पुणे महामेट्रो
पुणे महामेट्रो:
पुणे मेट्रोचा इतिहास ती सुरु होण्या आधीच बराच मोठा झाला आहे. म्हणजे मेट्रो खूप वर्षे चालू आहे असं काही नाही, चर्चेचा इतिहास आहे म्हणूया फार तर.. अनेक शहरांत मेट्रोची चर्चाही नव्हती, (जसे जयपूर, नागपूर).. तिथे मेट्रो मंजूर होऊन प्रत्यक्ष पळू लागली. पुण्यात मात्र ती जमिनीखालून की वरून, मार्ग कुठले असावेत इतकेच नाही तर मेट्रोचे आणि स्थानकांची नावं काय असावीत असली चर्चा करत म्हणजे टाळाटाळ करत दहा वर्षे कशी गेली कळलेही नाही. तोपर्यंत चार हजार कोटीचे मूळचे अंदाजपत्रक बारा हजार कोटीपार गेले! इथं कुणाला पडलंय त्यांचं? आम्ही करदाते आहोत कर भरायला आणि केंद्र आणि जागतिक बँक देईल पैसे नाहीतर जातील अजून दहा वर्षे! असा विचार इथले सगळेच पक्ष करतात असे दिसते.
सुरुवातीला बीआरटी मार्ग, सिमेंट रस्ते हे महान प्रकल्प २००० ते २०१२ पर्यंत कंटाळवाणे होईतो लांबले होते आणि लोकांना त्याचा उपयोग किती हा अनाकलनीय विषय होता!
कलकत्ता मेट्रो १९९२ साली पहिल्यांदा पाहिली होती त्यावेळी महाराष्ट्रात, मुंबईत अशी होईल का? असं वाटलं होतं- पुढे अनेक वर्षांनी ती झाली सुद्धा. पण पुण्यात मेट्रो असावी असं वाटलं नव्हतं कारण पुणे तेव्हा फारच लहान शहर होते. गेल्या दशकात लंडन अंडरग्राउंडचा मनसोक्त प्रवास करताना मात्र पुण्यात अशी सोया हवी असं प्रथमच वाटलं!आता पुण्यात काही मार्गांवर मेट्रो सुरू होते आहे. पुण्यात मेट्रो कशाला पाहिजे ..कोण जाणार त्यातून काय माहीत...पासून मेट्रोत पुणेरी पाट्या कश्या असतील हे सगळे विषय चघळून पुणेकर कंटाळले आणि मेट्रोला विसरूनही गेले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या म्हणजे सहा मार्चला औपचारिक उदघाटन होऊन काही मार्गांवर मेट्रो पळू लागेल याचा पुणेकर म्हणून आनंद आहेच.
जालावर महामेट्रोची थोडी माहिती मिळते, ती अशी:
(प्रत्यक्ष तपशील मधल्या दोन वर्षात बदलले असू शकतात)
पुणे मेट्रो हा नागरी सार्वजनिक जलद परिवहन रेल्वे प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत आहे. मार्च २०१८ पर्यंत या प्रकल्पात तीन मेट्रो मार्गिकांचा समावेश आहे, ज्यांची एकूण लांबी ५४.५८ किमी असेल.
मार्गिका क्र. १ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट अशी असेल. १६.५९ किमी लांबीची ही मार्गिका पिंपरीपासून रेंज हिल्सपर्यंत उन्नत व तिथून स्वारगटेपर्यंत भूमिगत मार्गाने धावेल.
मार्गिका क्र. २ ही पूर्णतः उन्नत असून पौड रस्ता, कोथरूड येथील वनाझला नगररस्त्यावरील १४.६६ किमी अंतरावर असलेल्या रामवाडीशी जोडेल.या दोन्ही मार्गिका २०२१ मध्ये नागरिकांसाठी खुल्या होण्याचे अपेक्षित आहे. (जी उद्या अंशतः सुरु होईल)
मार्गिका क्र. ३ ही हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क ते शिवाजीनगर अशी २३.३३ किमी लांबीची उन्नत मार्गिका असेल. शिवाजीनगर न्यायालय येथे बांधण्यात येणार्या स्थानकावर तिन्ही मार्गिका एकमेकींशी जोडल्या जातील. मेट्रोच्या तीनही मार्गिका, वाहनतळे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस व बीआरटीसेवेसाठी एकत्रीकृत भाडे आकारणी व्यवस्था प्रस्थापित करण्यात येणार आहे, तथापि प्रत्यक्ष भाडे वापरल्या जाणार्या सेवेवर अवलंबून असेल. ह्या व्यवस्थेअंतर्गत पीएमपीद्वारे सध्या वापरात असलेल्या 'मी कार्ड'चा रोकडविरहित व्यवहारासाठी उपयोग करण्यात येईल.
