भाग ५ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय- १२. ताजमहालावरील कोरीव लेखनकाम
भाग ५ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय
१२. ताजमहालावर जे कोरीव लेखनकाम करून केले आहे त्याची भाषा व लिपी कोणती ते? लिहिलेले वाचता येते का? कोरून लिहिलेल्या पट्टीवर कारागिरांनी आपली नावे त्यात लिहिली आहेत?
एबा कोच यांनी अरबी व फारसी भाषेत अत्युच्च दर्जाच्या लेखन शैलीच्या कारागिरांची नावे त्यांनी नोंदलेली आहेत असे आवर्जून लिहिले आहे. हे लेखन नेमके कुठे पहायला मिळेल? ते कोण यावर त्या म्हणतात...
खोट्या कबरीच्या खोलीत दक्षिणे कडील कमानीवरील पट्टीत ते सापडेल. त्यात शेंदरी चौकोनात १०४५ हिजरी असे आहे. तर खालील पिवळ्या चौकोनात अनामत खान अशी सही केली आहे. ‘नक्ष’ लेखन शैलीत आहे तर सही ‘सुलूस’ नावाच्या लिपीत सादर केली होती) (French word - cartouches - उच्चार कारतूश - सही किंवा नावासाठी दिलेली जागा) हे लेखन वाचू शकणाऱ्यांनी यावर अभ्यास करून आपले मत सांगावे की सही अरेबिकमधे आहे कि फारसीत? तारीख पुर्ण आहे की फक्त साल? कारण एबांच्या पुस्तकात संदिग्धता आहे.
*जिलूखाना इमारतीवरील इवानातील (आत गेलेला भागाच्या कमानी वरील) पिश्ताक (शीर्ष पट्टीचा भाग) उभ्या दांड्या व त्यातल्या मजकुराला आडवी लांबसर आखीव काट म्हणजे ते अरेबिक मधील कुराणातील आयते लिहिलेले आहेत. *ताजमहलाकडे जाताना ज्या दरवाज्यातून जावे लागते तो दरवाजा.
या शीलालेखातून असा काय संदेश मानवतेला दिला गेला आहे यावर एबा कोच पान २२६वर लिहितात… (Sura is 89, al-Fajr, 'Daybreak',) ताजमहालच्या शिलालेख कार्यक्रमाची थीम मृत्यूनंतरच्या जीवनावर आधारित (आहे). कुराणातील सुरा (प्रकरणे), किंवा त्यातील आयते (परिच्छेद,) (अंतिम) दिवसाच्या एकनिवाडा, दिव्य दया आणि स्वर्ग लोकांनी विश्वासू लोकांना (दिले गेलेले ) वचन आहे. याच आधारावर ताजमहाल होता असा युक्तिवाद केला जात आहे. ओ इब्न अल अरेबी यांनी गूढ चित्रात सांगितल्याप्रमाणे, देवाच्या सिंहासनाची प्रतिकात्मक प्रतिकृती बनवा. या कल्पनेच्या विरोधात बोलणार्या अनेक मुद्द्यांपैकी एक म्हणजे (सुरा २, श्लोक २५५) चे प्रसिद्ध सिंहासनाचे श्लोक. ते देवाच्या गौरवाचे गुणगान करणारे (आहेत) या शिलालेखात अनुपस्थित आहे. जेव्हा ताजमहालचे सर्व घटक एकत्र पाहता त्यामध्ये काही शंका नाही की - परमात्म्याकडे मुमताजसाठी घर तयार केल्याबद्दल देवाच्या स्वतःच्या शब्दासह, समाधीची संपूर्ण प्रतीकात्मकता त्यातून प्रकट व्हावी. (गूगलवरून सरभेसळ भाषांतराचे समजेल अशा भाषेत स्वैर रुपांतर)
यानिमित्ताने माझ्यापाशी असलेल्या कुराणाच्या मराठी प्रतीतून ताजमहालाच्या विविध भागात कोरलेल्या आयतींचा अनुवाद वाचला तो सादर करत आहे. त्या अर्थाचा संदर्भ कसा लावावा ते वाचकांनी ठरवावे.
लेडी न्यूजंट यांच्या सांगण्यावरून १८१२ साली दिल्ली वा आग्र्यातील कोणी एक मारिया नावाच्या कलाकाराकडून, हे कुराणातील सुलूस लिपीतून अरेबिक लेखन करवून घेतले गेले. त्यात सुरा ४० श्लोक ७ व ८ , सुरा ४१ श्लोक ३० व मधे (गूगलचे भाषांतर मासला म्हणून देत आहे. ‘जे स्वर्गात वचन देतात आणि जे त्यांच्या वाडवडिलांच्या पूर्वजांसमवेत योग्य मार्गाचा अवलंब करतात त्यांना सार्वकालिक बागांचा दावा करतात, पती / पत्नी आणि संतती '.
शेजारच्या फोटोत वर च्या चौकटीत शीर्षक मानले तर खाली ११ श्लोक आहेत असे वाटते.
हाच भाग मौदूदींच्या मराठी कुअरान प्रतीत असा आहे.
सुरा ४० मधील ७-९ - १२ श्लोक
सुरा ४१ मधील १९ ते ३० श्लोक -
वरील लेखाचा उद्देश असा आहे की ताज महालातील हस्तकलेच्या उन्नत लेखनशैलीची तारीफ करायला हवी. त्याच बरोबर त्या संस्कृतीच्या लेखी कुअराणामधील विचारधन काय असते यावर प्रकाश टाकला जावा. ताजमहाल पहाताना या बाबींकड लक्ष द्यायला शक्य नसते. फोटोतून पहायला मिळाले व विचारले की काय या पट्टीतील लेखनात लिहिले असते तर लोक "काय की" म्हणतात किंवा तोंडाचा चंबू करून "पुर्रर्ऱ" करून दोन्ही हातानी माहित नाही असे म्हणताना दिसतात. तसे होऊ नये ...
….
वर्गीकरण
विचार करायला लावणारे लिखाण
In reply to विचार करायला लावणारे लिखाण by दुर्गविहारी
धन्यवाद दुर्गविहारी
हागिया सोफिया आणि ताजमहाल
स्वामी
In reply to स्वामी by रमेश आठवले
स्वामी आणि ताजमहाल