काल नॉर्वे दौऱ्यात मोदी व नॉर्वेच्या पंतप्रधानांनी माध्यमांना माहिती देण्यासाठी (प्रेस ब्रीफिंग) एकत्रित बैठक बोलावली होती. ती संपल्यानंतर सर्वजण पुढील कार्यक्रमासाठी निघाले असताना एका नॉर्वेजिअन पत्रकार महिलेने अचानक प्रश्न चिचारला. परंतु कोणीही थांबले नाही. या घटनेची चित्रफीत त्या महिला पत्रकाराने ट्विटरवर प्रसिद्ध करून टीका केली. यावर घडामोडी धाग्यात मी सविस्तर उत्तर दिले आहे. त्यावर लगेच नेहमीच्याच यशस्वी कलाकारांकडून अपेक्षित प्रतिसाद आले.
माझा प्रतिसाद खालीलप्रमाणे होता. त्यात काही अधिक मुद्दे व माहिती दिली आहे.
__________________________________________________________________________
१) तो कार्यक्रम प्रेस ब्रीफिंग होता, प्रेस कॉन्फरन्स नव्हती.
२) प्रेस ब्रीफिंग संपून सर्वजण निघाले होते. नॉर्वेच्या पंतप्रधानांनी मोदींशी हस्तांदोलन करून जाण्याची खूण केली व दोन्ही पंतप्रधान आणि सर्व अधिकारी निघाले होते.
३) अचानक एका महिलेने विचारले की "Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world?"
४) या प्रश्नावर निघालेल्या कोणीही (मोदी, नॉर्वेचे पंतप्रधान व इतर अधिकारी) त्या महिलेकडे किंवा प्रश्नाकडे लक्ष न देता ते व्यासपीठावरून विंगेत निघून गेले.
५) परदेशात गेलेल्या नेत्याच्या कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक मिनिटागणिक ठरलेले असते. त्यात पुढेमागे करता येत नाही व कोणताही अनियोजित नवीन कार्यक्रम समावेश होऊ शकत नाही. हा कार्यक्रम प्रेस ब्रीफिंग होता व तो संपल्यानंतर मोदी वेळापत्रकाुसार पुढील कार्यक्रमांसाठी जाणे अपेक्षित होते.
यावर एकाने कुत्सितपणे लिहिले की मोदी दौऱ्यात अचानक पाकिस्तानला गेले होते ते बिर्याणी खाण्यासाठी गेले होते का?
एकतर मोदी अनपेक्षरित्या पाकिस्तानला केवळ काही तासांसाठी गेले होते ते दौऱ्यातून मधून निघून गेले नव्हते. ते अमेरिकेचा दौरा संपवून भारतात परत येताना गेले होते. कदाचित हा दौरा आधीच ठरविला असू शकतो व पाकिस्तानमधील दहशतवादी गट व त्यांना असलेले लष्कराचे पाठबळ पाहता हा दौरा गुप्त ठेवला असण्याची शक्यता आहे.
२००० या वर्षात क्लिंटन भारतात ४ दिवसांसाठी आले होते. ते परत जाताना अचानक ५-६ तासांसाठी पाकिस्तानला गेले व तेथे जाऊन त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाला जोपासण्यासाठी खडे बोल सुनावले होते.
याउलट आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत प्रतिभा पाटील सर्व कुटुंबीय घेऊन मेक्सिकोच्या अधिकृत दौऱ्यावर गेल्या होत्या. तेव्हा अचानक त्यांचे दोन्ही चिरंजीव नाहिसे झाल्याने मेक्सिकोत प्रचंड खळबळ उडाली होती. ते २ दिवसांनंतर अमेरिकेत परतले तेव्हा समजले की ते तेथून अमेरिकेत जाऊन ॲपल्या शिक्षणसंस्थेसाठी मदत मागण्यास गेले होते व याची मेक्सिमन अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. हा उघडउघड शिष्टाचारांचा भंग होता.
६) पत्रकार परिषद घेणे किंवा न घेणे, त्यात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे किंवा न देणे हा त्या व्यक्तीला मिळालेला वैधानिक अधिकार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखाद्या माध्यमाला किंवा पत्रकाराला हवे आहे म्हणून पंतप्रधान किंवा कोणीही पत्रकार परिषद घेण्यास किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील नाहीत. अनेक प्रत्रकार परिषदेत अनेकांनी मौन पाळून किंवा नो कमेंट्स असे सांगून तो प्रश्न टाळण्याची अनेक उदाहरणे आहेत.
