भाग ७
१६७० साली शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीच्या मोहिमेला सादर करत आहे. या मोहिम मालिकेतील आधीचे भाग २०१९ मधे सादर केले होते. त्याचा पुढील भाग रेंगाळत पडले होते. आता भाग ७ व पुढील भाग पुन्हा लिहून नकाशे भरून मिपाकरांना सादर करत आहे.
वाक्य रचना "असे असावेत" अशी ठेवण्यामागे त्या गोष्टीत फेरफार असू शकतो असे दर्शवले आहे.
कळवणहून पुढे सातबारी ओलांडायला महाराजांना ३ पर्याय होते -
१. वणीकडून, २. कांचनबारीतून ३. देवळामार्गे खेळदरीकडून
हाणामारीला सुरवात - सुरतेच्या मोहिमेतील मिळलेला ऐवज नेताना...
रसद, आणखी घोडदळ , पायदळ, शस्त्रास्त्रे यांची जमवाजमव करून दाऊदखान चांदवड किल्ल्याच्या भागातून तरातरा निघाला असावा. त्याने काही सैन्य कोलदेहेर कडील हमरस्त्यावरील खेळदरी गावापाशी नाके बंदीसाठी ठेवले असावे. (अवांतर माहिती - मिलिटरी कमांडर म्हणून दाऊदखान चतुर आणि शत्रूपक्षाच्या चाली काय असू शकतील याचा अचुक अंदाज घेणारा असावा असे त्याच्या हालचालीवरून लक्षात येते. कदाचित म्हणूनच इतर मुगल सरदारांचा हडेलहप्पी कारभार, सैन्याच्या गलथान हालचाली, आपापसातील हेवेदावे बढतीची शक्यता नसणे याशिवाय सेनापती महाबतखानाशी, दिलेरखानाशी न पटल्याने १६७१ नंतर तो उत्तरेत परत गेला असावा.) इखलासखानाने (तोफखान्यावरील हा निष्णात आणि हिकमती सिद्दीखान पुर्वी आदिलशाहीतून मुगलांच्यापदरी नोकरीला आला होता.) तोफांच्या सरबत्तीचा प्रभाव कितपत पडला असेल? त्याला काही धोका तर झाला नसेल? असा विचार करून दाऊदखानाचे साधारण पाच हजाराच्या आसपास सैन्य इखलासखानाच्या मदतीला १४ किमी पार करून आले असावे. वाटेत त्याने खेळदरीत काही रसद व सैन्य मागे ठेवले असावे.
सिवाच्या सैन्याला हुसकावून लावून सुरतेच्या मालमत्तेला संपुर्ण मिळवायला आपले सध्याचे सैन्य अपुरे आहे. समजा ते तिथून सटकले तर त्यांना वणी ते दिंडोरीच्या रस्त्यावर अडवायला हवे वगैरे विचार करत तो १६ ऑक्टोबरच्या उत्तर रात्री कांचनगडाच्या पायथ्याशी आला असावा.
वरील प्रातिनिधिक व्यूहरचनेतील तोफखाना इखलासखान याच्या नेतृत्वाखाली आधी पोहोचला असावा. त्याने कांचनबारीत एका उंचवट्यावरून दूरवर सिवाचे सैन्याचा पडाव पाहिला असावा.
मुगल सैन्याची वाट पहाणारे कांचनखिंडीच्या पायथ्यापाशी जमवाजमव करून राहिलेले महाराजांच्या सैन्यावर तोफा डागून हलकल्लोळ माजवला तर अर्धेकाम फत्ते होईल असे वाटून आपल्या तोफा खेचून आणत लावल्या असाव्यात. त्या कमीतकमी ४ तरी असाव्यात. दारू ठासून, गोळे भरून वात बाहेर काढून गोलंदाजांची तयारी पाहून ‘फायर’ ची आज्ञा दिली असावी…
थांबत थांबत तोफगोळे उडत राहिले असावेत. मराठे फौजांची पांगापाग झाली. काही जखमी तर काही त्यात मारले गेले. असे तोफांचे सुरवातीचे आक्रमण सहन करावे लागेल याची जाणीव महाराजांना होती. कारण इखलासखान चांदवड बाजूने येताना त्यांच्या टेहळ्यांनी टिपला होता.
