लेखककपिलमुनीयांनी शनिवार, 19/09/2020 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाची आयपीएल कोरोनामुळे उशिरा सुरू झाली आहे. यंदा UAE मध्ये सामने खेळवले जाणार आहेत .
वेळापत्रक
यंदा आयपीएल कोण जिंकणार ? सामन्यातील घडामोडी , उत्तम खेळ यांच्या चर्चेसाठी धागा!
जिकडे तिकडे कोव्हीड सोडून दुसरं काही नाही. अतिशय कंटाळा आला आहे.
(डॉक्टर असल्याने रोजच कुणी ना कुणीतरी फोन करून काहीतरी विचारत असल्यामुळे या विषयापासून सुटका होत नाहीये)
त्यात हा एक अतिशय स्वागतार्ह बदल आहे.
दोन तीन तास निखळ आनंद.
मागचे चार पाच हंगाम विशेष रस नव्हता. फक्त चेन्नईच्या मॅच बघायचो. धोनिसाठी.
पण मागचे सहा महिने कोरोना ने सामान्य जगण्याची वाट लावल्यामुळे यंदा आवर्जून बघणार.
गो Thalaiva!!
फारच कमी स्कोर.
रोहित शर्माने अगदी थकल्या सारखा कॅच दिला. ते पण पियूष चावला ला!
चावलाने मात्र बांधून ठेवलं पार. लुंगी अन चहर ने अपेक्षित चांगली बॉलींग केली.
पोलार्ड अन पंड्या ने फलंदाजीत निराशा केली. गोलंदाजीत भरून काढतात का बघू.
पुढच्या डावात फाफ, वाटसन, बुमराह वर लक्ष असेल.
अवांतर : माझ्या टीमचे पॉइंट्स ३९१ आहेत पहिला डाव संपल्यावर. ४९९२८/५११३५६
मजा येते आहे..बीसीसी आय president म्हणून उपस्थित असलेल्या सौरव दादाला बघायला आनंद वाटला.
प्रेक्षक नसेल तरी रेकॉर्डेड जल्लोष ऐकवत आहेत त्याची गंमत वाटली. :)
अभिनंदन गणेशा.....
मुंबई तर काल थकले भागले वाटत होते... क्षेत्ररक्षण तर जॉन्टी या वयातही त्यांच्याहुन नक्की चांगले करुन दाखवेल असे प्रकार चालु होते..
बादवे.... थोडे मोठे मैदान असल्याने काल ६ फार पहायला मिळाल्या नाहीत.... समालोचक गंमतीने रोहित शर्मा (आउट झाला तेव्हा) म्हणत होते की हा शॉट वानखेडेवर षटकार होता :)
आज दिल्ली जिंकेल असं वाटत आहे...
पृथ्वी शॉ हे एक वाया गेलेले टॅलेंट वाटते. चाइल्ड prodigy. विनोद कांबळीची आठवण करून देतो हा पोरगा.
पंत पण खेळाच्या कौशल्याच्या मानाने लई आगाऊ वाटतो. पण हा बहुतेक या पिढीचा अंगभूत गुण असावा. आम्हाला तर दादाने लॉर्ड्स वर शर्ट काढला याचंच लई कौतुक वाटलेले.
हेटमयार ने निराशा केली.
दिल्लीची सुरुवात अतिशय खराब झालीय.
शमी अपेक्षेप्रमाणे उत्तम बॉलिंग करतोय.
बऱ्यापैकी स्कोर करून दिला पंजाबला. १५७.
अगदी एकतर्फी वाटणारी मॅच लढण्यासारखी करून ठेवली.
Stoinis ५३(२१)
जबरदस्त slogging खेळी.
जॉर्डन ४-०-५६-०
देशी खेळाडू असता तर परत खेळण्याची शक्यता संपली असती.