मोदी जनतेला उत्तरदायी आहेत, माध्यमांना नाहीत. माध्यमे त्यांच्यावर सक्ती करू शकत नाहीत. ते माध्यमांच्या अपप्रचाराला घाबरून स्वतःला नको असेल ते करणार नाहीत. जनतेला हे मान्य नसेल तर जनता त्यांना घालवू शकते.
७) नंतर भारतीय दूतावासाने वेगळी पत्रकार परिषत आयोजित केली. त्यात ही महिला पत्रकार उपस्थित होती. त्यात तिने नेहमीप्रमाणे भारतातील मानवी हक्कांचे उल्लंघन यावर विचारण्यास प्रारंभ केला. म्हणजे मोदींना ती काय विचारणार होती ते उघड झाले. अनेक पाश्चात्य माध्यमे भारतातील मानवी हक्कांचे उल्लंघन, तथाकथित अल्पसंख्याकांवर होणारे तथाकथित अत्याचार, भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असलेली तथाकथित बंधने यावर सातत्याने अपप्रचार करीत असतात. भारतीय दूतावासातील अधिकारी या प्रश्नाचे शांतपणे उत्तर देत असताना ती उत्तर ऐकून न घेता हस्तक्षेप करून आधी माझ्या प्रश्नाचे सरळ उत्तर द्या असा वारंवार आग्रह धरून बसली होती. परंतु ते अधिकारी या दबावाला बळी न पडता शांतपणे सविस्तर उत्तर देत राहिले. शेवटी ३-४ मिनिटांनंतर ती महिला वैतागून निघून गेली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आपण कट्टर पुरस्कर्ते आहोत असे अनेक पत्रकार सातत्याने सांगत असतात. परंतु इराणमध्ये एका विद्यालयावर क्षेपणास्त्र सोडून अमेरिकेने १७० निष्पाप विद्यार्थिनिंना ठार मारले किंवा श्र्र्लंका बंदरात उभ्या असलेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेने पाणबुडीने क्षेपणास्त्र सोडून ८० सैनिक मारले, तेव्हा मानवी हक्कांचे पुरस्कर्ते असलेले बहुसंख्य पाश्चात्य पत्रकार मूग गिळून गप्प होते.
८) ज्यांना मोदी भित्रे, प्रश्नांना घाबरणारे, माध्यमांपासून लपणारे वाटतात, त्यांनी तशी समजूत करून घ्यावी. तशी समजूत करून घेणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे, जसा पत्रकार परिषद न घेणे हा मोदींचा घटनादत्त अधिकार आहे. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी खुशाल मोदींवर तोंडसुख घ्यावे. मोदी अशांना ढुंकूनही विचारत नाहीत.
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम सटीक
श्रीगुरुजी,
एकदम सटीक लेख आहे. खरंतर अशा मुखंडांमुळेच मोदींना प्रसिद्धी मिळते. मी तर म्हणेन की अशा मुखंडपाषाणांनी सतत निरर्थक गोंधळ घालीत जगभर हिंडावे.
आ.न.,
-गा.पै.
मोदी प्रश्नांना उत्तर…
मोदी प्रश्नांना उत्तर देण्यासाठी न थांबल्याचा नॉर्वे माध्यमांना इतका राग आलाय की लगेच मोदींवर व्यंगचित्र प्रकाशित केले. मोदी अशांना भीक घालत नाहीत हे उत्तम धोरण आहे. स्वतः टेंभा मिरवितात की आम्ही जगातील सर्वाधिक मुक्त पत्रकार आहोत, पण दुसऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कणभरही किंमत ठेवत नाहीत. मोदी अशांना लाथाडून जागा दाखवून देतात.
पत्रकारांना टाळणाऱ्यांना…
In reply to मोदी प्रश्नांना उत्तर… by श्रीगुरुजी
पत्रकारांना टाळणाऱ्यांना विनाकारण मीतरी डरपोक , घाबरट , भित्रे असे म्हणणार नाही . जन्मजात जनुकीय दोषाला नावं ठेवू नये .
इतकं स्पष्ट सांगूनही सारवासारव करायची गरज का पडली ?
खाई त्याला खवखवे . बिच्चारे विगू . सहानूभूती व्यक्त करतो . असे वाह्यात प्रसंग त्यांच्यावर कधीच येवू नये अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो .
