हा हा माझ्या मागील सीबीएससीच्या लेखाचा उपसंहार आहे - भाग 2
जुन्या लेखाची लिंक
https://www.misalpav.com/node/48450
मागे मी लिहिले होते की सीबीएससी चे नक्कीच काही फायदे आहेत. आता कन्या सीबीएससी झाल्यामुळे - आणि ती फारसा अभ्यास करीत नसल्याने मला त्यातील काही फायदे अधिकचे दिसले . यात कुठल्याही बोर्डाची भलावण वगैरे नाही पण फायदे असतील तर ते कळणे हे आहे आणि त्याचबरोबर ज्यांची मुले जाणार आहेत किंवा ते विचार करतात त्यांना काही माहिती मिळावी आणि योग्य निर्णय घेता यावा ही इच्छा.
पुढील १०-१२ वर्षात अर्थात यात काही गोष्टी बदलतील
तर जेव्हा कन्या सीबीएससी झाली म्हणजे शेवटची परीक्षा दिली आणि रिझल्ट लागला तेव्हा काही फायदे लक्षात आले
शेवटच्या परीक्षेला फक्त दोन भाषा आणि त्यात हि हिंदी मराठी नाही!
सहावी पासुंन मुलीला मराठी सोडता , आणि आठवीपासून मराठी . सीबीसीची फायनल परीक्षा ही फक्त दोन भाषांची होती - इंग्लिश प्रथम भाषा आहे आणि मुलीने फ्रेंच घेतले होते.
तिला सहावी पासून फ्रेंच होते त्यावेळी तीन भाषा होत्या - मराठीच्या ऐवजी फ्रेंच घेतले होते . आठवी नंतर हिंदी किंवा फ्रेंच हा पर्याय . एक मोठा फायदा झाला की मराठी आणि हिंदी सारख्या निरुपयोगी भाषा सोडून थोडीफार उपयोगी होईल खास करून उच्च / विदेशी शिक्षणासाठी वगैरे अशी फ्रेंच भाषा घेऊन परीक्षा देता आली
( आताच्या बॅच ला हि सुविधा नाही असे ऐकले आहे - खात्री करून घ्यावी )
फक्त ५ विषय -
त्याच्याच बरोबर शेवटच्या वेळी सीबीएससी ला फक्त पाच विषय असतात मुख्य भाषा इंग्लिश दुसरी भाषा एक गणिताचा पेपर एकच शास्त्रांचा पेपर आणि एकच समाजशास्त्र इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र यांचा पेपर आणि आपण एसएससी महाराष्ट्र बोर्ड पाहिले तर समाजशास्त्र शास्त्र आणि गणित यांचे दोन पेपर असतात त्यामुळे हा ॲडिशनल वैताग आहे
दोन पेपर मध्ये व्यवस्थित सुट्टी
परीक्षा झाली त्यावेळेला दोन पेपर मध्ये व्यवस्थित गॅप होता ते काही वेळेला पाच आणि काही वेळात आठवण दिवसांचा गॅप मिळाला त्यामुळे झाले काही की तयारी करायला सर्वांना व्यवस्थित वेळ मिळाला इम्पॅक्ट जर तुमची तयारी झाली नसेल एक थोडेसे मार्क पाहिजे असतील तर या दिवसात सुद्धा तयारी करता आली असती एस एस सी चा टाईम टेबल पाहिलं तर त्यामध्ये फार कमी गॅप होती पेपर जास्त आणि गॅप कमी हा वैताग होता.
सीबीएससी ला किमान ४ ते कमाल १० दिवसांची गॅप होती
अंतर्गत २० मार्क
एसएससी ला नक्की माहित नाही किंवा इतर बोर्डांचे पण पण सीबीएससी मध्ये 80 मार्काचा पेपर असतो 20 मार्क शाळा देते. तुम्ही चांगले वर्तन ठेवले, अभ्यास केला, थोडाफार वह्या पूर्ण ठेवल्या फार शाळेत उचापती केल्या नाहीत - तर विसात वीस मार्क दिले जातात. अगदी १५ दिले तरी बाकीच्या पेपर मध्ये पास व्हायचे असेल तर 80 मध्ये २० मिळवण्याची जबाबदारी राहते त्यामुळे तिकडे पण फायदा आहेत
बऱ्याच मुलांना वीस मार्क दिले जातात त्यामुळे त्यांना साधारण मार्क काढायचे आहेत त्यांना फार लोड येत नाही
सोपे गणिताचा पेपर
हे परत एच एस सी ला आहे का माहित नाही पण अनेक विद्यार्थ्यांना गणित कठीण जाते आणि सायन्स आर्किटेक्चर वगैरे जायचे नसेल तर गणिताचा उपयोग नसतो. सीबीएससी एक तुलनेने सोपे असलेला लोअर मॅथ्स चा पर्याय देते .
