Skip to main content
लेखक मारवा यांनी शुक्रवार, 25/09/2026 22:14 या दिवशी प्रकाशित केले.

 नुकत्याच घडलेल्या IIT mumbai मधील अत्यंत दुर्दैवी अशा आत्महत्येच्या निमित्ताने सतत वेगवेगळे पैलू विचारात घेत असताना आणि चर्चा करत असताना SCST act संदर्भातील अत्यंत वेगळ्या अशा तरतुदी बघून आश्चर्य वाटले. मी जमेल तसा वेळ मिळेल तसा हा कायदा समजून घेण्याचा अजून प्रयत्न करतो आहे. यातील किमान compensation हा मुद्दा बघा. या कायद्यानुसार

1

ज्या व्यक्तीने SC ST समुदायातील तक्रार दाखल केली तर त्या व्यक्तीस ठराविक रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते.

2

आता ही रक्कम गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार वेगवेगळी ठरवलेली आहे. यात उदा.केवळ शिवीगाळीची तक्रार केली असल्यास साधारण काहीतरी 30 ते 40 हजार (चूकभूल देणे घेणे) अधिक गंभीर धिंड काढण्याचा किंवा बलात्कार किंवा हत्या गुन्हा असल्यास 8 लाख इत्यादी अशा रक्कम निश्चित केलेल्या आहे.

3

या नुकसान भरपाईची रक्कम सरकारने द्यावयाची असते. आजपर्यंत काही करोडो मध्ये ही रक्कम देण्यात आलेली आहे

4

इथ पर्यंत ठीक आहे मात्र सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे केवळ तक्रार केल्या बरोबर किमान 25 टक्के ते 50 टक्के रक्कम अदा केली पाहिजे हा नियम आहे. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे चार्जशीट फाईल झाल्यानंतर उर्वरित दुसरी instalment 25 टक्के दिली पाहिजे. आणि अंतिम निकाल लागल्यानंतर उर्वरित 25 किंवा 50 टक्के रक्कम फिर्यादीस सरकारने दिली पाहिजे अशी तरतूद आहे.

5

यानंतर सर्वात क्रिटिकल मुद्दा असा की जर मूळ तक्रार जर अंतिम निकालात खोटी सिद्ध झाली तर पहिल्या दोन टप्प्यात मिळालेली नुकसान भरपाई ची रक्कम परत मिळेल का म्हणजे वसूल कशी करणार ?

6

तर कॉम्पेनसेशन देण्या संदर्भातील तरतुदी क्रिस्टल क्लिअर आहेत. केवळ तक्रार दाखल केल्याबरोबर चार्जशीट च्या सुद्धा अगोदर चौकशी च्या ही अगोदर किमान रक्कम 25 टक्के of the total amount of compensation देण्याची सुस्पष्ट तरतूद आहे. मात्र गुन्हा सिद्ध न झाल्यास आणि याहून महत्वाचं म्हणजे मूळ तक्रारच जर खोटी त्रास देण्याच्या हेतूने केली असे सिद्ध अंतिमतः झाले तरी ती परत करण्यासंदर्भातील तरतुदी या नाहीत किंवा अस्पष्ट आहेत.

7

साधारण एक आकडा (चूकभूल) 30000 केसेस अंतिमतः सिद्ध झालेले आहे की मूळ तक्रारच बोगस होती. मात्र याचा कुठेच आकडा मिळत नाही की अशा केसेस मध्ये recovery किती झाली.

8

या रकमेचे वाटप करण्यासाठी atrocities fund असा एक विशिष्ट फंड तयार करण्यात आलेला आहे.

9

कायदा कमालीचा कडक आहे आणि हे सुद्धा योग्यच आहे. उदा. इतर तरतुदीनुसार तपास किमान dysp स्तरावरील अधिकारी करणार, onus of proof ज्यावर गुन्हा दाखल केला आहे त्या आरोपीवर असणार, अटकपूर्व जामीन मिळणार नाही (यावर सध्या सर्वोच्च न्यायालयाने हलकीशी सूट दिली आहे ) अशा मजबूत तरतुदी आहेत.