मोदींची परदेशात जितकी दखल…
In reply to मोदी प्रश्नांना उत्तर… by श्रीगुरुजी
मोदींची परदेशात जितकी दखल घेतली जाते, तितकी आजवर कोणत्याही पंतप्रधानाची दखल घेतली गेली नाही. पूर्वी नॉर्वेत भारतीय पंतप्रधान कधी आले आणि गेले याचा तेथील माध्यमांना पत्ताच नसेल. पण निदान व्यंगचित्र काढून तरी मोदींची दखल घ्यावीच लागली.
वा वा काय ते विचार…
In reply to मोदींची परदेशात जितकी दखल… by श्रीगुरुजी
वा वा काय ते विचार. व्यंगचित्रांमधून सन्मान समजणे हेच किती क्रिएटीव आहे.
मी दखल घेतली असं म्हटलंय…
In reply to वा वा काय ते विचार… by पाषाणभेद
मी दखल घेतली असं म्हटलंय. बाकी सन्मान, अपमान इ. गोष्टींची मोदी पर्वा करीत नाहीत. ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात.
मोदींची परदेशात जितकी दखल…
In reply to मी दखल घेतली असं म्हटलंय… by श्रीगुरुजी
या वाक्यातून केवळ तुम्ही दखल घेतली आहे हे सिद्ध करणे म्हणजे मोदींनी पत्रकार परिषद घेतली हे मान्य करण्यासारखे आहे.
वारा येईल तसे पाठ फिरवणे, ह्या बोटाचे त्या बोटावर करणे या म्हणी आताच उदयाला आल्यात वाटते. साक्षीदार म्हणून कोर्टात नाव काढाल.
मोदींनी पत्रकार परिषद घेतली…
In reply to मोदींची परदेशात जितकी दखल… by पाषाणभेद
मोदींनी पत्रकार परिषद घेतली हे मी म्हटलेच नाही. मोदींनी त्या महिलेकडे दुर्लक्ष करणे, नंतर दुतावासाने दिलेले सविस्तर उत्तर हे नॉर्वेतील काही जणांना एवढं झोंबलय की निदान व्यंगचित्राच्या माध्यमातून तरी त्यांना मोदींची दखल घ्यावी लागली.
ए पलट. आता म्हणताय की…
In reply to मोदींनी पत्रकार परिषद घेतली… by श्रीगुरुजी
ए पलट.
आता म्हणताय की त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून दखल घेतली आहे.
काय पलट?
In reply to ए पलट. आता म्हणताय की… by पाषाणभेद
काय पलट?
शेम्बडे विहिरीत पडलें आणि…
In reply to मोदींची परदेशात जितकी दखल… by श्रीगुरुजी
शेम्बडे विहिरीत पडलें आणि निमित्ताने लुगडे धुवून आले !
आगतम् स्वागतम् सुस्वागतम् |…
आगतम् स्वागतम् सुस्वागतम् |
गा.पैं.नी उल्लेखलेल्या मुखंडांचे आगमन जाहले. अजून काही जण आहेत. तेही येणार.
पंतप्रधान पद हे काही खाजगी…
पंतप्रधान पद हे काही खाजगी पद नाही की त्या नेत्याच्या मर्जीने पत्रकार परिषद घेतली जावी.
मोदींना मन की बात करायला वेळ आहे. ते परिक्षा पे "चर्चा" करतात. त्याला ते भित नाहीत.
पण हे केवळ एकतर्फी आहे. म्हणून त्यांना ते फावते.
पत्रकारांच्या काटेरी प्रश्नांना घाबरणारे, डरपोक पंतप्रधान आहेत हे.
पंतप्रधानाने पत्रकार परिषद…
In reply to पंतप्रधान पद हे काही खाजगी… by पाषाणभेद
पंतप्रधानाने पत्रकार परिषद घेतलीच पाहिजे असे कोणतेही घटनात्मक बंधन नाही किंवा घटनात्मक कर्तव्य नाही. ते त्यांचे घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
तसे नसल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून मिळवा. प्रशांत भूषण, सरोदे असे वकील हा खटला विनामूल्य लढतील.
बाकी डरपोक वगैरे मत असल्यास लेखातील मुद्दा क्रमांक (८) वाचावा.
हाथी चले बाजार....
In reply to पंतप्रधान पद हे काही खाजगी… by पाषाणभेद
पत्रकारांच्या काटेरी प्रश्नांना घाबरणारे, डरपोक पंतप्रधान आहेत हे.
🤣😄
In reply to हाथी चले बाजार.... by चंद्रसूर्यकुमार
🤣😄
कसचं कसचं ! दिव्यांगांना मदत…
कसचं कसचं ! दिव्यांगांना मदत करण्यासाठी सदैव तयार .
