Skip to main content

मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 17/09/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र दामोदरदास मोदींचा आज सत्तरावा वाढदिवस. त्या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा! मोदींचं व्यक्तिमत्व मुख्यतः खूप वादग्रस्त आहे. त्यांची कारकीर्द खूप कष्टाची राहिली आहे. सतत आव्हानांचा सामना करत त्यांनी खूप काही साध्य केले आहे. जे काहीच शक्य वाटत नव्हते, ते मुद्दे सोडवले गेले आहेत. काही नवे मुद्दे वाढले आहेत. अजून खूप काही करायचे बाकी आहे. काहीही केले किंवा न केले तरी विरोध होतोच. नव्या माध्यमांमुळे सजगता वाढली आहे. बाकी इतिहास आपल्या सर्वांसमोर आहेच. त्यामुळे पुनराव्रुत्ती टळत आहे. यानिमित्ताने मनात काही प्रश्न येतात.. १. त्यांनीच सुरू केलेल्या प्रथेनुसार पुढील निवडणुकीनंतर ते पद न घेता ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील काय? त्यांना नातलगांची सोय लावायची नसल्याने चिकटून राहणार नाहीत असे वाटते. २. त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षात सक्षमपणे देशाचा कारभार कोणता नेता सांभाळू शकेल? ३. पुन्हा भाजपला सत्ता न मिळाल्यास दुसरा कोण पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल? ४. वरील मुद्दा तीन नुसार स्थिती मुळात येऊ शकते का? आणि त्यामुळे त्यांनी केलेले चांगले काम बंद तर होणार नाही ना? ५. त्यांच्या काय चुका झाल्या असे वाटते आणि उर्वरित साडेतीन वर्षांत कुठले मुद्दे त्यांनी  प्राधान्याने हातात घ्यायला हवेत? मिपाकरांना काय वाटते जाणून घ्यायला आवडेल. (अवांतर टाळण्यासाठी आधीच धन्यवाद..कारण सर्वच मिपाकर जबरदस्त सूज्ञ आहेत! )

वाचने 38050
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

आपण कोणी तारणहार आहोत अशी मोदी यांनी स्वतः:ची प्रतिमा अनावश्यकपणे निर्माण केली ही त्यांची खूप मोठी चूक झाली आहे. भारत देशात खास करून पी एम हे पद भारताचे सर्वेसर्वा पद आहे वा भारताची राज्यघटना डॉ आंबेडकर यांनी एकहाती लिहिली आहे हे दोन मोठे गैरसमज आहेत . त्यामुळे काही चांगले झाले की पी एम पदाचा उदोउदो करायचा , आंबेडकरांना देवाच्या पातळीला नेऊन सोडायचे वा काही विपरीत घडले की या दोन्ही गोष्टीबद्दल नापसंती व्यक्त करायची असा खाक्या भारतीय जनतेचा दुर्दैवाने आहे. भारत देशाची प्रमुख समस्याच लोकशाही व लोकसंख्या ही आहे . काही विद्वान लोक ह्या दोन गोष्टी भारताची बलस्थाने आहेत असे मानतात. स्वातंत्र्य आधी की समाजसुधारणा आधी असे वाद पूर्वी झाले आहेतच . त्यासाठी काही वर्षे तरी लोकशाहीचे विसर्जन हा मार्ग आहे जरी ती जगातील एक उत्तम राज्यपद्धती असली तरी . भारताचे आर्थिक प्रष्ण २००० वर्षाचे जुने आहेत. ते असे एकाएकी संपणारे नाहीत. भारत व चीन यांची लोकसंख्या फार पुर्वीपासूनच अतिरिक्त आहे हे सत्य नाकारता येत नाही. आता काळानुसार हिंदू मुसलीम संघर्ष वगरे कमी झाले असले तरी वर्ग संघर्ष वाढले आहेत. आर्थिक निकषावर आरक्षण झाले नाही ही सर्वात मोठी घोडचूक भारत देशाने केली आहे ! तिचा गुंता आता सोडवणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही ! आर्थिक वाटचालीत सरकार हा एक फक्त अनेक खेळाडूपैकी एक खेळाडू असतो हे अर्थशास्त्राचे मूळ तत्वच भारतातील कित्येकाना मान्य नाही ना राजकारण्यांना , ना नोकरशाहीला , ना उद्योगपतींना , ना कामगारांना , ना सामान्य लोकांना ! त्यामुळे मी आता काहीतरी जादू करून भारताला कसे सामर्थ्यवान करतो पहा अशी दर्पोक्ती पी एम पदावरून केली गेली आहे. इथे इतके अंतरविरोधी गट आहेत की लोकशाहीत एकाचा उद्धार करावा तर दुसरा गट तुमचा उद्धार करायला मोकळा.कामगार लोकांबरोबर उत्तम पगाराचे करार करून आर्थिक विषमता दूर करणारे उद्योजक , कार्यक्षम कर्मचारीव कामगार ,कायद्याचे पालन करणारे राजकारण्याच्या दबावाखाली ना येणारे नोकरशहा , पैसे ना बुडविणार्या बँका ,राजकारण हे करियर आहे पण धंदा नव्हे हा फरक समजणारे लोकप्रतिनिधी देव व धर्म या कल्पना आहेत पण जोपर्यंत जगात सर्व देश एकत्र येत नाहीत तोवर तरी राष्ट्र हे एक वास्तव आहे हे स्वीकारणारे सामान्या जन या साऱ्या मानासिक समस्या आहेत .त्या एखादा पी एम काय सोडवणार कप्पाळ ?