कन्येचा कला शास्त्र , इंजिनिअरिंग कडे नाही आणि तिला गणित कठीण जाते हे हे कळले तेव्हा आम्ही बेसिक मॅथ्स घ्यायचे ठरवले तिच्या शाळेत तरी याचा वेगळा वर्ग नव्हता किंवा वेगळी ट्युशन नव्हती तसेच क्लासही नॉर्मल मॅथ्स चा होत होता तर त्यामुळे अभ्यास नॉर्मल मॅथ्स आणि पेपर लोवर मॅथ्सचा याचा तिला पेपर सोपे जाण्यात फायदा झाला.
झटपट रिझल्ट आणि त्याची फार हवा नाही
यावर्षी रिझल्ट १२ मे ला लागला आणि आम्हाला तरी फार हवा नव्हती. काही दिवस आधी काही साईट वर माहिती येत होती पण त्या अफवा वाटल्या .
१२ मे ला सीबीएससी च्या बारावी चा रिझल्ट आला आणि ऑनलाईन झटपट एक दोन तासात दहावीचा आला . एसएससी सारखे तारखेचा अंदाज , त्याला बराच वेळ , काही वेळा थोडा पुढे ढकलणे असे झाले नाही.
आयसीएसई हा बहुदा अधिक लोकप्रिय बोर्ड आहे - त्याचे फायदे कोणी लिहिले तर बरे होईल
अतिशय थोडे जे निकाल ऐकले त्यात आयसीएसई ला अधिक मार्क मिळाले असे वाटले
जाता जाता
नवी मुंबईत फार आर्ट्स ची ची चांगली कॉलेज नसल्याने आम्ही एक सीबीएससी शाळेला संलग्न असलेल्या सीबीएससी आर्ट्स कॉलेज मध्ये मुलीला टाकले .ह्यांची बारावी सीबीएससी बोर्ड ची. फार पर्याय नव्हते
मला आयसीएसई / सीबीएससी च्या अकरावी बारावी बद्दल फार माहीत नव्हते
तिकडे पण दिसले कि सीबीएससी अकरावी बारावी ला महाराष्ट्र बोर्ड विषय कमी आहेत - महाराष्ट्र बोर्ड ला ७ विषय त्यात २ भाषा तर सीबीएससी ला ५ विषय त्यात एकच इंग्लिश भाषा
कोणाचे कोणी जर सीबीएससी मधून आर्ट्स केले असेल तर ते किती सोपे / कठीण आहे - त्यात फार लोड न घेता भरपूर मार्क मिळतात का / कसे मिळवावे याच्या माहितीच्या प्रतीक्षेत आहे
अजून एक - आय जी सी एस इ या इंटरनॅशल बोर्ड चा एक प्रॉब्लेम कळलं आहे - त्यांना गणितासाठी scintific calculator चालतो - आणि अकरावी बारावी लोकल बोर्ड, इंजिनिअरिंग - आर्किटेक्चर - इतर प्रवेश परीक्षेत चालत नसल्याने त्याचा त्रास होतो . काही जणांना यासाठी क्लास लावावे लागले आहेत
वर्गीकरण
वाचने
8837
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी या निरूपयोगी भाषेत हे
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
In reply to मराठी या निरूपयोगी भाषेत हे by श्रीगुरुजी
मला वाटते व्यावसायिक दृष्ट्या
In reply to मराठी या निरूपयोगी भाषेत हे by श्रीगुरुजी
व्यावसायिक दृष्ट्या मराठी
In reply to मला वाटते व्यावसायिक दृष्ट्या by कानडाऊ योगेशु
कमी अभ्यासक्रम, सोपे गणित,
लेखक म्हणतो त्याप्रमाणे
स्पर्धात्मक परीक्षांची पायाभरणी सी.बी.एस.सी मध्ये होत नाही
In reply to लेखक म्हणतो त्याप्रमाणे by कानडाऊ योगेशु
कानडाऊ योगेशु अधिक माहितीच्या प्रतीक्षेत
In reply to लेखक म्हणतो त्याप्रमाणे by कानडाऊ योगेशु
कानडाऊ योगेशु अधिक माहितीच्या प्रतीक्षेत
In reply to लेखक म्हणतो त्याप्रमाणे by कानडाऊ योगेशु
CBSE की CBSC
नक्की कुठल्या बोर्ड बद्दल लिहिलं आहे ?- सीबीएसई
In reply to CBSE की CBSC by कपिलमुनी
आता फार कॉलेज चा पर्याय
In reply to नक्की कुठल्या बोर्ड बद्दल लिहिलं आहे ?- सीबीएसई by हेमंत सुरेश वाघे
तो आहेच पण
In reply to आता फार कॉलेज चा पर्याय by चौकस२१२
आर्ट म्हणजे १) चित्रकला/
In reply to तो आहेच पण by हेमंत सुरेश वाघे
चित्रकला/ डिझाईन / अनिमेशन / visual communication / ग्राफिक / फॅ
In reply to आर्ट म्हणजे १) चित्रकला/ by चौकस२१२
बारावी नंतर
In reply to आर्ट म्हणजे १) चित्रकला/ by चौकस२१२
एवढे वेगवेगळे बोर्ड असतील तर
प्रवेश परीक्षा
In reply to एवढे वेगवेगळे बोर्ड असतील तर by चौकस२१२
शिक्षणाच्या आईचा घो
In reply to प्रवेश परीक्षा by हेमंत सुरेश वाघे
११ वि ते पदवी ?असे देणारी "डिमड का काय ते युनिव्हर्सिटी म्हणे?
