Skip to main content

ताज्या घडामोडी- डिसेंबर २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 16/12/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मागच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कुठ्ठाळीच्या (Cortalim) आमदार अलिना सालढाना यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष सोडायचा निर्णय घेतला आहे. अलिनांचे पती मथानी सालढाना युनायटेड गोअन्स डेमॉक्रॅटिक पार्टी या ख्रिश्चनांच्या पक्षाचे आमदार होते. २००५ मध्ये या पक्षाने मनोहर पर्रीकरांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यावर मथानींनी पक्षातून बाहेर न पडता पर्रीकरांची साथ दिली होती. पुढे २०१२ मध्ये ते भाजप उमेदवार म्हणून कुठ्ठाळीतून निवडून आले. पर्रीकरांनी त्यांना मंत्रीही केले. पण त्यांचे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन आठवड्यातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर अलिना सालढाना कुठ्ठाळीच्या जागेवरून निवडून येत होत्या. पक्षात गोंधळाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण (बेडलॅम) निर्माण झाले आहे असे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. मुरगावचे आमदार आणि प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री मिलिंद नाईक यांनी सेक्स स्कॅन्डलमध्ये नाव आल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खाऊंटे यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. ते २०१७ मध्ये दुसर्‍यांदा गोवा विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले होते. गोवा विधानसभेवर दुसर्‍यांदा निवडून गेलेले ते आतापर्यंतचे एकमेव अपक्ष आमदार आहेत. ते मनोहर पर्रीकरांच्या मंत्रीमंडळात मंत्रीही होते. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बाणावलीचे आमदार आणि माजी हंगामी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लुईझिनो फालेरोंनंतर चर्चिल आलेमावांच्या रूपात तृणमूलला स्थानिक पातळीवर प्रभावी असा आणखी एक नेता मिळाला आहे. चर्चिल आलेमाव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकाही दक्षिण गोव्यातून तृणमूलचे उमेदवार म्हणून लढवल्या होत्या. पणजीतून मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर निवडणुक लढण्यासाठी उत्सुक आहेत. २०१७ मध्ये निवडणुक झाली तेव्हा मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री असल्याने त्यांनी विधानसभा निवडणुक लढवली नव्हती. त्या जागेवर भाजपचे सिध्दार्थ कुंकळ्ळीकर जिंकले होते. त्यांनी मनोहर पर्रीकरांसाठी आपली जागा मोकळी केली. ऑगस्ट २०१७ मध्ये त्या जागेवर मनोहर पर्रीकर पोटनिवडणुकीत जिंकले. पर्रीकरांच्या निधनानंतर त्या जागेवर २०१९ मध्ये काँग्रेसचे बाबुश मोन्सेराट यांनी भाजपच्या सिध्दार्थ कुंकळ्ळीकरांचा पराभव केला. मोन्सेराट जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या १० आमदारांसह भाजपमध्ये सामील झाले. पणजीमधून उत्पल पर्रीकरांसह आता सिध्दार्थ कुंकळ्ळीकर आणि बाबूश मोन्सेराट हे पण उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. तिथून भाजपमध्ये बंडखोरी व्हायची शक्यता मोठी दिसत आहे. तेव्हा गोव्यात आता भाजप विरूध्द काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती विरूध्द मगोप-तृणमूल युती अशी तिरंगी लढत होईल असे दिसते. मागे म्हटल्याप्रमाणे भाजप अडचणीत सापडलेला दिसतो. विरोधी पक्ष पुरेसे प्रबळ नाहीत याच कारणाने झाला तर भाजपचा विजय होईल. अन्यथा पक्षाचे कठीण दिसते.

वाचने 39264
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

In reply to by चंद्रसूर्यकुमार

समान नागरी कायदा लागू करणं वाटतंय तेव्हढं सोपं असणार नाही. एक तर अल्पसंख्याक लोकांचा विरोध म्हणजेच भाजपा विरोधी हिंदू लोकही कायद्याला विरोध करणार आणि दुसरं म्हणजे North-East मधील राज्येही ह्या कायद्याला विरोध करतील. सध्याला North-East राज्यांना बाकी राज्यांपेक्षा जास्त अधिकार आहेत. त्यामुळे जरी समान नागरी कायदा आणला तरी North-East राज्यांसाठी काही सवलती द्यावा लागतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

हो हिंदू धर्मीय विचारवंत लोक या कायद्याला विरोध करतील पण त्याबरोबरच हिंदूंसाठीच्या कायद्यांचा ज्यांना लाभ होतो ते लोकही समान नागरी कायद्याला विरोध करतील. उदाहरणार्थ हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली हा प्रकार बनवून कर वाचवता येतो. तसे केवळ हिंदूंनाच करता येते इतर धर्मीयांना नाही. अशा एच.यु.एफ ला स्वतंत्र पॅनकार्डही मिळते. त्याचा फायदा घेऊन अनेक लोक कर वाचवत असतात. जर समान नागरी कायदा आला तर एच.यु.एफ रद्दबादल होईल.असे लोक समान नागरी कायद्याला विरोध करतील. काहीही असले तरी जर आपल्या राज्यघटनेप्रमाणे धर्मनिरपेक्षता हे सरकारचे धोरण ठरवले असेल (म्हणजे आपल्याच नागरिकांमध्ये धर्मावरून भेदभाव करता येणार नाही) तर मग परत हिंदूंसाठी वेगळे कायदे, मुस्लिमांसाठी वेगळे कायदे ठेवणे समर्थनीय नाही. काही लोक म्हणतात की मुस्लिम पर्सनल कायद्यामध्ये मुस्लिमांना जेवढ्या सवलती मिळतात त्यापेक्षा हिंदूंना दिल्या जातात. ते कितपत खरे आहे हे मला माहित नाही. ते जरी खरे असले तरी वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगळे कायदे ठेवणे नक्कीच समर्थनीय नाही. त्यामुळे हिंदूंना या समान नागरी कायद्यामुळे अधिक गमाविण्यासारखे असले तरी तो कायदा आणला पाहिजे.

