बोल्ट्झमन ब्रेन
आपले विश्व हे अफाट आहे आणि ह्या विश्वाकडे अफाट वेळ सुद्धा आहे. ह्या विश्वाच्या पोकळींत मॅटर आणि अँटी मॅटर ह्यांचे द्वंद्व सतत चालू असते. ह्या द्वंदात अत्यंत छोट्या कालावधीसाठी म्हणजे कदाचित सेकंदाच्या अब्जावधी भागासाठी मॅटर आणि अँटी मॅटर वेगळा होऊ शकतो आणि हा मॅटर कुठलेही रँडम संरचनेचे रूप धारण करू शकतो. उदाहरणासाठी ह्या अफाट पसार्यात कुठेतरी निव्वळ रँडम पद्धतीने आपण ज्या खुर्चीवर बसला आहात तशीच खुर्ची निर्माण होऊ शकते. आणि दुसऱ्याच निमिषांत ती अँटी मॅटर द्वारे नष्ट सुद्धा होते. हि प्रक्रिया पूर्ण व्हॅक्युम म्हणजे पोकळींत सुद्धा होऊ शकते.
आता ह्याच पद्धतींनी कितीही क्लिष्ट संरचना निर्माण होऊ शकते कारण infinite काळ आणि infinite मॅटर असेल तर ह्याची प्रोबॅबिलिटी १ होते. उदाहरणार्थ एका माकडाला टंकलेखन सामुग्री देऊन कोट्यवधी युगांचा कालावधी दिला तर कधी तरी ते माकड शेक्सपिअर चे संपूर्ण साहित्य निव्वळ रँडम पद्धतीने टंकलिखित करेलच.
आता तुम्ही इथे हे वाचत बसला आहात ह्याचा अर्थ काय ? तर तुमचा जो मेंदू आहे तो मेंदू डोळे कान इत्यादीतून येणारे सिग्नल्स प्रोसेस करून तुमचे मन निर्माण करतो. तुमच्या आठवणी स्वभाव ह्या सर्व गोष्टी खरे तर फक्त तुमच्या मेंदूतील न्यूरॉन्स ची रचना आहे. आता समजा विश्वांत असा मेंदूच क्षणाच्या एक कोटीच्या भागासाठी कुठे निर्माण झाला तर ? तर त्या मेंदूला त्या आठवणी वगैरे त्या क्षणासाठी खरेच वाटेल पण प्रत्यक्षांत मेंदू लवकरच नष्ट होईल.
आता तुम्ही खरोखर तुम्ही आहात कि असाच एक मेंदू आहात ?
आणि समजा ह्या प्रकारे मेंदू सारखी क्लिष्ट रचना निर्माण होऊ शकते तर संपूर्ण शरीर इतकेच नव्हते तर संपूर्ण ग्रह, तारे वगैरे सर्व सुद्धा क्षणाच्या १ कोटिव्या भागासाठी निर्माण होऊ शकते आणि त्या काळांत उपस्थित असल्येला सर्व लोकांना मात्र त्याची जाणीव असणार सुद्धा नाही. काही गणिताच्या आधारे असा मेंदू दर १० वर ५०० शून्ये वर्षांत निर्माण होऊ शकतो. जितकी संरचना क्लिष्ट तितका वेळ जास्त पण विश्वाचा पसारा इतका मोठा आणि कालातीत आहे कि हा कालावधी फारच छोटा आहे.
ह्यालाच बोल्ट्झमन ब्रेन म्हणतात. हि कल्पना लुडविग बोल्ट्झमन ह्या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने १८९६ साली मांडली. प्रत्यक्षांत हि कल्पना गौर गोपाल दास किंवा सद्गुरू छाप पोकळ कथा वाटली तरी प्रत्यक्षांत ह्याचा संबंध थर्मोडायनॅमिक नियमांशी आहे आणि एंट्रॉपी सारख्या संकल्पनांशी आहे.
बोल्ट्झमन ब्रेन ची संकल्पना हि वेदांत तत्वज्ञानाशी मिळती जुळती वाटली म्हणून मी काही वाचन केले केले तर काही लोकांनी ह्याचा संबंध हिरण्यगर्भ ह्या ब्रहदारण्यक उपनिषद किंवा योगवसिष्ठ मधील संकल्पनांशी जोडला आहे. ब्रह ने हिरण्यगर्भाची निर्मिती केली आणि संपूर्ण विश्व् हे हिरण्यगर्भातून निर्माण झालेली प्रतिमा आहे. हिरण्यगर्भ बोल्ट्झमन ब्रेन असू शकतो.
https://en.wikipedia.org/wiki/Boltzmann_brain
वाचने
4530
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
Matrix
मॅट्रिक्स हा वेदांत वर आधारित
In reply to Matrix by कपिलमुनी
ब्रम्हाने हिरण्यगर्भ निर्माण
ब्रम्ह , ब्रम्हा नाही.
In reply to ब्रम्हाने हिरण्यगर्भ निर्माण by कॉमी
ओके.
In reply to ब्रम्ह , ब्रम्हा नाही. by साहना
एकंदरीत
वेदांत विषयावरील सर्वांत
In reply to एकंदरीत by धर्मराजमुटके
हे असे चांगले लिहून मनातील
समजा असा अतिप्रगत मेंदू तयार
बोल्ट्झमन ह्यांनी ह्यावर
In reply to समजा असा अतिप्रगत मेंदू तयार by कानडाऊ योगेशु
वेळ म्हणजे नक्की काय भानगड,
संक्षी तर वेळ असे काही अस्तित्वातच नसते म्हणायचे.
In reply to वेळ म्हणजे नक्की काय भानगड, by कॉमी
संक्षी होते तेंव्हा एक वेगळीच गंमत होती राव.
उत्तम !
प्राणी (animal) ह्या
In reply to उत्तम ! by प्रसाद गोडबोले
कोणाला तरी स्व ची जाणीव आहे
In reply to प्राणी (animal) ह्या by कॉमी
कोणाला तरी स्व ची जाणीव आहे
In reply to कोणाला तरी स्व ची जाणीव आहे by गवि
माझ्यामते
In reply to कोणाला तरी स्व ची जाणीव आहे by गवि
सर्वच विषय अतिशय डम्ब डाऊन
In reply to उत्तम ! by प्रसाद गोडबोले
बोल्ट्झमन ब्रेन हे शिर्षक