Skip to main content

कलंत्रीसाहेबांना जाहीर प्रश्न..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 04/12/2008 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
कलंत्रीसाहेब, कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्या, ही विनंती.. घटना - मी अन् माझी बहिण रस्त्याने चाललो आहोत. कुणा गुंड-मवाल्याने माझ्या बहिणीकडे पाहात अत्यंत अश्लील उद्गार काढून तिचा अपमान केला, तिच्या स्त्रीत्वाला शिवी दिली. त्यावर मी त्या गुंडाला भररस्त्याततच लाथा-बुक्क्याने बडवला, आणि बेदम झोडून काढला. प्रश्न - १) त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही मी केलेली कृती आपल्याला योग्य वाटते का? २) आणि माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का? ३) की मी काही वेगळी कृती करायला हवी होती? असेल तर ती कोणती, की ज्यामुळे माझ्या बहिणीला तिथल्या तिथे न्याय मिळेल आणि ती मान उंचावून रस्त्याने चालू शकेल? बोला कलंत्रीशेठ! आपल्या उत्तरांची वाट पाहतो आहे. कृपया काही अवांतर लेखन न करता मी विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात परंतु नेमकी उत्तरे द्या ही कळकळीची विनंती.. काहीतरी अवांतर किंवा दिशाभूल करणारे लेखन कराल तर ते माझ्या डोक्यावरून जाईल एवढेच नम्रपणे सांगू इच्छितो. मी होता-होईल तोवर अत्यंत साध्या व सरळ शब्दात प्रश्न विचारले आहेत, तेव्हा त्याची उत्तरेही तेवढीच साधी व सरळ असावीत अशी अपेक्षा करतो.. वास्तविक हे प्रश्न मी आपल्याला खाजगीतही विचारू शकलो असतो परंतु ज्या गांधीवादाचे आपण हट्टाने आणि सातत्याने समर्थन करत आहात तो गांधीवाद किती फोल आहे अथवा सशक्त आहे, किंवा मूळ मुद्द्याला बगल देत शब्दांवर शब्द रचलेला शब्दांचा नुसतच एक गडबडगुंडा आहे, हे आपल्या उत्तरावरून चाणाक्ष मिपाकरांच्या लक्षात यायला मदत होईल..! आपला नम्र, तात्या.