10

भारतीय सामाजिक व्यवस्था बघता न्याय मिळणे फार कठीण असल्याने या तरतुदी ज्या या कायद्यात टाकल्या ते योग्यच आहे.

11

मात्र त्याच बरोबर ज्या केसेस खोट्या सिद्ध झालेली आहेत त्यात नुकसान भरपाई च्या रकमेची वसुली सुद्धा झाली पाहिजे किंवा तशा स्पष्ट तरतुदींचा अंतर्भाव कायद्यात केला पाहिजे असे वाटते.

त्याही पुढे जाऊन अगदी केवळ तक्रार आणि चार्जशीट दाखल या दोन टप्प्यावर नुकसान भरपाईची रक्कम न देता अंतिम निकालानंतरच ही रक्कम दिली पाहिजे म्हणजे वसुलीचा प्रश्न उरणार नाही. आणि काही केसेस मध्ये जो या कायद्याचा दुरुपयोग होत आहे तो सुद्धा निश्चितच आटोक्यात येईल.

12

हे केवळ तक्रार दाखल केल्याबरोबर रक्कम देणे हे चुकीचे आहे. अजून दोन्ही पक्षाची बाजू मांडून झाली नाही तपास सुद्धा झाला नाही चार्जशीट सुद्धा नाही आणि त्या अगोदर अशी रक्कम देणे हा आर्थिक दृष्ट्या नव्हे मूलभूत न्यायाच्या दृष्टीने सुद्धा अगोदरच एका बाजूने एकतर्फी न्याय दिल्यासारखे होते. जे की सर्वस्वी चूुकीच आहे.

माझा या कादयाविषयी फार सखोल असा अभ्यास अर्थातच नाही.  आपल्याला या एकूण या संदर्भात काय माहिती आहे काय मत आहे कृपया शेअर करावे ही विनंति 


वाचने 578
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

कायदा कमालीचा कडक आहे आणि हे सुद्धा योग्यच आहे. उदा. इतर तरतुदीनुसार तपास किमान dysp स्तरावरील अधिकारी करणार, onus of proof ज्यावर गुन्हा दाखल केला आहे त्या आरोपीवर असणार, अटकपूर्व जामीन मिळणार नाही (यावर सध्या सर्वोच्च न्यायालयाने हलकीशी सूट दिली आहे ) अशा मजबूत तरतुदी आहेत.

अजिबात काहीही योग्य नाही. तक्रार करणार्याने किमान प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध केले पाहिजेत.

> onus of proof ज्यावर गुन्हा दाखल केला आहे त्या आरोपीवर असणार

हा काय मूर्खपणा ?  मला कुणी मारले तर मी जखम दाखवू शकते. पण मी कुणाला मारलेच नाही किंवा शिवीगाळ केली नाही ह्याचा पुरावा कसा द्यायचा ?

> भारतीय सामाजिक व्यवस्था बघता न्याय मिळणे फार कठीण असल्याने या तरतुदी ज्या या कायद्यात टाकल्या ते योग्यच आहे.


न्याय काय फक्त SC ST लोकांनाच हवा असतो ? इतर लोकांचे काय ?


कायदा सर्वांसाठी सामान असावा अशी बहुतेक सुसंस्कृत देशांत माफक अपेक्षा आहे.  कायदा सामान नसेल तर ती गुंडगिरी आहे. 

 


In reply to by साहना

सर्वप्रथम भारतात इतरही काही अपवादात्मक कायदे आहेत ज्यामध्ये onus of proof हा आरोपीवर असतो. उदा. हुंडा संदर्भातील , PMLA मनी लाँडरिंग, तसेच NPDA आदी मध्ये.

दुसरे महत्वाचे म्हणजे संपुर्ण burden of proof आरोपी वर टाकलेला नाहीये. उदा. 

SCST फिर्यादी ला आपली जात कागदपत्रांद्वारे सिद्ध करावी लागते.  तसेच underlying offence जो या कायद्याच्या कक्षेत येतो तो झालाय याचे foundation सिद्ध करावे लागते. त्यानंतर आरोपी फिर्यादीस ओळखत होता हे ही सिद्ध करावे लागते. मात्र त्यानंतर आरोपीवर हा burden of proof असतो की त्याला फिर्यादीची जात माहिती नव्हती. ती त्याला माहितच आहे असे 2016 ची amendment गृहित धरते. आणि burden of proof आरोपी वर येतो की असे माहित नव्हते.