इखलासखानाने (तोफखान्यावरील हा निष्णात आणि हिकमती सिद्दीखान पुर्वी आदिलशाहीतून मुगलांच्यापदरी नोकरीला आला होता.) तोफांच्या सरबत्तीचा प्रभाव कितपत पडला असेल? त्याला काही धोका तर झाला नसेल? असा विचार करून
रसद, आणखी घोडदळ , पायदळ, शस्त्रास्त्रे यांची जमवाजमव करून दाऊदखान चांदवड किल्ल्याच्या भागातून तरातरा निघाला असावा. त्याने काही सैन्य कोलदेहेर कडील हमरस्त्यावरील खेळदरी गावापाशी नाके बंदीसाठी ठेवले असावे.
दाऊदखानाचे साधारण पाच हजाराच्या आसपास सैन्य इखलासखानाच्या मदतीला १४ किमी पार करून आले असावे. वाटेत त्याने खेळदरीत काही रसद व सैन्य मागे ठेवले असावे.
सिवाच्या सैन्याला हुसकावून लावून सुरतेच्या मालमत्तेला संपूर्ण मिळवायला आपले सध्याचे सैन्य अपुरे आहे. समजा ते तिथून सटकले तर त्यांना वणी ते दिंडोरीच्या रस्त्यावर अडवायला हवे वगैरे विचार करत तो १६ ऑक्टोबरच्या रात्री कांचनगडाच्या पायथ्याशी आला असावा.
वर्गीकरण
वाचने
3731
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्यंत अभ्यासपूर्ण, तपशीलवार सादरीकरण.
ठसठशीत दिसेल असे फाँट साईझ हवेत..
In reply to अत्यंत अभ्यासपूर्ण, तपशीलवार सादरीकरण. by चित्रगुप्त
फॉंट मोठा करून पाहिला आहे.
In reply to ठसठशीत दिसेल असे फाँट साईझ हवेत.. by शशिकांत ओक
मिपाकरांना विनंती की सादर केलेले मजकूराला वाचायला सोईचे वाटते की नाही यावर मत व्यक्त करावे.
@ओक- आता चांगले वाचता येते आहे, आकार किंचित कमी
In reply to फॉंट मोठा करून पाहिला आहे. by शशिकांत ओक
आपल्या सूचना विचारात घेत आहे...
In reply to @ओक- आता चांगले वाचता येते आहे, आकार किंचित कमी by चित्रगुप्त
नमस्कार श्री शशिकांत ओक, आता
In reply to फॉंट मोठा करून पाहिला आहे. by शशिकांत ओक
शिफारस भागांत चिकटवा हि
शिफारस ? हा काय प्रकार आहे?
In reply to शिफारस भागांत चिकटवा हि by साहना
(No subject)
In reply to शिफारस ? हा काय प्रकार आहे? by शशिकांत ओक
नमस्कार. तुमचा उपक्रम चांगला
गूगल लिंक उघडली...
In reply to नमस्कार. तुमचा उपक्रम चांगला by Trump
तुम्ही गुगल नकाशे दोन्ही
In reply to गूगल लिंक उघडली... by शशिकांत ओक
बहुतेक नकाशे तसेच बनवले आहेत..
In reply to तुम्ही गुगल नकाशे दोन्ही by Trump
मला तरी स्वतःला त्रीमितीमध्ये जाऊन अभ्यास करायला आवडेल.
In reply to बहुतेक नकाशे तसेच बनवले आहेत.. by शशिकांत ओक
मिपावर या आधीचे भाग एकत्र करून सादर केले आहेत.