वाचने 26165
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by लिखाळ

>> मध्यमवर्गीय आणि सुखात राहणार्‍यांना गांधीवाद पेलवला नाही याचे कारण गांधीविचारांची तत्वे सांगणे अतिशय सोपे होते. म्हणजे? असे की, गांधीविचारांची जी वैशिष्टे म्हणता येईल त्यात- 'सर्वांना सारखेच सुख व समाधान मिळणे व पोटभर अन्न मिळणे' हे सांगणे सोपे पण त्यांच्यासाठी स्वतःच्या सुखाच्या तुकड्यातून भुकेल्यांना काहीही न देता येणे. 'मानवाच्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण करायच्या मात्र चैन करायची नाही' हे सुखी माणसाला जमणारे नव्हते.ग्राम सफाई, अस्पृश्यता निवारण, समाजात विषमता नसणे, या गोष्टी सुखात राहाणारा केवळ बोलू शकत होता. प्रत्यक्षात त्यावर काम करणे हे शक्य होत नव्हते. म्हणजे गांधी विचार अनेकांच्या अंगी मुरला होता पण प्रॅक्टीकली त्यातले काहीच नव्हते. खरे तर त्यांच्या याच विचाराने खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या सर्वोदयाची जी काही कलमे होती त्याचा प्रभाव उमटला त्याला कारण त्यांचे विचार असतीलही, पण त्यांचे साधुशील व्यक्तित्व होते. त्यांच्या सुदैवाने टिळकांच्या मृत्युनंतर राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व गांधी यांच्याकडे आले. ते थोर समाजचिंतक जसे होते तसे ते अध्यात्मिकही होते त्याचाही प्रभाव जनसामान्यांवर पडला होता. त्याचबरोबर भारतीय समाजाची पुनर्चना कशी केली पाहिजे याचा विचार त्यांनी ' हरिजन' व ' यंग' या साप्ताहिकामधून मांडला हे सर्व विचार तेव्हा काहींना प्रगतीवादी,परिवर्तनशील वाटले. त्याचबरोबर...जालीयनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी केलेले असहयोगाचे आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, या आणि अशा काही घटनांनी गांधीविचाराबद्दल कुतूहुल निर्माण झाले आणि त्यापुढे सर्वोदयाच्या विचाराबद्दल आदर निर्माण झाला असावा असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विश्लेषणाशी सहमत आहे.
वरील तात्यांच्या उदाहरणात गांधीविचारांनी उत्तरे अशी असली असती, माझा एक तर्क.... स्त्रीत्वावरुन शिव्या देण्यार्‍याचे र्‍हदयपरिवर्तन करणे. ( सभ्य, सुसंस्कृत समाज निर्माण करायचा ) आणि बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल यासाठीही तिचेही र्‍दयपरिवर्तन करणे.
अगदी! अर्थात हे म्हणणे सोपे आहे, म्हणजेच
गांधीविचारांची तत्वे सांगणे अतिशय सोपे
पण प्रत्यक्षात आणणे अवघड, आणि त्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची तयारी किंवा इच्छा नसल्यामुळे,
दुर्दैवाने गांधीविचाराला विरोध करणार्‍यांना या गोष्टी कधीच झेपल्या नाहीत,
मध्यमवर्गीय आणि सुखात राहणार्‍यांना गांधीवाद पेलवला नाही
आणि
म्हणूनच गांधींजींची चळवळ जोरात फोफावत असतांना बहुसंख्य तरुण गांधीविचाराला भारुन या चळवळीकडे जसा आकर्षीत होत होता, तसाच त्यांच्या ध्येयधोरणाविषयी अनेकांना गांधी चळवळ अव्यावहारिक व एका समाजाला झुकते माप देणारी अशी वाटत होती त्याच बरोबर त्यांच्या र्‍दयपरिवर्तनाचा मार्ग अव्यावहारिक असल्याचे अनेकांचे मत होते.
हे अतिशय पटण्यासारखे. 'अव्यावहारिक' याचा अर्थ येथे 'आपल्या आवाक्याबाहेरचे'पेक्षासुद्धा 'आपल्याला जे करण्याची इच्छा नाही' असा असावा. (अर्थात हा मानवी स्वभाव आहे.) 'एका समाजाला झुकते माप' हा आरोप चळवळीमागची भूमिका ज्यांना कळली नाही अथवा ती कळून घेण्याची ज्यांना इच्छा नव्हती अशांकडून असंख्य वेगवेगळ्या संदर्भांत केला गेला. अर्थात चळवळीमागचे सामर्थ्य, भूमिकेमागील सच्चाई आणि अशा विचारसरणीची गरज ज्यांना कळली ते अशा आक्षेपांना महत्त्व न देता चळवळीकडे आकर्षित झाले आणि म्हणूनच चळवळ फोफावली आणि याच कारणांस्तव गांधीविचारांना आज जगात मान आहे. अर्थात 'गांधीवाद' किंवा 'अहिंसावाद' म्हटल्यावर गांधीविचारांचे जे एक अत्यंत विटंबित स्वरूप आज आपल्याला समजते त्याचे श्रेय गांधीविरोधकांइतकेच गांधीविचारांचा स्वतःला सोयिस्कर असा अर्थ लावून स्वतःची पोळी भाजणार्‍या स्वतःला 'गांधीवादी' म्हणवणार्‍या राजकारण्यांकडेही आहे. (अवांतर: आपल्या विचारसरणीला 'गांधीवाद' किंवा 'गांधी-इज़्म' म्हणवले जाऊ नये - आपण हिंदुपरंपरेत जे काही सांगितले आहे त्यापेक्षा वेगळे काहीच सांगत नाही आहोत - अशी खुद्द गांधींची भावना असल्याबद्दल वाचल्याचे आठवते. त्या अनुषंगाने 'गांधीवादा'ऐवजी 'गांधीविचार' हा शब्दप्रयोग आवडला.)