तर आपणास वाटले तसे सर्वच burden of proof हा आरोपी वर नाही तो काही बाबतीत आहे. पूर्वी फिर्यादी वर हे onus of proof होते.


In reply to by मारवा

आय आय टी मध्ये झालेल्या या प्रकाराला राजकीय वळण दिले गेल्याने  तेथे असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांचे अपरिमित नुकसान होणार आहे.

कारण एकांगी आरोप झाल्यामुळे आता उच्च वर्णीय मुले मागास्वर्गीयांपासून फटकून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ओळखच नाही म्हटल्यावर उगाच वादंग होणार नाही मग हे ऍट्रॉसिटीचं लफडं हि नाही. उगाच धोका कशाला घ्या?  

मागे नायर रुग्णालयात झालेल्या आत्महत्येत असेच आरोप झाले खुल्या प्रवर्गाच्या दोन मुलींना पोलीस कोठडीत टाकले आणि त्यांचे एक वर्ष फुकट गेले यानंतर बऱ्याच  मुलांनी मागास्वर्गीयांशी केवळ आवश्यक तेवढेच संबंध ठेवायला सुरुवात केली आहे.

समाजात अशी दुफळी निर्माण होणे हे अत्यंत घातक आहे.     


In reply to by सुबोध खरे

समाजात अशी दुफळी निर्माण होणे हे अत्यंत घातक आहे.  

सहमत आहे.‌ 

अत्यंत जुलमी ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती.‌ ती संधी धुडकावून उलट तो कायदा अतिशय जास्त कडक करणे यामागे, समाजात अशी दुफळी निर्माण करणे हाच कदाचित तत्कालीन पंतप्रधानांचा हेतू असावा.


In reply to by कांदा लिंबू

मतांच्या मागे लागून एका विशिष्ट जातीचे लांगूलचालन करणे आणि ते करताना आपल्या समर्थकांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करणे कारण ते आपल्याशिवाय कोठेच जाऊ शकत नाहीत हे गृहितक.

 

हे मोदी-फडणवीसांचे यशस्वी धोरण आहे. सवर्ण भाजप सोडून इतरांना मते देणार नाहीत हे मोदी जाणतात. मग होऊ दे त्यांच्यावर अन्याय, मी नवीन मतांसाठी दलितांचे लांगूलचालन करणार.

 

महाराष्ट्रात ब्राह्मण भाजप सोडून इतरांना मते देणार नाहीत हे फडणवीस जाणतात. मग नवीन मतांसाठी द्या मराठ्यांना भरभरून आणि ते देताना ब्राह्मणांवर अन्याय होतोय तर होऊ दे. 


भारताला तात्काळ एका समर्थ विरोधी पक्षाची व अजून एका उजव्या राष्ट्रीय पक्षाची नितांत गरज आहे. १९७० पूर्वी स्वतंत्र नामक उजवा पक्ष होता आणि जनसंघही होता. साम्यवादी व कॉंग्रेसने उजव्या विचारसरणीच्या विरोधात इतके नकारात्मक वातावरण निर्माण केले होते की स्वतंत्र पक्ष विलयाला गेल्यानंतर नवीन उजवा पक्ष निर्माण होऊच शकला नाही. 

 

 स्वतंत्र पक्षासारखाच अजून एक उजवा पक्ष हवा आणि एक प्रबळ विरोधी पक्षही हवा. 


या कायद्यातील कठोर तरतुदींना मी समजुन घेऊ शकतो. कारण भारतीय सामाजिक वास्तव बघता दलित वर्गाला न्याय मिळण्यासंदर्भात अनेक अडथळे अडचणी असतात. त्यामुळे सरकारांनी आणि विशेषत: मोदी सरकारने सर्वाधिक कठोर तरतुदी या कायद्यात आणलेल्या आहेत. यामुळे या कायद्याचे विरोधक याला उपहासाने " मोदी ॲक्ट" असे संबोधतात. माझा त्या कठोर तरतुदींनाही विरोध नाही. माझा विरोध हा खालील तरतुदींना आहे.

