पारपत्रावर लग्नानंतर नाव कसे बदलावे?
एका प्रश्नासाठी मार्गदर्शन हवे आहे.
एका भारतातील मुलीचे हॉलंडमधील भारतीय पारपत्रधारक मुलाशी लग्न झाले आहे. लग्नानंतर तिला हॉलंडमध्ये नवऱ्याकडे जाण्यासाठी spouse visa घेणे आवश्यक आहे.
१) त्यासाठी तिने आपल्या पारपत्रावर लग्नानंतरचे नवीन नाव बदलून घेणे आवश्यक आहे का?
२) मुलीचे लग्नानंतर नाव अजिबात न बदलता फक्त विवाह प्रमाणपत्राधारे लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळू शकतो का?
३) आयुष्यभर मुलगी विवाहानंतरही जुनेच नाव सर्वत्र वापरू शकते का?
४) समजा पारपत्रावर लग्नानंतरचे नाव हवे असल्यास ते कसे बदलता येईल?
५) पारपत्रावर नवीन नाव हवे असल्यास ते आधी आधारपत्र, PAN card, वेगवेगळी बँक खाती, भविष्य निर्वाह निधी खाते, DMAT खाते अश्या ठिकाणी आधी बदलावे लागेल व नंतरच पारपत्रावर बदलता येईल असे पारपत्र केंद्रात सांगण्यात आले आहे. किमान आधारपत्र व PAN CARD हे तरी नवीन नावाने असले पाहिजे कारण Identification proof, Address proof यासाठी ही कागदपत्रे लागतात.
ही माहिती बरोबर आहे का?
६) समजा लग्नापूर्वीच्या नावावर हॉलंडचा spouse visa मिळून मुलगी नवऱ्याकडे हॉलंडला गेली व काही वर्षांनंतर पारपत्राची मुदत संपल्यानंतर त्यावेळी नवीन नावाने हॉलंड वकीलातीतून नवीन भारतीय पारपत्र मिळू शकते का? त्यासाठी नवीन नावाने आधारपत्र, PAN card वगैरे लागेल का? तसे असल्यास ते हॉलंडमध्ये राहून बदलता येते का?
मार्गदर्शनासाठी आगाऊ धन्यवाद! _/\_
वाचने
5642
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मायबोलीवर बरेच धागे आहेत पासपोर्टचे तिथे पाहा.
उत्तरे
माझ्यामते विवाहानंतर परदेशात
In reply to माझ्यामते विवाहानंतर परदेशात by कानडाऊ योगेशु
करेक्ट
नांव बदलणे
उत्तरे.
पारपत्रावर लग्नानंतर नाव कसे बदलावे?
उत्तर
... एवढेच गरजेचे आहे.
In reply to ... एवढेच गरजेचे आहे. by चित्रगुप्त
धन्यवाद चित्रगुप्त सर!
कपिलमुनी, कानडाऊ योगेशु,
In reply to कपिलमुनी, कानडाऊ योगेशु, by श्रीगुरुजी
माझ्यामते स्पोउस नेम टाकणे हे
In reply to माझ्यामते स्पोउस नेम टाकणे हे by आनन्दा
धन्यवाद! दोघांचेही पारपत्र
अजून एक प्रश्न आहे.
मी गेल्या बरेच वर्षां पासून
In reply to मी गेल्या बरेच वर्षां पासून by निपा
धन्यवाद! Whatsapp साठी
In reply to धन्यवाद! Whatsapp साठी by श्रीगुरुजी
चालेल
In reply to मी गेल्या बरेच वर्षां पासून by निपा
+१
नाव बदलण्याची आवश्यकता नाही
In reply to नाव बदलण्याची आवश्यकता नाही by मालविका
धन्यवाद! उपयुक्त माहिती आहे.