सनदी लेखापालांवर घाव! भारतातील CA ची मक्तेदारी संपुष्टात?
ICAI, ICWAI आणि ICSI सारख्या नियामक संस्थांची मक्तेदारी संपवण्यासाठी मोदी सरकार चार्टर्ड अकाउंटंट्स कायद्यात सुधारणा करत आहे. सनदी लेखापाल कायदा १९४९, कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट ऍक्ट १९५९ आणि कंपनी सेक्रेटरी ऍक्ट १९८० मध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक - राज्यमंत्री इंद्रजीत सिंग यांनी सादर केले.
या विधेयकामुळे सरकारला या व्यवसायांच्या नियमनावर अधिक नियंत्रण मिळेल अशी सरकारला आशा आहे. असे काहीतरी होईल ही चाहूल मोदी यांनी एका भाषणात मागेच दिली होती. पण आता मात्र त्यांनी या कायदा सुधारणे द्वारे सनदी लेखापालांवर घावच घातला आहे असे दिसते. बहुदा तेंव्हा त्यांनी केलेल्या आवाहनाला सनदी लेखापालांनी काही भीक घातली नसावी.
त्यामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंट्स ही नवी संस्थाच सरकारने बनवली आहे. आता IIT, IIM आणि AIIMS प्रमाणेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेतली जाईल. मग यात पण आरक्षण येणार का? आल्यास त्याचा काय परिणाम असेल? आजवर हे क्षेत्र पूर्णपणे(?) गुणवत्तेवर आधारीत राहिले आहे असे दिसते.
मात्र या सुधारणेमुले माझ्या मनात असंख्य प्रश्न तयार झाले आहेत.
- या खास अकाउंटंट्ससाठीच्या संस्था निर्मितीमुळे भारतातील CA ची मक्तेदारी संपुष्टात येईल का?
- IIA कडे CA च्या सारखे अधिकार असणे अपेक्षित असेल का? हा बदल धोकादायक आहे का? की हा निर्णय देशाच्या भवितव्यासाठी चांगला असून देशाच्या प्रगतीसाठी उत्तम आहे?
- या बदलामागे कॉर्पोरेट फसवणूक थांबवणे अपेक्षित असल्यास तसे खरोखर घडू शकेल का?
वाचने
3381
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
भारतात कॉर्पोरेट ऑडिटर असू
In reply to भारतात कॉर्पोरेट ऑडिटर असू by कॉमी
माहिती कि अंदाज
In reply to माहिती कि अंदाज by कपिलमुनी
सद्य घडीला माहिती.
तज्ञ CA लोकांकडून लेखात प्रतिसाद हवेत.
स्त्युत्य निर्णय