Skip to main content

सध्या काय पाहतेय? ---२०२६

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 02/01/2026 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
1 या रे या stranger things च्या फ्यान लोकांनो इकडे या भावनांचे पाट वाहू द्या stranger things ला भरलेल्या मनाने गुड बाय करू या शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात. 2 कोणाचं कौतुक करावं ??? सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं. २०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_O… ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे . यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :) 3 4 अहो शेवट ,तुम्ही सस्पेंस ,थ्रिलरवर गोष्ट संपवता तेव्हा हे क्षणिक ठरत .मानवी भावनांना जेव्हा स्पर्श करता तेव्हा ती गोष्ट अमर होते. माईक सगळ्यांना समजून सांगतोय आपलं बालपण आता दूर चाललं आहे ,संपलं आहे .हा खेळ संपला आयुष्याचे नवीन अध्याय आता खेळणार आहोत.... हायला खूप दिवसांनी एखाद्या सीरिजने आनंद दिला ,हसवलं,उत्सुकता वाढवली ,रडवले. हॅट्स ऑफ डफर ब्रदर !!!!!

वाचने 8685
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय???(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी बदलु नये ,हा बेसिक नियम मान्यच असेल असे..:)) माहिती अधिक झाल्याने इथे स्वतंत्र धागा दिला आहे. http://misalpav.com/node/53480

1 प्रेमाला केवळ भावना म्हणून सिनेमांत सादर करणे खूप दुर्मिळ आहे. त्याच्याभोवती संघर्ष, प्रतिशोध,एकाकी लढा असे धागे कथा म्हणून गुंतलेले असतात. पण अशा कथासूत्रांत "साबर बोंड" (कॅक्टस पिअर्स) हा प्रेमाचा सिनेमा अडकत नाही.गोष्ट जगात सहज मान्य नसणाऱ्या "समलैंगिक तरुणांची"!पण सिनेमा इतक्या सहजतेने हॆ समलैंगिक नातं आपल्यापर्यंत पोहचवतो की वाटत "का बर प्रेम देणाऱ्या यां नात्याला बोल लावतो,यांच्याही भावना जाणून घेत नाही.लग्नासाठी ढकलून कोणत्याही मुलीचे/मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी, अशा लैंगिकता पुढे येऊन स्वीकार करणाऱ्यांना समाज दबावाशिवाय सामावून घेत नाही? वडिलांच्या मृत्यूनंतर आनंद अंतिम क्रियाकर्मसाठी गावाकडे जातो. तिथे त्याचे वय उलटल्यामुळे लग्नाविषयीं गावाकडचे त्याला सतत विचारत राहतात. तेव्हा आनंदला त्याचा लहानपणीचा सवंगगडी बाळ्या भेटतो. बाळ्याही याच लैंगिक ओळखीचा आहे. ग्रामीण भागातल्या तरीही मधेच शुष्क बाभाळी, एवलस तळ, डेरेदार झाड्याच्या पानाची सळसळीतले ते दोघे अशी गोंगाटविरहित फ्रेम दाहक विषय आपल्यापर्यंत शांतपणे आणून सोडते. यां सिनेमातल मर्म घ्यायचं असलं तरी काय?? उत्तर -"स्वीकार" आपल्या भावनांचा स्वीकार, समोरच्याच्या भावनांचा स्वीकार हॆ एक मूल्य आहे. आनंदला त्याचे आईवडील आहे आहे तसा स्वीकारतात त्यामुळे त्याच्या भावनांना सुरक्षा,प्रेम मिळते. बाळ्यालाही मग ती सुरक्षा मिळते. एक प्रेमाच "नातं" समाजाच्या नकळत सुरक्षित होतं.

तरल मनोवृत्तीच्या पब्लिक ने प्राईम व्हिडिओ वर नुकताच आलेला " ८ ए. एम. मेट्रो' हा चित्रपट बघावा अशी आवर्जून शिफारस करतो.

katwe हा चित्रपट आवर्जून बघा ! सत्यकथेवर आहे . यावर स्वतंत्र धागा काढायचा आहे.

