(महाराष्ट्रातल्या लोकांसाठी) तुमच्या कार्यालयात तुम्ही अनौपचारीकपणे कुठल्या भाषेत बोलता?
परवा काही कारणाने बॅकेत गेलो होतो. बँक अगदी पुण्यात, मध्यवर्ती मराठी भागात. पण Relationship Manager, त्याचा रिपोर्टीग मॅनेजर बिहारी, आणि स्वतः ब्रँच मॅनेजर अमराठी. बाकी बराच स्टाफ मराठी असूनही पहिले वाक्य इंग्लिशमधे, पण दुसर्या वाक्यापासूनच हिंदीच सुरु झाले, राहिले.
तेच आमच्या कंपनीतही. १०-१२ लोकांच्या टीममधे केवळ दोनजण अमराठी आहेत. तरीही जेवतांना, कित्येक वेळा कॉलवर सहजच हिंदीत बोलतात. पुण्या-मुंबईत हेच चित्र बहुतांशी खाजगी कार्यालयात पहायला मिळाले. मात्र स्थानिक शासकीय कार्यालयात बहुतांशी मराठीच वापरली जाते.
मी स्वतः लहानपणापासून कित्येक वेगवेगळ्या शहरात/गावात राहिल्याने "'बाहेरील लोकं' इथे यायलाच नको" असे *अजिबात* वाटत नाही. पण निदान महाराष्ट्रात मराठीत बोलायला नको का?नाहितर कार्यालयीन भाषा इंग्लिशमधे बोला.
मराठी राजभाषा दिनानिमित्त सहजच हा विचार/प्रश्न मनात आला.
>>> तुम्ही तुमच्या कार्यालयात कुठल्या भाषेत बोलता?
प्रतिक्रियेत कृपया तुमची Industry आणि शहर/गावही लिहा. परभाषीयांशी वैर न घेता मराठीत (निदान) बोलणे कसे वाढवता येईल?
वाचने
4079
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
आपल्याच राज्यात हिंदी
मी आधी कट्टर मराठी आग्रही
मी मराठी.
पुणे--आयटी--अनौपचारीक-मराठी
समोरच्याला कळेल अशा भाषेत
ठिकाण
"प्रसंगोचित"
आमचया कार्यालयात 1००% मराठी
लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी..
हम्म
मराठी
मराठी.
मराठी सोडून जगात भाषा आहेत?
मी मराठीतच बोलतो. जिथे हिंदी
मराठी नी इंग्रजी. हिंदी