राममंदिरातील दान चोरले जाते, त्यावर प्रश्न विचारू नका.
इथेनॉल वापरल्यामुळे मायलेज कमी होते असा प्रश्न विचारला तर तुमच्यावर Defamation ची केस होईल.
कोटींचा खर्च करून उभे केलेल्या प्रकल्पात पहिल्याच पावसात त्रुटी दिसल्या, त्यावर प्रश्न विचारला तर राज्याचा अपमान.
SIR बद्दल विचारले तर तुम्ही देशविरोधी.
व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला तर तुम्ही काँग्रेसवाले किंवा डावे.
आंदोलन केलं तर तुम्ही देशद्रोही, आपचे समर्थक, तुम्हाला फॉरेन फंडिंग आहे.
रुपया घसरतोय म्हटलं तर मॅडमच उत्तर येतं, "तो बाजाराचा विषय आहे, आमचा नाही."
NEET बद्दल प्रश्न विचारला तर टीकाकारांनाच दोष दिला जातो.
देशात राहून प्रश्न विचारला तर "पाकिस्तानात जा" असं सांगितलं जातं.
आणि देशाबाहेरून प्रश्न विचारला तर "देशात या, मग बघू" असं म्हटलं जातं.
हे सगळं जर तुम्हाला सामान्य वाटत असेल, आणि यातही तुम्हाला "अमृत काळ" दिसत असेल, तर स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा—लोकशाहीत प्रश्न विचारणं चुकीचं आहे का?
मिसळपाव
प्रतिक्रिया