बंगलोर ची सुरुवात तर उत्तम झालीय. तरी अजून कोहली अन एबी यायचेत. २०० नाही झाले तर बंगलोर वाईट खेळले असं म्हणावं लागेल.
आणि हैदराबाद कडे तितका जोराचा पाठलाग करणारी फलंदाजांची फळी दिसत नाहीये.
पहिल्या दहा षटकात जवळपास नव्वद धावा असताना आणि मधल्या फळीत विराट अन एबी असून पुढच्या दहा षटकात सत्तर धावा निघाल्या. एकूण बळी फक्त पाच होते. तरी बंगलोर ला एकूण फक्त १६५ ची मजल मारता आली.
तिन्ही सामन्यात १६० च्या मागे पुढे धावा झाल्या आहेत. कदाचित खेळपट्टी तशी असावी.
१६६ चं टार्गेट असताना हैदराबाद १५ षटकात २ बाद १२० अशा सुस्थितीत होते. पुढील पाच षटकात ४६ धावा आवश्यक असताना एकतर लागोपाठ बळी जात राहिले. आणि सैनी, चहल आणि दुबे यांनी विशेष हालचाल करू दिली नाही. चहल ने बेयरस्ट्रो आणि विशेषतः विजय शंकर ला आउट केले, ते दोन्ही बॉल मस्त टाकले होते. सैनी ने रशीद खानला आउट केले ते सुद्धा बघण्यासारखे.
पदिक्कल, एबी आणि बेयरस्ट्रो तिघांनी दर्जेदार फलंदाजी केली. विनाकारण धोका न पत्करता, वेडेवाकडे शॉट्स न मारता तिघांनी अर्धशतके केली.
इथून पुढे देखील १६०-१७० हा norm राहील असं वाटतंय.
पहिल्या सिजन ला वॉर्न अन नंतर द्रविड असताना राजस्थान आवडता संघ होता.
असो..
काल संजू Samson अन जोफ्रा आर्चर ने अशक्य हाणामारी केली. राजस्थान २१६ हे त्यांच्यासुद्धा कल्पने पलीकडे असेल. लुंगी अन सर जडेजा महाग पडले.
वॉटसन अन फाफ ने मस्त टोलेजंग फटकेबाजी केली, नंतर धोनी ने पण नजरेचे पारणे फेडले. कदाचित सुरुवातीची विजयची संथ फलंदाजीला महागात पडली.
हा पराभव चेन्नई ला महागात पडू नये ही अपेक्षा.
पहिल्या सिजन ला वॉर्न अन नंतर द्रविड असताना राजस्थान आवडता संघ होता.
असो..
काल संजू Samson अन जोफ्रा आर्चर ने अशक्य हाणामारी केली. राजस्थान २१६ हे त्यांच्यासुद्धा कल्पने पलीकडे असेल. लुंगी अन सर जडेजा महाग पडले.
वॉटसन अन फाफ ने मस्त टोलेजंग फटकेबाजी केली, नंतर धोनी ने पण नजरेचे पारणे फेडले. कदाचित सुरुवातीची विजयची संथ फलंदाजीला महागात पडली.
हा पराभव चेन्नई ला महागात पडू नये ही अपेक्षा.
चेन्नई ला काहीच महागात पडत नाही, कुठल्याच आयपी एल मधे... ते नेहमीच फायनल ला पोचतात ;)
कालचे ग्राउंड फारच छोटे वाटत होते... एवढे सामने पाहिले आहेत शारजाला झालेले, पण कालच्याईतके छोटे मैदान कधी वाटले नव्हते..... कदाचित पूर्ण झाडच बॅट म्हणुन घेउन येतात आजकाल त्यामुळेही तसे वाटत असेल....
आज के के आर अन मुंबई....
पंजाब सोडले तर बाकीच्या match चे अंदाज बरोबर आले माझे, काल राजस्थान ने मस्त win केली match.
आज मी kkr कडून आहे., बघू..
Dream 11 ला रोहित नाही घेतला.