In reply to by चौकटराजा

कुठलीच जुनी समस्या सुटत नाहीये का? समस्या फक्त वाढतच चालल्या आहेत का? माझ्या हयातीतच सगळ्या समस्या सुटल्या पाहिजेत असं काही बंधन स्वत:वर घालून घेतले आहे का? मी फक्त कुतूहल म्हणून विचारतो आहे. तुमच्या प्रामाणिकपणावर तसेच भारतावरच्या प्रेमावर शंका अजिबात घेत नाहीये.

In reply to by शाम भागवत

प्रत्येकाला दोन पातळीवर समस्या असतात . एक व्यक्तिगत व एक सामाजिक .व्यक्तिगत पातळीवरच्या समस्या आपण एक तर स्वतः:ची प्रगती करून सोडवू शकतो किंवा आहे ही प्रगती हीच समाधानकारक आहे असे आपण अध्यात्म मांडू शकतो . आपली परिसराविषयी किती संवेदना जागृत आहे याचा एक जन्मजात संस्कार आपल्यावर असतो . काही वेळेस ही संवेदना चांगल्या माणसांच्या सहवासाने देखील येते. उदा घ्यायचे झाले तर बिल गेटस यांचे घ्या. त्यांच्या वयक्तिक काही समस्यां नाहीत पण सम्वेदनाशील मनामुळे त्यांच्यापुढे सामाजिक समस्या मात्र नक्कीच आहेत. अगदी हीच स्थिती काही लहानशा पातळीवर माझी आहे. याचे संवेदनेतून अभय बंग ,प्रकाश आमटे या सारखे वेडे घडतात . भारत देशात समस्या सोडविल्या जात नाहीत असे नाही. नेहरू म्हणत माझ्या समोर ४० कोटी समस्या आहेत . समस्या या सर्वच जगात सर्व च सरकारे सोडवीत असतात . वीज, पाणी . आरोग्य ,दळणवळण या समस्या भारतात सोडविण्याचे प्रयत्न खचितच चालू आहेत. मानसिकतेचे काय ? बाकी मी आणि माझे कुटूंब हाच जगाचा आरंभ व शेवट असे मानणारे जगात काय कमी आहेत ...... ?

In reply to by शाम भागवत

भारताचे आर्थिक प्रष्ण २००० वर्षाचे जुने आहेत. ते असे एकाएकी संपणारे नाहीत. हे वाक्य वर आलेच आहे !

चीन चे आकारमान भारताच्या तिप्पट आहे. आकारमानाचा विचार केला तर भारताची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे. अमेरिका सारखा देश भारताच्या 7 पट मोठा आहे आणि लोकसंख्या यूपी आणि बिहार ची मिळून आहे तेव्हढीच असेल. पाकिस्तान उत्तर प्रदेश पेक्षा आकारानं तीपटी पेक्षा जास्त मोठा आहे लोकसंख्या आहे 20 कोटी आणि उत्तर प्रदेश ची 22 कोटी. लोकसंख्या हाच भारता समोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.