"हिंदू लोकही कायद्याला विरोध करणार" असा कायदा आणणे यात एवढे श्रम खर्ची पडतील आणि त्याला होणार विरोध हा इतका ढोंगी आणि बिलो द बेल्ट असेल कि विचार करून अंगावर शहारे येतात . जिथे सर्वधर्म समभाव याचा अर्थ " ज्याला जे पहिजे ते करा " असा सोयीस्कर रित्या लावला जातो तिथे काय संधी आहे आशय कायद्याला राजकारण बाजूला ठेवून अंध विरोधकानं हे लक्षात घ्यायचेच नाहीये कि जगातील अनेक लोकशाहीत असे कायदे आहेत आणि त्यात त्या त्या देशातील बहुसंख्यान्कांच्या प्रथेचे थोडं पडसाद असू शकतात .. तसेच भारतातील सरकारी धोरणात जरी हिंदूंनी संख्येचं जोरावर इतरांवर अन्याय करू नये हे अतिशय महत्वाचे असले तरी याचा अर्थ हा होत नाही कि देशाच्या प्रथेवर हिंदूंचा प्रभाव असू शकत नाही मलेशिया च्या दूतावासात मशीद असते पण भारतीय दूतावासात देऊळ बंदच तर पोटशूळ ! नको बाबा नको एकदा का त्या राहुल ला आणा रे गादीवर आणि झटपट काय ते सोक्षमोक्ष लावून टाका .. मग प्रशन फक्त हाच राहील कि दुसरा धर्म कोणता स्वीयकार्याचा ते ? .. आपल्याला तर वारुणी आवडते मग चर्च बरे ! हाःहाःहा (आपला घाबरलेला निधर्मी हिंदू)

गेल्या काही दिवसात कराचीवुड मधुन २ मोठ्या बातम्या आलेल्या आहेत... एक बातमी तर मला घोडा, पर्शियन मांजरांच्या भेट म्हणुन दिलेली नजरेत आल्याने समजली ! :))) तर दुसरी बातमी जय्या बच्चन यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी जो थयथयाट केला आणि शाप वाणी उच्चारली त्यामुळे समजले [ सप्टेंबर मध्ये मी, बुढ्ढी गुड्डी सठिया गई है ! अशी सही ठेवली होती, त्याची परत आठवण या प्रकाराने मला आली. ] या दोन्ही बातम्यांच्या संबंधीत व्हिडियो खाली देऊन ठेवतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Jaisa Mukhda To Pehle Kahin Dekha Nahin... :- Pyar Ke Kabil

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी काँग्रेस पक्षसंघटना विधानसभा निवडणुक तोंडावर आलेली असताना सहकार्य करत नाही अशास्वरूपाचे ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुक जिंकायची काँग्रेसला यावेळी सगळ्यात नामी संधी आहे. मागच्या वर्षी भाजपने सुरवातीला मार्च २०२१ मध्ये त्रिवेंदसिंग रावत यांना बदलून तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री केले. ते विधानसभेचे सदस्य नसल्याने त्यांना सहा महिन्यात पोटनिवडणुक लढवून विधानसभेवर निवडून जाणे भाग होते पण दरम्यानच्या काळात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आल्यामुळे पोटनिवडणुक घेतली जायची शक्यता कमी आहे हे लक्षात आल्यावर तिरथसिंग रावत यांच्या जागी पुष्करसिंग धामी यांना मुख्यमंत्री केले. झारखंडमध्ये तितके प्रभावी न ठरलेल्या रघुबर दास यांना वेळीच बदलले नाही याचा फटका पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये बसला होता. म्हणून त्यापासून धडा घेऊन पक्षाने उत्तराखंड (आणि त्यानंतर कर्नाटक आणि गुजरात) चे मुख्यमंत्री बदलले. महत्वाचा मुद्दा हा की शेजारच्या उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्रीपदावरून बदलायचा विचारही केला गेला नाही पण उत्तराखंडमध्ये मात्र मुख्यमंत्री बदलले गेले. याचाच अर्थ पूर्वीचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत प्रभावी ठरले नव्हते हे पक्षाने मान्य केले. त्यात आतापर्यंत राज्यात एकदाही सत्ताधारी पक्षाने परत निवडणुक जिंकलेली नाही. म्हणजे भाजप यावेळी बॅकफूटवरून सुरवात करणार आहे. अशी नामी संधी काँग्रेसकडे असताना हरीश रावत यांच्यासारखा ज्येष्ठ नेता ही तक्रार करत आहे ही गोष्ट गंभीर आहे.

