मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
In reply to नाशिकला असतो तर नक्की आलो by प्रचेतस
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by खेडूत
In reply to हजेरी लावा आणि दणकून फोटो पाठवा. by कंजूस
🥂
चीयर्स मिसळपाव, चीयर्स मिपा कट्टा !In reply to पुणे कट्टा करायला कोणी उत्सुक आहे का? by राजेंद्र मेहेंदळे
In reply to शुभेच्छा! ग्रुप फोटो by अनन्त्_यात्री
In reply to वृत्तांत by MipaPremiYogesh
पुणेकरांनो घ्या मनावर कट्ट्याचे2019 च्या दिवाळी पूर्व पाताळेश्वर कट्ट्याची पुनरावृत्ती व्हावी ऐकताय ना मालक मंडळी :)) नाशिकचा वृत्तांत अजून का येईना? तमाम महाराष्ट्रीय मिपाकरांचे डोळे लागून राहिले आहेत !!
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट), श्री. जानू (निळसर शर्ट).In reply to https://scontent.fbom19-2.fna by पाषाणभेद
In reply to वा.. बहोत खूब! by तुषार काळभोर
In reply to https://scontent.fbom19-2.fna by पाषाणभेद
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट), श्री. जानू (निळसर शर्ट).
निळ्या टी शर्ट मध्ये असलेला: चि. आरुष (सर्वेष सरांचा मुलगा.), पाठमोरी असलेली माझी मुलगी कु. स्वराली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट).
सौ. पाषाणभेद (अर्चना)- (राखाडी पंजाबी सुट)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), श्री. जानू (निळसर शर्ट).

सौ. पाषाणभेद (अर्चना)- (राखाडी पंजाबी सुट), सौ. कुलकर्णी मॅडम - (हिरवा पंजाबी सुट)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), श्री. जानू (निळसर शर्ट).
श्री. जानू (सर्वेष सर व त्यांचे कुटुंब जरा उशीरा आले होते. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकर त्यांच्या कुटूंबीयांसोबत मिपाकट्याला आले होते. उपस्थित: डावीकडून: सौ. कुलकर्णी मॅडम, सौ. बोरसे मॅडम, झाडावर बसलेली कु. स्वराली, कु. आरूष, सौ. लोहार मॅडम, कु. प्रज्ञा.
(तिनही महिला शिक्षिका असून सर्व जणी मराठी विषयच शिकवितात हा दुर्मीळ योगायोग आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
लहान मुले धबधब्याच्या टोकावरच्या टेकडीवर गेले होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्टा साजरा झाला त्याच्या जवळील दरी गावाजवळ असलेले दर्याईमाता देवस्थान.
पाठमोरे असलेले श्री. सर्वेष सर (मिपाआयडी - जानू.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
दर्याईमाता मंदीरातून दिसणारे विहंगम दृष्य. धबधबा, दरी, तसेच लांबवर दिसणारे काश्यप्यी धरणाचे पाणी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
दर्याईमाता मंदीरातून दिसणारे विहंगम दृष्य. धबधबा, दरी.
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ चे वृतांतलेखन लवकरच करतो.
In reply to अभिनंदन by श्रीरंग_जोशी
💖
एक बेंचमार्क सेट केलात की आपण !(तिनही महिला शिक्षिका असून सर्व जणी मराठी विषयच शिकवितात हा दुर्मीळ योगायोग आहे.)मिपाकर लेखकांना काही मार्गदर्शन मिळू शकते का ?
( कट्टाभेटीचे हे केवळ प्रातिनिधीक छायाचित्र आहे. या आधीच कट्टा भेटीचे इतर छायाचित्रे प्रकाशीत केले आहेत. कृपया ते पहावेत.)
तर मिपा कट्याच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक ०३/१०/२०२१ रोजी आपले वकील साहेब हॉटेलमध्ये सर्वात आधी म्हणजे नऊ वाजेच्या दरम्यान पोहोचले होते. मी देखील त्याच दरम्यान पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो पण नेमके आनंदवली पुढे चांदशीच्या रस्त्याचे काम चालू असल्याने मला पुन्हा माघारी यावे लागले व लांबचा रस्ता जवळ करावा लागला. त्यात वेळ गेला. अर्थात मी जास्त वेळ न जाता मी 9:40 च्या दरम्यान पोहोचलो. त्यानंतर कुलकर्णी साहेबांचा फोन आला. त्यानंतर ते घरून निघाले. ते जवळच राहत असल्याने व त्यांना चांदशीच्या नव्या होणार्या रस्त्याचा बायपास माहीत असल्याने ते लगोलग पोहोचले.