१-  हा कायदा एकुण ४७ प्रकारचे विविध गुन्हे निश्चीत करतो.  आणि जर सवर्ण व्यक्तीने दलितांविरोधात जर यापैकी कुठलाही गुन्हा केला तर प्रत्येक गुन्ह्यासाठी एक रक्कम निश्चित केलेली आहे. उदा.

अ-  ३(१) इ नुसार जर एखाद्या दलित व्यक्तीचे जबरदस्तीने कपडे फाडले, किंवा केस कापले , किवा मिशा कापल्यास किंवा चेहरा रंगवल्यास जर अशा प्रकारची जबरदस्ती करुन अपमानित केल्यास एकुण मोबदला रक्कम १ लाख निश्चित करण्यात आलेली आहे.

ब- ३(१) आर नुसार सार्वजनिक जागी जर एखाद्या दलित व्यक्तीला  हेतुपुर्वक अपमानित  केले किंवा करण्याची धमके दिली गेली. तर यासाठी सुद्धा  एकुण मोबदला रक्कम १ लाख रुपये निश्चीत केलेली आहे.

अशा वरील दोन उदाहरणाप्रमाणे एकुण ४७ गुन्हे व त्यावरील मोबदला रक्कम central SC/ST (Prevention of Atrocities) Rules, 1995, Annexure-I to the Schedule मध्ये सविस्तर गुन्हा त्याचे वर्णन याप्रमाणे नमुद केलेल्या आहेत.

(  या एकुण गुन्ह्याची संख्या पुर्वी २२ होती ती मोदी सरकारने २०१६ आणि २०१८ मधील सुधारणानुसार ४७ पर्यंत वाढवलेली आहे. तसेच यातील अधिकतम मोबदला रक्कम जरी ८,२५,००० आहे आणि कमीत कमी मोबदला ८५,००० आहे.. तरी कायद्यानुसार या रकमे व्यतिरीक्त राज्य सरकार अधिकचा मोबदला देऊ शकते. )

आता वरील उदाहरण घेउ मोबदला देण्याच्या तीन स्टेजेस सुनिश्चीत आहेत. एक  FIR STAGE दुसरी CHARGESHEET  तिसरी अंतिम निकालानंतर.  तीनही स्टेजेस मध्ये दोन टाइपनुसार मोबदला दिला जाईल

 एकतर २५%- २५% -५०%   म्हणजे २५,००० पहील्या २५,००० दुसऱ्या आणि उर्वरीत ५०, ००० तिसऱ्या स्टेजला.   हा झाला पहीला टाइप 

दुसरा ५०%-२५%-२५% म्हणजे ५०,००० पहील्या २५,००० दुसऱ्या आणि २५,००० तिसऱ्या स्टेजला मोबदला दिला जाईल

म्हणजे पहील्या दोन स्टेजमध्ये मिनिमम ५०% एकुण रकमेच्या किंवा ७५% मॉक्सीमम  मोबदला दिला जाईल 

आता पुन्हा या कायद्यात अजुन एक नियम आहे जो हे सुनिश्चित करतो की दलित तक्रारदाराला वरील रक्कम ७ दिवसाच्या आत तात्काळ दिली गेली पाहीजे.  ते कलम असे 

Rule 12(4) says the District Magistrate/SDM/Executive Magistrate must arrange immediate relief within seven days to the victim/family/dependants according to Annexure-I and Annexure-II.

तसेच अजुन एक नियम हे निश्चीत करतो की वरील रकमेचे वाटप करण्यासाठी डिस्ट्रीक्ट मैजिस्ट्रेट ला एक विशेष अधिकार दिलेला आहे ज्यानुसार तो सरकारी खजिन्यातुन रक्कम काढुन या वरील रकमेचे पेमेंट करु शकतो तो नियम असा

Rule 12(4A) Allows the State/UT to authorize the DM to withdraw money from the treasury so relief can be provided promptly

 हे नियम मुद्दाम देण्याचे कारण असे की कायदा हा मोबदला दलित व्यक्तीला एकतर 

१- 

 तक्रार दाखल केल्याबरोबर देण्यास भाग पाडतो त्यासाठी ७ दिवसाची स्पेसीफिक मुदतही आहे शिवाय त्यासाठी सरकारी तिजोरी सुद्धा खुली करण्याची तरतुद आहे. 