बघू किती महागात पडते ते
सुनील नारीन चा खेळ आवडतो. रोहित चांगला खेळला. पन्नास षटकात जितक्या सहजतेने २०० करतो तितकाच सहज २० षटकात शतक करू शकतो. आणि अगदी सहज.
दिनेश कार्तिक ला कर्णधाराची खेळी करावी लागेल.
दिल्लीची संथ पण मजबूत सुरुवात. पृथ्वी शॉ रिस्क न घेता खेळतोय. तरी बरा स्ट्राईक रेट आहे. आता अंदाज सांगणं अवघड आहे. पण दिल्ली १५०-१६० जायला हवी आणि चेन्नई ने आरामात पार करायला हवं.
धोनी चा यष्टी मागचा प्रेझेन्सच किती भरोसेदायक वाटतो.
दिल्लीसाठी समाधानकारक स्कोर असेल. पण दहा शतकात बिन बड ८८ वरुंन दोनशे व्हायला हवे होते.
हातात पुरेशा विकेट्स असूनही कॅप्टन अय्यर अती संथ खेळला. खेळपट्टी तशी होती, चेन्नई ची balling चांगली होती की तो अती बचावात्मक खेळला...
चेन्नई चा लाईन अप बघता आवाक्यातल टार्गेट आहे. फाफ, केदार, वॉटसन, जडेजा आणि स्वये श्री धोनी असताना १७६ साठी धापा टाकायची गरज भासायला नको.
विषयी सहानुभूती वाटते.
धोनीच्या किंचित आधी खेळायला सुरुवात केली त्याने.
भारतीय कसोटी संघात कार्तिक चा कॅप नंबर २५०, तर धोनीचा २५१.
एकदिवसीय संघात कार्तिक १५६ आणि धोनी १५८.
आज धोनी कहा आ गया और तुम कहा रह गये..
गिल मस्त खेळला काल... एकदम संयमित फलंदाजी..... गरज नव्हती तेव्हा मारझोड फटके अजिबात कुलुपबंद करुन १ - १ घेत राहिला.... फार वेळा बघायला मिळत नाही आय पी एल मधे हे :)
बाकी रसेल ला १ किंवा २च ओव्हर्स मिळतात गोलंदाजीला , पण तो खूपच रोखुन धरतो १८ - २० ओव्हर्स मधे....
मोठ्या score समोर शांत पणे खेळू शकणारे फक्त दोनच खेळाडू त्यांच्याकडे आहेत, स्मिथ पहिला आणि मग बटलर.
या दोघां व्यतिरिक्त अवघड आहे..
Samson run बनवू शकतो, पण मारण्या च्या नादात विकेट पण फेकू शकतो.. उथप्पा ची साथ आज हवी त्याला.
तरीही अवघड वाटत आहे सगळे.
बटलर ने 70+ करावेत ही इच्छा.. :-))
Dream 11 ला avg ली चांगले लक आहे अजुन तरी..
काल काहीच्या काही सामना झाला !!!!
तेवाटिया ने अनेक अनेक शिव्या शाप खाउनही नंतर ५ सिक्स मारुन हिरो झाला...
पण कालच्या सामन्यात सर्वात उच्च बिंदु होता तो म्हणजे निकोलस पूरणचा सीमारेषेपाशी झेलाचा प्रयत्न... झेल घेउ शकला नाही कारण मॅक्सवेल जरा लांब होता... पण ४ रन्सा वाचवल्या गड्याने....
प्रतिक्रिया
पहिला सामना - चेन्नई विरुद्ध मुंबई
मुंबई जिंकेल असे वाटते,
In reply to पहिला सामना - चेन्नई विरुद्ध मुंबई by कपिलमुनी
पाहणार आहे.
