Skip to main content

रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य ?

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 28/06/2019 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य? किती कार्यक्षम? एखाद्या ठिकाणचे पर्जन्यमान/ पाऊस मिलिमिटर्स अथवा सेंटिमिटर्स यांमध्ये मोजतात. रोजचा पाऊस किती झाला हे मिलिमिटर्समध्ये सांगणे सोयीचे असले तरी एखाद्या भागातला वर्षभरांत एकूण पाऊस किती हे सेंटिमिटर्स मापात सांगितल्यास तुलना करणे सोपे जाते. उदाहरणार्थ - ठिकाण - पाऊस - माप जैसलमेर - २० सेंटिमिटर्स पुणे - ४० सेंटिमिटर्स बंगळुरू - ८० सेंटिमिटर्स चेन्नई - १०० सेंटिमिटर्स कोलकाता - १५० सेंटिमिटर्स तिरुवनंथपुरम १६० सेंटिमिटर्स मुंबई - २०० सेंटिमिटर्स गोवा - २०० सेंटिमिटर्स कोची - ३५० सेंटिमिटर्स ((महाबळेश्वर - ८०० सेंटिमिटर्स मेघालय - १२०० सेंटिमिटर्स)) एक सेंमि पाऊस म्हणजे १२.५ मिलिलिटरस पाणी १२.५ चौ सेंमि (square cms area) क्षेत्रफळावर जमा होते. एका प्लॉटवर एक छोटे घर एक फुट बाइ एक फुट जागेवर साधारण नउशेतीस मिलिलिटर्स पाणी गोळा होईल. घरची गच्ची ५०० चौ फुट असेल तर एक सेंमि पावसाने ४५० लिटर्स पाणी मिळेल. वर्षभराच्या ४० सेंमि पाऊस होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी गोळा केल्यास १८००० लिटर्स पाणी मिळेल. वापर एका कुटुंबात चार जण धरून रोजचा पाण्याचा खप ५०० लिटर्स धरुया. हे १८००० लिटर्स पाणी त्या कुटुंबास ३६ दिवस पुरेल. म्हणजे वर्षभराच्या वापराच्या दहा टक्के पाणी रेन हार्वेस्टिंगने मिळाले. हे एक मध्यम पावसाच्या ठिकाणाचे उदाहरण झाले. जिथे यापेक्षाही कमी पाऊस पडतो तिथेच खरी गरज आहे. पण तेवढा पाऊस पडत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे रोजचा वापर २५० लिटर्सही केला जाईल तर तर दोन महिने पुरेल. साठवण ८ फुट बाइ ८ फुट लांब रुंद आणि ६ फुट खोल टाकी बांधल्यास त्यात ९ ते १० हजार लिटर्स पाणी साठवता येईल. अशा दोन टाक्या लागतील. प्लॉट जमिनीचा आकार ७५ फुट बाइ ६० फुट प्लॉटमध्ये १०/१०/१०/१५ फुट जागा सोडून २५ बाइ २०फुटी घर (५०० चौ फुट) ही एक आदर्श स्थिती झाली. त्यात कडेला या दोन टाक्या व एक संडासची टाकी बांधावी लागेल. मोठ्या इमारती , हौझिंग सोसायटीतील गरज तळ मजला अधिक त्यावर तीन मजले आहेत असे धरल्यास गच्चीवरच्या प्रत्येक पाचशे चौ फुट भागातील गोळा झालेले पाणी खालच्या चार रहिवाशांत वाटायचे आहे. वरच्या उदाहरणातील पाणी अर्थातच एका ब्लॉकला आठ दिवस पुरेल. अधिक मजले असतील तर आणखी वाटप कमी होईल. बाकी त्या टाक्या बांधणार कुठे हा एक प्रश्नच ठरतो. टाक्या बांधण्याचा खर्चही आहेच. केवळ टाक्या बांधणे, पाऊसपाणी साठवणे बंधनकारक केले म्हणून नागरीक ते करतीलच. गावागावांत जी पाणी अडवा जिरवा/ साठवा मोहिम अमलात आणत आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते सर्वच उघड्या जमिनीवरचे पावसाचे पाणी गोळा करून साठवतात. तसे सोसायटीच्या/इमारतीच्या आवारातील गोळा केले जाईल असे नाही वाटत. तुमचे अंदाज आणि सूचना मांडा.

वाचने 45692
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

पुनर्विकास नसला तरी ज्यांना जागा आणि पैशांनी शक्य आहे त्यांनी सुरुवात करायला हवीच. सक्तीपेक्षा समजुतदारपणा दाखवायला हवा.

भारी मांडला आहे विषय असा वेगळा विचार केल्याबद्दल आभार. मी पण पुण्याचे सरासरी पर्जन्यमान पाहीले.