मेट्रोचे भाडे सुरुवातीस वीस, चाळीस आणि साठ रुपये अश्या टप्प्यात भाडे असेल असं वाचलं होतं. म्हणजे कोथरूडहून वल्लभनगरला जायला वीस मिनिटात चाळीस ते साठ रुपये आणि शिवाजीनगरला एक गाडी बदलणे हे स्वतः गाडी चालवत पन्नास मिनिटं जाण्यापेक्षा मला बरेच आहे. मात्र दोन्ही बाजूस काही अंतर चालावे लागेल. तसेच हातात वजनदार बॅग वगैरे नसेल तरच हे सोयीचं वाटेल. पूर्वी वाचलेल्या अहवाला नुसार दिवसभरात ७५ फेर्या दोन्हीकडून आणि सर्वाधिक ५००० लोक ताशी प्रवास करतील अश्या अन्दाजाने हे मर्ग आणि स्थानके बनवली आहेत. त्यासाठी त्यांनी तासाला एकेका खन्डात प्रत्यक्ष दुचाकी, रिक्षाआणि चारचाकी मोजल्या होत्या!
२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्गिका १ व २ चे भूमिपूजन करण्यात आले. ३१.२५ किमी लांबीच्या या दोन मार्गिका उभारण्यासाठी नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन या कंपनीची फेररचना करून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) या केंद्र व राज्य शासनांची ५०:५० भागीदारी असलेल्या कंपनीची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पासाठी ११,५२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता तो अजून वाढला आहे.
मार्गिका क्र. ३ ला केंद्र व राज्य शासनांची मान्यता मिळाली आहे. ही मार्गिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणार आहे. ह्या मार्गिकेसाठी ₹ ८,३३३ कोटी इतका खर्च अपेक्षित असून, केंद्र शासनाने ₹ १,३०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे तर राज्य शासनाकडून ₹ ८१२ कोटींचा निधी अपेक्षित आहे. पीएमआरडीए, केंद्र शासन व राज्य शासन मिळून प्रकल्पासाठी आवश्यक ४०% निधी उपलब्ध करतील तर उर्वरित ६०% निधी खासगी गुंतवणूकदाराकडून उभारण्यात येईल. पीएमआरडीए तर्फे मार्च २०१८ मध्ये मार्गिका ३ साठी निविदा मागविण्यात आल्या. या कामाचे कंत्राट टाटा रिअल्टी-सिमेन्स यांना देणार आहेत. प्रत्यक्ष काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू होण्या ऐवजी जून २०२० मध्ये सुरु झाले आहे.
यावरून काही मुद्दे मनात आले, ते असे:
१. आजवर पुण्याच्या विस्कळीत वहातुकीवर ठोस उपाय न करता केवळ अल्टरनेट रस्ते एकदिशा (वन वे ) करणे आणि नदीवर दरसाल नवे नवे पूल बांधणे, इतकंच काम गेली तीस वर्षे सुरु होतं. वाढत्या पुण्याला मेट्रोमुळे दिलासा मिळावा ही अपेक्षा आहे. तुलनेत पिंपरी चिंचवड चांगले विकसित झाले.
२. १९९२ आणि २०१० च्या राष्ट्रीय स्पर्धा होत असताना ही वहातुक सुधारणेची संधी दवडली गेली होती त्यात काही बदल होईल आणि पुढे अजून काही मार्ग या प्रकल्पाला जोडले जातील.
३. या निमित्ताने वाढलेल्या FSI चा फायदा विकसक म्हणजे पर्यायाने राजकीय लोक घेतील. हे होत असताना दाट वस्तीत अंतर्गत वहातूक सुरळीत ठेवणे हे नवे आव्हान असेल.
४. यातून नव्या व्यवसाय संधी आणि नोकऱ्या निर्माण होऊन अन्य काही शहरात मेट्रो सुरु होतील.
५. ऐतिहासिक वास्तू जवळ बांधकामाचे नियम कठोर असल्याने शनिवारवाडा परिसरात अवाढव्य यंत्रे आणून जमिनीखालून आणि नदीखालून केलेला बोगदा हा यातला एक कठीण टप्पा असावा. या अनुभवाचा उपयोग अन्य प्रकल्पात होऊ शकेल.
६. पुढे चांदणी चौक मेट्रोने जोडला जाणार आहे त्याचा फायदा होईल, मात्र आधीच ते नियोजन असायला हवे होते. सध्या केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी पुढाकार घेत तिथे उत्तम सुविधा निर्माण केलेली दिसते.
७. दुचाकी आणि रिक्षा हे बेशिस्त आणि मोठ्या संख्येने असल्यामुळे वहातुकीवर ताण आहे असे मानले जात होते. त्यात आता फरक पडेल काय?
