Skip to main content

चिन्यांचा उपद्व्याप भाग ३

लेखक माहितगार यांनी बुधवार, 01/07/2020 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूज १८ च्या संकेतस्थळावर Lt Gen Hooda यांचा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा, एक नेमका आणि प्रत्येकालाच नेमक्या जबाबदारीचे नेमके भान देणारा लेख आला आहे. कॉपीराईटमुळे संपूर्ण लेख देऊ शकत नाही तो न्यूज १८ च्या संस्थळावर जाऊन वाचणे अधिक उत्तम त्यांच्या मुख्य मुद्यांचा खाली गोषवारा. १) Lt Gen Hooda (निवृत्त असावेत) म्हणतात की सार्वजनिक माहिती पेक्षा अधिकची माहिती त्यांच्याकडे नाही पण लदाख परिसर व Line of Actual Control (LAC) चे भारतीय लष्कराकडून होणारे व्यवस्थापन पद्धतीची त्यांना व्यवस्थीत कल्पना आहे. २) ज्या काही क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत भारत आणि चिनचे आपापले म्हणणे आहे त्यात Pangong Tso and Depsang या दोन जागांचा समावेश होतो . आत्ता पर्यंतची स्थिती आपापल्या म्हणण्यानुसार असलेल्या नियंत्रण रेषे पर्यंत दोन्हीही फौजांनी आपापली गस्त चालू ठेवावी पण कायमस्वरूपी प्रेझेन्स ठेवू नये. म्हणजे दोन्ही बाजूंचा क्लेम चालू राही. ३) Pangong Tso आणि Depsang, मध्ये जिथे गस्त करण्यासाठी चिनी आणि भारतीय सैन्य दोन्हींनाही परवानगी होती तिथे चिनने स्वतःच्या सैन्यतळाचा जम बसवून भारतीय सैन्याला गस्त घालण्यापासून रोखून ठेवले आहे. -म्हणजे चिनचे सैन्य गस्त घालून गेले असते आणि भारतीय सैन्यालाही त्यांची गस्त घालता आली असती तर समस्या नव्हती. ४) कायमस्वरूपी तळ दोन्ही सेनांनी करू नयेत असा ताळमेळ असताना तो चिनी सैन्याने मोडू नये अशी अपेक्षा आहे एखाद्या बाजूने मोडला तर चर्चेच्या नेमक्या पायर्‍या करारात आहेत आणि त्या पायर्‍यांमध्ये भारतीय सैन्याने सांगितल्या प्रमाणे त्यांची गस्त संपवून चिनी सैन्य मागे फिरलेले नाही उलट पक्षी सैन्य तळ अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे चर्चेद्वारे चिनी सैन्याने मागे फिरावे म्हणून भारतीय बाजूकडून सांगून पाहिले जात आहे. ५) हुडांच्या म्हणण्यानुसार युद्धाची भूमिका घेण्यापुर्वी चर्चेच्या संधी वापरून घेणे अधिक उचित पण आपल्या बाजूने होणारी चर्चा अधिक नि:संदिग्ध अशा स्वरूपाची असावयास हवी. ६) 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' आणि 'विवाद्य सीमा क्षेत्र' या दोन वाक्य प्रयोगात अल्पसा पण महत्वाचा फरक आहे. 