खालील लिंक वर पुण्यात एकूण किती पाऊस पडतो याची सरासरी आकडेवारी दिलेली आहे. http://www.pune.climatemps.com/precipitation.php महिन्याला सरासरी ६१.८ मिमी पाऊस पडतो असे यात म्हटले आहे. वर्षाला ७४१ मिमी. म्हणजे २९.२ ईंच. थोडक्यात अडीच फुटांच्या आसपास. आपण दोन फूट धरूयात. ५०० स्क्वेअर फूट गच्ची असेल तर वर्षभरात १००० घनफूट इतके पाणी जमा होईल. म्हणजेच २८३१६ लिटर्स. एका बंगल्याचं जर आपण बोलत असू तर अलिकडे पुण्याच्या भवतालच्या परिसरार सर्रास टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. याचे मोठे अर्थकारण देखील आहे. इथे ४००० लिटर्सचे टँकर्स चालतात. एका बंगल्याला दिवसाला साधारण ५०० लिटर इतके पाणी लागते. आपण जास्त गृहीत धरूयात. १००० लिटर्स धरू. याचा अर्थ ४ दिवसाला या कुटुंबाला ८०० रू खर्च येतो. तर त्यांचे एकूण सात टँकर्स वाचतील. म्हणजे रूपये ५६०० फक्त. जर दुमजली घर असेल आणि दोन कुटुंबे असतील तर निम्मे पैसेपचास्पच्। एखाद्या ११ मजली इमारतीमधे ५०० स्क्वे फूटाचे फ्लॅट्स एका विंगमधे असतील तर टॉपच्या फ्लॅटवर जेव्हढा एरिया आहे तो खालच्या फ्लॅटमधे विभागला जाईल. ( एकूण जेव्हढी टेरेस असेल त्या त्या खाली तेव्हढेच फ्लॅट्स सुद्धा असतील). म्हणजे आता हे ५६०० रूपये ११ कुटुंबात विभागले जातील. किंवा सात टँकर्स ११ कुटुंबात विभागले जात आहेत. अगदी ११ टँकर्स वाचले असे म्हटले तरी एका कुटुंबाने एक टँकर म्हणजेच प्रति फ्लॅट ८०० रूपये वाचवले असे म्हणता येईल. शासनाच्या दराने ४०० रूपये.

आता दुस-या बाजूने विचार करूयात. आमच्या सोसायटीत एका इमारतीचे ८००० स्क्वे फूट क्षेत्र आहे. अशा दहा इमारती. म्हणजे ८०००० चौफूट. गुणिले २ फूट पाऊस. १६०००० घनफूट. = ४,५३,००० लिटर्स इतके पाणी आमच्या सोसायटीत जमा होऊ शकते. अशा किमान दहा मोठ्या सोसायट्या जवळपासच आहेत. यांचेच पाणी जवळपास ४५ लाख लिटर्स इतके होईल. आमच्या गल्लीचा विचार करायचा तर दुतर्फा अंदाजे विचार केल्यास ते १ कोटी लिटर्स. आमच्या भागातल्या मुख्य रस्त्याला अशा किती गल्ल्या आहेत याची कल्पना नाही. आमचा गल्ली क्र ८० आहे. म्हणजे ८० कोटी लिटर्स. पूर्ण शहराचे किती ? कल्पना नाही. एव्हढे पाणी वाचले तर धरणावर कमी ताण येईल. पाणी वर्षभर पुरेल किंवा वाचलेले पाणी खाली सोडता येईल.

पाणी वाचवणे/अडवणे या साठी प्रयत्नं करतांना लोकांना प्रश्नं पडतात कारण हे का? कितीसं पाणी वाचणार्/वाढणार आहे ? ह्या गोष्टी मनांमधे असतात. पण सोनं वाचवायला सांगीतले तर कोणी प्रश्न विचारीत नाही का? कारण एक ग्राम सोनं वाचवलं तरी रु.३००० मिळतात/वाचतात. जर पाण्ञाची किंमतही अशीच झाली तर आपोआप लोक स्वता पाणी वाचवण्याचे /साठवण्याचे मार्ग शोधुन काढतील. पाणी हे जीवन आहे त्याविना जगु शकत नाही तरी ते अत्यंत स्वस्त आहे . ईतर अनेक गोष्टी ज्यांच्या विना आरामांत जगु शकतो त्या पाण्ञाहुन महाग आहेत आणि गंमत म्हणते त्यातल्या कित्येक बनवण्यासाठी पाणी वापरले जाते. पाणी फुकट / नाममात्र किमतीत सरकारने जनतेला उपलब्ध करुन दिले पाहिजे हा समजच घातक आहे. त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनामधे ढिसाळ्पणा आणि भ्रष्टाचार आला . जेवढा पैसा/श्रम पाणी उपलब्ध/शोधणे/ साठी लागतो तवढा लोकांकडुन मिळत नाही. म्हणुन ईतर कामे ज्यांतुन पैसा मिळतो त्यांना प्राथमिकता दिली जाते. काही वर्षांत जेंव्हा पाण्यासाठीमारामारी/युद्धे सुरु होतील तेंव्हा आपोआप पाण्ञाची बचत / रक्षण केले जाईल.