Skip to main content

ठाणे ' मिपा ' कट्टा (४)

Published on बुधवार, 24/12/2008
नमस्कार, आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे मिपा कट्ट्याचे नक्की केले आहे. स्थळ : 'लक्ष्मी केशव कार्यालय' प्रताप सिनेमा समोर ; कोलबाड रोड ; खोपट ठाणे (प.) सर्वांनी दुपारी ४.०० पासून जमावयास सुरूवात करावी पण ५.०० पे़क्षा जास्ती उशीर करू नये ही विनंती . कट्ट्याला वेळेचे बंधन नसेल. मेनू : सायं. ५.०० पासून मंडळींनी जमवयास सुरूवात करावी. प्रथम भजी ( कांदा,बटाटा, मूग, मेथी ) आणि चहा. आणि रात्रौ ७.३० नंतर भोजन : मिसळ पाव ; मटण , भाकरी ; भात ; दही ; ताक ; कांदा ;टमाटो वगैरे. आता या दोन्ही कार्यक्रमांच्या मधे काय करायचे ते त्याच वेळी ठरवू. येण्याचे नक्की करण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. संतोष जोशी ९८२०० ६२१३३ तात्या अभ्यंकर ९८२०४ ९४७२० हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

वाचन संख्या 6200
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

मेनू छानच आहे, नक्की येण्याचा प्रयत्न करणार. तात्याला फोन करून कन्फर्मेशन देतो. इतर कोण कोण सभासद येणारेत ते समजेल का? सर्वांचाच लाडका, शेणगोळा.

अरे कोण कोण मंडळी नक्की येणारेत ते लौकर कळवा रे!

पण कोणत्या तारखेला??? Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

माझ्याकडून कट्ट्याला हार्दीक शुभेच्छा

रवि २८ डिसें. ला आहे ना? सर्वांनी दुपारी ४.०० पासून जमावयास सुरूवात करावी पण ५.०० पे़क्षा जास्ती उशीर करू नये ही विनंती . मेनू : सायं. ५.०० पासून मंडळींनी जमवयास सुरूवात करावी. हे काही समजले नाही. :? वेळ ४ करा रे :) संध्याकाळी ४/ ४:३० ला येईन, किती वाजेपर्यंत असेन ते नक्की नाही.

हा काय प्रकार आहे ? ठाण्यात तुम्ही दर रविवारी भेटता का ?

जमलं तर मी हि तुमच्या ग्रुप मधे सामील होण्याचा प्रयत्न करीन.

साहेब,तारीख कोण कळविणार? जयेश माधव

In reply to by जयेश माधव

दि. २८ डिसेंबर , २००८ ( रविवार ) दु. ४.०० नंतर पुढे ' नो लिमिट ' हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

कट्ट्याचा खादाडी बेत जंगी दिसतोय. :) कट्ट्याला अनेकोत्तम शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

मी , रामदास, विजुभाउ येणार बर का?

In reply to by विनायक प्रभू

मी पण येतोय... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

कट्ट्याचा वृत्तांत (फोटोसकट) कधी टाकणार? फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

काल खूप छान कट्टा झाला. लाईफमधल्या दोन घटका सुखाच्या गेल्या. सर्व कट्टेकरींना भेटून आनंद झाला. संतोष जोशींनीही अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली होती.. आपला, (आनंदी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by विसोबा खेचर

मी ही पूर्ण सहमत. इतके वेळा ऐकून असलेला मिपा चा कट्टा काल एकदाचा अनुभवला. मस्त मजा आली. (पुढील कट्ट्याच्या)(आणि सध्या वृतांत आणि छायाचित्रांच्या) प्रतिक्षेत) -देवदत्त

ते सगळ ठीक आहे . पण काय वॄत्तांत ,फोटो वगैरे टाका की .... आम्ही काय-काय मीस करतोये ते तर कळेल...:-( बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

आयला, काय वो तात्या, कट्टा लै भारी झाली...मजा आली....एव्हढ्यात संपलं का सगळं? च्यायला, रामाची बायको शीता, तिला रावणानं पळवली, रावणाशी रामानं युध्द करुन त्याला ठार मारला आणि शीतेला सोडवून आणलं एव्ढ्यात रामायण संपतं का???? रामायण कसं असतं? आटपाट आयोध्यानगरी होती, तिचा राजा दशरथ ह्याला तीन राण्या होत्या, पण मुलबाळ व्हत नव्हतं म्हणुन त्यानं पुत्रकामिष्टेका यज्ञ केला.............. इथुन चालु होतं...काय? बराबर बोल्लो का नाय?

In reply to by धमाल मुलगा

रामायण कसं असतं? आटपाट आयोध्यानगरी होती, तिचा राजा दशरथ ह्याला तीन राण्या होत्या, पण मुलबाळ व्हत नव्हतं म्हणुन त्यानं पुत्रकामिष्टेका यज्ञ केला.............. १००% अगदी राम काय खात होता, पीत होता, ते पण!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

असेच म्हणतो.

In reply to by विनायक प्रभू

अरे वा मास्तर, +१०१ लगेच प्रतिक्रियेत आले :)

लई भारी......... कट्टा झाला. झकास...

च्यायला सगळे फोक्या ताणतायेत!!! जो पर्यंत वृत्तांत आणि फोटू येणार नाय तो पर्यंत आपण काय विश्वास ठेवणार नाय!!!!!!!!!!!!!!!!!! (ह.घ्या) ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by एकलव्य

च्यायला नुस्ता ! कट्टा झकास झाला ! कट्टा झकास झाला ! अरे पण वृत्तांत टाका ना ! (कट्टा झकास झाला ! अशा प्रतिक्रिया आता उडवून लावेन..जळवायचे एखाद्याला पण किती ) :)