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' ला 'विवाद्य सीमा क्षेत्र' म्हटले की मानसिक दृष्ट्या दुसर्‍याची बाजू तुम्ही आधीच स्विकारून दुसर्‍या बाजूस अधिकची संधी देता तर हुडांच्या म्हणण्यानुसार भारतीय सीमेच्या बाबत भारतीय सैन्याच्या अधिकार विषयक तडजोड करण्याचे भारतीयांना कसलेही कारण नाही. ज्या भूभागावर भारत अधिकार सांगतो त्यास 'विवाद्य सीमा क्षेत्र' ‘disputed area’ and ‘grey zone’ हे शब्द प्रयोग भारतीयांनी टाळले पाहीजे. ७) सध्या 'विवाद चालू असलेल्या सीमा क्षेत्रात' समस्या असली तरीही भारतीय सैन्य संपूर्ण नियंत्रणातील भूमीवरील कब्जा गामावत चालले आहे अशी दिशाभूल होते आहे ती दिशाभूल बरोबर नाही, सरकारे कोणतीही असोत डोळ्यात तेल घालून संपूर्ण नियंत्रणातील कोणताही भूभाग भारतीय सुरक्षा दलांनी अद्याप गमावलेला नाही. तसा अभास निर्माण करणे भारतीय सुरक्षा दलांच्या आता पर्यंतच्या योगदानास कमी लेखणारे ठरते. त्यामुळे भारतीयांचे मनोबल खच्ची करण्याची शत्रुस हकनाक संधी मिळते अशी संधी देणे सर्वांनीच टाळले पाहिजे. ८) आंतरराष्ट्रीय राजकारणात क्षमता व इच्छाशक्ती आणि त्या तुम्ही नि:सदिंग्धपणे कसा जाणवून देता हे महत्वाचे असते.
In international politics, deterring an adversary depends a lot on how we convey our intentions. Thomas C. Schelling writes in his classic work Arms and Influence, “It is a tradition in military planning to attend to an enemy’s capabilities, not his intentions. Bur deterrence is about intentions - not just estimating enemy intentions but influencing them. The hardest part is communicating our own intentions.”
९) नियंत्रण रेषेच्या बाबत आतापर्यंत आखून दिलेल्या परंपरा आणि करारांचे उल्लंघन चिनी सैन्याकडून होते आहे. त्यांनी मागे फिरावयास हवे आहे. आणि तसे मागे न फिरण्याची किंमत मोठी असू शकते त्यासाठी आवश्यक्ष क्षमता आणि इच्छाशक्ती भारताकडे आहे याची सुसप्ष्ट शब्दात कल्पना चिनींना नि:संदिग्धपणे सर्व स्तरावरून करून द्यावयास हवी. १०) चिनी सैन्याने मागे फिरून आधीची स्थिती बहाल केली जाईल यासाठी भारताने ठाम असावे, चिनींच्या नव्या उपद्व्यापांचे गांभीर्य कमी न लेखता डिटरन्स आणि कंपेलन्स या दोन्ही मार्गांचा अवलंब करावा. दोन्ही गोष्टींचा अवलंब तुम्ही किती करता यावरून तुमचा शत्रु तुम्हाला जोखत असतो. ११) काही वेळा शत्रुपक्षाला संबंधांवर गंभीर परिणाम होतो आणि त्याची किंमत मोठी आहे हे कृतीतून दाखवून देणे खासकरून तुमचा शत्रु तुमच्या पेक्षा बलाढ्य असल्यास महत्वाचे असते त्या दृष्टीने कृती आणि संवादात नि:संदिग्धता हवी. १२) शत्रु डोक्यावर बसलेला असतानाची वेळ सर्व राजकीय इच्छाशक्तीच्या एकोप्याची असते की ज्यामुळे शत्रु राष्ट्रास सुस्पष्ट संदेश जाऊ शकेल, हि वेळ राजकीय उखाळ्या पाखाळ्यांची अथवा टिव्हीपुरती चर्चा मर्यादीत ठेवण्याची नव्हे. * हुडांच्या लेखाचा दुवा पुन्हा एकदा * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

