पि चाय?" म्हणनारे ही लाखोंनी पडले आहे ह्या देशात, संस्क्रुतीच आहे ती आपली अहो त्याच फर्नाण्डिसां मागे शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचा ससेमिरा मागे लागला आहे. आता चाहाचे काय देण ते सांगा ?

In reply to by शंकरराव

तुम्हि तरि तुमच्या बायकोला विचारता काय? चहा घेतला कि नाहि? फर्नाण्डिसां मागे शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचा ससेमिरा मागे लागला होता तो इन्टरनेट जनित पीत पत्रकारितेचा किळसवाणा हिडिस बिभत्स कळस होता जो वेळिच निपटला गेला होता. विसरलात कि काय हो? तुम्हि शन्करराव चव्हाण तर नाहित ना? कारण त्यना काहि पत्रकार शन्खोबा असे म्हणत होते म्हणुन विचारले.

In reply to by स्वामीयोगेश

मी फक्त 'शंकरराव' आहे. :-) आता काहि पत्रकार फर्नांडीसला फाटक्या तोंडाचा असे ही म्हणत, तुम्ही म्हणनार का ? मग फाटक्या तोंडाचा फर्र फर्र करित "चहा घेतला कि नाहि?'' कसे विचारेल ? स्वामी योगेश... तुझे लग्न झाले आहे का ? नाही म्हणजे स्वामी ... योगेश.. नावानी ब्रम्हचारी वाट्तो. परत "चहा घेतला कि नाहि?'' असे विचारणारे लाख्खो च्या संखेने आहेत आपल्या संस्क्रुतीत ... नवल ते काय ? मला सांग "चहा घेतला कि नाहि?'' ही त्यांची कोड ल्यांगवेज तर नव्हती ना ?? ;-) मी .. नुस्ता चाहाच काय पण नाश्ता, जेवन .. आणखी बरेच काही घेतलेका सर्वांना विचारत असतो.. असो, तर तुझ्या बायलोलाही विचारेन चहा घेतला का ? ह. घे ;-)