काल आपला आवडता हीरो अमर विश्वास अ‍ॅमॅझॉनवर पाहिली https://www.amazon.in/minitv/tp/234bac87-44a3-4f3a-a6b1-30c2debf8c4a सुशिंची स्टार हंटर ही कादंबरी वाचली होती. तीचे चित्राट स्वरूप पहाताना कसे वाटेल हा प्रश्न होता पण सिरीयल आवडली. कादंबरी वाचण्यातली उत्सुकता सिरीयल पहातानाही अनुभवली.

In reply to by विजुभाऊ

अमर विश्वास आणि बॅरिस्टर दिक्षीत या पात्रांना बराच वाव होता, त्या तुलनेत मोहिनी, गोल्डी या व्यक्तिरेखा पहिल्या सिझनमधे फारशा वेधक वाटल्या नाहीत. ही उणीव पुढे भरून निघेल, त्यामुळे या मालिकेचे आणखी बरेच 'सीझन्स' यावेत अशी आशा आहे.

In the Blink of an Eye हा चित्रपट मानवजातीच्या अस्तित्वाचा, भावनांचा आणि वारशाचा अत्यंत वेधक आणि तत्त्वचिंतनात्मक प्रवास दाखवतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन Andrew Stanton यांनी केले आहे, यापूर्वी Finding Nemo आणि WALL‑E सारखे भावनिक आणि विचार करायला लावणारे चित्रपट त्यांनी दिले आहेत. WALL-E हा बालपणीचा एक अविस्मरणीय अनुभव होता,विशेषतः तो Star Movies वर वारंवार लागायचा आणि एकाकीपणा, प्रेम आणि आशा यांची सुंदर कथा सांगायचा. त्याच भावनिक आणि तत्त्वज्ञानात्मक शैलीची झलक In the Blink of an Eye मध्येही दिसते. चित्रपटातील तीन काळात मानवाची कथा फिरत आहे.मानवजातीचा प्रवास या चित्रपटात मानवाच्या इतिहासातील तीन महत्त्वाचे टप्पे परस्पर गुंफलेले दाखवले आहेत भूतकाळ (४५,००० BC) Neanderthal आदिमानवाचा संघर्ष, अस्तित्वासाठीची झुंज आणि कुटुंबाची सुरुवात, कशा प्रकारे ते होमो सेपीयन्सशी भेटतात, सहकार्य सुरु होते. वर्तमानकाळ -एक वैज्ञानिक संशोधक, जो विश्वातील रहस्ये आणि मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत राहतात. भविष्यकाळ -मानव दुसऱ्या ग्रहावर वसाहत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, जिथे अस्तित्व, वारसा आणि मानवी ओळख पुन्हा निर्माण होते. या तिन्ही कथांमध्ये एक समान धागा आहे. एकाकीपणातून कुटुंबाकडे, आणि कुटुंबातून मृत्यू व वारशाकडे जाणारा प्रवास. चित्रपट विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच मानवी भावनांचाही विकास दाखवतो. तंत्रज्ञान बदलते, काळ बदलतो, पण प्रेम, भीती, आशा आणि वारसा यांसारख्या मूलभूत भावना कायम राहतात.हा या चित्रपटाचा मुख्य संदेश आहे. OTT- Disney Jio Hotstar

नेफिवर His & Hers ही सिरीज पाहिली. वेगवान, उत्कंठावर्धक वाटली. **** स्पॉईलर अलर्ट **** कॅथरीनच लेक्सी आहे हे Annaला माहिती नसते, याचे फारच आश्चर्य वाटले. हेलन, रचेल अगदी तिच्या आईलाही हे माहिती असते, It didn’t feel convincing enough. स्पॉईलर अलर्ट Jugnuma: The Fable ही मुव्ही अमेझॉन प्राईमवर बघितली. काहींच्या काही open-ended आहे. चित्रपटातील मनोज वाजपेयीच्या मुलीचा आणि नोमॅडचा ट्रॅकही नीट समजला नाही.