वाचने 48161
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

मी फक्त उद्देश विचारला , संसदेत माहीती बेजबाबदारपणे देणार नाही हयाची खात्री आहे .

भारताचा अरुणाचल, आसाम किंवा मेघालय आणि बाकी राज्य असतील. भारतीय मीडिया त्यांची कधी च दखल घेत नाही . महिन्यातून काय 6 महिन्यातून 1 दा पण त्या राज्यांच्या प्रश्न विषयी भारतीय मीडिया वर चर्चा होत नाही. फक्त भू भाग भारताच्या हद्दीत असून चालत नाही. तसेच पाकिस्तान चे पण आहे गिलगिट,बलिस्तान,आणि बाकी लगतचा प्रदेश ह्या मध्ये राहणारी लोक bhale मुस्लिम असतील पण पठाणी पाकिस्तान ची संस्कृती ,विचार आणि ह्या भागातील लोकांचे विचार फरक आहे. गिलगिट आणि आजू बाजूचा प्रदेश आणि पाकिस्तान ची मुळ भूमी ह्यांचे संबंध तुटलेले च आहेत.

अखंड भारत मध्ये आता असलेले तीन देश भारत,बांगलादेश ,पाकिस्तान. ह्या देशांचा इतिहास बघितला तर अत्यंत द्वेषाचा आहे. देशाच्या फाळणी मध्ये 1.5 करोड लोक मारले gele. बांगलादेश देश फाळणी मध्ये लाखो लोक मारले gele. आणि ह्या आकड्या मधील खूप मोठा मृतांचा आकडा हा जनतेनी केलेल्या हिंसाचार मध्ये मारले gelelya लोकांचा आहे. हे तिन्ही देश एकमेकांचे शत्रू आहेत. जगात अनेक देश आहेत त्यांच्या मध्ये पण सीमेवरून वाद आहेत पण जनते मध्ये एवढं द्वेष कोणत्याच देशात नसावा. पाकिस्तानी भारताचा तीव्र द्वेष करतात,भारतीय पाकिस्तानचा तीव्र द्वेष करतात. पाकिस्तानी ,बांगलादेशी लोकांचा द्वेष करतात आता भारतीय जनता चीन च्या लोकांचा द्वेष करत आहे. पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे. ही अशी विचित्र अवस्था जगात फक्त इथेच का निर्माण झाली असावी.

In reply to by Rajesh188

पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे.
या एका वाक्यासाठी बाकी सगळं लिहलंय काय? अशी शंका आली. तुमचं चीनबद्दलच प्रेम जरा वाढतच चाललंय असंही एकदा मनांत आलं.

🤔


आता भारतीय जनता चीन च्या लोकांचा द्वेष करत आहे. पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे. मुळात चिनी नागरिकांना स्वतंत्रपणे विचार करण्याची सवयच लावलेली नाही. सरकार जे सांगेल तेच सत्य हे स्वीकारणायची सवय जन्मापासून आहे. आणि मताधिकार असण्यापेक्षा भरलेले पोट जास्त महत्त्वाचे असेच त्यांना शिकवले गेले आहे. १९६२ चे युद्ध इ गोष्टी त्यांना शिकवलेल्याच नाहीत आणि सरकार सांगेल तीच सीमारेषा बरोबर असेच त्यानि मान्य केलेले आहे. या उलट जपान आणि कोरिया( आता दक्षिण कोरिया) यांच्या बरोबरच्या युद्धात झालेली हार आणि त्यांनी चिनी जनतेवर केलेले अत्याचार यामुळे चिनी माणूस जपान आणि कोरियाचा द्वेष करतो परंतु त्यांना भारताबद्दल फारसे काही वाटत नाही. बुद्धाची जन्मभूमी आणि आशियातील एक देश म्हणून थोडी फार आत्मीयता वाटते एवढंच. या उलट चीनने भारताशी युद्ध केले आणि गेली कित्येक वर्षे भारतीय सीमेवर सतत कुरबुरी करत असल्यामुळे भारतीय माणसाला चीन बद्दल एक तर्हेची अढी होती.त्यातून सदा सर्वदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची तळी उचलत असल्यामुळे भारतीय जनतेला चीन बद्दल संताप आहे. आणि आता कोव्हीड चीन मधून जगभर पसरल्या मुळे( कि पसरवल्यामुळे) भारतीय जनतेला जो मोठा त्रास सहन करायला लागतो आहे त्यामुळे तर भारतीय माणूस चीनचा द्वेषच करतो आहे.

हिंदूस्थानाच्या सैन्यदलाने ५०,००० चायना बॉर्डरवर मूव्ह केले आहे. आता या भागात एकुण 200,000 जवान तैनात आहेत. India shifts 50,000 troops to China border in historic move हल्लीच झालेली अग्नीची चाचणी :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।