गोवा विधानसभा निवडणुक चुरशीची होताना दिसत आहे. काल आपच्या अरविंद केजरीवालांनी ममता बॅनर्जींवर तोफ डागली आहे. तृणमूल काँग्रेसचा गोव्यात तीन महिन्यांपूर्वीच प्रवेश झाला. त्यांना लगेच मते मिळणार नाहीत. लोकांमध्ये जाऊन काम केले तरच मते मिळतात असे ते म्हणाले आहेत. म्हणजे डिसेंबर २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये ७० पैकी २८ जागा मिळाल्यावर त्यांना थेट पंतप्रधानपदाची स्वप्ने पडायला लागली होती. फेब्रुवारी २०१५ मध्ये दिल्लीत ७० पैकी ६७ जागा मिळाल्यानंतर त्यांना स्वर्ग दोन बोटेच राहिला होता आणि दिल्लीचे कामकाज बघायचे सोडून २०१७ च्या पंजाब-गोवा विधानसभा निवडणुकांवर त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रीत केले होते. एक वेळ अशी आली होती की दिल्लीत डेंग्युची साथ येऊन १२-१५ लोक त्यात मरण पावले असताना नुसते आरोग्यमंत्रीच नाही तर सगळे दिल्लीचे मंत्रीमंडळ दिल्लीबाहेर होते. नंतर दिल्लीत महापालिका निवडणुकांमध्ये दणका बसल्यानंतर नुसता प्रचाराचा धडाका लाऊन देऊन मते मिळत नाहीत तर लोकांमध्ये जाऊन काम करावे लागते याची उपरती त्यांना झाली. असो. तेव्हा केजरीवाल ममतांना जे काही सांगत आहेत ते अनुभवाचे बोल आहेत :) https://www.hindustantimes.com/elections/goa-assembly-election/tmc-does… आता केजरीवालांना ममतांची आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसची इतकी काळजी असायचे काय कारण आहे? काहीच नाही. खरं तर त्यांना ममतांची अजिबात काळजी नाही तर ममतांच्या गोव्यातील अनपेक्षित प्रवेशामुळे आपण गोव्यात शिरकाव करायचा जो प्रयत्न करत आहोत त्याला धक्का बसणार का ही शंका त्यांना सतावत असावी असे म्हणायला जागा आहे. पाच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ममतांनी सध्या चालवला आहे तसाच धुमधडाका त्यांनी केला होता. वर्ष-सव्वा वर्ष आधी प्रचार सुरू करूनही नाव घेण्याजोगा एकही नेता त्यांच्या पक्षात सामील झाला नव्हता. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर स्वयंसेवी संस्था चालवणारे लोक त्यांच्या पक्षात सामील झाले. ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांची सून श्रध्दाही पक्षात आली. पण त्यापैकी कोणीही मते फिरवू शकायच्या ताकदीचे नव्हते. त्यानंतर पाच वर्षात दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती व्होटबँक बांधायचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला असे दिसते. मागच्या वर्षी झालेल्या जिल्हा परीषद निवडणुकांमध्ये बाणावलीची एकमेव जागा आपने जिंकली होती. परशुरामाने चिपळूणहून मारलेला बाण त्या ठिकाणी पडला आणि समुद्र तितका मागे गेला म्हणून त्या ठिकाणाचे नाव बाणावली हे झाले अशी आख्यायिका आहे. अशा बाणावलीमध्ये सध्या जवळपास ८०% लोक ख्रिस्ती आहेत. पूर्ण गोव्यात जी एकमेव जिल्हा परीषदेची जागा आपने जिंकली ती तिकडची होती. या जिल्हा परीषद निवडणुका झाल्यानंतर दहा दिवसातच मी माझ्या गोव्याच्या वार्षिक वारीसाठी गेलो होतो तिथे जाताना बाणावलीमधूनच पुढे जावे लागले होते. गावात बघावे तिथे आपचे झेंडे आणि केजरीवालांचे फोटो होते. केजरीवाल ही मतपेढी भक्कम करायचा प्रयत्न करत असतानाच नेमक्या त्याच मतांवर डल्ला मारायला ममतांचेही आगमन गोव्यात झालेले दिसते. इतकेच नाही तर लुईझिनो फालेरो आणि चर्चिल आलेमाव हे दोन माजी मुख्यमंत्रीही त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. इतकेच नाही तर केजरीवाल गोव्याच्या ज्या भागात आपले बस्तान बसवायचा प्रयत्न करत आहेत त्याच भागातील हे दोन माजी मुख्यमंत्री आहेत. स्वतः चर्चिल आलेमाव बाणावलीमधून तर लुईझिनो फालेरो शेजारच्याच नावेळी मतदारसंघातून निवडून गेले आहेत. त्यामुळे केजरीवालांना असुरक्षित वाटणे समजू शकतो. त्यातूनही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी आपण लोकांपुढे नक्की कोणते संकेत देत आहोत याची जाणीव या सगळ्या मंडळींना आहे का? जर २०२४ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र निवडणुक लढवायची असे बेत असतील पण त्याचवेळी गोव्यासारख्या लहान राज्यातील फार तर २०-२५ हजार मतदार असलेल्या राज्यातील एक-दोन विधानसभा मतदारसंघात एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न हे नेते करत असतील तर मग २०२४ मध्ये समजा सगळ्या विरोधी पक्षांची देशव्यापी आघाडी झालीच तर ती कितपत स्थिर राहणार हा प्रश्न मतदारांना पडला तर त्याला जबाबदार कोण?

गोव्यात सध्या इतके आयाराम गयाराम झालेले आहेत कि नक्की कोणाचे काय चालले आहे ते समजणे अशक्य आहे. श्री पर्रीकर येण्याच्या पूर्वी गोव्यात जशी स्थिती होती तशीच येणार आहे. ] १९८७ पासून २००० पर्यंत १३ मुख्यमंत्री आणि दोन वेळेस राष्ट्रपती राजवट लावली होती. दर वर्षी मुख्यमंत्री बदलत असे. त्याबद्दल गोव्यात तेंव्हा एक विनोद प्रसिद्ध होता - मुलगा -- बाबा गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत बाबा -- बाळा, परीक्षेच्या आदल्या दिवशी विचार तेंव्हाचा मुख्यमंत्री कोण असेल काय सांगता येतंय.