दुसर्‍या दिवशी बहिणीला एक राखी देईल आणि सर्व आजूबाजुच्या लोकांना एकत्र बोलावेल आणि त्या गुंडाला राखी बांध असे सांगेन. शक्यता आहे की माझा आणि इतरांचाही प्रश्न सुटु शकेल >>>> कलंत्री साहेब तूम्ही त्या गूंडाला मारवे की नाही ह्या बाबत मी काही बोलनार नाही. तो तूमचा निर्नय. पण तूम्ही जे लिहील त्यावर प्रतिक्रिया द्याविच लागेल. मूळात त्या गुंडाला एखादी सक्खी, मावस, चूलत बहिन असन्याची शक्यता नाकारता येत नाही मग आधीच बहिन असताना देखील तो छेड काढतो, मग ह्या फाल्तू राखीचे काय ते महत्व? आणी गुंडानां आया बहिनी नसतात असा तर तूमचा समज नाही ना? एखाद्या मानलेल्या बहिनीकडे पाहून तो उमाळा येउन छेडने थांबवेल हे समजने म्हणजे ??? मुन्नाभाई एम बी बी एस ला वास्तव समजल्यामूळे ही गफलत.

तात्या !!!!!!!!!!!!! तुमच्या बहीणीच रक्षण करायला तुम्ही खमके आहात्...................... पण आमच्या सारख्या भाऊ नसलेल्या स्त्रियांनी अश्या प्रसंगी काय करायच राव! आमच रक्षण करायला कोणता कृष्ण धावुन येणार?.......देवाने हात हा अवयव हा फक्त ठराविक कामांसाठीच दिलाय का माणसाला?योग्य वेळी त्याचा वापर करायला लागतोच की .?गावगुंडांना बुकलुन काढायची क्षमता नसेल कदाचित आमच्यात पण दोन सणसणीत कानशिलात हाणून भर दिवसा तारे दाखवण्याची ताकद असायला हवीच की प्रत्येक स्त्री मधे काय बिशाद लागुन गेली आहे कुणाची वाटेस जायची. :> अश्या प्रकारचा प्रसंग कुणा स्त्रीवर कधी ओढवु नये खर पहाता.पण तरी वेळ आलीच तर मात्र.................. तुम्ही निवडलेला पहिला पर्याय एकदम योग्य. माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का? याचे उत्तर म्हणजे त्या मवाल्याची तुम्ही केलेली पुजा सफल झाल्यावर बहिणीच्या हस्ते त्याची उत्तर पुजा देखिल तेथेच घालुन घ्यावी.कसें! आणि असल्या मुर्ख लोकांच्या बाष्कळ बडबडिकडे लक्ष देऊन आपली मान खाली घालण्याचे कुठल्याही स्त्रीला कारणच काय? "अनामिका"

वाखाणण्याजोगी आहे! द्वारकानाथजी अडचण करणार्‍या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत हे माहित असतानाही तु विचारतो आहेसः). यांच्या क्र. २ च्या लेखात मी काही प्रश्न विचारले होते. सारे मिळुन जेमतेम ५-६ ओळी. पण साहेबांनी उत्तर देणे टाळले वर प्रश्न पुन्हा विचारा असे सांगितले. असो. गेली अनेक वर्षे आपण त्यांचे निरूतर होणे पाहत आहोतच.

In reply to by सर्वसाक्षी

सर्वसाक्षी, परत एकदा विनंती, कृपया आपली प्रश्ने विचारा. समस्या अशी आहे की तुम्हाला तुमच्याच शब्दात उत्तरे हवी आहेत ती जगातील कोणालाही देणे शक्य नाही. तरी एकदा परत प्रश्न विचारा आणि त्यावर पडदा पाडा. द्वारकानाथ

In reply to by कलंत्री

उगाच निमित्त् कशाला सांगता. मी माझ्या शब्दात उत्तर द्या असे म्हटले नाही, उगाच वाचकांची दिशाभूल करु नका. आपण उत्तर दिले आहेत तर ते दाखवा आणि ते दिले असूनही मी असत्य कथन करीत असेल तर तसे दाखवुन द्या - हा सूर्य हा जयद्रथ! हे तुमचे उत्तर आणि हा त्याला माझा प्रतिसाद की तुमच्या नको माझ्याच शब्दात उत्तर हवे असा. कृपया दाखवुन द्या. उत्तर द्यायचे असेल तर प्रश्न आपल्याला दिसतीलच. असो. आपल्या प्रश्नातच आपले उत्तर मिळाले.

In reply to by सर्वसाक्षी

प्रिय सर्वसाक्षी, तुमच्या जुन्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देण्याची माझी इच्छा नाही. तरी पण तुम्ही जर प्रश्न परत विचारले तर मी माझ्या प्रामाणिकपणानेच उत्तर देईल असे परत एकदा लिहितो. या उप्पर तुमची मर्जी. सस्नेह, द्वारकानाथ कलंत्री