नीट च्या आंदोलनाच्या निमित्ताने राजकीय धुळवड सुरु आहे. पण ती बाजूला ठेवून नीट परीक्षेत गोंधळ नक्की झाला कसा ? त्याला कसे हाताळावे पाहिजे होते आणि भविष्यांत अशी चूक पुन्हा होऊ नये ह्यासाठी काय करावे ह्यासाठी हा लेख. राजकीय धुळवड इतर धाग्यांवर ठेवावी अशी विनंती.
JEE Mains आणि NEET ह्या दोन्ही परीक्षा NTA च्या अखत्यारीत येतात. दोन्ही परीक्षाची उत्क्रांती वेगळया पद्धतीने झाली आहे. JEE आधी IIT संस्था मॅनेज करत होत्या आणि ह्या परीक्षेला JEE Advanced जी दुसरी परीक्षा होती आणि आज सुद्धा आहे. आज सुद्दा advanced ची जबाबदारी IIT घेतात.
कपिल सिब्बल ह्यांनी JEE हि एकच परीक्षा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. इथे भ्रष्टचार होईल ह्याची पूर्ण जाणीव असल्याने IIT नि कडाडून विरोध केला. आणि त्यामुळे IIT Mains आणि Advanced अशी दुहेरी पद्धत निर्माण झाली. ह्यामुळे IIT ना आपली स्वायत्तता कायम ठेवता आली. IIT Mains चा पेपर फुटला तरी IIT साठी विशेष फरक पडत नाही.
JEE Mains चे पेपर का फुटत नाहीत ?
- JEE Advanced हि दुहेरी परीक्षा आहे आणि ती कठीण आहे त्यामुळे फक्त Mains चा पेपर मिळवून फायदा नाही हे विद्यार्थ्यांना ठाऊक आहे. दोन्ही टप्पे दोन वेगळ्या संस्था पाहत असल्याने एकाच व्यक्तीला दोन्ही चे पेपर फोडणे कठीण आहे. त्यामुळे कुठलाच विद्यार्थी लक्षावधी देऊन Mains चा पेपर मिळवू पाहत नाही. त्यामुळे पेपर फोडण्याचा फायदा कमी होतो. आर्थिक incentive कमी असल्याने भ्रष्टाचार आपोपाप कमी होतो.
- संगणकीय परीक्षा - JEE Mains हि १००% संगणकीय परीक्षा आहे त्यामुळे ह्याचे प्रश्न हे cryptographically secure ठेवता येतात आणि परीक्षेच्या काही मिनिटे आधीच पेपर उपलब्ध होतो.
- परीक्षा हि अनेक राऊंड मध्ये घेतली जाते. त्यामुळे अनेक पेपर्स असतात. तुम्ही कुणाला पैसे देऊन पेपर घेतला तरी तोच तुम्हाला मिळेल ह्याची शाश्वती नाही.
- हि परीक्षा वर्षाला दोन वेळा घेतली जाते. त्यातील विद्यार्थ्यांचे स्कोर पाहून पेपर फुटला असेल तर याची जाणीव व्यवस्थापकांना होते.
- कधी कधी परीक्षेतील भ्रष्टाचार पेपर फुटून होत नाही तरी पेपर तपासणीत होतो. संगणकीय परीक्षेत ते सुद्धा होत नाही.
- देशांत अभियांत्रिकी महाविद्यालये अनेक आहेत. त्यामुळे पेपर साठी पैसे मोजण्यापेक्षा ऍडमिशन साठी मोजून विद्यार्थी डिग्री मिळवू शकतात.
NEET चे पेपर फुटतात का ?
- NEET परीक्षा एकच दिवशी एकाच शिफ्ट मध्ये घेतली जाते. सर्व मुले एकच प्रश्नपत्रिका सोडवतात. ह्यांतील प्रश्नांचा क्रम वेगळा असला तरी सर्व प्रश्न १००% एकच असतात.
- त्यामुळे पेपर फोडण्याचा आर्थिक इन्सेन्टिव्ह प्रचंड आहे. कारण तुम्हाला पेपर ३-४ तास जर आधी मिळाला तर १००% स्कोर घेऊन तुम्ही साधारण वाट्टेल तिथे ऍडमिशन घेऊ शकता.
- NEET परीक्षा हि पेपर पेन्सिल ची आहे. संगणकीय नाही. त्यामुळे घोळ पेपर फोडून तसेच नंतर तपासणीच्या दरम्यान होऊ शकतो. तपासणी संगणकीय असली तरी शेवटी उत्तरपत्रिका मध्येच बदलली जाऊ शकते.
- National Medical Commission ह्यांनी संगणकीय व्यवस्था आणि एकापेक्षा जास्त प्रश्नपत्रिका ठेवण्यास विरोध केला होता.
- सध्याच्या पेपर फुटीत, भ्रष्टचार प्रत्येक लेवल वर पोचला होता असे निदर्शनात आले आहे. पेपर सेट करणारे लोक, ट्रान्सपोर्ट करणारे लोक सर्वच पेपर लीक होण्यात भुमीका बजावत होते असे दिसून आले आहे.
- पेपर सेट झाल्यावर म्हणे हे पेपर काही कंत्राटी लोकांना "verify" करण्यासाठी दिले जात होते. इथे हे पेपर फुटतील हे देशांतील शेम्बडे पोर सुद्धा सांगू शकले असते.
- देशांत मेडिकल सीट्स कमी आहेत. त्यामुळे ह्या सीट्स साठी मारामारी सुरु असते. त्यामुळे आर्थिक incentive आहे.