लुधियानाच्या कोर्टात बॉम्बस्फोट झाला आहे. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांपासूनच पंजाबमध्ये खलिस्तानवादी प्रवृत्ती परत डोके वर काढत आहेत असे दिसते. २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान सर्रास भिंद्रनवालेचे फोटो पंजाबमध्ये वापरले जात होते अशा बातम्या वाचल्याचे आठवते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या काही दिवस आधी बठिंड्यात स्फोट झाला होता आणि त्यात ६-७ जण मारले गेले होते. हा स्फोट डेरा सच्चा सौदाच्या लोकांनी केला असे वाचले होते पण त्यातही त्यांना खलिस्तानवाद्यांची मदत झाली असली तरी आश्चर्य वाटू नये. चार दिवसांपूर्वी गुरू ग्रंथ साहेबचा अनादर करण्याचा प्रयत्न केला म्हणून एकाची हत्या झाली. आता हा लुधियानाचा स्फोट झाला आहे. १९७९ मध्ये शीखांमधील फुटिर संप्रदाय असलेल्या निरंकारी संप्रदायातील काहींची हत्या हे पहिले मोठे कृत्य भिंद्रनवालेने केले होते. त्यापूर्वीही त्याने आणि त्याच्या समर्थकांनी लहानसहान कृत्ये केली होतीच. त्याच प्रकाराची पुनरावृत्ती तर होत नाही ना हा प्रश्न पडत आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुरवातीला केजरीवालांचा आप सत्तेत येणार हे वातावरण होते. पण जानेवारी २०१७ च्या शेवटी इंग्लंडमध्ये राहायला असलेल्या एका खलिस्तान कमांडो फोर्स या संघटनेच्या दहशतवाद्याच्या मोगा येथील घरी केजरीवाल रात्री उतरले होते ही बातमी आली. त्यापाठोपाठ दोन दिवसात बठिंड्यातील स्फोटाची बातमी आली. यातून पंजाबात १९८० च्या दशकाची पुनरावृत्ती होणार ही शंका वाटल्याने त्यानंतर काँग्रेसमागे हिंदू मते एकवटली आणि त्यातून अमरिंदरसिंगांना ११७ पैकी ८० जागा असा मोठा आणि त्यामानाने अनपेक्षित विजय मिळाला. २०१९ मध्ये इंग्लंड आणि कॅनडातील खलिस्तानवादी तत्वांनी रेफरेन्डम २०२० अशी टूम काढली होती. त्याला पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि आपचे नेते सुखपालसिंग खैरा यांनी पाठिंबा दिला होता. https://www.hindustantimes.com/punjab/khaira-s-support-to-referendum-20… . आता शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तीच खलिस्तानवादी तत्वे घुसली होती हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. तेव्हा रात्र वैर्‍याची आहे. अमरिंदरसिंगांनी आपला स्थानिक पक्ष काढायची घोषणा केली पण त्यापुढे काहीही झालेले दिसत नाही. आपला पक्ष काढून अमरिंदरसिंग निवडणुक लढवू देत आणि २०१७ प्रमाणे हिंदू कॉन्सॉलिडेशन होऊन आम आदमी पक्ष हा अतिशय घातक टमरेल गँगचा पक्ष सत्तेपासून दूर राहायला हवा. नाहीतर अमुक फुकट देतो, तमुक फुकट देतो असली आश्वासने देऊन केजरीवाल मतांची झोळी भरतील. जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नसते. दरमहा काही हजार लिटर पाणी फुकट मिळणे आणि वीजेचे बिल कमी येणे याची किंमत ८-१० वर्षात खलिस्तानवादी शिरजोर होण्याच्या रूपात चुकवायला मिळाली नाही म्हणजे मिळवली. खरोखरच रात्र वैर्‍याची दिसत आहे.

ओवैसी का वीडियो वायरल: जब योगी मठ में चले जाएंगे और मोदी पहाड़ों पर चले जाएंगे, तब तुम्हें बचाने कौन आएगा? https://www.amarujala.com/amp/india-news/aimim-chief-asaduddin-owaisi-c… परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, यावर काय टिप्पणी करतील, ते वाचणे रोचक ठरेल ...

मोदींच्या भारतात मुस्लीम असणं कसं वाटतं?; फारुख अब्दुल्ला म्हणाले, “भयानक, ते संपूर्ण देशाला…” https://www.loksatta.com/desh-videsh/farooq-abdullah-says-modi-governme… बांगलादेश येथील, हिंदू लोकांची घरे जाळली, तेंव्हा देखील, हे काहीच बोलले नाहीत .. अमरावती येथे दंगल झाली, त्या बाबतीत, हे काहीच बोलले नाहीत ....

https://marathi.abplive.com/news/pune/i-came-to-pune-to-thank-those-who… प्रचंड सहमत आहे.... निवृत्त नौसैनिकाला मारहाण करणे एका स्त्रीला, "हरामखोर" म्हणणे कितीतरी हिंदूंचे शिरकाण करणारा, टिपू सुलतान, याच्या जयंतीचा उल्लेख करणे अजान स्पर्धा आयोजित करणे "जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा," अशी पोस्टर्स लावणे "केम छो वरली, " असे पोस्टर लावणे ------- सगळेच उघड उघड आहे .... ------ (अर्थात, घराणेशाहीची पुजा करणारे मतदार बरेच आहेत, त्यामुळे, कितीही उघडपणे दिसले तरी, अशी धृतराष्ट्र मंडळी, या गोष्टी नजरेआड करण्याची शक्यता आहे ...)

घराणेशाहीची पुजा करणारे मतदार बरेच आहेत.
घराणेशाही हा नवीन प्रकारचा जातियवादच आहे. तथाकथीत पुरोगामी पक्षांत विरोधाभास भयंकर आहेत.

In reply to by Trump

आमच्या काल्पनिक 3-13-1760 ग्रहावर, अशा गोष्टी होतच असतात... सध्या तरी, आमच्या यानाच्या इंधनावरील टॅक्स कमी केले असल्याने, दर शनिवारी, आमच्या ग्रहावर, फेरी मारता येते....

हे

अन

"जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा," अशी पोस्टर्स लावणे

"केम छो वरली, " असे पोस्टर लावणे एकाच वेबसाईटवर, एकाचवेळी बोलूनही काहीही न वाटणे ह्यासाठी पहिल्या धारेच्या देशीचा शौक तरी हवा किंवा निर्लज्जपणात पहिला नंबर तरी....

मी खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते : नाना पटोले https://marathi.abplive.com/news/maharashtra/congress-leader-nana-patol… आत्या बाईला मिशा असत्या तर, काका म्हटले असते ... अशाच तर्हेचे, हे वाक्य आहे.... तरी बरे की, नाना पटोले, कॉंग्रेसमध्येच पदाधिकारी आहेत आणि ह्यांचेच सरकार आहे ....

सेना आमदार तानाजी सावंत बंडखोरीच्या तयारीत! मुख्यमंत्री ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष https://www.esakal.com/marathwada/mla-tanaji-sawant-disappointed-on-shi… बंडखोरीचे लोण पसरत जाणार, हा माझा अंदाज होताच ....

“चांगल्या कामामुळेच धर्मांतरं होतात, कुणीही तलवारीच्या जोरावर…”, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं विधान https://www.loksatta.com/desh-videsh/good-work-influences-people-to-con… पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये काय झाले? ------- या वर्षाच्या सुरुवातीला, गुजरात विधानसभेने ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२१’ बहुमताने पारित केला होता, यामध्ये लग्नाच्या माध्यमातून सक्तीने धर्मांतर करणार्‍यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गुजरातशिवाय उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये देखील धर्मांतर विरोधी कायदे करण्यात आले आहेत..... --------- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे ....