२०१३ मध्ये एका सभेत एका…
२०१३ मध्ये एका सभेत एका मौलवीने दिलेली जाळीदार टोपी नाकारून मोदींनी माध्यमांना एक विषय देऊन व्यग्र ठेवले होते ज्याचा मोदींना आपली कट्टर हिंदू या प्रतिमासंवर्धनासाठी खूप लाभ झाला होता. अनेक निधर्मांध पत्रकार मोदींवर भुंकत बसले ज्यामुळे जनमत मोदींकडे वळत गेले.
आता मोदींनी निधर्मांध पत्रकारांना नवीन विषय दिलाय ज्यामुळे ते जोरदार भुंकायला लागलेत व अंतिमतः त्याचा लाभ मोदींनाच होणार. आता इंधन किंमतवाढ हा मुद्दा बासनात जाणार व सर्वजण पत्रकार परिषद या मुद्द्यावर भुंकत राहणार ज्याचा जनतेवर काडीमात्र नकारात्मक परिणाम होणार नाही.
विरोधी मते (तुमची, आमची)…
In reply to २०१३ मध्ये एका सभेत एका… by श्रीगुरुजी
विरोधी मते (तुमची, आमची) असूनही तुमच्या मतांचा सन्मान करणे हे आम्ही जाणतो.
म्हणूनच लिहीतो की मोदींनी टोपी नाकारून चांगलेच केले. आपला स्वधर्म पाळणारे छत्रपती संभाजी राजे आमचे आदर्श आहेत.
बऱ्याच भारतीय लोकांना …
बऱ्याच भारतीय लोकांना "व्हाईट स्किन ईन्फेरियारीटी" हा रोग आहे. म्हणजे पाश्चीमात्य देशातल्या कुणीही टिनपाट व्यक्तीने काहीही टिनपाट वक्त्यव केली की "बघा बघा कित्ती किती काळजी आहे हो त्यांना" असे बोलुन लोटांगण घालायची सवय असते. आता हीच पत्रकार बघा, गेले २ वर्षे एक्स.कोम वर एकही ट्वीट तिने केले नाही. २००-३०० इतके प्रचंड फालोवर आणी अगदी याच महिण्यात तिने तिचे अकाऊंट वेरिफाय करुन घेतले आहे.
ह्या अतिशय नावाजलेल्या पत्रकाराने प्रेस ब्रीफिंग ह्या कार्यक्रमात थोडी आरडाओरड केली. लगेच आपले रागा व ईतर कंपु मंडळी तिल डोक्यावर घेउन नाचायला लागली. अगदी ही आरडाओरड नॅशनल एंबरेस्मनेंट आहे वगेरे वगेरे म्हणण्यापर्यंत ह्या लोकांची मजल गेली. खरे तर त्यादेशाने भारतीय पंतप्रधानांना त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला ही बातमी असायला हवी होती परंतु सवंग पत्रकारीते मुळे हा फालतु विषय चघळला जातोय.
बाकी काहीही असो. एक कोपऱ्यातला पत्रकार ३०० फालोवर वरुन बहुतेल ८००० वर पोहोचला आहे. जागतीक(?) स्तरावर मुलाखती देत आहे. रागा तिला विशेष ईंतरव्हु देणार आहे. भला हो मोदी का उसने उसका करीयर बना दिया :)
जाता जाता: एका मुलाखतीत त्या पत्रकाराने जिथे तिने आरडाओरड केली ती प्रेस ब्रीफिंग होती प्रेस कॉन्फरंस नव्हती असे कबुल केले आहे.
ती चित्रफीत मी ट्विटरवर…
In reply to बऱ्याच भारतीय लोकांना … by सुक्या
ती चित्रफीत मी ट्विटरवर पाहिली.
तिला विचारण्यात आले की दोन्ही पंतप्रधान प्रश्न घेणार नाहीत हे आधीच सांगितले होते का?
यावर तिने सांगितले की होय, तसे सांगण्यात आले होते.
असे असूनही सर्वजण कार्यक्रम संपल्यानंतर निघून जात असताना जाणूनबुजून प्रश्न विचारून नंतर समाजमाध्यमांवर आरडाओरडा केला, कारण मोदींना शिव्या दिल्या की तात्काळ प्रसिद्धी मिळते हे तिला लक्षात आले असावे.
भारतात तर अनेकांच्या घरात रोजची चूल मोदींना शिव्या दिल्या तरच पेटते. काही वर्षांपूर्वी नेहा ढुपिया नामक विस्मरणात गेलेली तिय्यम दर्जाची अभिनेत्री होती. तिने अचानक विनाकारण मोदींना शिव्या देणारे ट्विट केले व लगेच पुन्हा एकदा प्रकाशात आली. प्रकाश राज, अमोल पालेकर, कमला हासन हे अभिनेते ही युक्ती नेहमीच वापरतात.