In reply to by Rajesh188

एकदा जरी आठ दिवस आपण परदेशी जावून आलो की आपल्याला डोंबिवली वा कल्याणासारख्या पुण्यासारख्या शहरातील भेसूर दाटीची भीती वाटायला लागते. योगायोगाने ( योगायोग कसला डोस्क्याचा म्हणा ) हीच शहरे करोनाची माहेरघर झाली आहेत. चीनचे आकारमान भारतापेक्षा मोठे तर आहेच पण कुणालाही कितीही पोरे निर्माण करायची मुभा नाही हे तेथील वास्तव आहे ! भारतात रस्त्यावर जे लोक झोपून भटके जीवन कंठतात त्यांना बहुतेकाना तीन ते चार पोरे असतात . याचा शरीर संबंध ते कुठे करीत असतील याचा ही प्रश्न पडावा ..!! आज माझा कयास इथेच लिहून ठेवतो .. अकटोबर अखेर भारत जगातील सर्वात जास्त करोना ग्रस्त देश असेल हे नक्की .करोना झाला तरी जगायची शक्यता आहे पण उपासमार झाली तर कोण जगवील या प्रष्णाचे मूळ लोकसंख्येतच आहे !

विकास ची गंगा उलटी वाहत आहे काही दशकं पासून असे वाटत नाही का? जगात इंडस्ट्रियल क्रांती झाली आणि विकासाची फळ सर्वच देशात पडली. त्या मुळे तेव्हा वीज नव्हती आज वीज आहे. असला प्रतिवाद नको. जगातील प्रत्येक देशाची च फरकाने प्रगती झाली त्याला भारत अपवाद नाही. विकासाची गंगा उलटी वाहत आहे ह्याची काही उदाहरणे. 1) 80 ते 90 च्या दशकात महाराष्ट्र मध्ये सहकारी दूध डेअरी,साखर कारखाने, गुळ उत्पादन हे उद्योग जोरात होते. आज काय अवस्था आहे . दूध डेअरी,साखर कारखाने, गूळ उत्पादन हे सर्व उद्योग गैर कारभाराचे शिकार बनून अत्यंत कमजोर झाले आहेत. 2) एक काळ असा होता की st महा मंडळ,मुंबई ची बेस्ट सेवा सर्वोत्तम अवस्थेत होत्या आज त्यांची अशी अवस्था आहे की कधी ही बंद होतील. 3) काही दशकं पूर्वी नद्या स्वच्छ होत्या,जमिनी मधील पाणी प्रदूषण विरहित होते आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. आज काय अवस्था आहे. नद्या , नाले प्रदूषित झाले आहेत.कारखान्यातून निघणारे विषारी रसायने पाण्यात सोडली जात आहेत,शहरांचे सांड पणी काहीच प्रक्रिया न करता नदीत सोडले जात आहे. देशातील जवळ जवळ सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत. काही वर्षातच शुद्ध पाणी मिळणे ही समस्या निर्माण होवू शकते. 4) धरण आणि कालवे निर्माण करून जमीन पाण्या खाली आणली गेली .शेतीला 24 वीज काही दशकं पूर्वी उपलब्ध होती आज काय अवस्था आहे. कालवे धरण ह्यांची दुरुस्ती नाही.पणी वाया जात आहे,वीज फक्त 12 तास तीन पण रात्रीच उपलब्ध आहे. ह्या क्षेत्रात नवीन असे काहीच काम झाले नाही. उद्याही system कधी ही अडचणीत येवून शेतीला पाणी पुरवठयासाठी कठीण होवून जाईल. 5) काही दशकं पूर्वी नोकऱ्या उपलब्ध होत्या,नोकरी लागल्या नंतर ती टिकण्याची शास्वती होती,कंत्राट पद्धत नव्हती . कामगार हे कंपन्या नियुक्त करायच्या आणि त्यांना सर्व सुविधा दिल्या जायच्या आज काय अवस्था आहे. 1 जागे साठी 1000 लोक उपलब्ध आहेत. कामगार ना कंपन्या नियुक्त करत नाहीत कंत्राट दिले जाते. तिथे नोकरी ची शास्वती नाही ,किमान वेतनाची शास्वती नाही. ६) काही दशकं पूर्वी शिक्षण हे स्वस्त होते ,सरकारी शाळा कॉलेज ह्यांचा दर्जा उच्च होता. अगदी अती उच्च शिक्षण सुद्धा बौद्धिक क्षमतेवर कमीत कमी पैशात मिळत होते. टक्के वारी चा फुगा फुगवलेले नव्हता. आज काय अवस्था आहे सरकारी शाळा ,कॉलेज शेवटची घटका मोजत आहेत. अगदी kg साठी पण हजारो रुपये लागत आहेत. उच्च शिक्षण हे फक्त पैसे असतील तरच होवू शकतात. खर्च वाढला पण शिक्षणाचा दर्जा काय आहे. तो घसरत चालला आहे. उत्तम दर्जा चे विद्यार्थी निर्माण च होत नाहीत. 7) एक्स्प्रेस वे झाला काही दशकं पूर्वी आणि मुंबई आणि पुणे,सातारा हा प्रवास जलद झाला. आज काय अवस्था आहे विविध ठिकाणी अर्धवट काम सोडून दिली आहेत,रडते भयंकर खराब आहेत. 8) लोकसंख्या चा विस्फोट झाला आहे,खेड्या तून शहरात स्थलांतर खूप वाढले आहे. काही दशकं पूर्वी मुंबई सारखे शहर नितांत सुंदर होते त्याची आज अवस्था काय आहे. पुण्याची अवस्था काही दशकं पूर्वी आणि आज काय आहे. बकाल झाली आहेत शहर. काही ml पावूस शहरांना पाण्यात बुडव त आहे. खूप आहे संगण्या सारखे. ही सर्व उदाहरणे बघून विकासाची गंगा परत उलटी वाहत आहे असे का म्हणू नये.?