औरंगाबादमध्ये ५३ ख्रिश्चनांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. त्यासाठी ब्राह्मणसभेने पुढाकार घेतला आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/aurangabad-paithan-… उशीरा का होईना आपल्याला जाग येत असेल तर चांगले आहे. इतिहासकाळात आपण लढाया भरपूर जिंकल्या पण सक्तीने धर्मांतरीत केलेल्यांची घरवापसी करून घेतली नाही ही मोठी चूक झाली. शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरसारख्यांची घरवापसी केली ते एखाद दुसरे उदाहरण सोडले तर त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या काळातही तसे कोणी केले होते असे वाटत नाही. अगदी अटकेपार झेंडे लावणार्‍या पेशव्यांनी सुध्दा या गोष्टीकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष केले. पहिल्या पिढीतले सक्तीने धर्मांतरीत झालेले परत यायला कधीही तयार असतीलच. खरं तर ते घरवापसीसाठी आसुसलेले असतील. पण आपण ते तेव्हाच केले नाही आणि जशा जशा पिढ्या गेल्या त्यातून घरवापसी आणखी कठीण झाली. आता फुकाच्या धर्मनिरपेक्षतेला भीक न घातला जितके परत येतील त्यांची घरवापसी करून घ्यायलाच हवी. त्यांना कोणत्याही जातीत टाका पण हिंदू असणे महत्वाचे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

धर्मभास्कर वाचा, महिन्याला कितीतरी फिरंगी, यवन, किरीस्ताव हिंदुधर्मात परत आल्याच्या बातम्या असतात नीट.

In reply to by जेम्स वांड

मसूराश्रमातील शुध्दीसंस्कार असे काहीसे ते सदर असते का? बर्‍याच वर्षांपूर्वी धर्मभास्कर आमच्याकडे यायचे ते वाचायचो. त्यातही दर महिन्याला ५-१० च्या वर आकडा असतो असे वाटत नाही. निदान मी ते मासिक वाचायचो त्यावेळी तरी नसायचा. तो आकडा इतका कमी न राहता घरवापसी इन्स्टिट्यूशनलाईझ व्हायला हवी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकड्याच्या मला पण कल्पना नाहीत आत्ता, पण मुद्दा इतकाच आहे की प्रयत्न खूप आधीपासून सुरू आहेत.

माझ्या मते चारीही शंकराचार्यांनी एकत्र येऊन या बाबतीत ची अधिकृत प्रक्रिया काय आहे हे बोलायला हवे. या प्रकाराची, म्हणजे बाकीच्या धर्मातून हिंदूंमध्ये प्रवेश करण्याची अधिकृत क्रिया नसेल तर ती बनवायला हवी. शंकराचार्यांना जो उच्च पदाचा मान दिला आहे, तो त्या साठी आहे.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

शंकराचार्य तर कैकवेळा खुद्द सरकारवरच कडक टीका करताना आढळून येतात, चालतील का असे शंकराचार्य धार्मिक शुद्धीकरण करून लोक परत घरवापसी करवून घ्यायला ? ही एक बातमी पुरी पिठाचार्यांची द्वारका पिठाचार्य असणाऱ्या शंकराचार्यांची जुनी बातमी ही तर राजकीयदृष्ट्या जास्तच स्फोटक आहे, असे शंकराचार्य मंजूर असतील का पण घरवापसी करवून घ्यायला हा मूळ विषय आहे.

In reply to by जेम्स वांड

सरकारवर टीका करणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे तो शंकराचार्यांचा ही असायला हवा. शिवाय जर ते म्हणतात त्याप्रमाणे बिफ हिंदू व्यापारी च विकत असतील तर तो मुद्दा कुणी तरी उचलायला हवाच, तो ते उचलत आहेत. (बीफ बंदी ला माझे समर्थन आहे, असे मुळीच नव्हे. हा मुद्दा धार्मिक नव्हे असे माझे मत आहे. पण त्यांना जर तो धार्मिक मुद्दा वाटत असेल तर त्यांच्या मताचा आदर करायला हवा). पण टीका करताना त्यांना १५ लाख रुपये , कलम ३७० यावर करायची आवश्यकता नव्हती. It is beyond their domain. ते धार्मिक नेते आहेत, राजकीय नव्हे. धर्माने राजकारणात आणि राजकारण्यांनी धर्मात ढवळाढवळ करायचे थांबवायला हवे. शेवटची गोष्ट म्हणजे शंकराचार्यांना कसे निवडले जाते याबद्दल मला काहीही कल्पना नाही (धर्म संसद वगैरे बोलावून शंकराचार्यांना निवडले जाते का?) त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक योग्यतेबद्दल आणि त्यांच्या threat perception assess करण्याच्या योग्यतेबद्दल मला काहीही कल्पना नाही. मी धर्म तज्ञ नाही. पण सध्याच्या परिस्थितीत हिंदू धर्माचे नेते म्हणून त्यांची जर एखादी जबाबदारी असेल आणि ती त्यांना निभावता येत नसेल तर ती त्यांना करून देण्याची गरज आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंगांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि अकाली दलाचे बंडखोर नेते सुखद्देवसिंग धिंडसा यांच्या अकाली दल (संयुक्त) पक्षाबरोबर भाजपने युतीची घोषणा केली आहे. भाजपकडे पंजाबच्या शहरांमधील हिंदू मते बर्‍यापैकी आहेत पण नुसती तेवढी मते जिंकायला पुरेशी ठरत नाहीत. तरीही शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान खलिस्तान्यांचा झालेला शिरकाव आणि परवा लुधियानाला झालेला स्फोट या घटनांनंतर हिंदूंची एकगठ्ठा मते भाजपला गेली नाहीत तर मात्र कठीण आहे. अमरिंदर काँग्रेसची किती मते फोडतात हे बघायचे. या युतीला बहुमत मिळेल वगैरे अचाट कल्पना कोणी करणार नाही- अगदी स्वतः अमरिंदरही या भ्रमात असतील असे वाटत नाही. पण काहीही झाले तरी खलिस्तान्यांविषयी सहानुभूती असलेल्या आपचे सरकार पंजाबसारख्या राज्यात बनणार नाही इतपत प्रभाव तरी या युतीचा पडावा हीच इच्छा. https://timesofindia.indiatimes.com/india/bjp-formally-announces-allian…

फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी अचानक राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिकामेच होते. त्यासाठी मार्च २०२१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा जुलै २०२१ मधील पावसाळी अधिवेशनात निवडणुक घेतली जाणे अपेक्षित होते. ती निवडणुक त्यावेळी झाली नाही. या अधिवेशनात मात्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक घ्यायची महाविकास आघाडी सरकारने ठरविले. ही निवडणुक घ्यायची विधानसभेच्या नियमांप्रमाणे एक प्रक्रीया ठरलेली असते. हे नियम http://mls.org.in/pdf/ebooks/Assembly_Rules_10edtion_2015.pdf वर बघायला मिळतील. राज्यपालांच्या सहीने या निवडणुकीची घोषणा होते आणि प्रस्तावित मतदानाच्या तारखेच्या आदल्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतात. नियम ६(५) आणि ६(६) प्रमाणे ही निवडणुक गुप्त मतदान पध्दतीनेच घेतली जावी असे म्हटलेले जरी नसले तरी ते गृहित धरलेले दिसते कारण थेट मतपत्रिकांचाच उल्लेख या नियमांमध्ये आहे. मात्र गुप्त मतदानाने निवडणुक घेतल्यास आपल्यामागे किती मते आहेत (की किती आमदार फुटले आहेत) हे जगजाहीर होईल म्हणून महाविकास आघाडी सरकारने ही निवडणुक आवाजी मतदानाने घ्यावी असे राज्यपालांना पाठविलेल्या शिफारशीत म्हटले आहे. पण नियमांमध्ये ही निवडणुक गुप्त मतदानपध्दतीने घ्यावी असे म्हटलेले असताना आवाजी मतदानाने घेता येईल का या मुद्द्यावर राज्यपालांनी कायदेशीर सल्ला मागितला आहे. त्यावरून नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. यानिमित्ताने एक गोष्ट लिहितो. विधानसभेचे/लोकसभेचे उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला द्यावे असा संकेत असतो. १९९० मध्ये विधानसभा निवडणुक झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेच्या मनोहर जोशींकडे गेले तर उपाध्यक्षपद भाजपला द्यावे असे युतीमध्ये ठरले होते. त्याप्रमाणे भाजपचे अण्णा जोशी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. ते १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्यातून लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि विधानसभा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जुलै १९९१ मध्ये विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणुक झाली होती. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीकडे ९४ आमदार असले तरी युतीच्या उमेदवाराला ८५ मतेच मिळाली होती. युतीच्या ५ आमदारांची विधानसभेवर झालेली निवड उच्च न्यायालयाने १९९० च्या निवडणुकांसाठी प्रचारात धर्माचा वापर केला या कारणाने रद्द केली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्या आमदारांना मतदानाचा अधिकार नव्हता. तरीही आणखी ४ मते युतीच्या उमेदवाराला कमी मिळाली होती. ही मते नक्की कोणाची फुटली यावर शिवसेना आणि भाजपमध्ये थोडा कलगीतुरा रंगला होता. पण मते कोणाची फुटली होती हे आणखी साडेचार महिन्यात छगन भुजबळ आणि शिवसेनेचे इतर १७ आमदार (त्यापैकी ६ घाबरून लगेच परतही आले) बाहेर पडले तेव्हाच स्पष्ट झाले. महाविकास आघाडीकडे १७० आमदार आहेत हे अगदी उच्चरवाने ५० वेळा बोलले जात आहे. त्यामुळे किमान १७० मते मिळवणे महाविकास आघाडीसाठी अगदीच अगत्याचे आहे. त्याहून कमी मते मिळाली तर मात्र आघाडीसमोरील अडचणी वाढतील. तसेच निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये राष्ट्रवादीतून आलेल्या कचर्‍यापैकी थोडा स्वगृही परतला आणि महाविकास आघाडीला १७० पेक्षा जास्त मते मिळाली तर आणखी चांगले.

चंडिगड महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये ३५ पैकी आपने १४, भाजपने १२ तर काँग्रेसने ८ जागा जिंकल्या आहेत. २०१६ मध्ये महापालिकेत २६ जागा होत्या त्यापैकी भाजपने २० जागा जिंकल्या होत्या तर आपला एकही जागा मिळाली नव्हती. चंडिगडमध्ये चांगले यश मिळाल्यामुळे दोन महिन्यात होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी आपचा उत्साह आणि हुरूप वाढला असेलच.

“ शाळा, महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय…” ; आदित्य ठाकरेंचं विधान https://www.loksatta.com/maharashtra/whether-to-continue-schools-colleg… मदिरालये चालू आणि ज्ञानालये बंद.... आनंद आहे ...

https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/sanjay-raut-taunt-governo… अभ्यास आणि विद्वतेचं अजीर्ण होऊ नये, मुख्यमंत्र्यांच्या लेटर बॉम्बनंतर संजय राऊतांचं राज्यपालांवर शरसंधान ------ काही लोकांसाठी, द्रोणाचार्यांनी आणलेली संजीवनी विद्या, देण्याची गरज आहे....