In reply to शिक्षणाच्या आईचा घो by चौकस२१२
Deemed university
In reply to ११ वि ते पदवी ?असे देणारी "डिमड का काय ते युनिव्हर्सिटी म्हणे? by हेमंत सुरेश वाघे
वाचले , धन्यवाद पण मग
In reply to Deemed university by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते फार पूर्वी
In reply to वाचले , धन्यवाद पण मग by चौकस२१२
हो अर्थात हि पदवी युजीसी
In reply to ११ वि ते पदवी ?असे देणारी "डिमड का काय ते युनिव्हर्सिटी म्हणे? by हेमंत सुरेश वाघे
शेवटचा पर्याय
In reply to हो अर्थात हि पदवी युजीसी by चौकस२१२
सर शोधले तर MIT पुणे येथील कोर्स मिळाले
In reply to शिक्षणाच्या आईचा घो by चौकस२१२
मुंबए ला नरसी मोनजी पार्ले
In reply to सर शोधले तर MIT पुणे येथील कोर्स मिळाले by हेमंत सुरेश वाघे
अपडेट - सी बी एस ई च्या अभ्यासक्रमात बदल होत आहे
आता दहावीत फक्त २ भाषा घेणे
In reply to अपडेट - सी बी एस ई च्या अभ्यासक्रमात बदल होत आहे by हेमंत सुरेश वाघे
आता दहावीत फक्त २ भाषा घेणे आणि त्यात पण मराठी , हिंदी सारख्या निरुपयोगी आणि संस्कृत सारखी अति निरुपयोगी भाषा शिकणे हे करता येणार नाही.हिंदी ही निरूपयोगी भाषाय हे मान्य पण मराठी निरूपयोगी कशी?? भारतातील औद्योगीकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्याची ती राज्यभाषा आहे. ह्या सीबीएसई विद्यार्थ्यांना ती नक्कीच यायला हवी कारण ते महाराष्ट्रात शिकतात. तसेच सर्वात जास्त संध्याही महाराष्ट्रातच आहे स्थानीकांशी संवाद साधायला मराठी हा सीबीएसई विद्यार्थ्यांना ऊपयोगी पडेल. त्यामुळे मराठी अनिवार्य केली गेली असेल तर हा अत्यंत चांगला निर्णय आहे.>>>आता दहावीत फक्त २ भाषा
उपयोग
खरे आहे. तसे बघितले तर अन्न,
In reply to उपयोग by हेमंत सुरेश वाघे
बाकी सगळं जाऊ द्या !
In reply to उपयोग by हेमंत सुरेश वाघे
आपण काय काम करता ?
In reply to बाकी सगळं जाऊ द्या ! by अहिरावण
>>सर आपण काय काम करता ?
In reply to आपण काय काम करता ? by हेमंत सुरेश वाघे
खरे नाव लावत नाही , काम बहुतेक सांगण्यासारखे नसेल
In reply to >>सर आपण काय काम करता ? by अहिरावण
>>>खरे नाव लावत नाही , काम
In reply to खरे नाव लावत नाही , काम बहुतेक सांगण्यासारखे नसेल by हेमंत सुरेश वाघे
हल्लीच्या पालकांना भारीच टेन्शन असते .....