विकास ची गंगा उलटी वाहत आहे काही दशकं पासून असे वाटत नाही का? जगात इंडस्ट्रियल क्रांती झाली आणि विकासाची फळ सर्वच देशात पडली. त्या मुळे तेव्हा वीज नव्हती आज वीज आहे. असला प्रतिवाद नको. मी अगदी हेच म्हणणार होतो ! सांप्रत मी अनेक देशांचे प्रवासाचे व्हिडीओ एकामागून एक पाहात आहे. त्यात असे जाणवते की परदेशात गुन्हेगारी नाही असे नाही पण सामान्य लोकात भारतासारखी बेशिस्त नाही. एकदा ओव्हर ब्रीज बांधा व दहा वर्षात मेट्रो साठी पाडा असा प्रकार नाही ! विकासात गैरव्यवस्थापन हे भारत देशाचे पेटंट ठरावे ! फुटपाथ असेच बांधायचे की लोकांना त्यातील टाईल्स चोरी करून नेता याव्यात. पूल असेच बांधावेत की ते पडावेत . कारखाने असेच बांधावेत जे केमिकल्स नदीत सोडतील . अशीच वीज व्यवस्था असावी जीमध्ये भूमिगत वायर असूनही चार चार तास वीज जावी. रस्ते असेच बांधावेत जे एकाच मोसमात उखडतील ,त्यावर स्पीड ब्रेकर असेच बांधावेत ज्यायोगे वेग कमी होईल पण पाठदुखी वाढीस लागेल. बागा अशा बांधाव्यात जिथे कारंजी बंद पडून पालापाचोळा साठलेला असेल. पूल असे बांधावेत ज्याखाली पार्किंग ना करता कोणीही दुकाने थाटायला मुभा मिळावी . यादी मोठी आहे ...... असे बारीक सारिक गोष्टी सामान्य माणसाला जाणवतात या मन की बात मध्ये का येत नाहीत याचे दु:ख आहे !