विधानसभा अध्यक्ष निवडीवरून वातावरण तापले आहे. काल म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला निवडणुक आवाजी मतदानाने घ्यायची होती. तशी शिफारस सरकारने राज्यपालांना केली. पण ती शिफारस मान्य करायला राज्यपालांनी नकार दिला. याचे कारण विधानसभेच्या नियमांमध्ये ही निवडणुक मतपत्रिकांद्वारे घेतली जाईल असे स्पष्ट म्हटले आहे. परवा महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नेते राज्यपालांना भेटले. तरीही राज्यपाल ऐकत नाहीत हे बघितल्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना 'हे तुमचे काम नाही' अशा स्वरूपाचे 'खरमरीत' पत्र लिहिले. एक गोष्ट समजत नाही. जर राज्य सरकार नियमभंग करत असेल तर त्याला आवर घालायचे काम राज्यपालांचे नाही तर कोणाचे? त्यावर राज्यपालांनी काहीतरी उत्तर मुख्यमंत्र्यांना पाठविले. ते नक्की काय उत्तर आहे हे समजले नाही कारण ते उत्तर बंद लिफाफ्यात होते आणि ते उत्तर न्यूज चॅनेलवाल्यांच्या हाती पडलेले नाही. अगदी काही तासांपूर्वीपर्यंत राज्यपालांचा विरोध डावलून सरकार आवाजी मतदानानेच घेईल असे म्हटले जात होते. पण अचानक काहीतरी चक्रे हलली. बहुदा अजित पवारांनी सबुरीचा सल्ला दिला आणि सरकारने माघार घेतलेली दिसते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक आतापुरती टळली आहे की टाळली आहे. जर नियमाचे उल्लंघन करून घेतलेल्या निवडणुकीला राज्यपालांनी आक्षेप घेतला असता आणि तरीही सरकार निवडणुक आवाजी मतदानाने घेण्यावर अडून राहिले असते तर कदाचित राज्यपालांनी कलम ३५६ प्रमाणे राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची शिफारस केली असती हा धोका सत्तेच्या नशेत झिंगलेल्या इतर कोणालाही कळला नसला तरी तो अजित पवारांना समजलेला दिसतो. या प्रकारात महाविकास आघाडी सरकारचा गलथान कारभार पुढे आला आहे. मतपत्रिकांद्वारे (म्हणजे गुप्त मतदानाने) निवडणुक घेतली तर कदाचित आपल्याकडे १७० आमदार नाहीत हे जगजाहीर होईल ही भिती सरकारला होती असे दिसते. शक्यता फार थोडी पण समजा भाजपचा उमेदवार विधानसभा अध्यक्षपदावर निवडून आला असता तर सरकारने बहुमत गमावले हे स्पष्ट झाले असते. त्यामुळे नियम बदलून मतदान आवाजी पध्दतीने घ्यायचा घाट घातला गेला असे दिसते. जर आपल्या सोयीप्रमाणे पाहिजे तसे नियम बदलायचे असतील तर नियमांना अर्थ काय राहिला? नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी राज्यपालांवर टीका केली- राज्यपाल अभ्यास करण्यात फार वेळ घालवतात हे लोकशाहीसाठी चांगले नाही. अर्थात जनमत पायदळी तुडवून सत्तेवर आलेल्या या सरकारला कशाचीच फिकीर नाही. त्यापुढे विधानसभेचे कामकाजाचे नियम अगदीच क्षुल्लक झाले. प्रत्येकवेळी 'आमचे बहुमत आहे' हे पालुपद कसे चालेल? पण सत्तेच्या नशेत झिंगलेल्या मंडळींना हे कोण सांगणार?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बडा घर आणि पोकळ वासा रामदास कदम यांनी सांगीतले तसेच आहे, पुढच्या पिढी साठी शिवसेना नाही ...

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यावर राज्यपालांनी काहीतरी उत्तर मुख्यमंत्र्यांना पाठविले. ते नक्की काय उत्तर आहे हे समजले नाही कारण ते उत्तर बंद लिफाफ्यात होते आणि ते उत्तर न्यूज चॅनेलवाल्यांच्या हाती पडलेले नाही.
आपण राज्यघटनेचा बचाव करायची शपथ घेतली असून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बदल केलेले नियम अंसंवैधानिक आहेत असे प्रथमदर्शनी दिसते त्यामुळे मी त्या बदलाला मान्यता देऊ शकत नाही असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या 'खरमरीत' पत्रातील भाषा असंयमी आणि धमकीची आहे असेही राज्यपालांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/governor-bhagat-si… महाविकास आघाडी सरकारला नक्की भिती कसली वाटत आहे? आपले आमदार नाराज आहेत आणि ते गुप्त मतदान प्रक्रीयेत सरकारविरोधात मतदान करतील याची? तसे असेल तर ते किती काळ असे परिस्थितीपासून पळ काढू शकतील? लवकरच विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल. त्यात राज्यपालांचे अभिभाषण होईल. प्रथेप्रमाणे त्या अभिभाषणाबद्दल राज्यपालांना धन्यवाद द्यायचा ठराव विधानसभेला पास करायचा असतो (*). त्या ठरावावर विरोधी पक्षाने दुरूस्ती सुचवली आणि ती दुरूस्ती विधानसभेने मंजूर केली तरी त्याचा अर्थ सरकारने बहुमत गमावले असा होतो. सुरवातीला आवाजी मतदानाने अशी दुरूस्ती नाकारली असे विधानसभा उपाध्यक्षांनी जाहीर केले तरी एका जरी विधानसभा सदस्याने या ठरावावर मतदान घ्यावे असा आग्रह धरला तरी मतदान घ्यावे लागेल. तीच गोष्ट अर्थसंकल्पावरील मतदानाची. प्रत्येक वेळी सरकार असे परिस्थितीपासून पळणार का? *: राज्यपालांना धन्यवाद द्यायचा ठराव म्हणजे राज्यपाल, तुम्ही किती छान भाषण केलेत अशा स्वरूपाचा नसतो. तर राज्यपाल सरकारने लिहून दिलेलेच अभिभाषण वाचत असतात त्यामुळे त्यात सरकारच्या धोरणांचा अंतर्भाव असतो. त्यामुळे या धन्यवाद प्रस्तावावर व्यापक चर्चा होणे अपेक्षित असते. म्हणजे राज्यापुढील प्रश्न किंवा सरकारची धोरणे वगैरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

दुर्दैवाने असेच वाटते.... राज्यपाल आणि मुख्यमंत्री, यांच्यातील संबंध खेळीमेळीचेच हवेत ...

In reply to by चंद्रसूर्यकुमार

राज्यपालांना धन्यवाद द्यायचा ठराव म्हणजे राज्यपाल, तुम्ही किती छान भाषण केलेत अशा स्वरूपाचा नसतो.
सन्माननीय मुख्यमंत्र्यांना हे कुणी सांगितले आहे की नाही कोण जाणे. फक्त फोटोग्राफर म्हणून कारकीर्द असण्याचे तोटे दिसायला लागले आहेत (मुळात एखादा पार्ट टाईम छंद कारकीर्द म्हणून गृहीत धरावा का?) बाकी ते सभागृहात उपस्थित नसल्याने कुठल्याही प्रकारची सांख्यिकी माहिती नसणारे दसरा मेळाव्यात करण्याच्या टाईप चे राणा भीमदेवी प्रकारचे भाषण विधानसभेत ऐकून घ्येण्यापासून महाराष्ट्र बचावला.

