Skip to main content

तुमची कार कोणती आहे?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 22/06/2026 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा https://www.misalpav.com/discuss/53742 

 

 

मगृर, ॲरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न लोकं मर्सिडीज घेतात. 

मनमोकळे, मनमिळावू, कुटुंबवत्सल असलेले मारुती घेतात. 

तुमची कार कोणती आहे?


वाचने 472
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

माझ्याकडे रेनॉ ची कायगर आहे.

माझा स्वभाव स्वमग्न आहे. पण खुनशी नाहिय्ये.

रच्याकाने :  ज्याना जे परवडते त्यानुसार ती वाहने घेतात. 

 आज मारुती घेणारा मगृर, ॲरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न नसेलच असे नाही.

माझ्या पहाण्यात एक हातगाडीवाला आहे तो मगृर, ॲरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न आहे असा मला संशय आहे.


मोबाईल झाला आता कार,मग टि व्ही नंतर वाॅशिंग मशीन , मिक्सर,ओव्हन,सोफा करत करत बेड पर्यंत जातील. विचारतील क्वीन  का किंग आणी सर्वात शेवटी.....

 

हे तर गुगल पेक्षाही डेंजर  हाय.

 

बादवे, माझी पोर्शे.........


आम्ही मनमोकळे, मनमिळावू, कुटुंबवत्सल असलेले लोक्स आहोत हे धागाकर्त्याला माहित आहे तरीही तरीही त्यांनी आमच्या ब्रॅण्डचा उल्लेख इथे न केल्याबद्धल मी धागाकर्त्यांचा जाहीर उद्धार, निषेध, निर्भत्सना व विरोध करतो आणि माझे दोन शब्द सुरु करतो.  

 


मगृर, ॲरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न लोकं मर्सिडीज घेतात. 

आमच्या इथं पोलिसांना आणि कॅबवाल्यांकडे मर्सिडिस आणी आऊडी असतात. पण ते तसे वाटले नाहीत. (भारतात वाटायचे पण त्यांच्याकडे मारुतीच्या एर्टिगा आणि डिझायर असायच्या)

.

मनमोकळे, मनमिळावू, कुटुंबवत्सल असलेले मारुती घेतात. 

काही स्विफ्ट आणि वॅगनार सदृष्य दिसल्या पण त्या सुझुकीच्या आहेत. मारुती नाही. तेंव्हा इथे मनमोकळे, कुटुंबवत्सल लोक नसावेत फारसे. (पण पोर्शा आणि मास्सेरातीतून फिरणारी वत्सल कुटुंबे दिसली. काही मग्रुर सदृष्य लोक्स दिसले पण त्यांच्याकडे रेंजरोव्हर सारख्या भारतीय कार्स होत्या)

.

तस्मात लक्षात आले की ब्रॅंडनुसार गुण हे देशोदेशी बदलतात बहुधा.

मग भारतात जितक्या रुपयाला कार विकली तितकाच खर्च इथे लायसन्स काढायला येतो हे कळले..

मग विचार केला कशाला आपले सेल्फ व्हैल्युएशन करवून घ्या. 

सरळ बसने नायतर सायकलने फिरा.

 


In reply to by अभ्या..

युरोपियन देशांमध्ये रोजचे जीवन (सुविधेत) जगायला कारची गरज पडत नाही. उलट अनेक ठिकाणी कार ही डोकेदुखीच ठरते. अपवाद तुंम्ही खूपच हौशी व खूप अनवट जागी जाणारे असाल तर.

भारतात कार घेणारे मुख्यत: 'दाखवण्यासाठी' घेतात. इथे कार वापरणे अधिकाधिक अवघड व्हावे व सार्वजनिक वाहतूक अधिकाधिक सुविधाजनक व्हावी असे वाटते.


In reply to by चित्रगुप्त

मु. पो. जगाची परभणी.

वर्ष होऊन गेले की आता.

इथल सर्कार म्हणतंय "रावा की कायमचं टॅक्स देत देत"

.

आमी मनल "बगू"


In reply to by कांदा लिंबू

कुणी बिनडोकपणे वागत असेल तर त्याला "येडी त्युच धर्माबाद" असे म्हणतात.  नुसतं "लई धर्माबाद हाय त्येनं" असं म्हटलं तरी चालतं.  


महाराष्ट्रातून तेलंगाणात (पूर्वीच्या आंध्र प्रदेशात) रेल्वेने जाताना धर्माबाद हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव आहे. 
  


मी बॉक्सकार वापरतो. ती इथे बघायला मिळेल : https://en.wikipedia.org/wiki/Bockscar

 

ओळखा पाहू मी मगृर, ॲरोगंट, इगो असलेला, खुनशी, स्वमग्न आहे की मनमोकळा, मनमिळावू, कुटुंबवत्सल आहे ते.

 

-गा.पै.


In reply to by विजुभाऊ

अरेच्चा! हे लक्षांत आलं नाही. मला वाटलं की तुम्ही मला फारतर हरी खरे यांच्यापावेतो पोहोचवाल. पण तुम्ही बुवा थेट गरुडझेप घेतलीत.

-गा.पै.