जीवनास अत्यंत आवश्यकता असलेले घटक. हवा, पाणी,आणि जमीन. हवा. देशातील हवेच्या प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे सरकार ठोस पावले उचलत नाही. पाणी. जलस्रोत कमी होत आहेत जी काही उपलब्ध आहेत त्यांचे प्रदूषण करणे चरम सीमेवर आहे. काही दिवसांनी जलस्रोत उपलब्ध च राहणार नाहीत. जमीन. नापीक बनत चालली आहे, माती मध्ये अत्यंत घातक रसायने मिसळत आहेत. काही वर्षांनी त्या जमिनी ची उपजावू ताकत पूर्ण नष्ट होवू शकते.. ह्या तिनी क्षेत्रात तरी सरकार नी खंबीर आणि ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

मस्त. मोदींकडून लोक अपेक्षा करताहेत हे पाहून बरं वाटल.

🙂

२०१४ पर्यंत वाट पाहूया.

In reply to by शाम भागवत

२०१४ पर्यंत वाट पाहूया..........? विकासाची गंगा उलटी करायची का शामराव ,,, ? )))))

सर्व साधारण भारतीय समाजाच्या सवयी. 1. वैयक्तिक स्वार्थाच्या जागी जगातील सर्वात कुटील बुद्धी वापरणारा. 2. देश आणि समाज या बाबतीत सर्वाधिक कमी विचार आणि आठवण करणारा. 3. आपल्या खऱ्या शुभचिंतनकारावर सगळ्यात जास्त तक्रार आणि नाराजी व्यक्त करणारा. 4. आपल्या त्रास देणाऱ्या आणि गुन्हा करणाऱ्यास लवकर विसारणारा. एका ठिकाणी वाचलेले आठवण ठेवले होते. फार आवडले.

AHMEDABAD: As many as 450 school municipal school teachers paraded as fake CEOs to impress international delegates at the Vibrant Gujarat Global Summit 2017. According to a report published in Gujarat Samachar on Wednesday claimed that several aided school teachers were assigned ‘special duty’ and were told to pretend as corporate tycoon and CEOs. व्हायब्रन्ट गुजरात च्या जाहिरातीत 450 स्कुल टिचरना सी इ ओ चा ड्रेस घालून बसवले https://archive.siasat.com/news/fake-cant-make-450-fake-ceos-brought-si…

बर्‍याच सकारात्मक चर्चेसाठी आभार. काही लोकांना तेच ते जुने मुद्दे आणण्यातच रस आहे असे दिसते. पण ते एक असो. बरेच काही चांगले काम होईल आणि देश प्रगती करेल अशी आशा करुया!

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात असं कोणतही काम केलेलं नाही," असं सांगत भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या प्रश्नावरून मोदींवर निशाणा साधला. विशेष म्हणजे स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना यांचं श्रेय दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. आता काम सुरू झालेलं असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

In reply to by Gk

बरं मग ? मुळात मोदींनी कधी असं म्हटलाय की राम मंदिराच्या न्यायालयाच्या निर्णयात त्यांचा सहभाग आहे?

१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. निकाल सुनावला जात असताना २६ आरोपी कोर्टात हजर होते. लालकृष्ण अडवाणी यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्ययाधीशांनी नोंदवलं.

बाबरी मशीद विध्वंस : त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का, मग मशीद कुणी पाडली? हा माणुस नेहमी प्रमाणे आरडाओरडा करायला सुरवात करेल आता

२४०० पानांचा निकाल कुणीही वाचलेला नाही. न्यायाधीशांनी एवढंच म्हटलेलं आहे कि या ३२ जणांनी मशीद पाडण्यासाठी पूर्वनियोजित कट केला असा कोणताही सबळ पुरावा सी बी आय ला देता आलेला नाही. एखाद्या खुनाच्या आरोपातून आरोपी सबळ पुराव्याच्या अभावी मुक्त झळा तर खून झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही. पण येथे सगळे काँग्रेसी, लिब्रान्डु, डावे धाय मोकलून रडताना दिसताहेत कि मशीद पडलीच नाही. मशीद पडलीच नाही तर बाप मेल्यासारखे रडताय कशाला? तरी बरं हा सर्व तपास सी बी आय ने काँग्रेस सत्तेत असण्याच्या काळात केला होता. अन्यथा सी बी आय श्री मोदींची बटिक म्हणून असे झाले म्हणूनही यांनी रडारड करायला सुरुवात केली असती.