मोदींमुळे अनेकांचे डगमगते जीवन मार्गी लागले आहे.
"मोदी" पार्श्वभागाला पाय…
In reply to ती चित्रफीत मी ट्विटरवर… by श्रीगुरुजी
"मोदी" पार्श्वभागाला पाय लावुन पळाले असे म्हणा आणि मोकळे व्ह्या... तिची मुलाखत पण ए. आय. नी बनवली आहे हे हि सांगा...
तुम्हीी काही विशिष्ठ"लोकांचा (क्षणिक का होईना) "आनंद" हिरावुन घेत आहात. 😅
प्रेस कॉन्फेरन्स असती तर…
प्रेस कॉन्फेरन्स असती तर मोदी हजर राहिले नसते
माध्यम मुक्ततेच्या…
माध्यम मुक्ततेच्या निर्देशांकातील देशांची नावे व त्यांना दिलेला अनुक्रमांक पाहून अंमळ मौज वाटली.
पाकिस्तान, सोमालिया, सुदान, सिंगापूर, झिंबाब्वे अश्या अनेक देशात माध्यमे भारतातील माध्यमांपेक्षा जास्त मुक्त आहेत हे पाहून हसू आले. भारतात २०००+ वृत्तपत्रे, ५००+ वृत्तवाहिन्या आहेत व त्यातील अनेक वर्तमान सरकारवर अहोरात्र कोरडे ओढत असतात. त्यासाठी अनेक माध्यमे धडधडीत असत्य वृत्त प्रसारित करतात व तरीही ते मुक्त आहेत याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही सुद्धा ही यादी तयार करते व यादी प्रत्यक्ष आकडेवारीपेक्षा त्यांच्या वैयक्तिक मतानुसार तयार होते.
यात अमेरिका देश खूप वरच्या क्रमांकावर आहे. कालपासून त्या महिला पत्रकाराचे फेसबुक व इन्स्टाग्राम खाते प्रतिबंधित करण्यात आले आहे. अमेरिकेतील मुक्त माध्यम स्वातंत्र्य यातून सिद्ध झाले आहे.
नॉर्वेमधील पत्रकारांना…
नॉर्वेमधील पत्रकारांना मोदींनी उत्तरे दिली नाहीत, ठीक आहे कारण ती पत्रकार परिषद नव्हती.
पण माझा एक बेसिक प्रश्न आहे. भारतीय पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे का?
मला तरी वाटतं की महत्त्वाच्या प्रश्नांवर तरी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही critical प्रश्नच घेत नाही, तोपर्यंत ते सोडवणार तरी कसे? नाहीतर 'मोदीजी, आप आम कैसे खाते हो?' या प्रश्नाने कोणाचं काय भलं होणार, काय माहिती.
बरं, हा प्रश्न फक्त मोदींपुरता मर्यादित नाही. उद्या मोदींच्या जागी दुसरा कोणी तरी येईल तो पणं असाच पळ काढेल.
'घटनेत लिहिलेलं नाही' म्हणून समर्थन करणं हे फारच लंगडं समर्थन आहे.
मोदींना पत्रकारांचा तिटकारा आहे असंही नाही. त्यांच्या प्रचारसभा किंवा विजयी सभांमध्ये मात्र पत्रकारांसाठी जागा राखीव असते.
मोदी स्वतःला कदाचित फार अद्भुत समजत असतील, नाहीतर त्यांच्या कडे अनेक प्रश्नांची उत्तरं नाहीत म्हणून ते पळ काढत असतील.
मोदी-शहांचा सत्तेचा डोलारा दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे ED/CBI चा गैरवापर. दुसरं म्हणजे राहुल गांधी. जोपर्यंत या दोन गोष्टी आहेत, तोपर्यंत पत्रकार परिषद काय, मोदी संसदेत गेले नाहीत तरी त्यांचं काही वाकडं होणार नाही.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी ह्याचं समर्थन केलं तर एक वेळ ठीक आहे कारण त्यांच्या साठी मोदी-शहा काही चुकीचं करूच शकत नाहीत पण सामान्य लोकांनी तरी जे चूक आहे ते चूक तरी म्हणलं पाहिजे.
>>> पण माझा एक बेसिक प्रश्न…
In reply to नॉर्वेमधील पत्रकारांना… by रात्रीचे चांदणे
>>> पण माझा एक बेसिक प्रश्न आहे. भारतीय पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे का?