मुंबई जिंकेल
जिकडे तिकडे कोव्हीड सोडून
+१ टू डॉ
मुंबई १६२
मजा येते आहे..बीसीसी आय
चेन्नई चे कमबॅक
Betway ला आज चेन्नई लावली
जिंकलो सगळ्या. Contest :-)
In reply to Betway ला आज चेन्नई लावली by गणेशा
कसं जमलं?
In reply to Betway ला आज चेन्नई लावली by गणेशा
माझी एकच team होती, 662
In reply to कसं जमलं? by तुषार काळभोर
आपण मुंबईकडून....
अभिनंदन गणेशा.....
धन्यवाद..
In reply to अभिनंदन गणेशा..... by बेकार तरुण
आजचा पाठिंबा पंजाब
stoinis surprise package!!
In reply to आजचा पाठिंबा पंजाब by तुषार काळभोर
पंजाब जिंकणार
आज पण मी लावलेल्या सगळ्या.
अश्विन नाहिये माझ्याकडे.. तो
In reply to आज पण मी लावलेल्या सगळ्या. by गणेशा
नाही, just टाकलेले परत आले :-
In reply to आज पण मी लावलेल्या सगळ्या. by गणेशा
जबरदस्त मॅच झाली!
काल अगरवाल अन रबाडा भारी
बेंगलोर विरुद्ध हैदराबाद
अपेक्षाभंग
In reply to बेंगलोर विरुद्ध हैदराबाद by तुषार काळभोर
चेन्नई हरली आज :):):) ...
चेन्नई वि राजस्थान
चेन्नई वि राजस्थान
चेन्नई ला काहीच महागात पडत
कालचे ग्राउंड फारच छोटे वाटत होते...
In reply to चेन्नई ला काहीच महागात पडत by बेकार तरुण
पंजाब सोडले तर बाकीच्या match
In reply to चेन्नई ला काहीच महागात पडत by बेकार तरुण
बरेच महागात पडलाय
In reply to पंजाब सोडले तर बाकीच्या match by गणेशा
माझा last min change is
In reply to बरेच महागात पडलाय by कपिलमुनी
आज मुंबईच जिंकेल :)
आजचा पाठिंबा मुंबई
आज पुन्हा मी पंजाब बरोबर.
आज लाडक्या S. P. मुळे चेन्नई
आज दिल्ली फेव्हरीट
आज माझी आधी दिल्ली होती पण
In reply to आज दिल्ली फेव्हरीट by कपिलमुनी
आज थालैवा
दिल्ली पावणे दोनशे.
In reply to आज थालैवा by तुषार काळभोर
ढोणी कुंथत कुंथत खेळतो हल्ली.
In reply to दिल्ली पावणे दोनशे. by तुषार काळभोर
वय झालाय
In reply to ढोणी कुंथत कुंथत खेळतो हल्ली. by प्रचेतस
वयानुसार चालायचंच तेवढं!
In reply to ढोणी कुंथत कुंथत खेळतो हल्ली. by प्रचेतस
कोलकाता वि हैदराबाद
दिनेश कार्तिक
आज kkr आहे माझी team.
गिल मस्त खेळला काल... एकदम
आज राजस्थान विरुद्ध पंजाब
आज दोन्ही team same आणि
In reply to आज राजस्थान विरुद्ध पंजाब by कपिलमुनी
आज का अपना डब्बल घोडा
In reply to आज दोन्ही team same आणि by गणेशा
पंजाब चे ओपनर
२२३ पंजाब
In reply to पंजाब चे ओपनर by तुषार काळभोर
मोठ्या score समोर शांत पणे
In reply to २२३ पंजाब by तुषार काळभोर
काल काहीच्या काही सामना झाला
निकोलस पूरणचा सीमारेषेपाशी झेलाचा प्रयत्न.
In reply to काल काहीच्या काही सामना झाला by बेकार तरुण
आज rcb वर आहे..
Kohali तर ना :-))
In reply to आज rcb वर आहे.. by गणेशा
आज dc घेऊ कि srh कळेना..
आज हैदराबादी बिर्याणी