कानपूर मेट्रोचे उद्घाटन झाले. तशी ही बातमी आता शिळी झालीय. पण सर्व मेट्रोंमधे हीची उभारणी विक्रमी वेळेत पूर्ण झाली म्हणूनच हिचे वेगळेपण. मार्च २०१९ मधे उभारणीला सुरवात झाली.

टेक्स्टाईल आणि फूटवेअर वर आधीचा ५ टक्के जीएसटी वाढवून १२ टक्के करण्याचे विद्यमान सरकारने योजिले आहे. . पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी आणि आता टेक्स्टाईल व फूटवेअर. सगळ्या दुभत्या गाई पार पिळून घ्यायचे ठरवले आहे. महागाई बिहगाई तसले काही नसतेच म्हणा. उत्पादनातही आधीच बांग्ला देश, चीन पुढे निघून गेले आहेत.

https://www.loksatta.com/desh-videsh/naseeruddin-shah-on-pm-modi-say-he… बांगलादेश मध्ये, हिंदू लोकांची घरे जाळली, तेंव्हा हे काहीच बोलले नाहीत ... पाकिस्तान मध्ये, गैर मुस्लिम माणसाला जाळले, तेंव्हा, है काहीच बोलले नाहीत...

परत एकदा डोके वर काढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणे अपेक्षित असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकांचे काय करायचे याविषयी मुख्य निवडणुक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी कोविडचे सगळे प्रोटोकॉल पाळून विधानसभा निवडणुका पुढे न ढकलता वेळेवरच घ्याव्यात असे मत व्यक्त केले असे मुख्य निवडणुक आयुक्तांनी म्हटले आहे. तेव्हा पाच राज्यातील विधानसभा निवडणुका वेळेतच होतील ही शक्यता आहे.

राणे भाजपीय झाल्याने त्याचे गुन्हे हे पराक्रम आणि शौर्य गाथा म्हणून वर्णिले जावेत - आदेशावरून .

In reply to by कपिलमुनी

रा ग गडकरींचा पुतळा फोडणाऱ्यांना ५ लाख नगदी बक्षीस आणि ही वक्तव्ये भाजपने उदार मनाने पोटात घेतली आहेत असे दिसते, अन इतके सगळे स्पष्ट असूनही ब्राह्मण समाजाला भाजपा आपली तारणहार वाटते !

In reply to by जेम्स वांड

रा ग गडकरींचा पुतळा फोडणाऱ्यांना ५ लाख नगदी बक्षीस आणि ही वक्तव्ये भाजपने उदार मनाने पोटात घेतली आहेत असे दिसते
राणेंची व्यक्तव्ये लक्षात ठेवणे म्हणजे खुप मोठी कसरत आहे.

In reply to by धर्मराजमुटके

शाळा,कॉलेजेसही बंद होणार असे दिसते. त्या पूनावाला व भारत बायोटेककडे बर्याच लशी शिल्लक असाव्यात असे ह्यांचे मत. जनता कोमात, पूनावाला जोमात.

मेट्रो कारशेडच्या बेडूकउड्या ; दहिसरची कारशेड जाणार भाईंदरला, तर कोनची कशेळीला https://www.lokmat.com/thane/metro-car-shed-dahisars-car-shed-will-go-b… पर्यावरणाच्या मुद्यावरून आरे कॉलनीतील कारशेड कांजूरमार्ग येथे मिठागरांच्या जमिनीवर हलविण्याच्या निर्णयावर केंद्र आणि राज्य शासनात वाद पेटलेला एकीकडे पेटलेला असताना दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील कारशेड उभारण्याबाबतही एमएमआरडीएला वारंवार बेडूक उड्या माराव्या लागल्या आहेत. आमच्या सारख्या अशिक्षित लोकांना एकच समजते की, "कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत..."

जगात सर्वात जास्त शस्त्रास्त्रे आयात करणारा भारत आता निर्यातही करणार, ‘ब्रह्मोस’ फिलिपिन्सला देण्याबाबत लवकरच करार होणार https://www.loksatta.com/desh-videsh/world-largest-importer-of-arms-ind… ह्यासाठीच भाजपला पर्याय नाही.....

In reply to by मदनबाण

तोरसेकरांचे काही व्हिडियोज श्रवणीय असतात. शरद पवारांवर राजकीय टीका करणारे जुन्या पीढीतले भाउ पहिलेच पत्रकार असावेत. अन्यथा तळवलकरांपासुन ते गिरीश कुबेर.. हे संपादक अमेरिका/ब्रिटनच्या प्रमुखांना राजकीय ज्ञानामृत पाजतील पण महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर विशेष करून काँग्रेस/सेना नेत्यांवर टीका करायची वेळ आली की लेखण्या म्यान करतात.

“करोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपाच जबाबदार”, नवाब मलिक यांनी साधला निशाणा! https://www.loksatta.com/desh-videsh/ncp-nawab-maik-targets-bjp-on-coro… राज्य कुणाचे आणि दोष कुणाला? अशिक्षित माणसाला जे समजते, ते सुशिक्षित माणसांना समजेलच असे नाही ...

In reply to by मुक्त विहारि

जावयाचा न पकडला गेलेला माल शिल्लक असावा आणी अनायसे नववर्षाच्या स्वागतसमारंभात वापरला असेल त्यांनी.

In reply to by इरसाल

शाकाहारी अंडी आणि शाकाहारी कोंबडी खाल्ली की, असे ज्ञानकण मिळत असावेत का?

In reply to by मुक्त विहारि

हे फारच हास्यास्पद होत चाललंय. अगदी मलाही राहवलं नाही. :))

In reply to by सॅगी

किंवा कदाचित द्राणाचार्यांनी आणलेल्या संजीवनी विद्ये मुळे देखील, असे बोलणे सुचत असावे