घेण्यास आक्षेप नाही, परंतु घ्यायलाच पाहिजे असे नाही. नाही घेणे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. सक्ती करता येणार नाही.
Under Article 19(1)(a) of…
In reply to नॉर्वेमधील पत्रकारांना… by रात्रीचे चांदणे
Under Article 19(1)(a) of the Constitution, journalists have the fundamental right to freedom of speech and expression, which includes the right to report and seek information. However, this right does not impose a reciprocal legal obligation on the head of government to answer specific questions or participate in interviews.
While there is no legal requirement, political analysts and opposition critics widely argue that facing the press is a fundamental democratic responsibility. A Prime Minister is accountable to the public and the Parliament, but how they choose to communicate that accountability—whether through press conferences, interviews, or direct addresses like the Mann Ki Baat radio program—remains at their discretion.
While media outlets and advocacy groups continuously campaign for greater transparency and press freedom in India, they rely on public and political pressure rather than legal force to get the Prime Minister to take questions
पण माझा एक बेसिक प्रश्न आहे…
In reply to नॉर्वेमधील पत्रकारांना… by रात्रीचे चांदणे
गोबीजी सारख्या महामानवाने सामान्य वार्ताहरांच्या अतिसामान्य प्रश्नांची उत्तरे देणे म्हणजे त्यांच्या सारख्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या माणसाचा वेळ खर्चकरणे होय. गोबीजी अक्षय कुमार सारख्या ब्रहस्पती समान ज्ञान असलेल्या लोकांनाच मुलाखत देतात. "आपण आंबा कसा खाता ? " अश्या प्रकारचे दर्जेदार आणि राष्ट्रीय पातळीवरील महत्वाचं प्रश्नांना फक्त अक्षय कुमार सारखे लोक विचारू शकतात.
धीरेंन शास्त्रींच्या दरबारांत प्रश्न विचारायची गरज नाही. बाबांनी आधीच पर्ची लिहून ठेवलेली असते. त्याच प्रमाणे गोबीजींना प्रश्न विचारायची गरज नाही. देशापुढील महत्वाचे बौद्धिक प्रश्न त्यांना आधीच ठाऊक असतात त्यामुळे मंकी बात मध्ये ते अतिशय सक्रिय पणे ह्या प्रश्नांना उत्तर देतात.
बाकी व्हाट्सअँप वर गोबीजींचे प्रवक्ते २४ तास उपलब्ध आहेत. विदेश नीती पासून रक्षा धोरण आणि आर्थिक व्यवस्थे पासून कायदा आणि सुव्यवस्था पर्यंत प्रत्येक विषयावर गोबीजिची कशी दूरदृष्टी आहे ह्यावर ते सतत विवेचन करत असतात.
मोदीळ , डॉ. खरे सर, मोदी…
In reply to पण माझा एक बेसिक प्रश्न आहे… by साहना
मोदीळ , डॉ. खरे सर, मोदी नाव वाचता किंवा ऐकताना "पोटशूळ" का होत असवा ?
https://www.youtube.com/watch?v=LYRhvf0T2iE
हि मंडळी अक्कलशून्य म्हणावेत का ? का हे ही "पेड" मिडिया?
"भारतात प्रकारांना…
"भारतात प्रकारांना स्वातंत्र्य नाही" हे म्हणणाराना संजय राऊत यांचे अग्रलेख तसेच त्यांच्याच सकाळच्या पत्रकार परिषदा दाखवाव्यात.
प्रथम हे समजून घ्या की…
प्रथम हे समजून घ्या की माध्यमे हे काही समाजहितैषी, जनसेवा, परोपकार, धर्मादाय इ. नसून इतर अनेक व्यवसायांसारखा तो एक लाभकेंद्रीत व्यवसाय आहे. सर्व व्यवसाय लाभ, उत्पन्न यासाठी प्रयत्न करतात, तसेच माध्यमे सुद्धा करतात. सर्व व्यवसाय उत्पन्नासाठी सर्व बऱ्यावाईट मार्गांचा अवलंब करतात, तसेच माध्यमेही करतात.
माध्यमे उत्पन्नवृद्धीसाठी असत्य पसरविण्याची, एखाद्याची ठरवून अपकीर्ति करण्याची, एखाद्या अपात्राला मोठे करण्याची असंख्य उदाहरणे आहेत. माध्यमे जनतेचे प्रतिनिधी नाहीत, ते जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, ते चुकीच्या गोष्टींवर आवाज उठविणे आणि जनजागृती करणे असले प्रकार करीत नाहीत. ज्यातून उत्पन्नवृद्धी होईल त्याच नैतिक अनैतिक गोष्टी ते करतात.
