तर्क कोडे १ : घारे डोळे
कृपया इंटरनेटवर शोधून उत्तरे देऊ नयेत. तुम्हाला आधीपासून हे कोडे ठाऊक असेल तर उत्तर देऊन इतरांचा विचका करू नये.
एक आटपाट गाव आहे. गावांत काही लोकांचे डोळे घारे आहेत तर इतर सर्वांचे काळे. गावाची एक परंपरा आहे. जर कुठल्याही व्यक्तीला आपले डोळे घारे आहेत हे समजले तर त्या रात्री १२ वाजता त्या व्यक्तीने गांव सोडून जायचा. कुणीही गांवकरी दुसऱ्याला त्याच्या डोळ्याचा रंग सांगू शकत नाही किंवा डोळ्यांच्या रंगाविषयी काहीही बोलण्यास गावकर्यांना सक्त मनाई आहे.. गावांत आरसा वगैरे प्रतिबिंब दाखवणार्या गोष्टी नाहीत. डोळ्यांचा रंग फक्त तर्कशास्त्र वापरून व्यक्ती जाणून घेऊ शकतात. गांव तसा छोटा असल्याने दर दिवशी प्रत्येक माणूस गांवातील इतर माणसांना पाहू शकतो त्यामुळे प्रत्येक माणसाला आपण सोडून इतर सर्व लोकांच्या डोळ्यांचा रंग ठाऊक आहे.
एक दिवस गांवात एक साधू बाबा येतो. साधू बाबा कधीही खोटे बोलत नाहीत. ह्यावेळी गावांत एकूण क्ष व्यक्ती आहेत. साधूबाबा मग भर चौकांत राहून इतर लोकांचे चेहेरे पाहतो आणि मोठ्याने ओरडतो. "ह्या गांवातील काही लोकांचे डोळे घारे आहेत". आणि हे वाक्य बोलून साधू बाबा आपल्या वाटेने गांव सोडून जातात. साधूबाबाचे हे वाक्य गांवातील सर्व लोक ऐकतात.
ह्या एका वाक्याने पुढे काय होईल ?
हा एक को-ऑर्डिनेशन प्रॉब्लेम आहे. माहिती अनेक लोकांकडे असते पण कुलुपाची चावी नसावी त्याप्रमाणे कोऑर्डिनेशन सिंग्नल नाही तर ती माहिती लोक वापरू शकत नाहीत. होडी चालविणाऱ्या प्रत्येक माणसाच्या स्नायूंत बळ असले तर कुणी तरी एक दो एक दो म्हणून ताल धरल्याशिवाय सर्वांची शक्ती एकवटून बोट पुढे जाऊ शकत नाही. त्याच प्रमाणे साधू बाबाचे एक वाक्य संपुन गावांत एक अत्यंत छोटीशी माहिती पसरवते पण ह्याचे परिणाम मोठे आहेत. हिंट हवी असेल तर हे कोडे "सामान्य अनुमान" म्हणजे इंडक्शन वापरून सोडवले जाऊ शकते.
कोडे चांगले आहे ...
डोक्याचा भुगा करून
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
या कोड्यात एक त्रुटी वाटते
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तुमच्या ह्या उत्तरा ने मला
व्रात्य मुलांचा चमनगोटा
खूप वेळ विचार केला.. पण नक्की
In reply to खूप वेळ विचार केला.. पण नक्की by गणेशा
माईसाहेब म्हणतात त्यावरून आणि
In reply to माईसाहेब म्हणतात त्यावरून आणि by गणेशा
डोक्याचा भुगा झाला पण
साधू येण्याच्या आधी :