२-

दोन्ही टाइप ग्रुहीत धरले तरी पहील्या दोन स्टेजेस मध्ये एकुण मोबदला रकमेच्या उदा. १ लाखाच्या मिनिमम ५०% म्हणजे ५०००० किंवा अधिकतम ७५% रक्कम म्हणजे ७५००० ही अदा करुन झालेली असते.   

३-

आता सर्वाधिक आक्षेपजनक बाब यात ही आहे की 

अ-  या दोन स्टेजेस वर देण्याची इतकी घाई का मुळात ?  शिवाय हा सर्व मोबदला १ लाखाचा पुर्ण अंतिम निकाल लागल्यावरच का देत नाही तेच अधिक योग्य आणि न्यायाला धरुन नसेल का ?  की जेव्हा गुन्हा सिधा झालेला आहे.

ब-   जसे हा मोबदला देण्यास इतकी घाई आणि इतक्या कडक तरतुदी आहे त्याच्या  अगदी उलट जर ही फिर्यादीने दाखल केलेली केसच मुळात खोटी असेल असे जरी अंतिम निकालात सिद्ध झाले असले तरी अशी कुठलीही तरतुद कायद्यात नाही की ज्यायोगे ही फिर्यादीला दीलेली ( सात दिवसाच्या आत दिलेली )  रक्कम त्याच्या कडुन वसुल करण्यात यावी अशी एकही  अक्षरश: एकसुद्धा तरतुद नाही. याचा सुस्पष्ट अर्थ हा की जरी क्ष नावाच्या दलिताने अगदी पुर्णपणे खोटा गुन्हा दाखल केला व कोर्टात अगदी अंतिम निकालात जरी तसे सिद्ध झाले तरी त्याला देण्यात आलेली वरील ५०,००० ते ७५,००० रुपये हे पुन्हा कधीही त्याच्याकडुन कायद्याने वसुल करता येतच नाही. हे सर्वाधिक चुकीचे आहे आक्षेपजनक आहे. कारण याचे परीणाम

१-   यामुळे अप्रत्य्क्षपणे खोट्या केसेस दाखल करण्यास कायद्याकडुन अक्षरश:  आर्थिक उत्तेजन दिले जात आहे जे भयावह आहे. कारण मला जर माहीत आहे की माझी मुळ केस जरी खोटी असली आणि ती सिद्ध जरी अंतिम निकालाद्वारे झाली तरी मला पहील्या दोन स्टेज मध्ये मिळालेले पैसे मला परत करायचेच नाहीत. 

( आणि दुर्देवाने असे प्रत्यक्षात होतच आहे. जवळपास ३०,००० केसेस बोगस होत्या हे सिद्ध झालेले आहे. अजुन जवळ पास २.५० लाख खटले प्रलंबित आहेत जसजसे अंतिम निकाल लागतील तसे मुलत: बोगस तक्रारी होत्या अशांची संख्या आणि त्याला दिलेल्या मोबदला रकमेची संख्या ही वाढतच जाणार आहे. )

काही गाजलेली उदाहरणे ज्यात  हा दुरुपयोग झालेला आहे 

१-

In Arvind Kumar & Others v. State of U.P. & Others, the Allahabad High Court in August 2026 noted that Santosh Kumar Dohrey and his family members had received approximately ₹23,36,250 from State funds in connection with different criminal cases, with another 10–12 matters reportedly pending for consideration of further benefits.

२

2018 Supreme Court case — monetary incentive was expressly raised as a misuse concern

In Dr. Subhash Kashinath Mahajan v. State of Maharashtra, the Supreme Court considered submissions that the SC/ST Act could be misused because financial relief could become available after registration of a case.

The judgment records NCRB data cited to the Court showing that in 2016, 5,347 investigated SC cases and 912 investigated ST cases were classified as false by police disposal statistics. The Court also recorded the concern that monetary relief could potentially encourage false cases.