बाकी राजकारण वगैरे सुरु राहीलच, पण नागरिक म्हणून आपल्याला एक नवी सुविधा मिळेल याचा आनंद आहे. महामेट्रो टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
संदर्भ:महामेट्रो संस्थळ
मार्गिका आणि तपशील
एक महिन्यापूर्वीचा हा सुंदर व्हिडीओ
वाचने
17990
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
चांगली माहिती
माहिती बद्दल धन्यवाद .....
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by कंजूस
ते कधीच झाले आहे
मेट्रोत कट्टा
बेशिस्त वाहतूक
आजवर पुण्याच्या विस्कळीत
In reply to आजवर पुण्याच्या विस्कळीत by मनो
आपल्या वेगळ्या मताचा आदर आहेच
In reply to आपल्या वेगळ्या मताचा आदर आहेच by खेडूत
नाव घ्यायला हरकत नाही. बजाज.
पुण्यातील टेकड्यांमुळे काही
In reply to पुण्यातील टेकड्यांमुळे काही by मनो
असे प्रकार अजिबात करू नयेत
खूप समाधान वाटतंय
In reply to खूप समाधान वाटतंय by श्रीरंग_जोशी
सहमत
तिकिट किती आहे?
In reply to तिकिट किती आहे? by कंजूस
तिकीट दर दिल्लीपेक्षा जास्त वाटतील
करोना मध्ये थांबलेल काम
पिंपरी ते शिवाजी नगर
In reply to पिंपरी ते शिवाजी नगर by नि३सोलपुरकर
टाइम महत्वाचा
In reply to टाइम महत्वाचा by गावठी फिलॉसॉफर
धन्यवाद
मुंबई म्हणून मेट्रोचे दर
छान
In reply to छान by सुरिया
ही बोंब आपल्या राज्यात आहे.
In reply to ही बोंब आपल्या राज्यात आहे. by गावठी फिलॉसॉफर
गेली २ वर्षे कोची ( संपूर्ण
मोदींना पुणे मेट्रो प्रवास करताना पहाताना फार बरे वाटत होते
पुण्यात सर्वात महत्वाचे
In reply to पुण्यात सर्वात महत्वाचे by sunil kachure
साठ वर्षांपूर्वी अशी संधी आली होती.
In reply to पुण्यात सर्वात महत्वाचे by sunil kachure
ही ही ही
लिंक दिलेला
मेट्रोचे हार्दिक स्वागत !
In reply to मेट्रोचे हार्दिक स्वागत ! by चौथा कोनाडा
+१
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+ अगदी सहमत.
In reply to मेट्रोचे हार्दिक स्वागत ! by चौथा कोनाडा
बीआरटीचे करोडो रू पाण्यात
In reply to बीआरटीचे करोडो रू पाण्यात by सुबोध खरे
म्हंजे काय,
😄
परवाच एक विडिओ पाहिला बेंगळुरू मेट्रो
In reply to परवाच एक विडिओ पाहिला बेंगळुरू मेट्रो by कंजूस
आधी धड सुरू होऊ द्या
In reply to परवाच एक विडिओ पाहिला बेंगळुरू मेट्रो by कंजूस
नादच नाही
मेट्रो सेस
In reply to मेट्रो सेस by कपिलमुनी
घर खरेदीवर सेस
In reply to मेट्रो सेस by कपिलमुनी
शेठ
मेट्रो सुरू झाली, पण स्टेशन
In reply to मेट्रो सुरू झाली, पण स्टेशन by सुखी
नितिन गडकरी
In reply to नितिन गडकरी by श्रीरंग_जोशी
चांगली माहिती. असाच काही तरी
In reply to नितिन गडकरी by श्रीरंग_जोशी
माहिती बद्दल धन्यवाद... बघू
सार्वजनिक हित बघताना
In reply to सार्वजनिक हित बघताना by sunil kachure
सर्वच त्रास होणाऱ्या गोष्टी
In reply to सर्वच त्रास होणाऱ्या गोष्टी by सुखी
:) खरंच हसायला आलं. :))
In reply to सर्वच त्रास होणाऱ्या गोष्टी by सुखी
देखा मौका मारा चौका
In reply to सार्वजनिक हित बघताना by sunil kachure
बरोबर
पुणे मेट्रोतुन परवाच प्रवास केला
In reply to पुणे मेट्रोतुन परवाच प्रवास केला by राजेंद्र मेहेंदळे
अजून तर सुरुवात आहे. पुढे
In reply to अजून तर सुरुवात आहे. पुढे by खेडूत
आपल्याकडे हे कठीण !
In reply to आपल्याकडे हे कठीण ! by धर्मराजमुटके
_/\_
In reply to आपल्याकडे हे कठीण ! by धर्मराजमुटके
मेट्रो
In reply to मेट्रो by sunil kachure
नाही.
आसपासच्या सोसायट्यांमध्ये स्टेशन्वरुन थेट डोकावता येत आहे.
'पुणे मेट्रो' ला हेच बघायचं
पहिला प्रवास