आम्ही माध्यमे आहोत, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजे हा हट्टच अवैधानिक व निराधार आहे. एखाद्याला तुमच्याकडे लक्ष द्यायचे नसेल तर तो त्याचा घटनादत्त अधिकार आहे.
उद्या एखादा कोणतेही शीतपेय प्राशन करीत नसेल किंवा कोणतेही वाहन वापरत नसेल तर शीतपेय व्यवसाय किंवा वाहन व्यवसाय त्यांच्यावर शीतपेय प्राशन करण्याची किंवा वाहन वापरण्याची सक्ती करू शकत नाहीत. तसेच पत्रकार परिषद घेण्याची सक्ती मोदींवर कोणीही करू शकत नाही.
विशेषतः २००२ पासून बहुसंख्य माध्यमांनी अनेक असत्य आरोप करून मोदींची अपकीर्ति केलेली आहे. उदाहरणार्थ गुजरात दंगल, १५ लाखांचे आश्वासन, मोदींची पदवी, मोदी मुलाखतीत म्हणाले की प्रियंका मला मुलीसारखी आहे अशी अनेक असत्ये माध्यमांनी जाणूनबुजून पसरविली आहेत.
म्हणून तर बहुसंख्य माध्यमांना मोदी दारातही उभे करीत नाहीत. पत्रकार परिषद घेत नाहीत कारण त्यांना दाखवायचे आहे की मला तुमची अजिबात गरज नाही आणि म्हणून मी तुम्हाला लाथाडतो. मोदींना जी माहिती द्यायची ते ती स्वतःच्या मार्गाने देतात. त्यासाठी माध्यमांची त्यांना गरज नाही.
आपल्या व्यवसायवृद्धीसाठी, चंगळीसाठी मोदींची माध्यमांना गरज आहे, मोदींना माध्यमांची अजिबात गरज नाही.
मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत हे ज्या माध्यमांना मान्य नाही त्यांनी मोदींवर संपूर्ण बहिष्कार टाकावा, मोदी दरवर्षी वृत्तपत्रात एक दोन लेख लिहितात ते प्रसिद्ध करू नये, मोदींसंबंधातील कोणतेही वृत्त प्रसिद्ध करू नये, मोदींच्या सभेत उपस्थित राहू नये. पण ते असे करणार नाहीत कारण मोदी ही त्यांची गरज आहे, मोदींना त्यांची कणभरही गरज नाही.
माध्यमे हे काही समाजहितैषी…
In reply to प्रथम हे समजून घ्या की… by श्रीगुरुजी
माध्यमे हे काही समाजहितैषी, जनसेवा, परोपकार, धर्मादाय इ. नसून इतर अनेक व्यवसायांसारखा तो एक लाभकेंद्रीत व्यवसाय आहे. सर्व व्यवसाय लाभ, उत्पन्न यासाठी प्रयत्न करतात, तसेच माध्यमे सुद्धा करतात. सर्व व्यवसाय उत्पन्नासाठी सर्व बऱ्यावाईट मार्गांचा अवलंब करतात, तसेच माध्यमेही करतात.
बरोबर आहे.
असे असताना तथाकथित माध्यमांना मोदी लाथडतात यात काहीही चूक नाही.
गंमत अशी आहे की विरोधक…
गंमत अशी आहे की विरोधक कोणत्याच मुद्द्यावर टिकून राहत नाहीत. परवा इंधन किंमतवाढ हा मुद्दा घेतला, काल नॉर्वे हा मुद्दा घेतला, आज इटलीत मोदींनी पंतप्रधान जॉर्जिया मेलनींना मेलडी टॉफी दिली या मुद्द्यावर टीका सुरू केली. कोणत्या मुद्यांवर मोदींवर टीका करावी हेच समजत नसल्याने कोणत्याही मुद्यावर टीका सुरू आहे आणि यापैकी कोणताही मुद्दा जनतेला भिडत नाही.
ससुरे सटिया गये है...
In reply to गंमत अशी आहे की विरोधक… by श्रीगुरुजी
ससुरे सटिया गये है...
WfH / WfR
He asked us to do
*Work from Home*
But he is doing
*Work from Rome*!