 

For 2016, the Supreme Court recorded NCRB data in Dr. Subhash Kashinath Mahajan v. State of Maharashtra:

  • SC-related cases: 5,347 were classified as false among investigated cases
  • ST-related cases: 912 were classified as false among investigated cases. 
  • तर माझे असे मत आहे की मुळात पहील्या दोन स्टेजेसवर तरी मोबदला दिलाच जाऊ नये तर अंतिम निकाल आल्यानंतरच हा मोबद्ला दिला जावा.
  • रोचक रीत्या श्री चंद्रशेखर रावण या नेत्याने मोबदला रक्कम ३० लाखापर्यंत वाढविण्याची मागणी केलेली होती.
  • त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सध्याची जी कमीत कमी मोबदला रक्कम ८५,००० ते अधिकतम ८.२५ लाख आहे तिला वाढवुन कमीत कमी मोबदला १ लाख ते जास्तीत जास्त १२ लाख करण्याचा प्रस्ताव कमिटी कडे पाठवलेला आहे जो लवकरात लवकर पास होइल असे दिसतेय.

The Union Ministry of Social Justice and Empowerment has proposed increasing the existing compensation slabs from:

Current: ₹85,000 → ₹8.25 lakh
Proposed: approximately ₹1 lakh → ₹12 lakh

The proposal represents an increase of more than 40% at the upper end and is linked to the rise in the Consumer Price Index. According to the August 2026 report, the proposal had been sent to the Expenditure Finance Committee for approval.

 

 

  •  

SC/ST (Prevention of Atrocities) Rules, 1995, च्या Rule 3(1) नुसार राज्य सरकार असे काही जिल्हे भुभाग ठरवु शकतात की जे त्यांच्य मते atrocity-prone area आहेत याचा अर्थ असा की या भागांमध्ये दलितांवर अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे शक्यता अधिक आहे वगैरे. उदा समजा नगर जिल्हा महाराष्ट्रातील समजा असा ठरवण्यात आला.  तर साहजिकच आहे की जे असे जिल्हे किंवा शहरे असतील तिथे दोन्ही समाजामध्ये खुप तेढ वाढलेली असणार अत्यंत शत्रुतापुर्ण संबंध झालेले असतील दोन्ही कडे वातावरण तापलेले असणार.  

तर अशा विभागात राज्य सरकारला एक अधिकार दिलेला आहे त्यानुसार या शहरात जिल्ह्यात जितके शस्राचे परवाने सर्वणांना वाटप केलेले आहे म्हणजे दलित सोडुन फक्त तेवढे  सर्व परवाने रद्द करण्याचा विशेष अधिकार या तरतुदीनुसार सरकारला मिळतो . म्हणजे दलितांना सवर्णांकडुन धोका आहे म्हणुन त्यांचे गन्स, इत्यादी शस्त्रे परवाने रद्द करणे. 

मात्र त्याच बरोबर सरकारला हा सुद्धा अधिकार दिलेला आहे की अगदी त्याच वेळेस असे शस्त्र परवाने जर त्याच विभागातील दलित व्यक्तीना दिलेले असतील तर ते तसेच कायम ठेवावेत कारण ते त्यांच्या स्वसंरक्षणासाठी आवश्यक आहे.

आता हे किती कमालीचे धोकादायक आहे नाही का ? 

जिथे त्या भागातील दोन्ही गटातील वातावरण अगोदरच गढुळ झालेले आहे. दोन्हीकडे सुड भावना निर्माण झालेली आहे तिथे दोन्ही गटाकडुन शस्त्र काढुन घेणे परवाने रद्द करणे नक्कीच समजु शकते मात्र एका गटाला शस्त्रहीन करुन दुसऱ्या गटाला शस्त्रसज्ज ठेवणे यात कुठले लॉजिक आहे ?  दोन्हीना निशस्त्र करणे योगयच किंवा चला दोन्ही कडे स्वरक्षणासाठी सुट दिली ठिक पण हे असे ?

तुम्हाला काय वाटते ? हे किती धोकादायक आहे ? चुकीची परीस्थिती निर्माण करणारे नाही का ?


बहुधा जगातला सर्व काळातील सर्व देशातील सर्वात अन्यायकारक कायद्यांपैकी एक म्हणजे हा कायदा असावा.