मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाणांचे नाव जाहीर झाल्याबरोबर राणेनी पक्षश्रेष्ठींविरोधात जळजळीत विधाने करून सबंध महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.
सर्व मिडियामधून सध्या हिच ब्रेकींग न्युज झळकत आहे. राणे आता काय करणार? काँग्रेसमधेच रहाणार की काँग्रेस सोडणार? काँग्रेस हायकमांड त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार की त्याना काँग्रेसमधून काढून टाकणार अश्या चर्चांना उधाण आले आहे.
पण हे खरेच बंड आहे की लोकांचे लक्ष अतिरेकी हल्ल्यावरून वळवून दुसरीकडे नेण्यासाठी टाकलेला डाव आहे?
प्रत्तेक खळबळजनक बातमी कुठ्ल्यातरी दुसर्या खळबळजनक बातमीला लपवत असते.सध्या सत्ताधारी पक्षाला अतिरेकी हल्ला आणि त्याबद्दल मंत्र्यांची उदासीनता याबद्दल प्रचंड जनक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. हा जनक्षोभ कमी करण्यासाठी व लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या उद्देशाने, तु मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो छापाचा डाव खेळला जातोय?जर या प्रकारचा खेळ खेळला जात आसेल तर ही एक अत्यंत हीन खेळी आहे असेच म्हणावे लागेल.
येत्या काही दिवसात राणेंवर पक्ष काय कारवायी करतो किंवा राणे काय निर्णय घेतात यावरून यामागे नक्की काय उद्देश आहे हे स्पष्ट होइलच. बघू.
(पेट्रोल ५ रु. नी स्वस्त अशीही एक खळबळजनक बातमी झळकत आहे....... आजच पेट्रोल इतके स्वस्त होण्यासारखे नक्की काय घडले?)
कवटी
वाचन संख्या
3085
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
पेट्रोल ५
आर्रे वा
राजकारण...
अन्याय अन्याय
नको त्या जागेच दुखण
मुख्यमंत्
In reply to नको त्या जागेच दुखण by अनामिका
कदाचित म्हणूनच...
भुजबळ आणि राणे
भुजबळ आणि राणे
डाव?
जर का
जर का
वी गेट व्हॉट वी डिझर्व्ह.
अहाहा..