टोक्यो हानेडा विमानतळ अपघात - a textbook evacuation !
दि. ०२/०२/२०२४ रोजी टोक्यो हानेडा विमानतळावर अपघात झाला.
विमानतळावर उतरताना एअरबस A३५० -९०० विमान, धावपट्टीवर उड्डाणाच्या तयारीत असणाऱ्या Dash 8 या तटरक्षक दलाच्या छोट्या विमानाला धडकले.
असे का झाले याबाबत अधिक माहीती येत आहे, चौकशी चालू आहे.
एअरबस A३५० -९०० हे एक मोठे प्रवासी विमान आहे. अपघातग्रस्त विमानात प्रवासी व कर्मचारी मिळून ३७९ जण होते. धडकेनंतर मोठा आगीचा लोळ उठला व विमान धावपट्टीवर अनेक मीटर फरफटत पुढे गेले.
विमान थांबल्यावर मागच्या बाजूला आग लागली होती, इंजिनातून ठिणग्या उडत होत्या, धूर पसरला होता.
अशा कठीण परिस्थितीत सर्व ३७९ जण सुखरूप बाहेर आले. त्यानंतर संपूर्ण विमानाने पेट घेतला.
हे एक आश्चर्यकारक evacuation (मराठी ?) आहे. - a textbook evacuation !
1. अपघात / आणीबाणी आहे हे अगदी शेवटच्या काहि मिनिटात कर्मचारी आणि प्रवाश्याना कळले. आणीबाणीची अजिबात तयारी नव्हती.
२. विमान पुढे झुकलेले होते. आगीमुळे फक्त पुढील दोन आणि मागील एक दरवाजा / घसरगुंडी उघडण्यात आली होती. एकूण आठापैकी तीन फक्त.
३. अंदाजे फक्त अडीच मिनिटात ३७९ जण सुखरूप बाहेर पडले. हे विमान ४ दरवाजे वापरून ९० सेकंदात रिकामे करण्यासाठी प्रमाणित आहे.
४. कर्मचायांचे ट्रेनिंग उत्कृष्ठ झाले असावे व त्यांनी त्या ट्रेनिंगचा पुरेपूर यथोचित उपयोग केला.
५. अधिकतर प्रवाशी जपानी असल्याचा काही फायदा असावा. इंटरनेट वर अनेक जण जपानी संस्कृतीला श्रेय देत आहेत. जपानी लोक दिलेल्या आज्ञा काटेकोरपणे पाळतात. त्यामुळे घाईगडबड न करता , सामान न घेता लोक शिस्तीत बाहेर आले.
आपणही यातून काही शिकू शकतो. ज्या सूचना कर्मचारी वर्ग आपल्याला देतो त्या पाळाव्यात. त्या सूचना अश्या आणीबाणीच्या प्रसंगांसाठी केलेली तयारी असतात.
उदा. विमान उतरताना ट्रे बंद करवा , सामान रस्त्यात ठेवू नये, खिडकी ऊघडी ठेवावी वगैरे. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आणीबाणीत अनमोल सेकंद वाचू शकतात.

वाचने
7744
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
१)आमच्याकडे भाषेची अडचण.
आपल्याकडे असा काही प्रसंग
Calling गवि
तासाभराच्या प्रवासानंतर
काल एवढी मोठी दुर्घटना घडली
दि. ०२/०२/२०२४?? ही तारीख
कौतुक करण्याआधी थोडे थांबा.
एका विमानाचा (single aircraft
In reply to एका विमानाचा (single aircraft by गवि
रुल्स रिटन इन ब्लड
In reply to रुल्स रिटन इन ब्लड by मुक्त विहारि
रुल्स रिटन इन ब्लड (ऑफ दोज हू