एकूणच NEET परीक्षा हि "was designed to be compromised" असे आम्ही म्हणून शकतो. कदाचित ह्यांत उच्चपदस्थ व्यक्ती, वैद्यकीय महाविद्यालये चालविणारे व्यक्ती, इत्यादी लोकांचा फायदा असावा. आता NEET परीक्षा पद्धती पूर्णतः रद्दबातल करण्यात येत आहे आणि JEE प्रमाणे ती संगणकीय करण्यात येत आहे.
दुर्दैवाने देशांतील कुठलेच पॉलिसी निर्णय हे पारदर्शी पद्धतीने आणि सिस्टिमिक विचाराने घेतले जात नाहीत (आणि जात नव्हते) नेहमीच प्रत्येक गोष्टीला knee jerk प्रत्युत्तर आणि घिसाडघाईने निर्णय.
NEET परीक्षा हि पेन पेपर ची का होती ? National Medical Commission नक्की कुठल्या मुद्यावरून विरोध केला होता ? विरोध नक्की कुठल्या व्यक्तींनी केला होता ? ह्या विरोधाला NTA ने इतके महत्व का दिले ? ज्या लोकांनी विरोध केला होता त्यांचे आता मत काय आहे ?
पेपर फुटीवर कुणी ह्याआधी तक्रार केली होती का ? मग तिथे NTA ने नक्की काय केले ?
पेपर फुटला ह्याचा अर्थ संपूर्ण परीक्षा पुन्हा घेतलीच पाहिजे असे नाही. पेपरफुटीचा ब्लास्ट रेडियस काय होता हे पहिले पाहिजे. आधुनिक डेटा ऍनेलिस ने हे सहज शक्य आहे. १-२ महिन्यात हे ऍनेलिसिस सार्वजनिक केले जाऊ शकते. anonymized डाटा सरकारने उपलब्ध केल्यास आम्ही लोक २४ तासांत अत्यंत डिटेल ऍनेलिसिस देऊ शकतो.
पेपर फुटला म्हणून सर्व परीक्षा पुन्हा घ्यायची गरज नव्हती. ज्या भागांत फुटला होता तिथेच पुन्हा घ्यायची होती आणि नंतर स्कोर normalize केले जाऊ शकत होते.
पुढे काय ?
- NEET हि संगणकीय करणे चांगली गोष्ट आहे असे तरी मला वाटते. National Medical Commission ने नक्की का म्हणून ह्याला विरोध केला होता हे समजत नाही.
- JEE प्रमाणे NEET दुहेरी टप्पे ठेवून विविध समस्या दूर केल्या जाऊ शकतात. टॉप १०%-२०% मुलांनी NEET ऍडवान्सड ची परीक्षा द्यायची. त्यावरून मेडिकल प्रवेश द्यायचा. NEET Advanced पाहिजे तर पेपर पेन ने ठेवा. पण बहुसंख्य सुमार विद्यार्थी संगणकीय परीक्षेत बाहेर पडतील.
- NEET परीक्षेला वयाचे बंधन नाही त्यामुळे दर वर्षी असंख्य मुले हि परीक्षा देतात. माझ्या मते हे बदलले पाहिजे. एकूण attempt २ पेक्षा जास्त असता कामा नये. तुम्ही पाहिजे तर १ वर्ष ब्रेक घेऊन उत्तर द्या पण १०-१० वेळा NEET देणारे महाभाग आहेत. हे चुकीचे आहे.
----
NEET परीक्षेतील भ्रष्टाचार हा एक छोटा नमुना आहे. मागील काही वर्षांत सर्वच परीक्षा (JEE चा अपवाद सोडता) येन केन प्रकारे compromized झाल्या आहेत. पदवी शिक्षणाचे महत्व आणि उपयोगितता फारच कमी झाली आहे. BA BCOM BSC ह्यांना तर काहीच अर्थ राहिला नाही.
सुदैव किंवा दुर्दैव म्हणा पण देशाची लोकसंख्या काही काळाने कमी होत जाणार आहे. माझ्या माहिती प्रमाणे २०२५ मध्ये एकूण शालेय enrollment भारताच्या इतिहासांत सर्वप्रथम कमी झाली. उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी बिमारू देहातमॅक्स राज्ये सोडल्यास इतर ठिकाणी हा demographic collapse फारच वेगवान असेल. त्यामुळे ह्या परीक्षा, प्रवेश प्रक्रिया ह्यांच्यावर तो ताण आहे तो कमी होत जाईल. त्यामुळं आता रिफॉर्म्स ची विशेष गरज नाही. देशासमोरील समस्या वेगळ्याच असतील.
माझ्या मते सुमार विद्यार्थी आणि सामान्य विद्यार्थी ह्यांतील filtering करण्यासाठी देशांत काहीच परीक्षा नाही. JEE आणि NEET काही प्रमाणात ते करतात पण ह्या प्रकारची मोठी व्यापक परीक्षा राष्ट्रीय स्तरावर पाहिजे. चिनी गकाओ प्रमाणे.
कदाचित १२वी नंतर अशी परीक्षा ठेवावी. ह्या परीक्षेत टॉप ५०% मध्ये येणाऱ्या लोकांनाच पदवी शिक्षण घेण्याची परवानगी असावी नाहीतर हल्ली वाट्टेल तो पदवी शिक्षण घेतो.
मिसळपाव
प्रतिक्रिया