इथल्या प्रतिक्रिया मजेशीर…
In reply to WfH / WfR by कांदा लिंबू
इथल्या प्रतिक्रिया मजेशीर आहेत!
https://www.facebook.com/100044527235621/posts/1783489743145250/?app=fbl
आताच गौरी द्वीवेदी ने हेले…
आताच गौरी द्वीवेदी ने हेले लिंग ची घेतलेली मुलाखत बघितली. ईतरांना मला आताच उत्तर द्या आता म्हणजे आता असे ओरडणारी हेले ने विचारलेल्या प्रश्नांवर त त प प करायला लागली. मजा आली बघायला ... ह्या अजेंडाधारी तथाकथीत पत्रकारांना त्याच भाषेत चोपले पाहिजे ... मजा आली.
गौरी ला ती "यु शुड रीड बुक ऑन हीम ..." वगेरे बोलत होती. गौरीने तुमा भारताविषयी काय माहीती आहे. काय वाचले आहे ते विचारले तर टाय टाय फिश. मला ईंडीयन करी / योगा आवडतो वेगेरे वगेरे त त फ फ . . .
सुधारीत . . .
आताच गौरी द्वीवेदी ने हेले लिंग ची घेतलेली मुलाखत बघितली. ईतरांना मला आताच उत्तर द्या आता म्हणजे आता असे ओरडणारी हेले गौरी द्वीवेदी ने विचारलेल्या प्रश्नांवर त त प प करायला लागली. मजा आली बघायला ... ह्या अजेंडाधारी तथाकथीत पत्रकारांना त्याच भाषेत चोपले पाहिजे ... मजा आली.
गौरी ला ती "यु शुड रीड बुक ऑन हीम ..." वगेरे बोलत होती. गौरीने तुला भारताविषयी काय माहीती आहे. काय वाचले आहे ते विचारले तर टाय टाय फिश. मला ईंडीयन करी / योगा आवडतो वेगेरे वगेरे त त फ फ . . .
एकच पालुपद "मला भारतातल्या प्रेस फ्रीडम वर बोलायचे आहे" ही ही ही . . . .
https://x.com/ndtv/status/2057127130295939167
https://x.com/ndtv/status/2057127130295939167
डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींची नवी परदेशी अम्मी
समस्त डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींना एक नवीन परदेशी अम्मी मिळाली आहे. पूर्वी ते स्थान ग्रेटाकडे होते. मधल्या काळात टेनिस खेळाडू मार्टिना नवरातिलोवा पण होती. ही बया जाऊन तिसरी कोणी आली की तिला डोक्यावर घेतले जाईल. आणि नेहमीप्रमाणे मोदी या सगळ्या बाष्कळ बडबडीकडे पूर्ण दुर्लक्ष देऊन त्यांना करायचे तेच करतील. आणि हो... मोदी मधल्या काळात इथल्या डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींच्या हातात नवा कोणता तरी खुळखुळा देतील आणि ते लोक तो खुळखुळा अगदी प्रामाणिकपणे खेळत बसतील.
हहपुवा
In reply to डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींची नवी परदेशी अम्मी by चंद्रसूर्यकुमार
🤣🫠😝
महात्मा गांधींचा भारत आहे ,…
In reply to हहपुवा by श्रीगुरुजी
महात्मा गांधींचा भारत आहे , त्यामुळे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता- पांचट जॉर्ज. गांधीकी गॅरंटी ! अचानक हल्ला झाला की माणूस खरं बोलतो .
😃
In reply to डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींची नवी परदेशी अम्मी by चंद्रसूर्यकुमार
😃
ते लोक तो खुळखुळा अगदी…
ते लोक तो खुळखुळा अगदी प्रामाणिकपणे खेळत बसतील.
मोरू लोक इथे मिपावर सुद्धा खुळखुळा हलवत बसलेले आहेत. यातून आवाज कसा काय येतो ते त्यांना समजत नाहीये.
आपणच खुळखुळा हलवल्यामुळे आवाज येतो हे त्यांना समजत नाहीये.
मग मांजराचे पिल्लू कसं आपल्याच शेपटीच्या मागे गोलगोल फिरत राहतं, तीच स्थिती यांची आहे.
द्विरुक्ती: मोदीळ , डॉ. खरे…
In reply to ते लोक तो खुळखुळा अगदी… by सुबोध खरे
द्विरुक्ती:
मोदीळ , डॉ. खरे सर, मोदी नाव वाचता किंवा ऐकताना "पोटशूळ" का होत असवा ?
https://www.youtube.com/watch?v=LYRhvf0T2iE
हि मंडळी अक्कलशून्य म्हणावेत का ? का हे ही "पेड" मिडिया?