मिपावर राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यास काही काळ बंदी घातली आहे मात्र राजकीय चर्चांमधील हाणामार्यांमधे इतर विषय / बातम्यांविषयीच्या चर्चांचा देखील मृत्यु झाला आहे. इतर महत्वाच्या बातम्यांचा उहापोह करण्यासाठी अराजकीय घडामोडी नावाचा चर्चाप्रस्ताव सादर करीत आहे. मिपा धोरणात बसत असेल तर चर्चा चालू द्यावी ही विनंती.
प्रतिसाद देणार्यांनी चर्चेला राजकीय वळण देऊ नये ही विनंती !
------
१. कळवा रुग्णालयात १२ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू
कळवा रुग्णालय हे काही ना काही कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. ठाण्याचे सिव्हिल रुग्णालय बंद झालेले असल्यामुळे कळवा रुग्णालयावरील ताण वाढला असावा अशीही एक शक्यता आहे.
२. मेट्रोमध्ये सर्वाधिक बिहारी लोक काम करतात
मेट्रो स्टेशनवर सर्वाधिक बिहारी लोक काम करताना दिसत आहेत, अशी तक्रार एका महिलेने केली.
बाई बहुतेक हस्तीदंती मनोर्यात राहत असाव्यात. मराठी मुलांनी अशी कष्टाची कामे केली तर गळ्यात बैलासारखे तोडे घालून कोण मिरविणार ?
३. छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? Msc. Bed शिक्षिकेनं चक्क लाईफलाईन घेतली
काय वाटते ? शिक्षिकेला उत्तर माहित असावे पण कॅमेर्यासमोर धांदल उडाली असावी ? की इतिहासाचे वाचन विसरले गेले असावे ? इतिहासातील सनावळ्या पाठ करणे माझ्यासाठी डोकेदुखी होती मात्र काही ठळक मुद्दे अजूनही लक्षात आहेत. पोटपाण्यासाठी गरजेची असणार्या विद्येमुळे इतर विषयांमधील रुची मागे पडत असावी काय ?
४. रशियाचं 'लूना २५' घालणार 'चांद्रयान ३'ला खोडा? एकाच दिवशी दोघेही पोहोचणार चंद्रावर!
१४ जुलै रोजी इस्रोने 'चांद्रयान-३'चं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. सध्या हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची इस्रोची योजना आहे. दरम्यान, रशिया देखील आपलं लूना-२५ हे यान चंद्रावर पाठवत असून; ते चांद्रयानाच्या आधी चंद्रावर उतरू शकतं.रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोस आपलं लूना-२५ हे यान चंद्रावर पाठणार आहे. ११ ऑगस्टला या यानाचं प्रक्षेपण असणार आहे. त्यानंतर पाच दिवसांत ते चंद्राच्या जवळ पोहोचेल. यानंतर पुढचा सुमारे एक आठवडा ते चंद्राच्या कक्षेत फिरेल. त्यानंतर ते चंद्राच्या दक्षिण भागात लँड करेल. यामुळे चांद्रयान-३ आणि लूना-२५ या दोन्ही यानांची लँडिंगची तारीख जवळपास सारखीच असू शकते.
अवकाशात अशी याने सोडण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी कोणती मध्यवर्ती नियामक संस्था आहे काय ? जी सगळ्या देशांच्या उपक्रमावर नजर ठेऊन असते ? किंवा तिची परवानगी आवश्यक असते ?
वर्गीकरण
वाचने
5158
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी मुलांनी अशी कष्टाची
मराठी मुलांनी अशी कष्टाची कामे केली तर गळ्यात बैलासारखे तोडे घालून कोण मिरविणार ?+१३०८२३बुद्धिबळ
चांगली बातमी !
In reply to बुद्धिबळ by बोका
बुद्धिबळ
In reply to बुद्धिबळ by बोका
पुढच्या दहा वर्षात भारतीय विश्वविजेता / विश्वविजेते पाहायला मिळू शकतात.+१३०८२३. बुद्धिबळ खेळ आवडतो.प्रग्नानन्द
In reply to बुद्धिबळ by बोका
अपडेट
In reply to प्रग्नानन्द by बोका
संगणक विरुद्ध बुद्धीबळपटू
In reply to अपडेट by धर्मराजमुटके
कार्लसनचा खेळ वेगळा आहे.
In reply to संगणक विरुद्ध बुद्धीबळपटू by बोका
धाग्यासाठी धन्यवाद.
अरेरे...
भारताचे चंद्रयान काय करते याची उत्सुकता
In reply to अरेरे... by वामन देशमुख
नागपंचमी विशेष : अडीच दशकांत तब्बल २० हजार सापांना जीवदान
चीन चा थयथयाट!!
चंद्रयान चंद्रावर सुरक्षितपणे उतरलं!
सर्व शास्त्रज्ञांचे मनःपुर्वक
In reply to चंद्रयान चंद्रावर सुरक्षितपणे उतरलं! by वामन देशमुख
चांद्रयान मोहिमेत भाग
यावर आता पाकिस्तान चे आधीचे
In reply to चांद्रयान मोहिमेत भाग by धर्मराजमुटके
भारताच्या दूरदृष्टी असलेल्या
लोकसत्ता अग्रलेख.. बजाव पुंगी
JEE, NEET वगैरे स्पर्धा
:(
In reply to JEE, NEET वगैरे स्पर्धा by गवि