हॉटेलमध्ये आल्यानंतर सगळ्यांची व एकमेकांच्या कुटूंबातील सदस्यांची ओळख पाळख झाली. पेरूची वाडी हॉटेल हे पेरूच्या बागेतच केले आहे. पेरूची झाडे पेरूच्या बहाराने लगडलेली होती. सर्वेष सर (जानू) व कुटूंबीय अजून पोहोचले नव्हते. त्यामुळे जमलेल्या मंडळींनी पेरूच्या बागेत फोटो काढले. कुणी झाडावर चढून तर कुणी झोक्यावर बसून मजा केली. तेथेच ताजे पेरू विक्रीला होते. मंडळींनी ते पेरू विकत घेतले. सर्वेष सर अजूनही हॉटेलात पोहोचले नव्हते. ते देखील चांदशीच्या नव्या रस्त्यात अडकले होते. मग कुलकर्णी साहेबांनी त्यांना फोनवरून मार्गदर्शन केले. तो पर्यंत मिसळीची ऑर्डर दिल्या गेली होती. मंडळी मिसळ पावाचा आस्वाद घेत होती. जरा वेळाने सर्वेष सर त्यांच्या कुटूंबासमवेत हॉटेलात पोहोचले. मग लगोलग त्यांच्या डीशची ऑर्डर दिल्या गेली. तेथेच ओळख होवून गप्पा सुरू झाल्या. महिला वर्ग गप्पात रंगला होता. मिसळीचा आस्वाद घेणे सुरू होते. तिनही महिला शाळेत मराठी विषय शिकवत आहेत हा एक योगायोग होता. त्यामुळे त्यांच्या गप्पांना निराळाच संदर्भ लाभला.
मिसळ खाऊन झाल्यानंतर गुळाच्या जिलेबीच्या रिपीट ऑर्डरी दिल्या गेल्या. त्यानंतर तेथे पेरूच्या स्वादाचे आईस्क्रीम छान मिळते अशी बातमी कुलकर्णी सरांनी दिली. त्याचा आस्वाद घेण्यात आला. एकूणच आईस्क्रीम छान होते. आता हॉटेलमध्येही गर्दी वाढलेली होती.
खाणे झाल्यानंतर पेरूच्या बागेत पुन्हा फोटो काढल्या गेले. या ठिकाणाहून जवळच आठ एक किमीवर डोंगरावर एक दर्या धबधबा आहे. तेथे जाण्याचे आमचे ठरले. वकीलसाहेबांना कामामुळे लगेच निघायचे असल्याने त्यांनी निरोप घेतला. कुलकर्णी दांपत्यानेही पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला. सर्वेष सर व माझे कुटूंब यांनी धबधब्याला भेट देण्याचे ठरवले. धबधब्याचे जवळचे गाव दरी आहे. रस्ता छान शेतातून जाणारा होता. पावसाने शेती बहरली होती. हिरवीगार शेती व वळणाचा डोंगरावर जाणारा रस्ता पाहून मन प्रसन्न होत होते.
धबधब्याच्या बाजूलाच दर्या मातेचे डोंगरातल्या कपारीत मंदीर आहे. तेथे जाण्यासाठी पायर्या आहेत. मंदीरातून समोरची दरी, बाजूचा धबधबा समोरच्या धरणाच्या पाण्याचा विस्तार दिसत होता. सर्वेष सर मुलांना, महिलांना धबधब्याच्या टेकडीवर चढून गेले. वरती एक छोटासा बांध होता. मी धबधब्याच्या खाली असलेल्या छोट्या पुलाच्या खाली बसून विश्रांती घेतली. कु. प्रज्ञा, चि. आरूष व कु. स्वराली या मुलांनी धबधब्याच्या परिसराचा खरा आनंद घेतला. ते चारही जण भरपूर वेळ धबधब्याच्या काठावर, वरती टेकडीवर होते.
त्यानंतर तेथून निघण्याची वेळ झाली. मखमलाबाद पर्यंत आमच्या गाड्या एकत्र धावल्या व नंतर आमचा मार्ग निराळा होवून आम्ही एकमेकांच्या कुटूंबाचा निरोप घेतला.
अशा रितीने मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ साजरा झाला.
या प्रतिसादाच्या आधीच कट्याच्या भेटीचे, हॉटेल तसेच धबधब्याचे, दर्या मातेच्या मंदीराजवळील फोटो टाकले असल्याने आपणास कोण कोण आले होते याची कल्पना आलीच असेल.
कार्यबाहूल्यामुळे मिपाकट्याच्या वृतांता टाकण्यास खूपच उशीर झाला असल्याने क्षमस्व. (शुद्धलेखन तपासले नसल्याने लिखाणातल्या चूकांकडे दुर्लक्ष करावे.)
नाशकात होणार्या आगामी कट्ट्यास तुम्हा सगळ्या मिपाकरांस आताच आमंत्रण देत आहे, हे सांगून मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ चे वृतांतलेखन येथेच थांबवतो.
कळावे,
तुमचाच,
पाषाणभेद.
११/१०/२०२१In reply to मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ - by पाषाणभेद
In reply to मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ - by पाषाणभेद

In reply to तुम्हा सर्वांचे व वाचकांचे आभार. अशाच भेटीगाठी होत राहोत. by पाषाणभेद
बाकी नेहरू उद्यानाला असतेच त्याची गाडी. तेथे एकदा भेळ खाल्ली. त्याने ते काम भैयांना आऊटसोर्स केलेले दिसले. चव काहीच नाही अन पैसेही जास्तनेहरू उद्यानाची गाडी तर पहिल्यापासूनच आहे, शौकीनची भेळ बोगस आहे, मात्र पाणीपुरी जबरदस्त. फक्त त्यासाठी शौकीनला भेट द्यावी लागते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rama Ashtakam (Ameya Records) Bhaje Visesha Sundaram!!! श्री रामाष्टकम्
नाशिकला असतो तर नक्की आलो