Skip to main content

फ्लॅट विकणे बाबत

लेखक अश्विनी मेमाणे यांनी शुक्रवार, 31/05/2019 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा एक फ्लॅट आहे जो आम्ही बिल्डर कडून घेतला होता. या फ्लॅटवर SBI बँकेचे लोन आहे. ज्या व्यक्तीस आम्ही फ्लॅट विकतोय तो विजया बँकेचे लोन करणार आहे. त्यांच्या बँकेच्या डिमांड प्रमाणे आम्ही sale to agreement केले आहे. जेणे करून ते लोन करून देतील. त्या व्यक्तीचे own contribution आम्हाला मिळाले आहे. विजया बँक आता आमच्याकडे बिल्डर कडून फ्लॅट घेताना ज्या receipt मिळाल्या त्याचे ओरिजिनल मागत आहे. झेरोक्स आधीच दिलेली आहे. तर त्या ओरिजिनल receipt खरंच गरजेची आहे का? आम्ही SBI लोन केले तर तेव्हा त्यांनी त्या मागितल्या नाहीत. SBI लोन असूनही विजया बँक ने भरपूर वेगवेगळे documents मागितले. आपल्या मधली जाणकार मंडळी सांगू शकतील का कि आम्ही paymnet केलेल्या recipt लोनसाठी गरजेच्या आहेत काय? धन्यवाद

वाचने 5638
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

दुर्दैवाने भारत देशात सर्व बँका साठी सारखी प्रणाली नाही सबब असं बी आय व विजया बँक यांची तुलना करण्यात मतलब नाही !

त्या ओरिजिनल receipt खरंच गरजेची आहे का हो प्रत्यक्ष बँकेचा वेगळा क्रिटेरिया आहे

हो मूळ पावत्या बंधनकारक आहे तुमच्या वेळी कदाचित तुमच्या बिल्डरने पूर्ण फाईल आधीच अप्रूव करून घेतली असेल आणि बँकेला direct (परस्पर) दिल्या असतील, माझ्या flat च्या वेळी असेच केले होते.

दर बँकेचे नियम वेगवेगळे असू शकतात. परंतू, लोन ट्रान्सफरसाठी अनेक बँकाची (पहिल्या बँकेने कर्जप्रक्रिया पुरी केलेली असल्यामुळे) तुलनेने फार सोपी प्रक्रिया असते. तुम्ही इतर दोन-तीन बँकांकडॅ चौकशी करावी हे उत्तम.

हाडेफाका ( HDFC ) बँके कडून ऋण घेताना त्यांनी मूळ पावत्या घेतल्या होत्या. ऋण परत केले तेंव्हा त्या पावत्या स कत सर्व कागदपत्रे सुस्थित एका पाकिटात बंद करून दिली होती.