In reply to by कंजूस

कौतुकासाठी कंकाका धन्यवाद ! स्क्रीनशॉट काढते याचा आणि घरी दाखवते :) घरच्यांना वाटते मी टाइमपास करते .

#गांधी_टॉक्स #उत्तर किशोर पांडुरंग बेलेकर दिग्दर्शित, विजय सेतुपती, अरविंद स्वामी, अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेला एक अनोखा मूक चित्रपट आहे.चित्रपटाची गोष्ट मुंबईच्या चाळीतल्या सामान्य व्यक्तीचे संघर्षाचे आहे.सामन्यांना सिस्टिममधून जाताना सरकारी नोकरी ,निवडणुका या लोकशाहीच्या महत्वाच्या पडावांवर भ्रष्टाचार पाहावा लागतो.बर मग श्रीमंत व्यावायिकांनाही सिस्टीमचा भ्रष्टाचार धुळीस मिळवतो हेही यात दाखविले आहे.या सगळ्यात आता विचारांऐवजी नोटेवरच उरलेले गांधीजी महत्वाचे म्हणून "#गांधीटॉक्स ".मूकपट पाहण्यासाठी वेगळाच अनुभव आहे .जागोजागी भारत जाधव याचे ताणून आणलेले विनोद आहेत ,पण ठीक आहे .हिरो हिरोइनची प्रेमकथा छान दाखविली आहे .हॅंप्पी एंडिंग सिनेमात असतोच ,पण सामन्याने मिळवलेला न्याय यातला शेवट खासच आहे . क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात रेणुका शहाणे ,अभिनय बेर्डे आणि हृता दुर्गुळे यांचा #उत्तर" सिनेमा आई -मुलाच्या नात्याची वीण उलगडतो.गृहीत धरलेली आई ,जर आपल्यात नसेल तर रोजाचे जीवन थांबायला नको .म्हणून इंजिनीरिंग शिकणारा मुलगा नोमिस असं काहीतरी बॉट बनवतो .पण खरोखच आई देवाघरी गेल्यावर ,मी चॅट बॉट बनवला तो आईची कमी पूर्ण करेल या भ्रमात मुलगा असतो .पण कोणतेच तंत्रज्ञान सुप्त मनातील भावनेचा ओलावा रिप्लेस करू शकत नाही,हा गोड शेवट दाखविला आहे .

हे काय नवीन..
झी वरची मराठी सिरीज आहे.
खुप मोठा लेख लिहिणार होते पण थोडक्यात सांगते..
पूर्ण मालिकेत रमा अक्षरशः आपला ताबा घेते. रमाची नवीन उद्योग सुरु करायची इच्छा असते पण ती उच्च महत्वकांक्षा ठरत नसते. त्यामुळे तिचे आईवडील, नवरा तिच्या बाबतीत थोडे काळजीत असतात. त्यात रमाला भेटलेल्या दोन सहकारी यांच्या विदर्भीय उच्चार भाषाने मालिका हलकीफुलकी ठेवलीय. पण रमा अनेकदा उदासीच्या काठावर जात राहते. दरवेळी काहीच न झाल्यागत ती पुन्हा सामान्य होते असते हे आवडले.
शेवटचा भाग सर्वात खास आहे... खेळायला जायचं.. आपल्या स्वप्नांशी,छंदांशी मनसोक्त खेळायचं, खेळायला सवंगडी जमवायचे. आयुष्यात निर्माण झालेली वा 'केलेली' पोकळी भान विसरून करत असणाऱ्या छंदाने भरून जाते. पण समोरच्याला ती पोकळीच दिसते. त्याला आपण प्रिय नाही का?? हे रमाच्या मनात उठलेले प्रश्न आपणही अनुभवलेले असतात.
प्रिया बापटने कमाल का केले आहे 👌
तमाम नवरे लोकांप्रमाणे सतत उशिरा ट्यूब पेटणारा नवरा उमेश कामतने तंतोतंत साकाराला आहे त्यालापण पंचतारांकित शाबासी 😅

https://youtu.be/RjphBAgLwKo

मनपिशाच्च  हा झीरो बजेट सिनेमा आहे. राही अनील बर्वेंचा

अवघ्या ३३,०००/- रुपयांत तयार झालेला आहे.

बघणेबल आहे. यु ट्यूब वर सतत जहिराती येतात त्यामुळे विरस होतोय.


In reply to by Bhakti

आजच सगळी सिरीज पाहून संपली. चौथा सीजन वेगवान आहे. बर्ड दाम्पत्याचे होणारे अध:पतन उत्तम चित्रित केले आहे.


In reply to by प्रचेतस

बर्ड दाम्पत्याचे होणारे अध:पतन

ओह मला वाटलं चमत्कार होऊन ते सुटणार!

Marty, windey, rut  कमाल काम केले आहे


In reply to by प्रचेतस

आपल्याकडे नायक/ नायिका सर्व वेळी, उदात्तच दाखवण्याची पध्दत आहे. अनेक पश्चिमेच्या मालिकांत मात्र माणसांत गुणाबरोबर अवगुणही असतात, त्यांचेही स्खलन होते असे दाखवले जाते. आपल्याकडे असली परिपक्वता कधी येणार कोण जाणे...

 


सध्या कॅप्चर पाहतोय - बीबीसी आय प्लेअर वर. तिसरा ससिझन. 

सीसी टीव्ही हॅक झाले, तर सुरक्षा एजन्सीजवर कसा परिणाम होईल असे काहीसे कथानक आहे. उत्कंठावर्धक आहे.


कुणाला अतिशय डार्क सिरीज बघायच्या असतील तर “Monster: The Ed Gein Story”, “Dahmer” आणि “Mindhunter” सुचवेन. डोकं सुन्न होतं. 

 


ozark ..
मी मारधाड ,क्रिमिनल,हॉरर सिरीज अजिबात पाहत नाही .पण इथे सुचवलेली ओझर्क सिरीज अक्षरश: बिंज वॉच केली .कारण मार्टी आणि त्याचे त्याच्या कुटूंबावर असलेले प्रेम !!

खतरनाक अभिनय केला आहे.कायम शांत ,तरीही नशिबाच्या फेऱ्याने गुन्हेगारांच्या विळख्यात सापडतो.पण कुटुंबाला वाचवण्यासाठी एकामागून एक गुन्हे ते करत राहतात .

 चार गुणिले दहा अधिक चार =एकूण ४४ भागांत अनेक महत्वाच्या व्यक्तिरेखांचा खून होतो .पण त्या प्रत्येक व्यक्तिरेखांची मानसिक जडण घडण पूर्णपणे आपल्या पर्यंत आधीच पोहचल्याने मेलेला व्यक्ती गुन्हेगार आहे तरीही त्याच्या जाण्याने चक्क वाईट वाटते.

कथा खूपच वाढत जाते .काही लूपहोलही आहेत पण वेडी वेन्डीबाईंमुळे ती गोष्ट आणखीनच वाढली आहे .रूथ

मला सगळ्यात जास्त आवडली होती.


'From' बघतय का कोणी ? चौथा सीजन आलाय आत्ता. डोक्याला शॉट आहे लई 🫡

prime वर बघता येईल. 


सध्या काय पाहताय?

सध्या मी लोकशाहीची होणारी हत्या पाहतोय. :)
खिक्क!  (ह. घ्या. हा.) 
सध्या येडपट गोष्टी (stranger things) इंग्रजीत पाहायला सुरुवात केली आहे, चक्क समजतेय, पण वेळ खूप लागतोय कारण सबटायटल वरून नजर उचलली जात नाहीये. त्या नंतर नवीन काही पाहेन म्हणतो! 
विहिरी हा मराठी सिनेमा अर्धा राहिलाय!